जितेंद्र आव्हाडाकडून महावीर मल्हारराव होळकरांची मद्यसम्राट विजय मल्ल्याबरोबर तुलना 

पंढरीत सकल धनगर समाज करणार आव्हाडांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन  



थोर पराक्रमी महापुरुषांच्या पराक्रमाने पवित्र झालेल्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड महावीर मल्हारराव होळकर यांची तुलना मद्यसम्राट विजय मल्ल्याशी करण्याचे धाडस करीत आहे मात्र या आगळीकीविरोधात धनगर समाज शांत बसणार नाही.शुक्रवारी सकल धनगर समाजाच्या वतीने पंढरीत जितेंद्र आव्हाडच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात येणार आहे अशी माहीती धनगर समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते माऊली हळणवर व धनगर समाजोन्नती मंडळाचे अध्यक्ष संतोष बंडगर यांनी पंढरी वार्ताशी बोलताना दिली.
    या देशात वाल्याचा वाल्मिकी होतो आणि मल्ल्याचा मल्हारराव होळकर होतो’ असा शब्दप्रयोग आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर केला आहे. मल्हारराव होळकरांबद्दल असे लिखाण केल्याबद्दल होळकरप्रेमी व धनगर समाजात संताप उसळला आहे.आव्हाड यांच्या या ट्विटचे स्नॅपशॉट वॉट्सअप व फेसबुकवर व्हायरल करून होळकर प्रेमींनी आव्हाड यांच्या विरोधात आग ओकणा-या शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. ‘बघा या भ्रष्टवादी वाल्यांची समाजाबद्दल असणारी भावना’, जितेंद्र आव्हाड महाराष्ट्राला कलंक आहे, वाचाळवीर अशा प्रतिक्रिया सोशल मीडियात व्यक्त करण्यात आल्या आहेत.मल्हारराव होळकर यांनी मराठा साम्राज्याचा उत्तरेत विस्तार केला. बारामतीच्या चुलत्या पुतण्याच्या जिवावर आव्हाड वाट्टेल तसे बरळत आहेत त्यांना वेळीच रोखा अन्यथा सकल धनगर समाज त्यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा यावेळी माऊली हळणवर यांनी पंढरी वार्ताशी बोलताना दिला.पंढरपूर शहर व तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी आपल्या समाजाचा इतिहास पुरुष असलेल्या मल्हारराव होळकर यांची बदनामी करणार्‍या जितेंद्र आव्हाडाचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी सकाळी ठिक 11 वाजता पंढरीतील छत्रपती शिवाजी चौक येथे उपस्थित रहावे असे आवाहन धनगर समाजनोत्ती मंडळाचे अध्यक्ष संतोष बंडगर,युवक शहर अध्यक्ष आण्णा सलगर,तालुकाध्यक्ष सोमनाथ ढोणे यांनी केले आहे.  

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव