पंढरीतील डि.व्हि.पी. उद्योग समुहाचा आता उत्तर महाराष्ट्रात दबदबा !
धाराशिव शुगर नंतर नाशिक जिल्ह्यातील कारखान्याचे संचालन आता डिव्हीपी ग्रुपकडे
अनेक नाविन्यपुर्ण कल्पना,धाडसी व्यवस्थापन आणि आव्हाने स्विकारण्याची तयारी यामुळे पंढरीतील डिव्हीपी.उद्योग समुहाने अल्पावधीतच आपल्या उद्योगविश्वास विस्तार गतीने केला असून समृध्दी ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून सुरु झालेली ही वाटचाल डिव्हीपी स्क्वेअर,डि.व्ही.पी.बझार,डि.व्ही.पी.गारमेंटस,डि.व्ही.पी.मिल्क प्राडक्टस,धाराशिव साखर कारखाना असा प्रवास करीत आता थेट उत्तर महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारीत आपला दबदबा निर्माण करणारी ठरली आहे.धाराशिव शुगरच्या युनिट क्रमांक 2 च्या माद्यमातून विठ्ठेवाडी ता.देवळा जि.नाशिक येथील वसंतरावदादा पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचलन आता डिव्हीपी.ग्रुपच्या माद्यमातून होणार आहे.या कारखान्याच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदिपन शुभारंभ राज्य सहकारी बँकेचे प्रशासकिय संचालक अविनाश महागावकर,यांच्या शुभहस्ते आज करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.डॉ.राहुल दौलतराव आहेर हे होते.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आ.जिवा पांडू गावीत, बोरसे,एन.डी.सी.सी.बँकेचे नाशिक चेअरमन केदानाना आहेर,मा.व्हा.चेअरमन संतोष मोरे,नारायण मनसेचे सोलापूर जिल्हा संघटक दिलीप धोत्रे.प.सदस्य नितिन पवार,प्राधिकृत मंडळ सदस्य धनंजय पवार,अभिमान पवार,बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डि.व्ही.पी.समुहाचे प्रवर्तक व धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील म्हणाले,की, काही मागील काळात कारखाना बंद अवस्थेत असल्यामुळे कारखानामधील सर्व काम करून येत्या 1नोव्हेंबर ला मोळी पुजन करण्यात येईल. आणि कामगारांचा पगार व उसबिल काटा पेमेंट करण्यात येईल.यावेळी या कारखाना परिसरातील ऊस उत्पादकांनी आपला विश्वास व्यक्त करीत या कारखान्यास आता पंढरीच्या विठ्ठलाच्या सानिध्यातील व्यवस्थापन लाभल्याने समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमास डिव्हीपी उद्योगसमुहाचे सर्व सदस्य व कारखान्याचे अधिकारी वर्ग व कर्मचारी शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
