... तर स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस परिषदेत ना.सदाभाऊ खोत यांचा सत्कार करणार !

विनाकपात 3 हजार 575 रुपये दर देवून आश्‍वासनाची पुर्तता करा !

 स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आवाहन 


 स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 27 ऑक्टोबरला जयसिंगपुर येथे होणार्‍या ऊस परिषदेची जय्यत तयारी केली आहे. मात्र त्याचवेळी सदाभाऊ खोत यांनी यावर्षी उसाला तोडणी वाहतूक वगळून 3 हजार 575 रुपये प्रति टन दर देऊ अशी घोषणा केली आहे.  त्यांचे हे जाहीर वक्तव्य सर्वत्र प्रसिद्ध झाले आहे. खोत यांनी जाहीर केल्याप्रमाणे यावर्षी 3 हजार 575 रुपये दर विनाकपात शेतकर्‍यांना द्यावा. त्यांचा स्वाभिमानीच्या ऊस परिषदेत जाहीर सत्कार केला जाईल, असे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी दिला आहे.

रयत संघटनेच्या सभेत 24 ऑक्टोबर रोजी सदाभाऊ यांनी जाहीर केलेली ही रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जाहीर करावी. त्यानंतर 27 ऑक्टोबरला जयसिंगपूर येथे होणार्‍या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेमध्ये सदाभाऊ खोत यांचा जाहीर सत्कार केला जाईल,  असे अनिल पवार म्हणाले.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव