समाधान आवताडे यांच्या पंढरपूर संपर्क कार्यालयाचे ह.भ.प.संजय महाराज मोरे यांच्या हस्ते आज उद्घाटन
संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांच्या पंढरपूरातील संपर्क कार्यालयाचे उदघाटन गुरुवार दिनांक 18 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ठिक 5 वाजता ह.भ.प.संजय महाराज मोरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे हे असणार आहेत.
चेअरमन समाधान आवताडे यांच्या संपर्क कार्यालयाच्या उदघाटनाच्या निमित्ताने येथील भक्तीमार्ग येथे वीर शिवबा काशिद फलकाचे उदघाटन,गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव करण्यात येणार आहे.समाधान आवताडे हे गेल्या काही महिन्यापासून पंढरपूर शहर व तालुक्यात प्रचंड जनसंपर्क निर्माण करण्यात यशस्वी ठरले असून कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक यांच्याशी संपर्क करण्याच्या हेतून त्यांनी पंढरपूर येथे संपर्क कार्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
जाहिरात :-
जाहिरात :-

