- Get link
- X
- Other Apps
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुतन कार्यकारणीची निवड जिल्हा अध्यक्ष मा.आ.दिपकआबा साळुंखे-पाटील व जिल्हा सरचिटणीस लतीफ तांबोळी यांचे सुचनेनुसार जिल्हा कार्याध्यक्ष राजुबापु पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत घोषीत करण्यात आली. याप्रसंगी शहराध्यक्ष सुधीर भोसले व कार्याध्यक्ष दिगंबर सुडके उपस्थित होते.
नुतन पदाधिकारी पुढील प्रमाणे उपाध्यक्ष गिरिष चाकोते, सचिन कदम, सचिन जाधव, आण्णा कोळी, प्रा. विजय गायकवाड, वसीम शेख, सरचिटणीसपदी प्रकाश थिटे, अमित स्वामी, अशिष तांबोळी, सचिवपदी विजय काळे, सहसचिव कपिल कदम आणि संघटकपदी सचिन सोळंकी, दत्तात्रय माने यांची तर कार्यकारणी सदस्य मल्हारी पवार, सतिश भोसले, धनंजय लकडे आणि प्रजोत भोसले यांची निवड करीत असल्याचे सुधीर भोसले यांनी जाहीर केले.
या सर्व पदाधिकार्यांना राजुबापू पाटील यांचे हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले. या प्रसंगी ग्रा.पं.सदस्य धोंडिराम पाटोळे, संकेत ढवळे, डॉ. अमरजीत गोडसे, कृष्णात माळी, गुलाब मुलाणी, रशिद शेख, सलिम मुलाणी, रणजीत पाटील, अरूण आसबे-पाटील, सुरज पेंडाल, साधना राऊत, रंजना हजारे आदी पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या प्रसंगी राजुबापू पाटील यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक विजय काळे यांनी तर उपस्थितांचे आभार गिरिष चाकोते यांनी मानले.
- Get link
- X
- Other Apps
