Posts

Showing posts from November, 2018

अनवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुनिता महादेव सुर्यवंशी यांची बिनविरोध निवड

Image
अनवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुनिता महादेव सुर्यवंशी यांची बिनविरोध निवड                     अनवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे-आ.भालके-आ.परिचारक आघाडीच्या सुनिता महादेव सुर्यवंशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.मंगळवारी अनवली ग्रामपंचायतीच्या कार्यालयात उपसरपंचपदाच्या निवडीसाठी झालेल्या निवड प्रक्रियेत उपसरपंचपदासाठी सुनिता महादेव सुर्यवंशी यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणुक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी श्री माने  आणि सह.निवडणुक अधिकारी निवडणुक अधिकारी तथा तलाठी गुटाळ व ग्रामसेवक श्री महानवर प्रक्रिया पुर्ण करुन सुनिता माने यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषीत केले.        या निवडीनंतर बोलताना नुतन उपसरपंच सुनिता सुर्यवंशी यांच्या समर्थकांनी गुुलालाची उधळण करीत आनंद व्यक्त केला.यावेळी सत्कार स्विकारताना नुतन उपसरपंच सुनिता सुर्यवंशी म्हणाल्या की,उपसरपंच पदाच्या माध्यमातून माझ्यावर ग्रामस्थांनी मोठी जबाबदारी सोपवीली आहे.ग्रामस्थांचा विश्‍वास सार्थ करण्यासाठी अनवली ग्रामस्थांच्या मुलभ...

राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या तालुका कार्याध्यक्षपदी आदम मुजावर,सचिवपदी युसुफ शेख तर उपाध्यक्ष पदी सैफन मुजावर

Image
राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या तालुका कार्याध्यक्षपदी आदम मुजावर,सचिवपदी युसुफ शेख तर उपाध्यक्ष पदी सैफन मुजावर   राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या पंढरपूर तालुका कार्याध्यक्षपदी आदम महामूद मुजावर,सचिव युसूफ अब्दुल रहमान शेख तर तालुका उपाध्यक्षपदी सैफन सत्तार मुजावर यांची निवड करण्यात आली आहे.येथील शासकिय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी कॉग्रेसचे सोलापूर जिल्हा निरिक्षक हुजूरभाई इनामदार,अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष ऍड.वजीर शेख यांच्या हस्ते या निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादीचे मंगळवेढा पंढरपूर विधानसभा अध्यक्ष दिपक वाडदेकर,शहराध्यक्ष सुधीर भोसले,जि.प.सदस्य अतुल खरात,राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण आसबे,सलिम मुलाणी,शहराध्यक्ष रशीद शेख,उपाध्यक्ष शाहरुख मुलाणी,महंमद मुलाणी,अतिक मुलाणी आदी उपस्थित होते.      यावेळी बोलताना राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष गुलाब मुलाणी म्हणाले की,सद्या या सत्ताधारी शासनाच्या  ध्येयधोरणाबद्दल जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे.राज्यात त्रीव दुष्काळाच्या झळा जाणवत असताना केवळ स्व...

अजिंक्य स्पोर्टस अकॅडमी च्या मानसी महाडिकचे राष्ट्रीय स्पर्धेत सुयश

Image
अजिंक्य  स्पोर्टस अकॅडमी च्या मानसी  महाडिकचे राष्ट्रीय स्पर्धेत सुयश                रांची झारखंड येथे सुरू असलेल्या 34 वी ज्युनिअर राष्ट्रीय मैदानी स्पर्धा मध्ये मानसी महाडिक अडथळा मध्ये *कांस्य पदक पटकावला तर  संतोषी देशमुख थाळीफेक मध्ये राष्ट्रीय क्रमवारीत 5 व्या स्थानी राहीली त्या बद्दल  कर्मयोगी मा.ना सुधाकरपंत परिचारक जिल्हाचे आमदार प्रशांत  परिचारक युटोपियन चे चेअरमन उमेश परिचारक यांनी अभिनंदन केले या दोघीही  अजिंक्य स्पोर्ट अकॅडमी चा मैदान वर अजिंक्य स्पोर्टस् अकॅडमी कार्याध्यक्ष प्रा.सुभाष मस्के सर यांच्या मार्गदर्शनखाली ती तिचे मुख्य प्रशिक्षक चेतन धनवडे सर  सराव करून घेत आहेत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा डॉ सोहनी सर यशवंत विद्यालय मुख्याध्यापक श्री शेवाळे सर राज्य अथलेटिक्स संघटनेचे खजिनदार जिल्हा सचिव प्रा.राजू प्याटी  प्रा. फुले जेष्ठ क्रीडा मार्गदर्शक गजेंद्र पवार सर आबा नवले गणेश बागल तालुक्यातील सर्व  क्रीडा  शिक्षकांनी जिल्हा क्रिडा शिक्षक ...
Image
पंढरपूर,माळशिरस विधानसभा मतदार संघात गोपिचंद पडळकर आणि उत्तम जानकर ठरणार ‘गेम चेंजर’ कॉग्रेस,राष्ट्रवादी आणि भाजपाशी बांधीलकी जोपासणार्‍या गावपुढार्‍यांची मात्र होणार गोची !   आरक्षणासाठी पेटून उठलेला धनगर समाज सद्यातरी सत्ताधारी आणि विरोधकांच्या ‘आवाक्या बाहेर’?                   (विशेष आर्टीकल : राजकुमार शहापूरकर)   असे म्हणतात की दर पाच वर्षांनी धनगर समाज आरक्षणाच्या आपल्या वषानुवर्षाच्या हक्काच्या प्रश्‍नासाठी एका नव्या नेतृत्वाला जन्म देतो,नव्या नेत्याच्या पाठीशी उभा राहतो.गेल्या पन्नास वर्षापासून धनगर समाज आपल्या हक्काच्या अनुसुचीत जमातीच्या आरक्षणासाठी संघर्ष करत आला आहे.राज्यात धनगड या जमातीचे अस्तीत्वच नसताना धनगर समाजाच्या हक्काचे आरक्षण केवळ या काल्पनीक जमातीच्या अस्तीत्वास पुढे करीत नाकारले जाते अशी संतप्त भावना या समाजात आहे.धनगर समाजाच्या  आरक्षणाचा मुद्दा पहील्या प्रथम खर्‍या अर्थाने अतिशय समर्थपणे उचलला तो यशवंत सेनेने मात्र या समाजाचे दुदैव म्हणजे आता पर्यंत या समाजाने आरक्षणाच्या...
Image
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर   जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू  पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान          येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुतन कार्यकारणीची निवड जिल्हा अध्यक्ष मा.आ.दिपकआबा साळुंखे-पाटील व जिल्हा सरचिटणीस लतीफ तांबोळी यांचे सुचनेनुसार जिल्हा कार्याध्यक्ष राजुबापु पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत घोषीत करण्यात आली. याप्रसंगी शहराध्यक्ष सुधीर भोसले व कार्याध्यक्ष दिगंबर सुडके उपस्थित होते. नुतन पदाधिकारी पुढील प्रमाणे उपाध्यक्ष गिरिष चाकोते, सचिन कदम, सचिन जाधव, आण्णा कोळी, प्रा. विजय गायकवाड, वसीम शेख, सरचिटणीसपदी प्रकाश थिटे, अमित स्वामी, अशिष तांबोळी, सचिवपदी विजय काळे, सहसचिव कपिल कदम आणि संघटकपदी सचिन सोळंकी, दत्तात्रय माने यांची तर कार्यकारणी सदस्य मल्हारी पवार, सतिश भोसले, धनंजय लकडे आणि प्रजोत भोसले यांची निवड करीत असल्याचे सुधीर भोसले यांनी जाहीर केले.  या सर्व पदाधिकार्‍यांना राजुबापू पाटील यांचे हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले. या प्रसंगी ग्रा.पं.सदस्य धोंडिराम पाटोळे,...
Image
* चि.समर्थ साहेबराव नागणे याची 14 वर्षीय वयोगटातील हाॅलिबाॅल स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघात निवड * . श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती येथे दिनांक 31आॅक्टोंबर रोजी पार पडलेल्या निवड चाचणीत * समर्थ साहेबराव नागणे याची दिल्ली येथे होणार्या राष्ट्रीय हाॅलिबाॅल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. * या निवड चाचणीत त्याने महाराष्ट्र राज्यातून 13 वा क्रमांक प्राप्त केला. समर्थ हा सध्या राहुल गांधी माध्यमिक विद्यालय,कोर्टी येथे इयत्ता 8 वी मध्ये शिकत आहे. या यशाबद्दल त्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कोंडलकर सर, उपाध्यक्ष नवले सर, मुख्याध्यापक लवटे सर, संचालक जानकर सर, काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष नागेश फाटे, विठ्ठल चे संचालक सूर्यकांत दाजी बागल, भाजपाचे तालुकाध्यक्ष श्रीकांत बागल, माजी सरपंच महादेव बागल, बिल्डर दत्ता बागल, गादेगांव ग्रामपंचायत सदस्य गणेश बागल, सुभाष नागणे, शिवाजी नागणे यांनी कौतुक केले. यासाठी त्याला क्रीडाशिक्षक पांडागळे सर, सोमनाथ बागल (सर) लाभले तर मोगल सर, पांढरे मॅडम, जाधव मॅडम आदिनीं अभिनंदन केले. समर्थ हा उपरीचे प्रसिद्ध पैलवान व हनुमान दूध डेअरीचे ...
Image
चळ्यातील माने गुरुजींचा अनुकरणीय उपक्रम पालवीतील व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी केला वाढदिवसाचा खर्च           एकीकडे लाडक्या कन्येचा पहिला वाढदिवस तर दुसरीकडे अनावश्यक  खर्चाला फाटा  देवून वाढदिवस साजरा कसा करायचा?  या द्विधा मनस्थितीत होते माने गुरुजी! अखेर त्यांनी शाळेतील मुलांना आणि पालवीतील चिमुकल्यांना मुलीच्या वाढदिवसासाठी होणाऱ्या खर्चातून खाऊ, दिवाळी अभ्यासिका, इतर शैक्षणिक साहित्य आणि उपयोगी भेटवस्तू मुलगी मनस्वीच्या हस्ते त्या विद्यार्थ्यांना वाटून दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करून स्वतःचा आनंद द्विगुणीत केला त्यामुळे तालुक्यातूनच नव्हे तर जिल्ह्यामधून ‘गुरुजी असावे तर असे.’ असा सूर उमटत आहे.            त्याचे झाले असे ! चळे (ता. पंढरपूर) येथील रहिवासी असलेले पण आंबेमध्ये प्राथमिक शाळेत शिक्षक असलेले संभाजी कुबेर माने यांना गेल्यावर्षी मनस्वी नावाची एक सुस्वरूप कन्या झाली. तिचा परवा पहिला वाढदिवस होता. साजरा तर करावा लागणार, पण वाढदिवसाचा खर्च ...
Image
छावा क्रांतीवीर सेनेच्या तालुका युवक अध्यक्षपदी हणमंत घाडगे यांची निवड विविध पदाधिकार्‍यांच्याही निवडी जाहीर                  छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या आदेशानुसार आणि प्रदेश सरचिटणीस दिनकर कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा अध्यक्ष धनराज लटके,जिल्हा कार्याध्यक्ष गणेश माने यांच्या प्रमुख उपस्थितीत छावा क्रांतिवीर सेनेच्या पंढरपूर तालुका युवक अध्यक्षपदी हणमंत घाडगे, तसेच छावा क्रांतिवीर सेना रिक्षा चालक संघटनेच्या शहर अध्यक्षपदी देविदास रसाळ, शहर उपाध्यक्षपदी सचिन रेनापुरे यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा अध्यक्ष धनराज लटके,जिल्हा अध्यक्ष  युवक महादेव पवार, जिल्हा अध्यक्ष विद्यार्थी  आघाडी प्रविण घाडगे, जिल्हा कार्याध्यक्ष गणेश माने, सुरज घाडगे, देवल उघडे, पप्पू गायकवाड, उत्तम घाडगे, मुकेश वाडेकर, समाधान वाडेकर, शिवाजीराजे मोरे, सागर पवार, शुभम सुरवसे, अनिल सरडे ,अनिल चव्हाण, लखन गांडूळे, उपस्थित होते.   निवडीनंतर नुतन पदाधिकार्‍यांनी राजमाता जिजाऊ मॉं साहेब  आणि ...
Image
पंढरीत सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आदरांजली अर्पण               देशाच्या माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त व भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त पंढरपूर शहरातील इंदिरा कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी चौक येथे कॉग्रेसच्या महिला कार्यकर्त्या वनिता बनसोडे व ज्येष्ठ कॉग्रेस कार्यकर्ते मामा फलटणकर यांच्या हस्ते प्रतिमांचे पुजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन मा.शहराध्यक्ष सुहास भाळवणकर यांनी केले होते.या कार्यक्रमास मा.उपाध्यक्ष नागनाथ अधटराव,शहर अल्पसंख्याक अध्यक्ष अशपाक सय्यद,ज्येष्ठ नेते प्रताप रजपूत,देवानंद इरकल,दत्ता झरकर,राजेंद्र उराडे,रफिक पिरजादे,ज्ञानेश भेंकी,सुरज कुकडे,आनंद भागानगरे,सुनिता गवळी,लक्ष्मी कबाडे,प्रमिला कबाडे यांच्यासह कॉग्रेेसचे विविध पदाधिकारी व    कार्यकर्ते उपस्थित होते 
Image
पंढरपूर शहरात तापाच्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ शहरात त्वरीत डास प्रतिबंधक उपायोजना करा  महर्षी वाल्मिकी संघ विद्यार्थी आघाडीची मागणी               पंढरपूर शहरात गेल्या काही दिवसात तापाच्या आजाराच्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे.त्यामुळे नागरिकांच्या जिवीतास धोका उत्पन्न झाला असून डेंग्यु, मलेरिया,रक्तातील पेशी कमी होणे अशा जिवघेण्या आजारांचा सामना करीत असलेल्या रुग्णांची संख्या दरदिवशी वाढत आहे.या गंभीर प्रकाराची दखल घेवून पंढरपूर नगर पालीकेने तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा महर्षी वाल्मिकी विद्यार्थी आघाडीच्या वतीने पंढरपूर नगर पालीकेसमोर उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा महर्षी वाल्मिकी संघ विद्यार्थी आघाडीच्या वतीने पंढरपूर नगर पालीकेच्या आरोग्य अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.      या बाबत बोलताना महर्षी वाल्मिकी संघ युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष महावीर अभंगराव म्हणाले की,गेल्या काही महिन्यापासून पंढरपूर शहर व उपनगरात तापाच्या आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढ...