महर्षी वाल्मिक कर्मचारी संघटनेच्या वतीने महर्षी वाल्मिकी जयंती साजरी

आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा व कर्मचार्‍यांचा सत्कार
  
          

महर्षी वाल्मिक कर्मचारी संघटनेच्या वतीने महर्षी वाल्मिकींच्या जयंती निमित्त प्रतिमेचे आमदार प्रशांतराव परिचारक यांचे शुभहस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.नगरसेवक गणेश अधटराव हे होते.इसबावी येथील फणसेकर महाराज मठात आयोजीत या कार्यक्रमात कोळी समाजातील मार्च 2018 दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देवून आ.परिचारक यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला व शासकीय सेवानिवृत कर्मचारी तसेच निरपेक्ष वृत्तीने समाजसेवा करणार्‍या समाजबांधव मधूकर आंबेकर, गोपाळ अभंगराव, महादेव परचंडे, अरुण नेहतराव यांचा सत्कार करण्यात आला.
       याप्रसंगी आमदार प्रशांतराव यांनी कर्मचारी मंडळाच्या सामाजिक बांधलीकीचे कौतूक करीत महर्षी वाल्मिकींच्या कार्याची माहिती दिली व आजही त्यांच्या आदर्शाची फार आवश्यकता असल्याचे सांगितले, गुणवंत विदयार्थ्यानी केवळ डॉक्टर,इंजिनिअर याच क्षेत्राकडे न जाता आता देशाला विज्ञान व माहिती क्षेत्रातील संशोधक व कुशल पदवीधरांची गरज आहे ज्यामध्ये अर्थिक संपन्नता देखील व देश प्रगती करता देखील हितकारक आहे यासाठी सर्वच समाजा तील पालकांमध्ये यासाठी आता जागृती आवश्यक आहे मुलांच्या आवडीनिवडी पाहून केवळ डॉक्टर इंजिनिअर क्षेत्र न निवडता प्रशासकीय सेवा अधिकारी, विज्ञान संशोधन, क्रिडा या क्षेत्रात सुद्धा विदयार्थ्याना भवितव्य आहे असे सांगितले. कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष लक्ष्मणभाऊ शिरसट, योग प्रशिक्षक अशोक ननवरे, कोळी महासंघाचे बळवंतकर सर यांनी मनोगत व्यक्त केले. 
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष सुरेश शिंदे सर यांनी केले  कार्यक्रमास उपनगराध्यक्ष विशाल मलपे,वसंतराव नेहतराव, शिवाजी कोळी, गणेश अंकुशराव, अरुण भाऊ कोळी, सचिन शिंदे,कांबळे आदी मान्यवर तसेच कर्मचारी व महिला पालक मोठया संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नगरसेवक अनिल अभंगराव यांनी केले तर  आभार अनिल होमकुमरे सर यांनी मानले .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सचिव रामचंद्र खडाखडे, तानाजी कोळी, शंकर परचंडे, चंद्रकांत परचंडे, शामराव संगितराव आदीनी परिश्रम घेतले.. 

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव