पंढरीतील अपघात प्रवण रस्त्यांवरील वाहतूक सुरक्षेसाठी आता जिल्हाधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली समिती? 

 नगर पालीका परिसरातील अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या प्रतिनिधीचाही समितीमध्ये समावेश 

 शहरातील अपघात प्रवण असलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील रस्त्यावर दुभाजक करण्याच्या राष्ट्रवादी कॉग्रेसच्या मागणीची पुर्तता होणार ?





नगर पालीका क्षेत्रातील अपघात प्रवण रस्त्याबाबत रस्ते सुरक्षेच्या व व अपघात प्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या हेतूने एक समिती नेमण्याचा निर्णय शासनाने घेतला असून जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये नगर पालीकेचे मुख्याधिकारी,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता,शहर वाहतूक उपनिरिक्षक ,नगर पालीका क्षेत्रातील अभियांत्रीकी महाविद्यालयाचा प्रतिनिधी,नगर पालीकेचे मुख्य अभियंता यांचा समावेश असणार आहे.या बाबत शासनाने गुरुवारी घेतलेल्या शासननिर्णयानुसार लवकरच ही समिती स्थापन होणार असून त्यामुळे पंढरपूर शहरातील सर्वात अपघात प्रवण समजल्या जाणार्‍या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय रस्त्यावर  दुभाजक तयार करण्याबरोबरच तालुका पोलीस ठाणे ते प्रबोधनकार ठाकरे चौक रस्त्यावर विशेष उपाययोजना करण्यात येतील तसेच शहरानजिकच्या कासेगाव रस्ता परिसरात नगर पालीका हद्दीत व कासेगाव हद्दीत मोठया प्रमाणात नागरी वस्ती विस्तारीत झालेली आहे या रस्त्यावर अपघात टाळण्यासाठी विशेष उपायोजना केल्या जातील अशी अपेक्षा राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर भोसले यांनी पंढरी वार्ताशी बोलताना व्यकत केली आहे. 
    या बाबत बोलताना सुधीर भोसले म्हणाले की,पंढरपूर शहरातील कर्मवीर औदुंबरराव पाटील चौक ते कर्मवीर भाऊराव पाटील चौक हा रस्ता शहरातील सर्वात वर्दळीचा व धोकादायक रस्ता आहे.या रस्त्यावर झालेल्या अपघातात आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.या रस्त्यावर अपघात टाळण्यासाठी रस्ता दुभाजक करण्यात यावेत व पुरेशी प्रकाश व्यवस्था निर्माण करण्यात यावी या आशयाचे निवेदन आम्ही गतवर्षी बांधकाम विभागास व नगरपालीकेस दिले होते.मात्र या बाबत अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करण्यात येत होती.खड्डेमुक्त महाराष्ट्राची घोषणा करणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर विधानसभेत हा रस्ता अपघात प्रवण नसल्याचे वक्तव्य करुन पंढरपूरकरांच्या जखमेवर मिठ चोळले होते.आतातरी या  रस्त्यावर तातडीने रस्ता दुभाजक तयार करण्यात यावा अन्यथा राष्ट्रवादी कॉग्रेस पुन्हा आंदोलनाचा मार्ग अवलंबेल असा इशारा त्यांनी दिला.  

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव