पंढरीतील ‘त्या’ भुरट्यांना ‘डॉन’ होण्याची स्वप्ने पुन्हा पडू देवू नका !

प्रपंचग्रस्तांना भीती खणार्यांना रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सक्षम भुवैकुंठ पंढरी नगरी,महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी.समतेची शिकवण देणार्या संताचे माहेरघर. मात्र या पंढरीस लागलेला कलंक म्हणजे येथील भुरटेगीरी.या भुरटेगीरीचा दाहक अनुभव अनेकांना आला असला तरी नसती कटकट नको म्हणुन ’आम आदमीत्याकडे त्याकडे दुर्लक्ष करतात.आणि त्यामुळेच या भुरट्यांना एक प्रकारे प्रोत्साहन मिळत जाते.व ते पुढे डॉन’होण्याची स्वप्ने पाहु लागतात.
विनासायास,विनाकष्ट मोठे होण्याची स्वप्ने या शहरातील अनेक तरुण बाळगत असल्यासाचे दिसुन येते.या भुरट्यांमध्ये ‘विवेक’ उरलेला नसल्यामुळे या गोष्टी त्यांच्या समजुतीच्या बाहेर असतात.भुरटेगीरी करणार्यांना सर्वसामान्य नागरिकांकडून विरोध होत नसल्यामुळेच त्यांच्यातील धाडस पुढे वाढत जाते आणि त्याचा त्रास याच सर्वसामान्य छोटा मोठा व्यवसाय करुन पोट भरणार्यांना सहन करावा लागत असतो.
पंढरपूर शहरात भुरटया दादागीरीच्या घटना वारंवार घडत असतात मात्र याची तक्रार पोलीस ठाण्यापर्यंत जातेच असे नाही.ज्या व्यवसायीकांना हा त्रास सहन करावा लागतो ते ‘‘रोज उठुन तोंड बघायेचे,कुठे कटकटी वाढवा ’’ असा सोयीस्कर विचार करुन तक्रार करण्यास धजावत नाहीत.तर प्रपंचाच्या गरक्यात अडकलेला सामान्य नागरिक या भुरट्यांच्या भुरटेगीरीकडे दुर्लक्ष करत राहतो हे या शहरातील भिषण वास्तव आहे.
पोलीस खात्याच्या द्रष्टीने या भुरटेगीरीला आळा घालणे ही अतिशय किरकोळ बाब आहे मात्र जो पर्यंत सामान्य नागरिक तक्रार करीत नाहीत तोपर्यंत हे रडगाणे असेच चालू राहणार आहे. भुवैकुंठ अशी ओळख असणार्या पंढरी नगरीतील या राक्षसी प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी चांगले पोलीस अधिकारी सद्या पंढरपूर शहरारास लाभले आहेत मात्र जनतेनेही भीती न बाळगता तक्रार देण्यासाठी पुढे आल्यास कारवाई करणे शक्य होणार आहे.अन्यथा मुकपणे अन्याय सहन करणारे येथील नागरिक आपल्या बुजरेपणामुळे गुंडगीरी,भुरटेगीरी बाबत येथील पोलीस प्रशासनास जबाबदार धरण्याचा नैतीक अधिकार गमावून बसणार आहेत.
- फिरस्ता पंढरपूरकर