आरेवाडी येथील दसरा मेळाव्यात पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील हजारो समाज बांधव सहभागी होणार- संतोष सुळे


 गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत रविवारी मंगळवेढा तालुक्यात विविध गावांमध्ये बैठकांचे आयोजन 

‘टिस’च्या अहवालानंतर धनगर समाज आता निर्णायक लढयाच्या तयारीत !


 टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ (टीस) या संस्थेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण लागू करण्याचा मार्ग मोकळा होईल, असे लाल गाजर गेल्या चार वर्षांपासून सत्ताधारी भाजपच्या नेत्यांकडून दाखविले जात होते. पण टीस’चा अहवाल धनगर समाजाच्या विरोधात गेला आहे. धनगर’ व धनगड’ या दोन्ही भिन्न जाती आहेत असे अहवालात स्पष्ट नमूद केले आहे. त्यामुळे धनगर समाजाचे एसटी आरक्षण कठीण बनले आहे.सत्ता कुणाचीही असो राज्यकर्त्यांकडून धनगर समाजाचा केवळ निवडणूकीपुरता वापर केला जात आहे.राज्यात 9 टक्के इतक्या मोठया प्रमाणात धनगर समाजाची मतदार संख्या असताना व 40 टक्के मतदार संघात धनगर समाजाची मते निर्णायक असतानाही केवळ या समाजाची आश्‍वासनावर भलावण करीत आरक्षणाच्या हक्कापासून वंचीत ठेवले आहे अशी भावना या समाजात निर्माण झाली आहे.धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या आरेवाडी येथील श्री बिरोबा देवाच्या बनात होणारा यंदाचा दसरा मेळावा हा ऐतिहासीक होणार असून या मेळाव्यासाठी पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातून हजारोच्या संख्येने धनगर समाज बांधव सहभागी होणार आहेत अशी माहीती संतोष सुळे यांनी पंढरी वार्ताशी बोलताना दिली.

  धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणीचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ या नामांकित संस्थेकडून अहवाल मागविला होता. हा अहवाल गेल्या महिन्यात राज्य सरकारला सादर करण्यात आला. हा अहवाल मंत्रिमंडळाला सादर करून अहवालाच्या आधारे राज्य सरकारकडून केंद्र सरकारला आरक्षणाबाबत शिफारस करणे अपेक्षित होते. परंतु हा अहवाल नकारात्मक असल्याने या अहवालाबाबत गुप्तता पाळण्यात येत आहे. तसेच राज्यातील आदिवासी आमदारांचाही धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यास विरोध असल्याने धनगर आरक्षणाची कोंडी वाढण्याची शक्यता आहे.

       या बाबत अधिक माहीती देताना संतोष सुळे म्हणाले की,धनगर समाजातील प्रत्येक प्रमुख नेत्याची धनगर समाजास आरक्षण मिळाले पाहीजे अशी भावना आहे.मात्र गेल्या साठ वर्षाच्या काळात आरक्षणाचे अमिष दाखवून धनगर समाजाचा निवडणुकीपुरता वापर करण्यात आला.धनगर समाजाच्या आरक्षणासाठी या समाजातील अनेक नेत्यांनी संघर्ष केला.मात्र सत्ताधार्‍यांनी अतिशय चातुर्याने या समाजात फूट पाडण्याचाच प्रयत्न केला आहे.अशातच आता ‘टिस’चा अहवाल प्रतिकूल आल्याने धनगर समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.धनगर समाजाचा आरेवाडी येथील यंदाचा निर्णायक ठरणारा दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर ,उत्तम जानकर हे महाराष्ट्रव्यापी दौरा करुन जनजागृती करीत आहेत.गोपिचंद पडळकर हे रविवारी मंगळवेढा तालुक्यातील 14 गावांना भेट देवून बैठका घेवून समाजासमोर आपली भूमिका मांडणार आहेत.तरी या दसरा मेळाव्यात धनगर समाज बांधवांनी पक्षभेद,गटतट बाजुला ठेवून व राजकीय मतभेद विसरुन सहभागी व्हावे असे आवाहन धनगर समाजातील एक सामान्य कार्यकता म्हणून मी करीत आहे अशी प्रतिक्रिया यावेळी संतोष सुुळे यांनी पंढरी वार्ताशी बोलताना व्यक्त केली.      


Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव