श्री पुंडलिक देवस्थान ट्रस्टच्या वतीने महर्षी वाल्मिक जयंती साजरी
सुधाकरपंत परिचारक यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व कर्मचार्यांचा सत्कार
महर्षी वाल्मिक जयंतीनिमित्त श्री पुंडलीक देवस्थान ट्रस्टच्या वतीने येथील दिनदयाळ मंदीरात आयोजीत कार्यक्रमात मा.आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष बाबासाहेब अधटराव हे होते.ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही समाजातील 10 वी12 वी उत्तीर्ण 25 हुशार गुणवंत विदयार्थांचा मानचिन्ह व रोख पारितोषिक देवून सन्मान करण्यात आला. तसेच समाजातील शासकीय सेवेतील कर्मचार्यांचा व समाजासाठी विशेष योगदान दिल्याबद्दल माजी नगराध्यक्ष लक्ष्मणभाऊ शिरसट, पैलवान श्रीकांत कोताळकर, आप्पा करमकर, सुनिल कोताळकर, हभप प्रकाशबूवा अभंगराव, योग प्रशिक्षक अशोक ननवरे यांचा सुधाकरपंत परिचारक यांचे हस्ते शाल व सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला, यावेळी समाजातील 100 गरजू विदयार्थ्यांना वह्या वाटप प्रमूख अतिथिच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना सुधाकरपंत परिचारक यांनी आजच्या जयंतीचे औचित्य साधून ट्रस्टने गुणवंत विद्यार्थी, समाजासाठी चांगले योगदान देणार्या बांधवाचा व सेवानिवृत कर्मचार्यांच्या शासकीय सेवेची दखल घेत गौरव केला हे स्तुत्य आहे, कोळी समाजात अशा कार्यक्रमाने शिक्षणाचे प्रमाण वाढेल व समाज निश्चित प्रगतीकडे वाटचाल करेल असे सांगितले, ट्रस्टची नूतन इमारतीची पाहणी करुन त्यांनी देवस्थानच्या सामाजिक कार्याबद्दल समाधान व्यक्त केले, सत्कारार्थी सुरेश शिंदे सर, लक्ष्मणभाऊ शिरसट, प्रकाशबूवा अभंगराव यांनी तसेच कोळी महासंघाचे जेष्ठ पदाधिकारी अरुणभाऊ कोळी यांनी मनोगत व्यक्त केले,
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत ट्रस्टचे विश्वस्त नगरसेवक अनिल अभंगराव यांनी केले. कार्यक्रमास नगरसेवक विक्रम शिरसट, माजी नगरसेवक अनिल ज्यो. अभंगराव, कृषी उपत्न्न बाजार समितीचे माजी उपसभापती लक्ष्मण धनवडे, हरिभाऊ नेहतराव, संदिप माने, पांडुरंग सावतराव, आदि मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचा सत्कार ट्रस्टचे अध्यक्ष मारुती संगितराव, सचिव महादेव अधटराव, उपाध्यक्ष सतिश नेहतराव, खाजिनदार सुरेश परचंडे, उत्तम परचंडे, गणपत नेहतराव, दत्तात्रय कांबळे या पदाधिकार्यांनी केला, आभार सतिश नेहतराव यांनी मानले,या कार्यक्रमास महादेव कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
