राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या वतीने विश्‍वनाथ कराडांच्या प्रतिकामत्मक पुतळ्याचे दहन 
वाखरी येथील ‘एमआयटी’च्या बांधकामाची चौकशी करण्याची निवेदनाद्वारे मागणी
  




एमआयटीचे सवेसर्वा विश्‍वनाथ कराड यांनी छत्रपती शिवरायांबद्दल काढलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध करीत वाखरी येथील एमआटी संस्थेच्या प्रवेशद्वारात आज राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या वतीने विश्‍वनाथ कराडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.यावेळी कराड यांच्या अधिपत्याखालील वाखरी येथील संस्थेचे बांधकाम बेकायदेशीर असून त्याची चौकशी करण्यात यावी व तातडीने कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या कार्यालयात देण्यात आले.
     या बाबत अधिक माहीती देताना  राष्ट्र्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अरुण आसबे म्हणाले की,राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष विक्रांत माने यांच्या नेतृत्वाखाली व राजूबापू पाटील,ऍड.दीपक पवार, सुधीर भोसले, दीपक वाडदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाखरी येथे हे आंदोलन करण्यात आले. याची दखल घेवून कराड यांनी लवकरात लवकर माफी मागावी,व बेकायदेशीर बांधकामाची चौकशी लवकर करून कारवाईचे आदेश प्रांताधिकारी यांनी द्यावेत अन्यथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पंढरपूर तालुक्याच्या च्या वतीने उग्र आंदोनलन छेडलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आल्याचे त्यांनी सांगीतले.
 यावेळी रंजना ताई हजार,अनिता पवार ,संगीता पाटील,चारुशीला कुलकर्णी,संकेत ढवळे,अरुण आसबे गुलाब भाई ,संदीप गाजरे,राम माने,शहाजी पाटील,शाहूराजे भोसले,राहूल गायकवाड,सचिन गाजरे,सचिन घुले,सचिन जाधव,गोपाळ जाधव, राहुल गायकवाड नवनाथ आसबे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव