शिरढोण ग्रामस्थांनी पकडलेले ‘ते’ दोन टिपर अधिकृत वाळू वाहतूक करणारे !
रात्रीच्यावेळी व्होळे येथून भरुन आलेल्या टिपरमुळे संभ्रम 

व्होळे येथून जप्त केलेली वाळू वाहतूक करीत असल्याचा तलाठ्याचा खुलासा




 पंढरपूर तालुक्यातील व्होळे येथे सातत्याने अवैध वाळू उपसा होत असतानाही येथील वाळू उपशाकडे महसूल प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आले आहे,रात्रीच्या वेळी व्होळे येथून मोठया प्रमाणात अवैध वाळू ऊपसा करणारे टिपर, ट्रॅक्टर शिरढोण मार्गे पंढरपूर शहरात दाखल होत असल्याची चर्चा नेहमीच होत असते.अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी  संबधीत गावचे पोलीस पाटील व ग्रामस्थ यांनी पुढे यावे असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी वेळोवेळी केले आहे.त्यांच्या या आवाहनास प्रतिसाद देत शिरढोण येथील ग्रामस्थांनी नुकतेच रात्रीच्या वेळी व्होळे येथून वाळू भरुन शिरढोण मार्गे आलेल्यो दोन टिपरला रोखण्याचा प्रयत्न केला असता.प्रचंड वादावादी झाल्याचे समजते.

       या वादावादी नंतर शिरढोण येथील ग्रामस्थांनी पंढरपूर ग्रामिण पोलीस ठाण्याशी संपर्क साधत या बाबत तक्रार केली.त्यानंतर या टिपरची रवानगी थेट ग्रामिण पोलीस ठाण्याच्या आवारात करण्यात आली. यावेळी योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्‍वासन ग्रामस्थांना देण्यात आले.या घटनेची माहीती मिळताच सा.पंढरी वार्ताच्या प्रतिनिधीने ग्रामिण पोलीस ठाण्याशी संपर्क करुन पुढील कारवाई बाबत माहीती घेण्याचा प्रयत्न केला असता सदर टिपर हे व्होळे येथे अवैध रित्या उपसा केलेली वाळू  घेवून पंढरपूरातील शासकिय गोडावूनमध्ये जमा करण्यासाठी निघाले होते असा लेखी खुलासा व्होळे येथील तलाठी काझी यांनी ग्रामिण पोलीस ठाण्याकडे दिला असल्याची माहीती देण्यात आली.

       या बाबत पंढरी वार्ताच्या प्रतिनिधीने या घडामडोडीत प्रत्यक्ष सहभागी असलेल्या ग्रामस्थांशी संपर्क केला असता या रस्त्यावरुन नेहमीच व्होळे येथून अवैध वाळू उपसा करणारी वाहने ये-जा करीत असतात.ही वाळू चोरी रोखण्यासाठी आम्ही आज पुढाकार घेतला खरा पण नेमके आम्ही अडविलेले टिपर अधिकृतरित्या वाळू वाहतूक करणारे होते हे समजल्यावर आमचाही भ्रम निरास झाला आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.व्होळे येथून वाळू घेवून निघालेले हे दोन टिपर इसबावी येथील एका बांधकामासाठी वाळू घेवून जात होते अशी चर्चा होत असतानाच व्होळे येथे अवैध वाळू उपसा करुन साठा करण्यात आलेली वाळू वाहतूक करणारे हे टिपर होते असा खूलासा महसुल प्रशासनाकडून करण्यात आल्यामुळे या चर्चेस पुर्णविराम मिळाला आहे. 

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव