राष्ट्रवादी कॉग्रेसच्या ध्येयधोरणांचा प्रसार करा - खा.विजयसिंह मोहीते - पाटील
खा.मोहीते-पाटील यांच्या हस्ते सुधीर भोसले यांचा सत्कार
सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस शिवाय पर्याय नाही हे आता जनतेच्या लक्षात आले आहे.मात्र तरीही गाफील न राहता राष्ट्रवादी कॉग्रेसच्या ध्येयधोरणांचा जनतेमध्ये प्रसार करा.सुधीर भोसले यांनी आपल्या अध्यक्षीय कारकिर्दीत चांगले काम केले आहे.त्यामुेळच त्यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे.कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे राहून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष आणखी बळकट करावा असे प्रतिपादन खा.विजयसिंह मोहीते-पाटील यांनी केले.राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी सुधीर भोसले यांची फेरनिवड झाल्याबद्दल सत्कार प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष गुलाब मुलाणी,राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस संभाजी शिंदे-नाईक,किसान सभा तालुकाध्यक्ष कृष्णात माळी आदी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष गुलाब मुलाणी,राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस संभाजी शिंदे-नाईक,किसान सभा तालुकाध्यक्ष कृष्णात माळी आदी उपस्थित होते.