पंढरपूर शहरात तापाच्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ
शहरात त्वरीत डास प्रतिबंधक उपायोजना करा
महर्षी वाल्मिकी संघ विद्यार्थी आघाडीची मागणी
शहरात त्वरीत डास प्रतिबंधक उपायोजना करा
महर्षी वाल्मिकी संघ विद्यार्थी आघाडीची मागणी
पंढरपूर शहरात गेल्या काही दिवसात तापाच्या आजाराच्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे.त्यामुळे नागरिकांच्या जिवीतास धोका उत्पन्न झाला असून डेंग्यु, मलेरिया,रक्तातील पेशी कमी होणे अशा जिवघेण्या आजारांचा सामना करीत असलेल्या रुग्णांची संख्या दरदिवशी वाढत आहे.या गंभीर प्रकाराची दखल घेवून पंढरपूर नगर पालीकेने तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा महर्षी वाल्मिकी विद्यार्थी आघाडीच्या वतीने पंढरपूर नगर पालीकेसमोर उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा महर्षी वाल्मिकी संघ विद्यार्थी आघाडीच्या वतीने पंढरपूर नगर पालीकेच्या आरोग्य अधिकार्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
या बाबत बोलताना महर्षी वाल्मिकी संघ युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष महावीर अभंगराव म्हणाले की,गेल्या काही महिन्यापासून पंढरपूर शहर व उपनगरात तापाच्या आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे.शहरात मलेरिया व डेग्यु सदृश आजाराने नागरिक त्रस्त असताना आरोग्य विभाग व नागरी हिवताप योजनेचे कर्मचारी मात्र गंभीरपणे फवारणी व डास नष्ट करण्यासाठीच्या उपाययोजना करताना दिसून येत नाहीत.हे कर्मचारी केव्हा तरी आठ पंधरा दिवसातून एकदा ठराविक ठिकाणी फवारणी करून निघून जातात.पंढरपूर नगर पालीकेच्या आरोग्य विभागाने या बाबीची गंभीर दखल घेवून तातडीने डास प्रतिबंधक व स्वच्छतेसाठी उपाय योजना कराव्यात अन्यथा महर्षी वाल्मिकी संघ विद्यार्थी आघाडीच्या वतीने उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
हे निवेदन देताना महर्षी वाल्मिकी संघ विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश मेहेर,पप्पू भोपळे,दिनेश अधटराव,प्रशांत होनकरी आदी उपस्थित होते.
हे निवेदन देताना महर्षी वाल्मिकी संघ विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश मेहेर,पप्पू भोपळे,दिनेश अधटराव,प्रशांत होनकरी आदी उपस्थित होते.
