Posts

Showing posts from October, 2018
Image
महर्षी वाल्मिक कर्मचारी संघटनेच्या वतीने महर्षी वाल्मिकी जयंती साजरी आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते गुणवंत  विद्यार्थ्यांचा व कर्मचार्‍यांचा सत्कार               महर्षी वाल्मिक कर्मचारी संघटनेच्या वतीने महर्षी वाल्मिकींच्या जयंती निमित्त प्रतिमेचे आमदार प्रशांतराव परिचारक यांचे शुभहस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.नगरसेवक गणेश अधटराव हे होते.इसबावी येथील फणसेकर महाराज मठात आयोजीत या कार्यक्रमात कोळी समाजातील मार्च 2018 दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देवून आ.परिचारक यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला व शासकीय सेवानिवृत कर्मचारी तसेच निरपेक्ष वृत्तीने समाजसेवा करणार्‍या समाजबांधव मधूकर आंबेकर, गोपाळ अभंगराव, महादेव परचंडे, अरुण नेहतराव यांचा सत्कार करण्यात आला.        याप्रसंगी आमदार प्रशांतराव यांनी कर्मचारी मंडळाच्या सामाजिक बांधलीकीचे कौतूक करीत महर्षी वाल्मिकींच्या कार्याची माहिती दिली व आजही त्यांच्या आदर्शाची फार आवश्यकता असल्याचे सांगितल...
Image
पंढरीतील ‘त्या’ भुरट्यांना ‘डॉन’ होण्याची स्वप्ने पुन्हा पडू देवू नका ! प्रपंचग्रस्तांना भीती दाखणार्‍यांना रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज     पंढरीतील ‘त्या’ भुरट्यांना ‘डॉन’ होण्याची स्वप्ने पुन्हा पडू देवू नका ! प्रपंचग्रस्तांना भीती खणार्‍यांना रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सक्षम  भुवैकुंठ पंढरी नगरी,महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी.समतेची शिकवण देणार्‍या संताचे माहेरघर. मात्र या पंढरीस लागलेला कलंक म्हणजे येथील भुरटेगीरी.या भुरटेगीरीचा दाहक अनुभव अनेकांना आला असला तरी नसती कटकट नको म्हणुन ’आम आदमीत्याकडे त्याकडे दुर्लक्ष करतात.आणि त्यामुळेच या भुरट्यांना एक प्रकारे प्रोत्साहन मिळत जाते.व ते पुढे डॉन’होण्याची स्वप्ने पाहु लागतात.    विनासायास,विनाकष्ट मोठे होण्याची स्वप्ने  या शहरातील अनेक तरुण बाळगत असल्यासाचे दिसुन येते.या भुरट्यांमध्ये ‘विवेक’ उरलेला नसल्यामुळे या गोष्टी त्यांच्या समजुतीच्या बाहेर असतात.भुरटेगीरी करणार्‍यांना सर्वसामान्य नागरिकांकडून विरोध होत नसल्यामुळेच त्यांच्यातील धाडस पुढे वाढत जाते आणि त्याचा त्रास याच सर्वस...
Image
पंढरीतील अपघात प्रवण रस्त्यांवरील वाहतूक सुरक्षेसाठी आता जिल्हाधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली समिती?    नगर पालीका परिसरातील अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या प्रतिनिधीचाही समितीमध्ये समावेश    शहरातील अपघात प्रवण असलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील रस्त्यावर दुभाजक करण्याच्या राष्ट्रवादी कॉग्रेसच्या मागणीची पुर्तता होणार ? नगर पालीका क्षेत्रातील अपघात प्रवण रस्त्याबाबत रस्ते सुरक्षेच्या व व अपघात प्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या हेतूने एक समिती नेमण्याचा निर्णय शासनाने घेतला असून जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये नगर पालीकेचे मुख्याधिकारी,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता,शहर वाहतूक उपनिरिक्षक ,नगर पालीका क्षेत्रातील अभियांत्रीकी महाविद्यालयाचा प्रतिनिधी,नगर पालीकेचे मुख्य अभियंता यांचा समावेश असणार आहे.या बाबत शासनाने गुरुवारी घेतलेल्या शासननिर्णयानुसार लवकरच ही समिती स्थापन होणार असून त्यामुळे पंढरपूर शहरातील सर्वात अपघात प्रवण समजल्या जाणार्‍या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय रस्त्यावर  दुभाजक तयार करण्याबरोबरच तालुका पोल...
Image
दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे मराठा आरक्षणाबाबत कार्यवाही न झाल्यास राज्यव्यापी ठिय्या आंदोलन ! मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा सरकार आणि विरोधी  पक्षाची  मराठा समाजाला न्याय देण्याची इच्छाशक्ती नाही   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 15 नोव्हेंबरपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाची कार्यवाही पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. परंतु सरकारची त्या दृष्टीने हालचाल दिसून येत नाही. त्यामुळे दिलेल्या तारखेपर्यंत सरकारने आरक्षणाची वैधानिक कार्यवाही पूर्ण न केल्यास येत्या 25 नोव्हेंबरपासून राज्यव्यापी ठिय्या आंदोलन पुकारण्यात येर्इल, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिला आहे. मुंबईत मराठी पत्रकार संघात पाटील म्हणाले, आरक्षणासाठी रस्त्यावर मोर्चे काढले. ठिय्या आंदोलने झाली. सरकारला लाखो निवेदने दिली. परंतु तरीही कोणत्याही सरकारला, विरोधी पक्षाला मराठा समाजाला न्याय देण्याची भावना सरकारची नाही. त्यामुळे आता सरकारसोबत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कोणतीही चर्चा केली जाणार नाही किंवा बैठका घेतल्या जाणार नाहीत. आरक्षण मिळणार नाही तो...
Image
राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या वतीने विश्‍वनाथ कराडांच्या प्रतिकामत्मक पुतळ्याचे दहन  वाखरी येथील ‘एमआयटी’च्या बांधकामाची चौकशी करण्याची निवेदनाद्वारे मागणी    एमआयटीचे सवेसर्वा विश्‍वनाथ कराड यांनी छत्रपती शिवरायांबद्दल काढलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध करीत वाखरी येथील एमआटी संस्थेच्या प्रवेशद्वारात आज राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या वतीने विश्‍वनाथ कराडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.यावेळी कराड यांच्या अधिपत्याखालील वाखरी येथील संस्थेचे बांधकाम बेकायदेशीर असून त्याची चौकशी करण्यात यावी व तातडीने कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या कार्यालयात देण्यात आले.      या बाबत अधिक माहीती देताना  राष्ट्र्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अरुण आसबे म्हणाले की,राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष विक्रांत माने यांच्या नेतृत्वाखाली व राजूबापू पाटील,ऍड.दीपक पवार, सुधीर भोसले, दीपक वाडदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाखरी येथे हे आंदोलन करण्यात आले. याची दखल घेवून कराड यांनी लवकरात लवकर माफी मागावी,व बे...
Image
श्री पुंडलिक देवस्थान ट्रस्टच्या वतीने महर्षी वाल्मिक जयंती साजरी सुधाकरपंत परिचारक यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व कर्मचार्‍यांचा सत्कार महर्षी वाल्मिक जयंतीनिमित्त श्री पुंडलीक देवस्थान ट्रस्टच्या वतीने येथील दिनदयाळ मंदीरात आयोजीत कार्यक्रमात मा.आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष बाबासाहेब अधटराव हे होते.ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही समाजातील 10 वी12 वी उत्तीर्ण 25  हुशार गुणवंत विदयार्थांचा मानचिन्ह व रोख पारितोषिक देवून सन्मान करण्यात आला. तसेच समाजातील शासकीय सेवेतील  कर्मचार्‍यांचा व समाजासाठी विशेष योगदान दिल्याबद्दल माजी नगराध्यक्ष लक्ष्मणभाऊ शिरसट, पैलवान श्रीकांत कोताळकर, आप्पा करमकर, सुनिल कोताळकर, हभप प्रकाशबूवा अभंगराव, योग प्रशिक्षक अशोक ननवरे यांचा सुधाकरपंत परिचारक यांचे हस्ते शाल व सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला, यावेळी समाजातील 100 गरजू विदयार्थ्यांना वह्या वाटप प्रमूख अतिथिच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी बोलताना सुधाकरपंत परिचारक यांनी आजच्या जयं...
Image
पंढरीतील डि.व्हि.पी. उद्योग समुहाचा आता उत्तर महाराष्ट्रात दबदबा ! देवळा जि.नाशिक येथे वसंतदादा पाटील साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ धाराशिव शुगर नंतर नाशिक जिल्ह्यातील कारखान्याचे संचालन आता डिव्हीपी    ग्रुपकडे                            अनेक नाविन्यपुर्ण कल्पना,धाडसी व्यवस्थापन आणि आव्हाने स्विकारण्याची तयारी यामुळे पंढरीतील डिव्हीपी.उद्योग समुहाने अल्पावधीतच आपल्या उद्योगविश्‍वास विस्तार गतीने केला असून समृध्दी ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून सुरु झालेली ही वाटचाल डिव्हीपी स्क्वेअर,डि.व्ही.पी.बझार,डि.व्ही.पी.गारमेंटस,डि.व्ही.पी.मिल्क प्राडक्टस,धाराशिव साखर कारखाना असा प्रवास करीत आता थेट उत्तर महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारीत आपला दबदबा निर्माण करणारी ठरली आहे.धाराशिव शुगरच्या युनिट क्रमांक 2 च्या माद्यमातून विठ्ठेवाडी ता.देवळा जि.नाशिक येथील वसंतरावदादा पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचलन आता डिव्हीपी.ग्रुपच्या माद्यमातून होणार आहे.या कारखान्याच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रद...
Image
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे यांच्या मोबाईल संभाषणाच्या ‘त्या’  कथित क्लिपमुळे  मोहीते-पाटील समर्थकात अस्वस्थता पक्षात  वरिष्ठ पातळीवरुनच ‘कडवट’ गटबाजी जोपासली जात असल्याचे उघड  1990 च्या दशकात ‘मोहीते-पाटील बोले आणि जिल्हा हाले’ अशी राजकीय परिस्थीती होती.स्व.शंकरराव मोहीते-पाटील यांनी 1960-70 च्या दशकात अगदी बैलगाडीतून प्रवास करुन सोलापूर जिल्ह्यातील वाडया वस्त्यावरील नेत्यांना आपल्या प्रभावाखाली आणून मोहीते-पाटील गटाचे पाळेमुळे बळकट केले होती.करमाळा ते अक्कलकोट आणि मंगळवेढा ते बार्शी असा संपुर्ण सोलापूर जिल्ह्याच्या चारही दिशावंर आपला राजकीय प्रभाव निर्माण करण्यात मोहीते-पाटील यशस्वी ठरले होते.त्या काळी स्व.शंकरराव मोहीते-पाटील आणि स्व.नामदेवराव जगताप हे दोनच प्रमुख राजकीय गट सोलापूर जिल्हयाच्या राजकारणात सर्वात प्रभावशाली म्हणुन ओळखले जात होते.स्व.शंकरराव मोहीते-पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे जेष्ठ सुपुत्र विजयसिंह मोहीते-पाटील यांनी जिल्ह्याच्या राजकारणाची सुत्रे आपल्या हाती घेतली.नामदेवराव जगताप गट पुढे प्रभावहीन होत गेला त्यामुळे या गटाचे ...
Image
चंद्रभागेत बुडणार्‍यांना जीवदान देणार्‍या सुनिल कोताळकरचा शिवक्रांती संघटनेच्या वतीने सत्कार बुडालेल्या अनेक मृतदेहांच्या शोधकार्यातही सुनिल कोताळकर याची पोलीसांना मदत कुठल्याही साधनाशिवाय 40 फूट खोल बुडी मारण्याचे कसब चंद्रभागा नदी आणि सुनिल कोताळकर याचे अगदी बालपणापासूनचे अतूट नाते,शाळेपेक्षा आपली होडी बरी म्हणून सुनिल कोताळकरने चंद्रभागा नदी हेच आपले कार्यक्षेत्र समजले.चार प्रमुख यात्राकाळासह  इतरवेळी आपल्या होडीतून भाविकांना विष्णूपद आणि गोपाळपूर दर्शनासाठी घेवून जाणे हा आपला पारंपारिक व्यवसाय करणारा सुनिल कोताळकर म्हणजे एक प्रख्यात जलतरण पटूच.चंद्रभागेच्या पात्रातील अवैध वाळू उपशामुळे पडलेले मोठ मोठया खड्यांमुळे,बंधार्‍याच्या परिसरात स्नानास गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तसेच आत्महत्या करण्याच्या हेतून चंद्रभागेत बुडत असलेल्या अनेकांना जीवदान देण्याचे कार्य सुनिल कोताळकर याने निरपेक्ष भावनेने केले आहे.विहरीत थेट चाळीस फुटापर्यंत कुठल्याही साधनाशिवाय बुडी मारुन अनेक मृतदेहांचा शोध घेवून पोलीसांना मदत केली आहे.अशा या जिवनरक्षकाचा शिवक्रांती संघटनेच्या वर्...
Image
जितेंद्र आव्हाडाकडून महावीर मल्हारराव होळकरांची मद्यसम्राट विजय मल्ल्याबरोबर तुलना  पंढरीत सकल धनगर समाज करणार आव्हाडांच्या  प्रतीकात्मक  पुतळ्याचे दहन   थोर पराक्रमी महापुरुषांच्या पराक्रमाने पवित्र झालेल्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड महावीर मल्हारराव होळकर यांची तुलना मद्यसम्राट विजय मल्ल्याशी करण्याचे धाडस करीत आहे मात्र या आगळीकीविरोधात धनगर समाज शांत बसणार नाही.शुक्रवारी सकल धनगर समाजाच्या वतीने पंढरीत जितेंद्र आव्हाडच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात येणार आहे अशी माहीती धनगर समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते माऊली हळणवर व धनगर समाजोन्नती मंडळाचे अध्यक्ष संतोष बंडगर यांनी पंढरी वार्ताशी बोलताना दिली.     या देशात वाल्याचा वाल्मिकी होतो आणि मल्ल्याचा मल्हारराव होळकर होतो’ असा शब्दप्रयोग आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर केला आहे. मल्हारराव होळकरांबद्दल असे लिखाण केल्याबद्दल होळकरप्रेमी व धनगर समाजात संताप उसळला आहे.आव्हाड यांच्या या ट्विटचे स्नॅपशॉट वॉट्सअप व फेसबुकवर व्हायरल करून होळकर प्रेमींनी आव्...
Image
पंढरपूर शहर तालुक्यातील  एक हजार युवकांना स्वयंरोजगार तर पाचशे युवकांना रोजगार उपलब्ध करुन देणार- समाधान आवताडे    पंढरीत समाधान आवताडे यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन पंढरपूर शहर व तालुक्यातील किमान 1 हजार युवकांना स्वयंरोजगार व पाचशे युवकांना रोजगार उपलब्ध करुन देणार असून पंढरपूर शहर हे पर्यटन स्थळ आहे.या ठिकाणी पर्यटन स्थळाच्या द्रष्टीने अनेक छोटे मोठे व्यवसाय उभारले जावू शकतात यातून बेरोजगार युवकांना स्वयंरोजगार व  थेट रोजगार उललब्ध होऊ शकतो मात्र या द्रष्टीने कधी प्रयत्नच होत नाहीत.व्यवसायाच्या माध्यमातून शिर्डी,शनी शिंगणापूर सारख्या तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी माझा संपर्क आला.तेथील नियोजन आणि विकासाची तळमळ पाहून मी प्रभावीत झालो.आज पंढरपूर असो अथवा मंगळवेढा या तालुक्यात रोजगाराच्या संधीच तयार होत नाहीत.मंगळवेढा तालुक्यात एमआयडीसी साठी जमीन संपादीत करण्यात आली.आणि यातील सव्वाशे एकर जमीन सोलर प्रोजेक्टला देण्यात आली.यात केवळ सहा लोकांना रोजगार उपलब्ध झाला ते लोकही बाहेरचे आहेत.जर अशा पध्दतीने आपल्याकडील युवकांची अहवेलना होणार असेल तर आम्ही स्वस्...
Image
समाधान आवताडे यांच्या पंढरपूर  संपर्क कार्यालयाचे ह.भ.प.संजय महाराज मोरे यांच्या हस्ते  आज उद्घाटन        संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांच्या पंढरपूरातील संपर्क कार्यालयाचे उदघाटन गुरुवार दिनांक 18 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ठिक 5 वाजता ह.भ.प.संजय महाराज मोरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे हे असणार आहेत.   चेअरमन समाधान आवताडे यांच्या संपर्क कार्यालयाच्या उदघाटनाच्या निमित्ताने  येथील भक्तीमार्ग येथे वीर शिवबा काशिद फलकाचे उदघाटन,गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव करण्यात येणार आहे.समाधान आवताडे हे गेल्या काही महिन्यापासून पंढरपूर शहर व तालुक्यात प्रचंड जनसंपर्क निर्माण करण्यात यशस्वी ठरले असून कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक यांच्याशी संपर्क करण्याच्या हेतून त्यांनी पंढरपूर येथे संपर्क कार्याल य  सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.     जाहिरात :-   
Image
आरेवाडी येथील दसरा मेळाव्यात पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील हजारो समाज बांधव सहभागी होणार- संतोष सुळे   गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत रविवारी मंगळवेढा तालुक्यात विविध गावांमध्ये बैठकांचे आयोजन  ‘टिस’च्या अहवालानंतर धनगर समाज आता निर्णायक लढयाच्या तयारीत !   टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ (टीस) या संस्थेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण लागू करण्याचा मार्ग मोकळा होईल, असे लाल गाजर गेल्या चार वर्षांपासून सत्ताधारी भाजपच्या नेत्यांकडून दाखविले जात होते. पण टीस’चा अहवाल धनगर समाजाच्या विरोधात गेला आहे. धनगर’ व धनगड’ या दोन्ही भिन्न जाती आहेत असे अहवालात स्पष्ट नमूद केले आहे. त्यामुळे धनगर समाजाचे एसटी आरक्षण कठीण बनले आहे.सत्ता कुणाचीही असो राज्यकर्त्यांकडून धनगर समाजाचा केवळ निवडणूकीपुरता वापर केला जात आहे.राज्यात 9 टक्के इतक्या मोठया प्रमाणात धनगर समाजाची मतदार संख्या असताना व 40 टक्के मतदार संघात धनगर समाजाची मते निर्णायक असतानाही केवळ या समाजाची आश्‍वासनावर भलावण करीत आरक्षणाच्या हक्कापासून वंचीत ठेवले आहे...
Image
शिरढोण ग्रामस्थांनी पकडलेले ‘ते’ दोन टिपर अधिकृत वाळू वाहतूक करणारे ! रात्रीच्यावेळी व्होळे येथून भरुन आलेल्या टिपरमुळे संभ्रम  व्होळे येथून जप्त केलेली वाळू वाहतूक करीत असल्याचा तलाठ्याचा खुलासा   पंढरपूर तालुक्यातील व्होळे येथे सातत्याने अवैध वाळू उपसा होत असतानाही येथील वाळू उपशाकडे महसूल प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आले आहे,रात्रीच्या वेळी व्होळे येथून मोठया प्रमाणात अवैध वाळू ऊपसा करणारे टिपर, ट्रॅक्टर शिरढोण मार्गे पंढरपूर शहरात दाखल होत असल्याची चर्चा नेहमीच होत असते.अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी  संबधीत गावचे पोलीस पाटील व ग्रामस्थ यांनी पुढे यावे असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी वेळोवेळी केले आहे.त्यांच्या या आवाहनास प्रतिसाद देत शिरढोण येथील ग्रामस्थांनी नुकतेच रात्रीच्या वेळी व्होळे येथून वाळू भरुन शिरढोण मार्गे आलेल्यो दोन टिपरला रोखण्याचा प्रयत्न केला असता.प्रचंड वादावादी झाल्याचे समजते.        या वादावादी नंतर शिरढोण येथील ग्रामस्थांनी पंढरपूर ग्रामिण पोलीस ठाण्याशी संपर्क साधत या बाबत तक्रार केली.त्यानंतर या ...
Image
... तर स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस परिषदेत ना.सदाभाऊ खोत यांचा सत्कार करणार ! विनाकपात 3 हजार 575 रुपये दर देवून आश्‍वासनाची पुर्तता करा !  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आवाहन    स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 27 ऑक्टोबरला जयसिंगपुर येथे होणार्‍या ऊस परिषदेची जय्यत तयारी केली आहे. मात्र त्याचवेळी सदाभाऊ खोत यांनी यावर्षी उसाला तोडणी वाहतूक वगळून 3 हजार 575 रुपये प्रति टन दर देऊ अशी घोषणा केली आहे.  त्यांचे हे जाहीर वक्तव्य सर्वत्र प्रसिद्ध झाले आहे. खोत यांनी जाहीर केल्याप्रमाणे यावर्षी 3 हजार 575 रुपये दर विनाकपात शेतकर्‍यांना द्यावा. त्यांचा स्वाभिमानीच्या ऊस परिषदेत जाहीर सत्कार केला जाईल, असे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी दिला आहे. रयत संघटनेच्या सभेत 24 ऑक्टोबर रोजी सदाभाऊ यांनी जाहीर केलेली ही रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जाहीर करावी. त्यानंतर 27 ऑक्टोबरला जयसिंगपूर येथे होणार्‍या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेमध्ये सदाभाऊ खोत यांचा जाहीर सत्कार केला जाईल,  असे अनिल पवार म्हणाले. ...
Image
पंढरीत संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या विरोधात उग्र आंदोलन   ना.तावडे यांच्या प्रतिमेवर मद्य ओतून केला निषेध   सर्व शिक्षा अभियानातील ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकात संभाजी महाराजांविषयी वादग्रस्त व आक्षेपार्ह उल्लेख केल्याचा आरोप करण्यात आल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली असून राज्याच्या शिक्षण खात्याने या प्रकरणात आपली बौध्दीक दिवाळखोरी दाखवून दिली आहे.राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी याची जबाबदारी स्विकारुन राजीनामा द्यावा अशी मागणी करीत आज पंढपूरातील छत्रपती शिवाजी चौक येथे संभाजी बिग्रेडच्या वतीने विनोेद तावडे यांच्या प्रतिमेवर दारु ओतून जोडेमार आंदोलन करण्यात आले.     सर्व शिक्षा अभियानात समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकाचा समावेश असून हे पुस्तक डॉ. शुभा साठे यांनी लिहिले आहे. पुस्तकाचे प्रकाशन नागपूरमधील लाखे प्रकाशनाने केले आहे. या पुस्तकातील पान क्रमांक 18 वर संभाजी महाराजांविषयी उल्लेख आहे. रायगडावरुन संभाजीराजांनी केलेल्या अनेक खर्‍या- खोट्या अत्याचारांच्या बातम्या समर्थांच्या कानावर येत होत्या....
Image
राष्ट्रवादी कॉग्रेसच्या ध्येयधोरणांचा प्रसार करा - खा.विजयसिंह मोहीते - पाटील   खा.मोहीते-पाटील यांच्या हस्ते सुधीर भोसले यांचा सत्कार सर्व सामान्य जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस शिवाय पर्याय नाही हे आता जनतेच्या लक्षात आले आहे.मात्र तरीही गाफील न राहता राष्ट्रवादी कॉग्रेसच्या ध्येयधोरणांचा जनतेमध्ये प्रसार करा.सुधीर भोसले यांनी आपल्या अध्यक्षीय कारकिर्दीत चांगले काम केले आहे.त्यामुेळच त्यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे.कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे राहून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष आणखी बळकट करावा असे प्रतिपादन खा.विजयसिंह मोहीते-पाटील यांनी केले.राष्ट्रवादी कॉग्रेस  पक्षाच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी सुधीर भोसले यांची फेरनिवड झाल्याबद्दल सत्कार प्रसंगी ते बोलत होते.         यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष गुलाब मुलाणी,राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस संभाजी शिंदे-नाईक,किसान सभा तालुकाध्यक्ष कृष्णात माळी आदी उपस्थित होते.    
Image
नवरात्र महोत्सवाच्या वर्गणीवरुन झालेल्या वादात पंढरीत वृध्देस लोखंडी सळईने मारहाण नवरात्र महोत्सवानिमित्त शक्ती देवीच्या वर्गणीसाठी पंढरीतील दत्ता फुलारे(रा.परदेशी नगर पंढरपूर) या युवकास आरोपी सुरज जगताप(रा.टाकळी रोड पंढरपूर) हा शिवीगाळ व दमदाटी करत असताना  हे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या  दत्ता   फुलारे याच्या वृध्द आईस ‘म्हतारे तु कशाला मध्ये आलीस आता तुला जिवंत सोडत नाही’ असे म्हणत शिविगाळ करुन लोखंडी सळईने मारहाण करण्यात आली आहे.यामध्ये  सुभद्रा दशरथ फुलारे(वय 80 रा.परदेशी नगर ) ही वृध्दा जबर जख्मी झाली असून आरोपीने फिर्यादीच्या दारात उभी असलेल्या एम.एच.13 बीएन 4970 या कारची तोडफोड करुन नुकसान करण्यात आले आहे अशा आशयाची फिर्याद पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास सपोनि काळे हे करीत आहेत.
Image
लक्ष्मी टाकळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तानाजी कांबळे यांचा समाधान आवताडे यांच्या संपर्क कार्यालयात सत्कार       ल.टाकळी यांची तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी  तानाजी कांबळे यांची निवड झाल्याबद्दल दामाजी सह.सा.कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांच्या पंढरपूर येथीळ संपर्क कार्यायात  सत्कार करण्यात आला.यावेळी अमर सुर्यवंशी यांचाही वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला यावेळी नाथा देठे,संतोष कवडे,रोशन कदम,आण्णासाहेब आयवळे,दत्ता शिंगाडे,राजेंद्र शिंदे,रघुनाथ नाईकनवरे,नितीन काळे,जोतिराम कांबळे,चांगदेव खरात,सुमीत खटावकर,अमजद हकीम,अमोल धोत्रे,अविनाश मोरे आदी उपस्थित होते.   
Image
हुमनीस प्रतिबंध करण्यासाठी युटोपियन शुगरचे संपुर्ण सहकार्य - उमेश परिचारक युटोपियन शुगरच्या वतीने नारायण चिंचोली येथे ऊस पिक परिसंवाद संपन्न नारायण चिंचोली येथे युटोपियन शुगरच्या वतीने ऊस पीक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युटोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.उपसभापती लक्ष्मण धनवडे,सरपंच पोपट पाटील,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शिवाजी गुंड,तुगंतचे सरपंच अंगद रणदिवे,मा.सरपंच धर्मराज नलवडे,चेअरमन विष्णू माने,मा.उपसरपंच गहिनीनाथ चव्हाण आदी उपस्थित होते.         या वेळी बोलताना उमेश परिचारक म्हणाले की,चालू गळीत हंगामात ऊसपिकावर हुमणीचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे.त्यामुळे शेकडो एकर ऊस पिके उध्वस्त झाली आहेत.कारखान्याच्या वतीने हुमणी प्रतिबंधक विविध औषधांचा पुरवठा केला आहे.पुढील वर्षी हुमणीवर शंभरटक्के नियंत्रण मिळविण्यासाठी कारखान्याच्या माध्यमातून परदेशातून सुक्ष्म जिवाणू उपलब्ध करुन शेतकर्‍यांची या संकटातून कायमची मु...