पंढरीत संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या विरोधात उग्र आंदोलन

 ना.तावडे यांच्या प्रतिमेवर मद्य ओतून केला निषेध



 सर्व शिक्षा अभियानातील ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकात संभाजी महाराजांविषयी वादग्रस्त व आक्षेपार्ह उल्लेख केल्याचा आरोप करण्यात आल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली असून राज्याच्या शिक्षण खात्याने या प्रकरणात आपली बौध्दीक दिवाळखोरी दाखवून दिली आहे.राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी याची जबाबदारी स्विकारुन राजीनामा द्यावा अशी मागणी करीत आज पंढपूरातील छत्रपती शिवाजी चौक येथे संभाजी बिग्रेडच्या वतीने विनोेद तावडे यांच्या प्रतिमेवर दारु ओतून जोडेमार आंदोलन करण्यात आले.

    सर्व शिक्षा अभियानात समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकाचा समावेश असून हे पुस्तक डॉ. शुभा साठे यांनी लिहिले आहे. पुस्तकाचे प्रकाशन नागपूरमधील लाखे प्रकाशनाने केले आहे. या पुस्तकातील पान क्रमांक 18 वर संभाजी महाराजांविषयी उल्लेख आहे. रायगडावरुन संभाजीराजांनी केलेल्या अनेक खर्‍या- खोट्या अत्याचारांच्या बातम्या समर्थांच्या कानावर येत होत्या. संभाजी राजा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता. स्वराज्याची ही अवहेलना पाहून समर्थांचे अंत:करण तिळतिळ तुटत होते. मनातला राम अखेरच्या कर्तव्याची टोचणी लावत होता. अखेर समर्थांनी संभाजीराजांना पत्र लिहिले’, असा वादग्रस्त उल्लेख या पुस्तकात आहे.त्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.

      या आंदोलनात संभाजी बिग्रेडचे विभागीय अध्यक्ष किरण घाडगे,तालुकाध्यक्ष बाळासाहेब बागल,शहराध्यक्ष स्वागत कदम,अमोल आटकळे,धनराज मोरे,नितिन शेळके,अनिल यादव,आकाश मांडवे,अनिकेत मेटकरी,शेखर आटकळे,प्रशांत सुरवसे,स्वप्निल गायकवाड,पप्पू देशमुख,राहुल देवकर,दत्तराज साळुंखे,अनिकेत कदम,सोमा गांडुळे,दिलीप बाबर,मनोज गोसवी,पप्पू चव्हाण,लखन नवत्रे यांच्यासह पंढरपूर शहर व तालुक्यातील संभाजी बिग्रेडचे असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव