प्रतिबंधीत खाद्यपदार्थ विक्री करणार्या जनरल स्टोअर्सवरील कारवाईने खळबळ पंढरपूर शहरात 91 परवानाधारक तर 1409 नोंदणीकृत अन्न पदार्थ विक्रेते आहेत.तर पंढरपुर तालुक्यात 127 परवाना धारक तर 997 नोंदणीकृत खाद्यपदार्थ विक्रेते सहाय्यक आयुक्त(अन्न) पी. एम. राऊत यांचा कारवाईचा धडाका शाळा महाविद्यालय परिसरातील बेकायदा पान टपर्यांवर कारवाई करण्याबाबत पंढरपूरचे अन्न निरिक्षक मात्र उदासीन फेरीवाला असो वा स्टॉलधारक, पंचतारांकित हॉटेल असो वा हॉटेल/धाबा चालक/बार परमिटरुम अन्न पदार्थांची विक्री करण्याकरता,अन्न पदार्थ शिजवून विकण्याकरता अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए)चा परवाना आणि नोंदणी असणं बंधनकारक आहे. पण अगदी फेरीवाल्यांपासून ते पबपर्यंत अनेकजण असा परवाना न घेता, नोंदणी न करता अन्न आणि प्रतिबंधीत व नियमबाह्य उत्पादककांकडून उत्पादीत केलेले खाद्यपदार्थ विकत असल्याचं समोर येत आहे.पंढरपूर शहरात 91 परवानाधारक तर 1409 नोंदणीकृत अन्न पदार्थ विक्रेते आहेत.तर पंढरपुर तालुक्यात 127 परवाना धारक तर 997 नोंदणीकृत...