राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या तालुका कार्याध्यक्षपदी आदम मुजावर,सचिवपदी युसुफ शेख तर उपाध्यक्ष पदी सैफन मुजावर


राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या तालुका कार्याध्यक्षपदी आदम मुजावर,सचिवपदी युसुफ शेख तर उपाध्यक्ष पदी सैफन मुजावर



 राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या पंढरपूर तालुका कार्याध्यक्षपदी आदम महामूद मुजावर,सचिव युसूफ अब्दुल रहमान शेख तर तालुका उपाध्यक्षपदी सैफन सत्तार मुजावर यांची निवड करण्यात आली आहे.येथील शासकिय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी कॉग्रेसचे सोलापूर जिल्हा निरिक्षक हुजूरभाई इनामदार,अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष ऍड.वजीर शेख यांच्या हस्ते या निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादीचे मंगळवेढा पंढरपूर विधानसभा अध्यक्ष दिपक वाडदेकर,शहराध्यक्ष सुधीर भोसले,जि.प.सदस्य अतुल खरात,राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण आसबे,सलिम मुलाणी,शहराध्यक्ष रशीद शेख,उपाध्यक्ष शाहरुख मुलाणी,महंमद मुलाणी,अतिक मुलाणी आदी उपस्थित होते.
     यावेळी बोलताना राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष गुलाब मुलाणी म्हणाले की,सद्या या सत्ताधारी शासनाच्या  ध्येयधोरणाबद्दल जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे.राज्यात त्रीव दुष्काळाच्या झळा जाणवत असताना केवळ स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात हे सत्ताधारी मग्न आहेत.राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि विजयदादा यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉग्रेस अधिक बळकट करण्यासाठी अल्पसंख्यांक समाजांनी संघटीत होत राष्ट्रवादीच्या पाठीशी उभा राहणे गरजेचे आहे.गटबाजी आणि मतभेद बाजुला सारत आता आपणास सर्वसामान्य जनतेच्या हितासाठीचा लढा आणखी प्रबळ करावयाचा आहे.या नुतन पदाधिकार्‍यांकडून आम्हास याच अपेक्षा आहेत.
       यावेळी या नुतन पदाधिकार्‍यांचा उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव