श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती येथे दिनांक 31आॅक्टोंबर रोजी पार पडलेल्या निवड चाचणीत *समर्थ साहेबराव नागणे याची दिल्ली येथे होणार्या राष्ट्रीय हाॅलिबाॅल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.* या निवड चाचणीत त्याने महाराष्ट्र राज्यातून 13 वा क्रमांक प्राप्त केला. समर्थ हा सध्या राहुल गांधी माध्यमिक विद्यालय,कोर्टी येथे इयत्ता 8 वी मध्ये शिकत आहे. या यशाबद्दल त्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कोंडलकर सर, उपाध्यक्ष नवले सर, मुख्याध्यापक लवटे सर, संचालक जानकर सर, काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष नागेश फाटे, विठ्ठल चे संचालक सूर्यकांत दाजी बागल, भाजपाचे तालुकाध्यक्ष श्रीकांत बागल, माजी सरपंच महादेव बागल, बिल्डर दत्ता बागल, गादेगांव ग्रामपंचायत सदस्य गणेश बागल, सुभाष नागणे, शिवाजी नागणे यांनी कौतुक केले.
यासाठी त्याला क्रीडाशिक्षक पांडागळे सर, सोमनाथ बागल (सर) लाभले तर मोगल सर, पांढरे मॅडम, जाधव मॅडम आदिनीं अभिनंदन केले.
समर्थ हा उपरीचे प्रसिद्ध पैलवान व हनुमान दूध डेअरीचे चेअरमन साहेबराव नागणे यांचा मुलगा आहे.