देशाच्या माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त व भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त पंढरपूर शहरातील इंदिरा कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी चौक येथे कॉग्रेसच्या महिला कार्यकर्त्या वनिता बनसोडे व ज्येष्ठ कॉग्रेस कार्यकर्ते मामा फलटणकर यांच्या हस्ते प्रतिमांचे पुजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन मा.शहराध्यक्ष सुहास भाळवणकर यांनी केले होते.या कार्यक्रमास मा.उपाध्यक्ष नागनाथ अधटराव,शहर अल्पसंख्याक अध्यक्ष अशपाक सय्यद,ज्येष्ठ नेते प्रताप रजपूत,देवानंद इरकल,दत्ता झरकर,राजेंद्र उराडे,रफिक पिरजादे,ज्ञानेश भेंकी,सुरज कुकडे,आनंद भागानगरे,सुनिता गवळी,लक्ष्मी कबाडे,प्रमिला कबाडे यांच्यासह कॉग्रेेसचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर महाराष्ट्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमल बजावणी सुरु आहे.या अभियानाअर्तंगत राज्यामध्ये ज्या कुटुंबाकडे शौचालय नाही अशा कुटुंबाना शौचालयाची सुविधा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी शासनाची पार पाडणे याच बरोबर शहर स्वच्छ ठेवणे या दोन्ही जबाबदार्या स्थानिक प्रशासनाने पार पाडणे या हा या अभियानाचा राज्य शासनाचा मुख्य हेतू आहे.राज्य शासनाने संपुर्ण महाराष्ट्राचा शहरी भाग हा 1 ऑक्टोंबर 2017 रोजी राष्ट्रपतींच्या उपस्थितीत हागणदारी मुक्त करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. या नंतर आता शासनाचे स्वच्छ महाराष्ट्र धोरणानुसार ‘कचरा लाख मोलाचा’ हे ब्रीद घेवून शहरे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी शासनाने नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी बंधनकारक केली आहे. ‘कचरा लाख मोलाचा’हे लक्षात घेवून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगर पालीकेने ठोस उपाययोजना करण्याबरोबरच जे नागरिक यास सहकार्य करीत नाहीत त्यांच्यावर थेट दंडात्मक कारवाई करावी असे आदेश शासनाने 30 डिसेंबर रोजी निर्गमीत केले आहेत.त्यानुसार आता पंढर पूर शहरात उघडयावर कचरा टाकणा...
