Posts

Showing posts from October, 2017

ना.चंद्रकांत पाटील यांनी.... निवेदन घेतले, ऐकून घेतले नाही !

Image
पंढरपूर (प्रतिनिधी) ः - चंद्रभागेच्या पात्रात अवैध वाळू उपश्यामुळे पडलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यूमुखी पडलेल्या चार बालकांच्या कुटुंबियास शासनाकडून आर्थिक मदत दिली जाईल असे आश्‍वासन प्रत्यक्ष विधानसभेत दिले गेले होते. मात्र पंढरपूर तहसिल कार्यालयाकडून चुकीचा अहवाल पाठविण्यात आल्यामुळे दुर्घटनाग्रस्त कुटुंब शासकीय मदतीपासून वंचित राहिले होते. या कुटुंबास शासनाकडून जाहीर झालेली मदत तात्काळ देण्यात यावी या मागणीचे निवेदन आज राज्याचे महसूल तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले. मात्र याबाबत काहीही ऐकून घेण्याची त्यांची मनस्थिती नसल्याचेच दिसून आले असून त्यामुळे आता न्यायालयीन लढा लढण्याशिवाय पर्यायच उरला नसल्याचे दिसून येत आहे. तर त्या ‘चार’ बालकांच्या मृत्यूनंतरही चंद्रभागेत अवैध वाळू उपश्यामुळे खड्डे पडतात हे मान्यच करायला येथील तहसिल कार्यालय नकार देत असल्याचे त्यांनी या घटनेबाबत तयार केलेल्या दुरूस्ती अहवालामधून दिसून येत आहे. त्याबाबतही माहिती देण्याचा प्रयत्न केला असता, ना.चंद्रकांत पाटील यांनी ऐकून घेण्यास नकार दिल्याचे दिसून आले. पंढरपूर तह...

News

Image

पांडुरंगा.. भयमुक्त कर तुझे पंढरपूर

Image
पांडुरंगा..  भयमुक्त कर तुझे पंढरपूर !  (सा. पंढरी वार्ता विशेष ) जेव्हा नव्हते चराचर । तेव्हा होते पंढरपूर ॥ हे संतानी अभंगातून सांगीतले हे पंढरपूरकर अभिमानाने सांगताना दिसून येतात तर या मराठी मातीतील जन्मलेला प्रत्येक  सज्जन पंढरपूरला आपले माहेर म्हणून संबोधताना दिसून येतो.जेव्हा आम्ही कळते झालो तेव्हा आम्हासही पंढरपूरची हीच महती व्यक्त करावीशी वाटली आणि जेथे जावू तेथे आम्ही आता हीच महती सांगत असलो तरी एक वेदना आमच्या मनामध्ये आजही कायम आहे.जेव्हा आम्ही शालेय विद्यार्थी होतो नंतर तरुण होतो तेव्हा पंढरपूर सोडून बाहेर कुठे गेलो की इथल्या गुंडगीरीबाबत आम्हास उत्सुकतेने विचारले जायचे.अमुक दादा,तमुक नाना यांच लईच हवा आहे म्हण तुमच्या पंढरीत असं जेव्हा विचारलं जायचं तेव्हा सार्‍या भुमंडळाचा डॉन जिथं कमरेवर हात ठेवून मी आहे अशी साक्ष देत आहे तीथं अजुन कुणाचीतरी महती वर्णन केली जात होती याचं दु:ख आम्हास कळंत झाल्यावर वाटायला लागलं.गाव तिथं गुंड ही संज्ञा अनादी काळापासुन चालत आली आहे.पण पंढरपूर हे गाव नाही तर भाविकांचे माहेरघर आहे,भुवैकुंठ आहे अशी अपार श्रध्दा अस...

नांदोरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.रूक्मिणी रघुनाथ भिंगारे यांची बिनविरोध निवड संपन्न झाली!

Image
नांदोरे ग्रामपंचायतीच्या आज झालेल्या एक वर्षा करीता झालेल्या सरपंचपदाच्या निवडी करता सौ.रूक्मिणी भिंगारे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली  यावेळी मावळत्या सौ.मनिषा  माणिक माने यांनी यापदाचा आगोदरच (04-09-2017)रोजी राजिनामा दिला होता त्या नंतर आज नविन सरपंच पदाची निवडनुक प्रक्रिया पार पडली यावेळी पंढरपुर तहसिल कार्यालयाकडुन निवडनुक निर्णय आधिकारी म्हणुन एस.एम.काझी यांनी काम पाहीले.व ग्रामसेवक प्रशांत भा.कुंभार यांनी सहकार्य केले वळी सर्व सनमानिय मान्यवरांचे सत्कार समारव  पार पडले.यावेळी उपसरपंच सौ.सुलभा सत्यवान माने(कोळी) हे सुध्दा उपस्थित होते.यावेळी विजय(भाऊ)भिंगारे,  संचालक शिवाजी साळुंखे,मा.उपसरपंच ज्ञा नेश्वर दत्तु सातुरे,माणिक आबा माने, सोमनाथ.मा.भिंगारे,संतोष पं भिंगारे,आशोक भिंगारे,मा. सरपंच बापु नाना माने,समाधान सरवदे,युवराज सातुरे,युवराज भिंगारे,सचिन पो.कदम(तंटामुक्ती अध्यक्ष),बाबुराव कदम,भिमराव वाघ मा.सरपंच,शिवाजी वसंत साळुंखे,प्रकाश मो.भिंगारे(तलाठी),सुरज बा.कांबळे,बापु गं.कांबळे(शिपाई),चंद्रकांत कांबळे(कोतवाल) व आदी मान्याव...

वारकरी केंद्र बिंदू मानून पंढरपूरच्या विकासास प्राधान्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

Image
वारकरी केंद्र बिंदू मानून पंढरपूरच्या विकासास प्राधान्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील पंढरपूर दि. 30 :-  पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने येणाऱ्या वारकरी-भाविकांना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य दिले आहे. राज्य शासन  वारकरी केंद्र बिंदू मानून पंढरपूर, पालखी मार्ग, पालखी तळांचा विकास करीत असल्याची माहिती महसूल, मदत व पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली.             कार्तिकी एकादशी निमित्त शासकीय महापुजेसाठी महसूल मंत्री श्री. पाटील पंढरपूर येथे  आले असून त्यांनी यावेळी पंढरपूरातील विविध मठांना भेटी दिल्या त्या प्रसंगी मठातील महाराज, वारकरी,फडकरी यांच्या संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख, आमदार प्रशांत परिचार, मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, शेखर चरेगावकर, श्रीकांत भारतीय, माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, सहायक पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, तहसिलदार मधुसूदन बर्गे यांच्यासह मा न्य व र पदाधिकारी,...

राज्यातील जनतेला सुख व सुरक्षा मिळू दे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे श्री विठ्ठल चरणी साकडे

Image
रा ज्यातील जनतेला सुख व सुरक्षा मिळू दे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे श्री विठ्ठल चरणी साकडे पंढरपूर दि. 31 :-  राज्यातील जनतेला सुख व सुरक्षा मिळू दे, असे साकडे महसूल, मदत व पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी  कार्तिकी  एकादशीच्या शासकीय महापुजेच्या वेळी श्री विठ्ठल चरणी घातले.             पंढरपूर येथे कार्तिक एकादशी निमित्त श्री विठ्ठल- रुक्मिणीची शासकीय महापुजा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी अंजली पाटील यांच्या हस्ते  संपन्न झाली. शासकीय महापुजेस महसूल मंत्री श्री. पाटील यांच्या समवेत मानाचे वारकरी म्हणून उपस्थित राहण्याचा मान कर्नाटक राज्यातील विजापूर तालुक्यातील हडगल्ली येथील बळीराम शेवू चव्हाण (वय 40 वर्षे) आणि त्यांच्या पत्नी शिनाबाई बळीराव चव्हाण (वय 35 वर्षे) या वारकरी दांपत्याला मिळाला.             शासकीय महापुजेनंतर विठ्ठल-रुक्मिणी  मंदिर समितीच्यावतीने  आयोजित सत्कार समारंभ...

हिंदुस्थान हा फक्त हिंदू धर्मीय लोकांचा देश नाही तर इतर धर्मीय लोकांचाही देश

Image
इंदूर- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शुक्रवारी इंदूरमधील एका महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करताना हिंदुस्थान हा फक्त हिंदू धर्मीय लोकांचा देश नाही तर इतर धर्मीय लोकांचाही देश आहे. ज्याप्रमाणे जर्मन लोकांचा देश जर्मनी आहे, ब्रिटिशांचा देश ब्रिटन आहे, अमेरिकन नागरिकांचा देश अमेरिका त्याचप्रमाणे हिंदुस्थान हा हिंदूंचा आहे. पण हा देश फक्त हिंदूंचा नाही तर इतर धर्मीयांचाही असल्याचे वक्तव्य केले आहे. देशाला महान कुठलाही एक नेता किंवा एक पक्ष बनवू शकत नाही, तर त्यासाठी समाजाचे मोठे योगदान असावे लागते, असेही मोहन भागवत यांनी म्हटले आहे. पूर्वी लोक काहीही समस्या जाणवू लागल्यावर देवाकडे साकडे घालायचे किंवा देवाला दोष द्यायचे. पण सध्या कलियुग आहे त्यावेळी सरकारला दोष लोक देतात. पण सरकारला जेव्हा समाजाची योग्य साथ मिळते तेव्हाच सरकारला लोकांच्या समस्या निवारण्याचे काम योग्यपणे करता येते, असेही भागवत यांनी म्हटले आहे. जगातील महासत्ता होण्याची क्षमता भारतामध्ये आहे. महासत्ता व्हायचे असेल तर जनतेला आपल्या डोक्यातून आणि मनातून भेदभाव हा शब्द काय...

प्राधिकरणाच्या चुकीच्या आराखड्याबाबत आ.भालके यांची जिल्हाधिकारी यांचेशी चर्चा

Image
प्राधिकरणाच्या चुकीच्या आराखड्याबाबत आ.भालके यांची जिल्हाधिकारी यांचेशी चर्चा पंढरपूर Live 30 september  2017