चंद्रभागेत बुडणार्यांना जीवदान देणार्या सुनिल कोताळकरचा शिवक्रांती संघटनेच्या वतीने सत्कार
बुडालेल्या अनेक मृतदेहांच्या शोधकार्यातही सुनिल कोताळकर याची पोलीसांना मदत
कुठल्याही साधनाशिवाय 40 फूट खोल बुडी मारण्याचे कसब
बुडालेल्या अनेक मृतदेहांच्या शोधकार्यातही सुनिल कोताळकर याची पोलीसांना मदत
कुठल्याही साधनाशिवाय 40 फूट खोल बुडी मारण्याचे कसब
चंद्रभागा नदी आणि सुनिल कोताळकर याचे अगदी बालपणापासूनचे अतूट नाते,शाळेपेक्षा आपली होडी बरी म्हणून सुनिल कोताळकरने चंद्रभागा नदी हेच आपले कार्यक्षेत्र समजले.चार प्रमुख यात्राकाळासह इतरवेळी आपल्या होडीतून भाविकांना विष्णूपद आणि गोपाळपूर दर्शनासाठी घेवून जाणे हा आपला पारंपारिक व्यवसाय करणारा सुनिल कोताळकर म्हणजे एक प्रख्यात जलतरण पटूच.चंद्रभागेच्या पात्रातील अवैध वाळू उपशामुळे पडलेले मोठ मोठया खड्यांमुळे,बंधार्याच्या परिसरात स्नानास गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तसेच आत्महत्या करण्याच्या हेतून चंद्रभागेत बुडत असलेल्या अनेकांना जीवदान देण्याचे कार्य सुनिल कोताळकर याने निरपेक्ष भावनेने केले आहे.विहरीत थेट चाळीस फुटापर्यंत कुठल्याही साधनाशिवाय बुडी मारुन अनेक मृतदेहांचा शोध घेवून पोलीसांना मदत केली आहे.अशा या जिवनरक्षकाचा शिवक्रांती संघटनेच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आ.भारत भालके,मा.उपनगराध्यक्ष नागेश भोसले व युवा नेते प्रणव परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
सुनिल कोताळकर याने कधीही आपल्या या कार्याबद्दल प्रसिध्दीची अपेक्षा केली नव्हती.अगदी निरपेक्ष भावनेने केवळ माणुसकी म्हणून आपण हे कार्य करीत आहोत अशी प्रतिक्रिया तो वेळोवेळी व्यक्त करीत असतो.मात्र आज त्याचा शिवक्रांती संघटनेने विशेष सन्मान केल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.