नवरात्र महोत्सवाच्या वर्गणीवरुन झालेल्या वादात पंढरीत वृध्देस लोखंडी सळईने मारहाण
नवरात्र महोत्सवानिमित्त शक्ती देवीच्या वर्गणीसाठी पंढरीतील दत्ता फुलारे(रा.परदेशी नगर पंढरपूर) या युवकास आरोपी सुरज जगताप(रा.टाकळी रोड पंढरपूर) हा शिवीगाळ व दमदाटी करत असताना हे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या दत्ता फुलारे याच्या वृध्द आईस ‘म्हतारे तु कशाला मध्ये आलीस आता तुला जिवंत सोडत नाही’ असे म्हणत शिविगाळ करुन लोखंडी सळईने मारहाण करण्यात आली आहे.यामध्ये सुभद्रा दशरथ फुलारे(वय 80 रा.परदेशी नगर ) ही वृध्दा जबर जख्मी झाली असून आरोपीने फिर्यादीच्या दारात उभी असलेल्या एम.एच.13 बीएन 4970 या कारची तोडफोड करुन नुकसान करण्यात आले आहे अशा आशयाची फिर्याद पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास सपोनि काळे हे करीत आहेत.
