हुमनीस प्रतिबंध करण्यासाठी युटोपियन शुगरचे संपुर्ण सहकार्य - उमेश परिचारक
युटोपियन शुगरच्या वतीने नारायण चिंचोली येथे ऊस पिक परिसंवाद संपन्न
नारायण चिंचोली येथे युटोपियन शुगरच्या वतीने ऊस पीक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युटोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.उपसभापती लक्ष्मण धनवडे,सरपंच पोपट पाटील,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शिवाजी गुंड,तुगंतचे सरपंच अंगद रणदिवे,मा.सरपंच धर्मराज नलवडे,चेअरमन विष्णू माने,मा.उपसरपंच गहिनीनाथ चव्हाण आदी उपस्थित होते.
या वेळी बोलताना उमेश परिचारक म्हणाले की,चालू गळीत हंगामात ऊसपिकावर हुमणीचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे.त्यामुळे शेकडो एकर ऊस पिके उध्वस्त झाली आहेत.कारखान्याच्या वतीने हुमणी प्रतिबंधक विविध औषधांचा पुरवठा केला आहे.पुढील वर्षी हुमणीवर शंभरटक्के नियंत्रण मिळविण्यासाठी कारखान्याच्या माध्यमातून परदेशातून सुक्ष्म जिवाणू उपलब्ध करुन शेतकर्यांची या संकटातून कायमची मुक्तता केली जाईल.चालू गळीत हंगामात दरवर्षी प्रमाणे वीस -ऐंशी हे धोरण बदलून साठ-चाळीस हे धोरण गाळपासाठी राबवीले जाईल.त्यामुळे हुमणी बाधीत शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.तर पुढील वर्षीसाठी डिसेंबर लागण केल्या जाणार्या 8005 या ऊसास ऊसबेणे व अल्प व्याज दराने अर्थसहाय्य उपलब्ध करुन ठिबक सिंचनाची सोय केली जाणार आहे.गेल्या वर्षी गाळपास आलेल्या शेतकर्यांना दिवाळीसाठी साखर उपलब्ध करुन दिली जाणार आहे.गतवर्षीप्रमाणे याही वर्षी नारायण चिंचोली परिसरातील शेतकर्यांनी गाळपासाठी ऊस देवून सहकार्य करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण धनवडे यांनी केले.यावेळी त्यांनी नारायण चिंचोली परिसरातील ऊस उत्पादकांच्या समस्या मांडल्या.यावेळी युटोपियन शुगरचे मुख्य शेती अधिकारी धनंजय व्यवहारे,ऊस पुरवठा अधिकारी ठवरे,फाटे आप्पा,श्री खांडेकर,ऍग्री ओवरसियर संतोष कुलकर्णी,वैजिनाथ मस्के,अनिल धुमाळ,निलकंठ शिंदे,भारत गोडगे,संदीप हिंगमीरे,मा.सरपंच नितिन मस्के,विठ्ठल माने,लक्ष्मण कोले,दत्तात्रय कोले,विजय कोळेकर,ज्ञानेश्वर बरडे,राजाराम क्षिरसागर,बापू कोेले आदी उपस्थित होते.या कार्यक्रमात सैन्यदलात सेवा करुन निवृत्त झालेले दादासाहेब शिंदे व संदीप कोले यांचा सत्कार उमेश परिचारक यांनी केला.
