Posts

Showing posts from July, 2018

पंढरी वार्ता :- मराठा, धनगर, मुस्लीम, कोळी समाजालाआरक्षण मिळावे यासाठी कासेगाव ( पंढरपूर) येथे रस्ता रोको आंदोलन

Image
  मराठा, धनगर, मुस्लीम, कोळी समाजालाआरक्षण मिळावे यासाठी कासेगाव येथे रस्ता रोको आंदोलन  मराठा, धनगर, मुस्लीम, कोळी समाजालाआरक्षण मिळावे यासाठी कासेगाव ( चौथा मैल ) येथे पंढरपूर -- सांगोला रोड वर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.  शासनाचा निषेध म्हणून आज कासेगाव येतील समस्त जनतेने आज सकाळी पंढरपूर-- संगोलरोडवर रास्ता रोको आंदोलन सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देत केले.      या रास्ता रोको आंदोलना मध्ये कासेगावतील मराठा, मुस्लीम, धनगर व सर्व जाती- धर्मातील लोकांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. रस्ता रोको आंदोलनामुळे पंढरपूर-- संगोलरोडवरील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती.

ना.दिलीप कांबळे यांच्या आदेशानंतर कोळी महादेव जमातीचे दाखले देण्यास सुरुवात भाजपाच्या सत्ताकाळात न्याय मिळाला- गणेश अंकुशराव

Image
ना.दिलीप कांबळे यांच्या आदेशानंतर कोळी महादेव जमातीचे दाखले देण्यास सुरुवात  भाजपाच्या सत्ताकाळात न्याय मिळाला- गणेश अंकुशराव प.महाराष्ट्रातील कोळी महादेव जमातीच्या गेल्या वीस वर्षापासून रखडलेला अनुसुचीत जमातीच्या दाखल्याचा प्रश्‍न  अखेर मार्गी लागला आहे.आषाढी यात्रेपुर्वी महर्षी वाल्मिकी संघाने जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता.याची दखल घेत महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांना राज्याचे समाजकल्याणमंत्री ना.दिलीप कांबळे,पालकमंत्री ना.विजयकुमार देशमुख यांनी आमंत्रीत केले होते.यावेळी आ.भारत भालके,अदिवासी विभागाचे उपायुक्त श्री गोलाईत,प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत ना.दिलीप कांबळे यांनी  कोळी महादेव जमातीचे दाखले अडवू नयेत असे आदेश प्रांताधिकार्‍यांना दिले होते.या आदेशामुळे कोळी महादेव समाजातील अनेक रखडलेले दाखले मिळण्यास सुरुवात झाली असून यानंतर राहूल जगन्नाथ परचंडे यांना अनुसुचीत जमातीचा दाखला नुकताच प्रदान करण्यात आला आहे.हा आमच्या वीस वर्षाचा लढाईतील महत्वाचा टप्पा असून त्यामुळे आम्ही भाजपा सरकारचे आभारी आहोत ...

पंढरी वार्ता :- आरक्षणासाठी धनगर समाज नागपूर ते पंढरपूर लॉँग मार्च काढणार !

Image
  आरक्षणासाठी धनगर समाज नागपूर ते पंढरपूर लॉँग मार्च काढणार ! केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असूनही धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासंदर्भात सरकारने कुठलीही कार्यवाही केली जात नसल्याने व वारंवार खोटी आश्वासने देऊन सरकार धनगर समाजाची फसवणूक करत असल्याने धनगर समाज आता रस्त्यावर उतरणार असून  नागपूर ते पंढरपूर धनगर समाजाची जनजागरण यात्रा काढण्यात येणार आहे. 5 ऑगस्ट रोजी पुण्यात होणाऱ्या राज्यस्तरीय बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार असल्याची माहिती धनगर समाज आरक्षण समन्वय समितीच्या वतीने पांडुरंग मेरगळ यांनी सोमवारी औरंगाबादेत दिली.     धनगर समाज आरक्षण समन्वय समितीच्या राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्याची बैठक औरंगाबादेत पार पडली. यासाठी पुणे, बारामती, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, बुलडाणा, धुळे जिल्ह्यातील धनगर समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

पंढरी वार्ता :- प्रभाग क्र.९ मध्ये पिण्याच्या पाईनलाईनच्या व काँक्रीटीकरण कामाचा आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते शुभारंभ

Image
प्रभाग क्र.९ मध्ये पिण्याच्या पाईनलाईनच्या व काँक्रीटीकरण कामाचा आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते शुभारंभ प्रभाग क्रमांक ९ मधील लक्ष्मी नगर, संतपेठ येथील अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटकरण व कुंभार गल्ली ,  येथील पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईन टाकण्याच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते, नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली, उपनगराध्यक्ष विशाल मलपे, पाणीपुरवठा समिती सभापती सुप्रिया डांगे, नगरसेवक वामनतात्या बंदपट्टे, या प्रभागाच्या नगरसेविका लतिका डोके, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, पक्षनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.   यावेळी बोलताना आमदार प्रशांतराव परिचारक यांनी सांगितले की, संतपेठ भागात व विशेषत :  लक्ष्मी नगर झोपडपट्टी येथील रस्ता कॉंक्रीटीकरण करावा व कुंभार गल्ली या भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या गेली  अनेक वर्षे होती व सदर नागरिकांनी या ठिकाणी पाईपलाईन टाकुन मिळावी अशी मागणी या प्रभागाचे नगरसेवक लतिका डोके यांनी माझ्याकडे केली होती. त्य...

पंढरी वार्ता :- व्ही.एन.एस. ग्रुपचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव

Image
व्ही.एन.एस. ग्रुपचा  ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते   महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव      बांधकाम क्षेत्रात अल्पावधीतच  नावलौकिक कमावलेल्या व्हि. एन.एस.गृपच्या कार्याची दखल घेऊन इंडिया न्युज या चॅनेल ने  महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार केंद्रिय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या  हस्ते शनिवार दि.28 हाॅटेल ट्रायडेंट KBC  या ठिकाणी देण्यात आला.    इंडिया न्युज चॅनलच्या वतिने दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन महाराष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात येतो.यावर्षी बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय काम काम केल्याबद्दल व्हि. एन.एस.गृप या कंपनीला देन्यात आला या वेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, ना.  पंकजाताई मुंडे ,  प्रफुल्ल पटेल अभिनेते ॠशी कपूर, ना.  किर्ती कुल्हारी , गाईका अनुराधा पोडवाल  ईतर अनेक मान्यवर उपस्थित होते या वेळी   vns चे सचिन भोसले,संतोष वायचळ,नितिन जाधव,शितल लोखंडे,उत्तम...

पंढरी वार्ता :- खाजगी दूध संकलन केंद्रावरील धाडीत १०० किलो भेसळयुक्त दूध पावडर जप्त

Image
खाजगी दूध संकलन केंद्रावरील धाडीत १०० किलो भेसळयुक्त दूध पावडर जप्त    जिल्हा अन्न प्रशासनाची कारवाई जिल्हा अन्न प्रशासनास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सांगोला तालुक्यातील मानेगाव येथील जालिंदर अर्जुन बाबर याच्या दूध संकलन केंद्रावर टाकलेल्या धाडीत  १०० किलो Skimmed Milk Powder (किंमत सुमारे 36०००/-) हा भेसळकारी पदार्थ आढळून आला. सदर ठिकाणी दुधाचे नमुने विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित भेसळीचा संशय असलेले व योग्य तापमानास न साठविलेले दूध (१९८ लिटर) किंमत सुमारे रु.3960/- जप्त करण्यात आला व भेसळयुक्त दुधाचा साठा नष्ट करण्यात आला.व  एकूण रु. 39960/- किमतीचा साठा जप्त करण्यात आला. सदर आस्थापणेस दूध संकलन बंद करणेबाबत निर्देश देण्यात आले असून आस्थापणेचा परवाना रद्द करणेबाबत पदानिर्देशित अधिकारी यांना सादर करण्यात येईल. सदरची कारवाई सहाय्यक आयुक्त (अन्न) श्री. प्र. मा. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन अन्न सुरक्षा अधिकारी श्री. मंगेश लवटे यांनी सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी श्री. योगेश देशमुख व श्री. उमेश भुसे यांच्या सहकार्याने पार पाडली. ...

पंढरी वार्ता :- मराठा समाजाचा अंत पाहू नका ! जि. प. सदस्य शैला गोडसे यांचा इशारा

Image
 मराठा समाजाचा अंत पाहू नका ! जि. प.  सदस्या  शैला गोडसे यांचा इशारा  कुरूल जि.प.गट मतदार संघातील इंचगाव ता.मोहोळ  येथे काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मराठा समाजाच्या मागण्याचे निवेदन कामती पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक  श्री.   उंदरे यांना सर्व ग्रांमस्थाच्या वतीने देण्यात आले. *मराठा समाजाने मुंबई येथे काढलेल्या 58 व्या मुक मोर्चावेळी शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आश्वासनाची पूर्तता अद्याप झालेली नाही. म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील 50% सवलतीची अंमलबाजवणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करावी, राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठ्यांसाठी घोषित केलेल्या 16% आरक्षणाचा अध्यादेश काढून त्यांचे त्वरित कायद्यात रूपांतरण करावे, अण्णासाहेब पाटील महामंडळ योजने अंतर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत आणि कै. काकासाहेब शिंदे यांना त्वरित आर्थिक मदत देवून हुतात्मा घोषित करावे, या मागण्या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शासनाकडे वारं...

पंढरी वार्ता :- मराठा आरक्षणासाठी घटना दुरूस्ती करा ! शरद पवार यांनी सुचविला उपाय

Image
  मराठा आरक्षणा साठी घटना दुरूस्ती करा ! शरद पवार यांनी सुचविला उपाय  मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घटना दुरूस्ती करणे शक्य आहे.  घटना दुरूस्ती केली तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते. यासाठी आपण केंद्रातील व राज्यातील विरोधी पक्षांचीही समजूत काढू, केंद्रात भाजपचे स्पष्ट बहुमत आहे त्या मुळे कायदेशीर अडथळा दूर करण्यासाठी घटनादुरुस्ती करणे हा पर्याय आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी कोल्हापूर येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केली .       कोल्हापुरातील दसरा चौकात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला शरद पवारांनी हजेरी लावली तत्पूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना वरील वक्तव्य केले आहे .        गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यास आता  अतिशय उग्र लढ्याचे  रूप प्राप्त झाले असून मूक मोर्चे काढूनही सरकार दाद देत नाही हे लक्षात आल्याने मराठा युवक संतप्त झाले आहेत . एकीकडे सरकार आरक्षण देण्यात कायदेशीर अडथळा येत असल्याचे कारण पुढ...

महाराष्ट्र वक्फ मंडळाचे एजाज शेख यांच्या हस्ते पोहोरगाव येथे वृक्षारोपण

Image
महाराष्ट्र वक्फ मंडळाचे एजाज शेख  यांच्या हस्ते पोहोरगाव येथे वृक्षारोपण  महाराष्ट्र मुस्लिम वक्फ मंडळाचे औरंगाबादस्थित वरिष्ठ अधिकारी एजाज शेख व जे.के.शेख(मोहोळ)यांच्याहस्ते पोहोरगाव ता.पंढरपूर येथे    मक्का मस्जिद,हुसेनसाहेब दर्गा परिसर व कब्रस्तान परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.या वेळी ग्रा.प.सदस्य बाबुलाल सय्यद,ग्रा.प.सदस्य अयुबखान मुजावर,निजाम मुजावर, शहाजहान मुजावर,शमुसद्दीन सय्यद,समिर सय्यद,गुडूलाल सय्यद,शरीप पठाण,मुसा मुजावर,इरफान सय्यद,हिरालाल मुजावर,असिम मुजावर,मैनुद्दीन मुजावर,असिम पठाण,महामूद मुजावर,सलिम मुजावर,आदम मुजावर,महबुब मुजावर,मैनुद्दीन मुजावर,हुसेन पठाण यांच्यासह पोहोरगाव परिसरातील मुस्लिम समाजबांधव उपस्थित होते.     यावेळी बोलताना एजाज शेख म्हणाले की,निसर्गाचे सर्वधन करणे हे आपले कर्तव्य आहे.या परिसरात वृक्षारोपण केल्याने हा परिसर सुशोभीत होणार असून त्याच बरोबर येथील वातावरण आणखी प्रसन्न राहणार आहे.पोहोरगाव येथील मुस्लिम समाजाने एकत्र येवून हा एक चांगला उपक्रम राबविल्याबद्दल अभिनंदन केले.

पंढरी वार्ता :- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुस्ते येथील सचिन शिंगण या तरुणाचा जलसमाधीचा प्रयत्न प्रकृती चिंताजनक असल्याची माहीती

Image
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुस्ते येथील सचिन शिंगण या तरुणाचा जलसमाधीचा प्रयत्न    प्रकृती चिंताजनक असल्याची माहीती                           मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकार जाणीवपुर्वक राजकारण करीत असून समाजास वेठीस धरत आहे.शांततापुर्ण मार्गाने समाजाने लाखोंच्या संख्येत सहभागी होऊन मुक मोर्चे काढले तेव्हाही सरकारने मराठा समाजास केवळ आश्‍वासन देवून व प्रत्यक्षात वेगळीच कृती करुन फसवले आहे.आता मराठा समाजाच्या भावना संतप्त झाल्या असून मराठा समाजाच्या आंदोलनास पाठींबा व्यक्त करण्यासाठी सुस्ते येथील तरुण सचिन शिंगण याने  आज जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला असून या युवकास कार्यकर्त्यांनी तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.                  आपण जलसमाधी घेणार असल्याचे निवेदन सचिन शिंगण यांनी 25 जुलै रोजी येथील प्रांताधिकारी कार्यालयात दिले होते.तेव्हा पासून सुस्ते येथील या तरुणाचे मनव...

पंढरी वार्ता:- मराठा समाज आरक्षणासाठी सुस्ते येथील सचिन शिंगण या तरुणाचा जलसमाधी घेण्याचा इशारा

Image
मराठा समाज आरक्षणासाठी सुस्ते येथील सचिन शिंगण या तरुणाचा जलसमाधी घेण्याचा इशारा  मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकार जाणीवपुर्वक राजकारण करीत असून समाजास वेठीस धरत आहे.शांततापुर्ण मार्गाने समाजाने लाखोंच्या संख्येत सहभागी होऊन मुक मोर्चे काढले तेव्हाही सरकारने मराठा समाजास केवळ आश्‍वासन देवून व प्रत्यक्षात वेगळीच कृती करुन फसवले आहे.आता मराठा समाजाच्या भावना संतप्त झाल्या असून मराठा समाजाच्या आंदोलनास पाठींबा व्यक्त करण्यासाठी सुस्ते येथील तरुण दिनांक 28 जुलै रोजी सुस्ते येथे उपोषणास बसणार आहेत.यावेळी या सरकराचा निषेध म्हणून आपण जलसमाधी घेणार असल्याचा इशारा सुस्ते येथील तरुण सचिन शिंगण याने प्रांताधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.    

पंढरी वार्ता:- आमदार भारत भालके यांचा राजीनामा

Image
आमदार भारत भालके यांचा राजीनामा  मराठा,धनगर,कोळी महादेव व मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारवर डागली तोफ पहा viedo  मराठा समाज,धनगर समाज व मुस्लिम सामाजाच्या आरक्षणाच्या मागणीबाबत राज्य सरकार केवळ राजकारण करीत असून कोळी महादेव समाजासही याच भावनेने खोटी आश्‍वासने देवून सरकारकडून फसविण्यात येत आहे.केवळ राजकारण करण्याचाच सरकारचा हेतू असून अशातच महसूल मंत्री ना.चंद्रकांत पाटील हे सातत्याने मराठा समाजाच्या या आंदोलनाबाबत वादग्रस्त विधाने करीत असताना मुख्यमंत्री मात्र बोटचेपी भूमिका घेत  आहेत.सरकारच्या या धोरणामुळे मराठा समाज प्रचंड अस्वस्थ आहे.मराठा समाज,धनगर समाज रस्त्यावर उतरून आंदोलने करीत असतानाच या सरकारमधील काही मंत्री व आमदार या समाजांच्या आंदोलनाबाबत अतिशय वादग्रस्त वक्तव्य करीत आहेत.आरक्षणाच्या प्रश्‍नाबाबत सभागृहात अनेकवेळा आवाज उठवूनही हे सरकार दखल घेत नाही,रस्त्यावर उतरून आंदोलने करुनही दाद देत नाही,लाखोंच्या संख्येने शांततेत मुक मोर्चे निघाले तरीही केवळ खोटी आश्‍वासने देते.आता या सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष असताना आमदार म्हणून कार्यरत राहणे म...

पंढरी वार्ता:- जात वैधता प्रमाणपत्राबाबत आक्षेप घेतल्याने मा.उपसभापतीकडून हात तोडण्याची धमकी

Image
  जात वैधता प्रमाणपत्राबाबत आक्षेप घेतल्याने मा.उपसभापतीकडून हात तोडण्याची धमकी माजी सैनिक महादेव नागटिळक यांची पोलीसात तक्रार ग्रामपंचायत निवडणूकीत विजयी झाल्यानंतर सहा महिन्याच्या कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असतानाही ते सादर केले की नाही या बाबत तहसिलदार पंढरपूर यांच्याकडे माहीतीच्या अधिकारात माहीती घेवून सदर वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याचे आढळून आल्याने जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे रितसर तक्रार केल्यामुळे चिडून ‘तुझे हात तक्रारी अर्ज करण्यासाठी फार सळसळतात,वारंवार तक्रारी करतो’ म्हणून पंचायत समितीचे मा.उपसभापती विजयसिंह देशमुख यांनी  हात तोडण्याची धमकी दिल्याची तक्रार कासेगाव येथील माजी सैनिक व मा.ग्रामपंचायत सदस्य महादेव नागटिळक यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.या तक्रारीची प्रत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनाही देण्यात आली आहे अशी माहीती पंढरी वार्ताशी बोतलाना महादेव नागटिळक यांनी दिली आहे.             पंढरपूर तालुकयातील कासेगाव ही सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते.कासेगाव ग्रामपंचायतीच्या 2015 म...

पंढरी वार्ता:- लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचा मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरव करा

Image
  लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचा मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरव करा    खा.धनंजय महाडिक यांची लोकसभेत लक्षवेधीद्वारे मागणी  आपल्या कृतीतून आणि विचारातून समतेचा संदेश देणारे लोकराजा शाहू महाराज यांचे जिवनकार्य अद्वितीय असून या देशातील समतेच्या चळवळीस राजसत्तेचा पाठींबा मिळण्याचे सर्वप्रथम उदाहरण आहे.त्यांनी आपल्या हयातीत केलेल्या कार्याची दखल घेवून त्याना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात यावे अशी मागणी खा.धनंजय महाडिक यांनी आज लोकसभेत लक्षवेधी सुचनेद्वारे केली आहे.   महाराष्ट्राने देशाला अनेक समाज सुधारक दिल समतेची शिकवण देणारे शाहू महाराज हे लोकोत्तर पुरूष होते. समाजातल्या तळागाळातील लोकांना त्यांचा आधार वाटायचा. भारतात पहिल्यांदा सर्व समाजाच्या मुलांना शिक्षणाची आणी वसतिगृहाची सोय करून देणारे ते युगपुरूष होते. मुलीच्या शिक्षणालाही त्यांनी प्रोत्साहान दिले.ते कर्ते सुधारक होते आपल्या राज्यातील फासेपारधी ,मातंग , गारूडी यांना त्यांनी आपल्या दरबारात नोकर्‍या दिल्या एवढे करून ते थांबले नाही तर अस्पृश्यांच्या शिक्षणाची सोय करून विकासाच्...

पंढरी वार्ता:- कोळी महादेव जमातीचे दाखले अडवू नका

Image
कोळी महादेव जमातीचे दाखले अडवू नका ना.दिलीप कांबळे यांचे प्रांताधिकार्‍यांना आदेश  ठोस कार्यवाहीचे पहील्यांदाच आदेश   सामुहिक जलसमाधीच्या इशार्‍यानंतर घेतली बैठक  सोलापूर जिल्ह्यात अदिवासी कोळी महादेव जमातीचे अस्तित्व आहे हे वेळोवेळी जात पडताळणी समितीने पडताळणी करुन दिलेल्या जातीच्या दाखल्यामुळे सिध्द झाले आहे.जर   आवश्यक ते सर्व कागदपत्रे सोबत जोडून कोणी अनुसुचीत जमातीच्या दाखल्यासाठी अर्ज दाखल करत असेल तर त्यांचे दाखले अडवू नका असा थेट आदेश सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.दिलीप कांबळे यांनी दिले आहेत.महर्षी वाल्मिकी संघाने सामुहिक जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता.या पार्श्‍वभुमिवर येथील शासकिय विश्रामगृहात ना.दिलीप कांबळे,पालकमंत्री विजयकुमार देशमुख,आ.भारत भालके,सहाय्यक जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे,प्रांताधिकारी सचिन ढोले,विभागीय जात पडताळणी समितीचे उपायुक्त श्री गोलाईत  व जातपडताळणी विभागाचे व समाजकल्याण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.      या बैठकीत महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक गणेश अंकुशराव यंानी कोळी महादेव ज...

पंढरी वार्ता :- मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

Image
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी    क्रांतिवीर दामोदर चाफेकर  स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमात गोंधळ   पिंपरी चिंचवड येथील घटना  ५० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले सोमवारी सकाळी  पिंपरी चिंचवडमध्ये  क्रांतिवीर दामोदर चाफेकर यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजना साठी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांनी  जोरदार घोषणाबाजी केल्याने ५० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ! मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत मुख्यमंत्र्यांना शहरात पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा देत हा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी मराठा कार्यकर्त्यांचा हा हेतू सफल होऊ दिला नाही. सकाळ पासून कार्यक्रम स्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्‍यात आला होता. मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करणार्‍या काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आतापर्यंत 50 पेक्षा जास्त जणांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी शिक्षणम...

कृषी पंढरी कृषी महोत्सवाचे ना.गिरीष महाजन यांच्या हस्ते उदघाटन

Image
कृषी पंढरी कृषी महोत्सवाचे ना.गिरीष महाजन यांच्या हस्ते उदघाटन  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भव्य स्वरुपात आयोजीत करण्यात आलेल्या कृषी पंढरी कृषी महोत्सवाचे उदघाटन राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ना.महाजन यांनी कृषी पंढरी कृषी महोत्सवाच्या ठिकाणी विविध स्टॉलला भेटी देवून कृषी विषयक माहीती जाणुन घेतली .अशा उपक्रमामुळे शेतकरी आधुनिक शेतीकडे वळण्यास मदत होणार असल्याचे यावेळी ना.महाजन यांनी सांगीतले.    या उदघाटन प्रसंगी परिवहन मंत्री दिवाकर रावते,सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजयकुमार देशमुख,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे,पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.आ.सुधाकरपंत परिचारक,आ.सुरेश धस,आ.प्रशांत परिचारक,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे,भाजपाचे तालुकाध्यक्ष श्रीकांत बागल , पुणे विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर,जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले,संदीप गिड्डे आदी उपस्थित होते.    यावेळी बोलताना परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले की,वारकरी हे शेतकरीच आहेत.त्यांची सेवा करण्याचे...

पंढरी वार्ता :- जो बोले सो निहाल !

Image
 जो बोले सो निहाल !  मराठा,धनगर व कोळी महादेव समाजाच्या आरक्षणाबाबत मौन बाळगलेले नेते धर्मसंकटात ? भुमिका स्पष्ट करण्यासाठी येत आहे कार्यकर्त्यांचा दबाव   मराठा,धनगर व महादेव कोळी समाजाच्या आरक्षणाच्या लढाईने आता उग्र रुप धारण केले असून माझ्या जिवीची आवडी । पंढरीसी नेईन गुढी ॥ हा संत तुकोबारायांचा अभंग प्रमाण मानत भडक भगव्या ध्वजाला   थोडासा नरमाईचा रंग देत त्याची पताका करुन खांद्यावर घेत पंढरीची वारी करणारा मराठा समाज आता निर्वाणीच्या भुमिकेत आला असून लाखोंचे मुक मोर्चे काढून देखील हे सरकार बधत नाही,फसव्या घोषणा  करुन मराठा समाजाची दिशाभूल करते हे लक्षात आल्यामुळे या समाजातील कार्यकर्ते आता आक्रमक झाले आहेत. ‘करा अथवा मरा’ हे स्वातंत्र्य पुर्व काळातील भारत छोडे आंदोलनाचे ब्रीद, देणार की जाणार ? या शब्दामध्ये परावर्तीत करुन यंदा संतपरंपरेची पताका बाजूल ठेवून भगवा ध्वज हाती घेवून सनदशिर मार्गाने  मिळत नसेल तर आता ठोक मोर्चाद्वारे मिळवू हीच कणखर भुमिका घेवून मैदानात उतरले आहेत.या महत्वाच्या व मराठा समाजाच्या अस्मितेच्या लढयात सारे समान हेच सुत्र ...

पंढरी वार्ता :- वारकऱ्यांची पाऊले वळत आहेत कृषी महोत्सवाकडे शासनाचा कृषी विभाग मात्र उदासीन

Image
  वारकऱ्यांची पाऊले वळत आहेत कृषी महोत्सवाकडे   शासनाचा कृषी विभाग मात्र उदासीन कृषी उत्पन्न बाजार समिती, पंढरपूर व शुअर शॉट इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित केल्या जाणाऱ्या कृषी प्रदर्शनाचे यंदाचे ३ रे वर्ष आहे. यंदाचा हा कृषी महोत्सव आषाढी वारीतील एक प्रमुख आकर्षण ठरत आहे. यावर्षी कृषी महोत्सवामध्ये प्रथमच माहिती व जनसंपर्क महासंचानलयाच्या वतीने संवाद वारी हे शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे दालन उभारण्यात आले आहे. याशिवाय मोठी यंत्रे, औजारे व विविध साधनांची प्रात्याक्षिके तसेच देशी गायींचे प्रदर्शन व भाग्यवान विजेत्याला ट्रॅक्टर बक्षीस यामुळे आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपुरात येणारे भाविक आपसूकच कृषी प्रदर्शनाकडे वळत आहेत. ५ दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये ३०० पेक्षा जास्त स्टॉल्सचा समावेश आहे. २५ जुलै पर्यंत हा कृषी महोत्सव चालणार असून पहिल्याच दिवशी या प्रदर्शनास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. या कृषी महोत्सवाची सुरुवात औपचारिक उद्घाटनाने झाली असून मुख्य उद्घाटन सोहळा दि. २२ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता मुख्य...

पंढरी वार्ता :- मुख्यमंत्र्यांनी महापुजेसाठी येवू नये !

Image
मुख्यमंत्र्यांनी महापुजेसाठी येवू नये !   काही दुर्घटना घडल्यास जबाबदारी सरकारची- आ.भारत भालके   मराठा,धनगर,कोळी समाजाचे कार्यकर्ते आक्रमक आंदोलनाच्या तयारीत   मराठा,धनगर,कोळी महादेव व अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नांकडे या समाजांनी लोकशाही मार्गाने शांततेने  केलेल्या आंदोलनाकडे शासनाने अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे आता कार्यकर्ते आक्रमक आंदोलनाच्या तयारीत असून शांततापुर्ण मार्गाने मोर्चे काढून,आंदोलने करुन देखील सरकार दखल घेत नसल्यामुळे आता या प्रश्‍नाने उग्र रुप धारण केले आहे. आषाढी महापुजेपासून मुख्यमंत्र्यांना रोखण्याचा इशारा देण्यात आला असून त्यासाठी  राज्यभरातून हजारो कार्यकर्ते पंढरपूर परिसरात मोठया संख्येने दाखल होत आहेत.त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशी महापुजेसाठी पंढरपूरात येवू नये जर ते येथे आल्यास आषाढी यात्रा काळात 12 ते 14 लाख भाविक पंढरीत आलेले असताना भीतीचे वातावरण निर्माण होऊन मोठी दुर्घटना घडू शकते असा इशारा आ.भारत भालके यांनी दिला आहे .           यावेळी बोलताना आमदार भालक...

पंढरी वार्ता :- काही कर्मचार्‍यांच्या ‘अर्थपुर्ण’ व्हि.आय.पी.दर्शनास विरोध केल्यानेच माझ्याविरोधात आंदोलन !

Image
 काही कर्मचार्‍यांच्या ‘अर्थपुर्ण’  व्हि.आय.पी.दर्शनास विरोध केल्यानेच माझ्याविरोधात आंदोलन ! सी.सी.टि.व्ही फुटेज तपासून पाहील्यास सत्य समोर येईल - सचिन अधटराव  कलम 144 चा भंग करणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करा-काका बुराडे  मंदीर समितीमधील काही पुढारीछाप कर्मचारी गेल्या काही महिन्यात अर्थपुर्ण व्हि.आय.पी.दर्शनात व्यस्त होते.व्हि.आय.पी.दर्शन पुर्णत: बंद करण्यात यावे अशा सुचना राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या असतानाच व भाविकांच्या गर्दीमुळे दर्शनरांग गोपाळपूर रस्त्यावरील शेडपर्यंत पहोचलेली असतानाच  हे कर्मचारी अधिकार्‍यांची व  सदस्यांची नजर चुकवून दर्शन रांगेत घुसखोरी करण्यास मदत करत होते.यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या जात होत्या.या बाबत आपण मंदीर प्रशासनाकडे  तक्रार केल्यानेच आपणाविरोधात काल आंदोलन करण्यात आले होते.मंदीर समिती प्रशासनाने तातडीने या गंभीर प्रकाराची दखल घेवून व्हि.आय.पी.दर्शन बंद करावे अशी मागणी मंदीर समितीचे सदस्य सचिन अधटराव यांनी आज मंदीर समिती व्यवस्थापनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.    गुरवार दिनांक 19 रोजी...