दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मराठा आरक्षणाबाबत कार्यवाही न झाल्यास राज्यव्यापी ठिय्या आंदोलन !
मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा
सरकार आणि विरोधी पक्षाची मराठा समाजाला न्याय देण्याची इच्छाशक्ती नाही
मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा
सरकार आणि विरोधी पक्षाची मराठा समाजाला न्याय देण्याची इच्छाशक्ती नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 15 नोव्हेंबरपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाची कार्यवाही पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. परंतु सरकारची त्या दृष्टीने हालचाल दिसून येत नाही. त्यामुळे दिलेल्या तारखेपर्यंत सरकारने आरक्षणाची वैधानिक कार्यवाही पूर्ण न केल्यास येत्या 25 नोव्हेंबरपासून राज्यव्यापी ठिय्या आंदोलन पुकारण्यात येर्इल, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिला आहे.
मुंबईत मराठी पत्रकार संघात पाटील म्हणाले, आरक्षणासाठी रस्त्यावर मोर्चे काढले. ठिय्या आंदोलने झाली. सरकारला लाखो निवेदने दिली. परंतु तरीही कोणत्याही सरकारला, विरोधी पक्षाला मराठा समाजाला न्याय देण्याची भावना सरकारची नाही. त्यामुळे आता सरकारसोबत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कोणतीही चर्चा केली जाणार नाही किंवा बैठका घेतल्या जाणार नाहीत. आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत 25 नोव्हेंबरपासून राज्यातील आमदार व खासदारांच्या घरासमोर शांततापूर्ण ठिय्या आंदोलन सुरू करणार आहे. परळीतील ठिय्या आंदोलनावेळी सरकारने आमच्याच काही लोकांना हाताशी धरून वेगवेगळी आंदोलने केली. परंतु आता राज्यव्यापी आंदोलन होणार असून त्यासाठी एकच आचारसंहिता असेल. या आंदोलनासाठी ठोक मोर्चाचे प्रतिनिधी नेमण्यास सुरुवात झाली आहे. 1 डिसेंबरपासून हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येर्इल, असे पाटील म्हणाले.
