Posts

Showing posts from August, 2018

पंढरी वार्ता :- विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात पालकांचा सहभागही महत्वाचा - विवेक परदेशी

Image
  विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात पालकांचा सहभागही महत्वाचा -  विवेक परदेशी  लोकमान्य विद्यालयात पालक सभा संपन्न   पंढरपूर न.प.संचलित लोकमान्य विद्यालयात पालक सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण समितीचे सभापती मा.श्री विवेकजी परदेशी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष  संतोष कोळी होते.शिक्षिका सौ जमदाडे यांनी सर्वांचे स्वागत केले.सभेची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतीमेच्या पुजनाने झाली.           पालक सभेच्या सुरूवातीस प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सदानंद डिंगरे सर यांनी शाळेत विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यासाठी पालकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. दर आठवड्याला कमीत कमी एकदा पालकांनी आपल्या पाल्याच्या वर्गशिक्षकांना किंवा मुख्याध्यापकांना भेटुन आपल्या पाल्याच्या प्रगतीचा आढावा ध्यावा असे सांगितले. शिक्षकांच्या वतीने श्रीमती साखरे यांनी विविध शैक्षणिक आणि शिस्तविषयक उपक्रमांची माहिती दिली.           शिक्षण समिती सभापती श्री व...

पंढरी वार्ता :- विश्वक्रांती सामाजिक मालवाहतूक संघटनेच्या शाखेचे वेळापूर येथे उद्‌घाटन संपन्न

Image
  विश्वक्रांती सामाजिक मालवाहतूक संघटनेच्या शाखेचे वेळापूर येथे उद्‌घाटन संपन्न       विश्वक्रांती सामाजिक मालवाहतूक संघटनेच्या शाखेचे वेळापूर येथे सौ.विमलताई जानकर, वृषाली पाटील यांच्याहस्ते उद्‌घाटन करण्यात आले. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष दिलीप मलपे, संस्थापक उपाध्यक्ष संदिप शिंदे, सचिव भाऊराव जाधव, जिल्हाध्यक्ष सतीश शिंदे, पोलीस हवलदार जावेद जमादार, काका जाधव, पिनू येडगे, शिवराज मंडले, रमेश वाघ यांच्यासह आदि मान्यवर प्रमुख उपस्थितीत होते. संस्थापक अध्यक्ष दिलीप मलपे म्हणाले की, ड्रायव्हरला अडचण आल्यास एकमेकांना सहकार्य करावे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांना लायसन्स काढण्यासाठी कागदपत्रांची अडचण असो आर्थिक अडचण असो ती संघटनेच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्रित येणे आवश्यक  असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुरज चौधरी, अशोक जाधव, जिल्हा संघटक सुर्यकांत बनसोडे, जिल्हा कार्याध्यक्ष नागनाथ शेंडगे, माळशिरस तालुकाध्यक्ष आप्पा गोरे, उपाध्यक्ष किरण बोडरे, पंढरपूर तालुका उपाध्यक्ष बापू वाघ, शहराध्यक्ष ...

पंढरी वार्ता :-निष्ठेचे फळ आणि कार्यकर्त्याच्या पाठबळामुळे शिवसेना जिल्हा प्रमुखपदी निवड - संभाजी शिंदे

Image
निष्ठेचे फळ आणि कार्यकर्त्याच्या पाठबळामुळे शिवसेना जिल्हा प्रमुखपदी निवड  - संभाजी शिंदे  संभाजी शिंदे यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण   पं.स. सदस्य तथा विद्यमान शिवसेना पंढरपूर तालुका प्रमुख संभाजी शिंदे यांची सोलापूर जिल्हाप्रमुखपदी (पंढरपूर विभाग) निवड घोषित करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.24) रोजी दुपारी मुंबई येथील मातोश्री निवास या ठिकाणी शिवसेना पक्षाचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी निवड जाहीर केली आहे.  या निवडीप्रसंगी संभाजी शिंदे यांचा सत्कारही पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यानिवडीप्रसंगी शिवसेनेचे उपनेते तानाजी सावंत, नूतन सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, सहसंपर्कप्रमुख तथा भैरवनाथ शुगरचे व्हा. चेअरमन प्रा. शिवाजी सावंत, जिल्हाप्रमुख  (सोलापूर विभाग) गणेश वानकर आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  या निवडीचे वृत्त समजल्यानंतर भाळवणी गावात फटाक्याची आताषबाजी करण्यात आली.  संभाजी शिंदे हे  शिवसेनेचे  एकनिष्ठ कार्यकर्ते असून गेली 25 वर्षे निष्ठेने शिवस...

पंढरी वार्ता :- केरळ पूरग्रस्तांना पंढरपूर शहर ओबीसी काँग्रेस कडून आर्थिक मदत

Image
  केरळ पूरग्रस्तांना पंढरपूर शहर ओबीसी काँग्रेस कडून आर्थिक मदत  केरळमध्ये पाऊस व महापुराने थैमान घातलेले असून यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झालेली आहे. अशा संकटातील केरळच्या बांधवांना जात, धर्म, पंथ व पक्ष भेद न मानता अल्पशी मदत म्हणून पंढरपूर शहर ओबीसी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून 4 हजार रूपयांची मदत देण्यात आलेली आहे. याचा डी.डी. पंढरपूर तहसिल कार्यालयातील जेलर शिंदे यांच्याकडे ओबीसी कॉंग्रेस पंढरपूर शहराध्यक्ष मधुकर फलटणकर व प्रदेश सचिव प्रा.अशोक डोळ यांच्याहस्ते देण्यात आला. सध्या केरळ येथील बांधवांना देशातून व परदेशातून मदत देण्यात येत आहे. याचा विचार करून पंढरपूर शहर ओबीसी कॉंग्रेस ही मागे न राहता ती केवळ राजकारण न करता समाज कार्यात देखील अग्रेसर असते. याचाच एक भाग म्हणून केरळमधील पुरग्रस्त बांधवांना अल्पशी मदत दिलेली आहे. कॉंग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष कल्याणराव काळे साहेब, तालुकाध्यक्ष प्रकाशतात्या पाटील, महिला प्रदेश सचिव सुनेत्राताई पवार, ओबीसी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रमोदजी मोरे, जिल्हाध्यक्ष समीर कोळी व कॉंग्रेस कमिटीचे शहर...

नगर पालीका क्षेत्रातील करपात्र मालमत्तांचे सर्वेक्षण पुर्ण

Image
नगर पालीका क्षेत्रातील करपात्र मालमत्तांचे सर्वेक्षण पुर्ण  17 सप्टेंबर पर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत ‘त्या’166 जागेतील भाडेकरुंचा मुद्दा ऐरणीवर    मठ,धर्मशाळा,लॉज आणि शापिंग सेंटरच्या तळमजल्याच्या पार्कींग स्पेसमधील भाडेकरु  करआकारणीच्या कक्षेत येणार  ?        पंढरपूर नगर पालीका हद्दीतील सर्व रहिवाशी इमारती,घरे,मठ,धर्मशाळा,लॉज,शापिंग कॉम्प्लेक्स तसेच खुल्या जागा यांची पंढरपूर नगर पालीकेच्या करविभागाच्या वतीने नगर पालीकेच्या कर विभागातील कर्मचार्‍यांकडून दर चार वर्षातून सर्व्हेक्षण करुन या मालमत्ताधारकांच्या मालमत्तांचे नव्याने करनिर्धारण करण्यात येते.गेल्या चार वर्षाच्या कालावधीत पंढरपूर नगर पालीकेच्या वतीने नव्याने देण्यात आलेले बांधकाम परवाने,वापर परवाने,दुरुस्ती परवाने,वाढीव बांधकामांसाठीचे परवाने लक्षात घेवून तसेच सद्य स्थितीतील मालमत्ता धारकांचे बांधकाम,भाडेकरु,व्यवसायीक वापरातील जागा याचा संपुर्ण सर्व्हे पंढरपूर नगर पालीकेच्या कर्मचार्‍यांनी गेल्या सुमारे वर्षभरात पुर्ण केला असून त्या नुसार आता शहरातील मालमत्तांचे ...

पंढरी वार्ता :- दोन समाजात तेढ निर्माण करू पाहणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक करा-. सचिन साठे

Image
 दोन समाजात तेढ निर्माण करू पाहणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक करा-. सचिन साठे              थोर साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेच्या विटबंनाची बातमी कळाल्या नतंर अण्णा भाऊ साठे  यांचे नातु सचिनभाऊ कांबळे हे पंढरपुर मध्ये घटना स्थळला भेट देण्यासाठी आले होते. यावेळी कार्यकत्यांशी व पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना सचिन भाऊ म्हाणाले... अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेची  विटंबना  झाली याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. अशा घटनांमध्ये ठरावीक समकंटकांमुळे संपुर्ण समाजाला दोषी ठरवता येणार नाही,   दंगेखोर किंवा समाजविघातक कृत्य करणाय्रां  समाजकंटाकांवर योग्य ती कारवाई करुन,  तात्काळ उर्वरीत आरोपिंना अटक करावी अन्यता राज्यभर आंदोलन उभ करण्याच इशारा दिला.  गेल्या चार वर्षात महापुराषंच्या विटबंना, जातीय दंगली, जाति जाति मध्ये तेढ, या घटनांमध्ये वाढ झाली असुन सरकार जाणिवपुर्वक दुर्लक्ष करत आहे.  तसेच काही मनुवादी विचारधारेचे लोक चुकिचा इतिहास सांगुन समाज...

पंढरी वार्ता :- मंदीर समितीच्या वतीने दिलेल्या स्वच्छतेचा ठेका रद्द करा,अनछत्रात भाविकांच्या भोजनात चापातीचा समावेश करा !

Image
मंदीर समितीच्या वतीने  दिलेला   स्वच्छतेचा ठेका रद्द करा, अनछत्रात भाविकांच्या भोजनात चापातीचा समावेश करा ! राष्ट्रवादी युवक कॉग्रेसची निवेदनाद्वारे मागणी   विठ्ठल रुक्मिणी मंदीरे समितीने एप्रिल 2018 पासून बीएसए कार्पोरेशन लि.पुणे या कंपनीस 3 एप्रिल 2018 च्या वर्कऑर्डर नुसार  1 कोटी 93 लाख 6184 इतका मोबदला मोजून मंदीर परिसर,प्रदक्षिणा मार्ग व चंद्रभागा मंदीर परिसराच्या स्वच्छतेचे काम दिले आहे.मात्र प्रत्यक्षात हे स्वच्छतेचे काम या पध्दतीने केल जात नसून केवळ मोजकेच सफाई  कामगार नियुक्त करुन हे काम करण्यात येत आहे.या ठेकेदार कंपनीकडून करण्यात येत असलेल्या कामाबाबत नाराजी असून त्यामुळे हा ठेका रद्द करावा व यातून बचत झालेल्या पैशातून संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रातील भोजनात चपातीचा समावेश करावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या वतीने प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.या बाबत ठोस निर्णय न झाल्यास मंदीर परिसरातील नागरिक व भाविकांना सोबत घेवून धरणे आंदोलन केले जाईल अशा इशाराही देण्यात आला आहे.    या बाबत अधिक माहीती...

पंढरी वार्ता :- फोटोग्राफर विकास मंचने ‘शिवबाबा’ला दिली जगण्याची नवी उमेद

Image
  फोटोग्राफर विकास मंचने ‘शिवबाबा’ला दिली जगण्याची नवी उमेद   फोटोग्राफर दिनानिमित्त D40 hm DSLR “ कॅमेरा भेट देवून केला हृद सत्कार  19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त पंढरपूर विकास मंचच्या वतीने फोटोग्राफर म्हणून  45 वर्षे  या क्षेत्रात कार्यरत राहीलेल्या परंतू आता परिस्थीतीचे चटके खात जगण्याची दिशाच हरवून बसलेल्या शेवते येथील राजू स्वामी उर्फ  शिवबाबा यांचा फोटोग्राफर विकास मंचच्या वतीने  D40 hm DSLR  कॅमेरा, मानाचा फेटा व संपूर्ण कपडयाचा आहेर देऊन हृद सत्कार करण्यात आला.यावेळी परिस्थीतीचे चटके खात जगण्याची उमेद व दिशा हरवून बसलेल्या शिवबाबाच्या डोळ्यातून अश्रुच्या धारा वहात होत्या.माझ्या व्यवसायबंधूनी मला परत नवसंजिवनी दिली त्यांचा मी शतश: आभारीआहे अशी भावपुर्ण प्रतिक्रिया यावेळी त्यांनी व्यक्त केली.यावेळी उपस्थित मंचच्या सदस्यांचेही डोळे पाणावले होते.        संघटना ज्या वेळी निर्माण होते त्या वेळेला त्या संघटनेचा मुख्य हेतु हा असतो की आपल्या संघटनेच्या निगडित असलेल्या कोणत्याही व्यक्...

पंढरी वार्ता :- प्रदिप थोरात,नागेश जाधव,मुन्ना जाधव यांच्या पैकी किमान एकास स्विकृत नगरसेवकपदाची संधी द्या !

Image
  प्रदिप थोरात,नागेश जाधव,मुन्ना जाधव यांच्या पैकी किमान एकास स्विकृत नगरसेवकपदाची संधी द्या !   गोविंदपुरा परिसरातील परिचारक समर्थकांच्या बैठकीत मागणी      गोविंदपूरा परिसर हा प्रत्येक निवडणुकीत परिचारकांचा बालेकिल्ला राहीलेला आहे.विधानसभा निवडणूक असो अथवा नगर पालीका निवडणूक प्रत्येकवेळी परिचारक देतील तो उमेदवार स्विकारुन तो बहुमताने निवडून आणायची जबाबदारी येथील कार्यकर्त्यांनी मोठया परिश्रमपुर्वक पार पाडली आहे.मात्र नगर पालीका निवडणुकीत येथील प्रभाग अनेकवेळा खुल्या प्रवर्गासाठी उपलब्ध असतानाही संधी मिळाली नाही.निदान आता स्विकृत नगरसेवक पदासाठी या परिसरातील खंदे परिचारक समर्थक प्रदिप थोरात,नागेश जाधव,मुन्ना जाधव यांना संधी द्यावी अशी मागणी करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.           या परिसरातील विरधे बिल्डींग येथे गोविंदपूरा परिसरातील परिचारक समर्थकांची बैठक पार पडली.या बैठकीत समर्थकांनी वरीलप्रमणो आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.गोविंदपुरा,खिस्ते गल्ली,बाराभाई तालीम परिसर,दिंडीरवन परिसरातील कार्यकर्ते या बैठकीस मो...

पंढरी वार्ता : - मराठा आरक्षणासाठी तावशी येथे 'ब्लॅक रिबन ' आंदोलन

Image
 मराठा आरक्षणासाठी तावशी येथे 'ब्लॅक रिबन ' आंदोलन      पंढरपूर तालुक्यातील तावशी येथे रविवार दि.19\08\2018 रोजी स.09 वा.येथील मारूती मन्दिरासमोर संभाजी ब्रिगेड व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने मराठा आरक्षनासाठी  ब्लॅक रिबन प्रत्येक मराठ्यांच्या डाव्या दंडाला बांधून आंदोलन करण्यात आले  ९ अॉगस्ट  २०१६ ला सूरु झालेला मराठा मोर्चाचा प्रवास ९ अॉगस्ट २०१८ पर्यंत मुक मोर्चापासुन ठोक मोर्चापर्यंत कधी येऊन पोहोचला हे लक्षात ही आले नाही. या दोन वर्षात फडणवीस सरकारने हा लढा मोडुन काढण्यासाठी बरेच मार्ग वापरुन पाहिले. पहिल्यांदा इतर समाजाला मराठा मोर्चाच्या विषयी गैरसमज पसरवून प्रती मोर्चे काढायला प्रवृत्त केलं. नंतर आंदोलनात फुट पाडण्यासाठी मोर्चांना जातीय रंग देणे, काही कळसुत्री नेत्यांना आंदोलनात घुसविणे, अशा नेत्यांनी सरकारशी चर्चा केल्याचे वृत्त पसरविणे, समान नागरी कायदा, आर्थिक निकष अशा कधीच अस्तित्वात न येणार्‍या मुद्यावर आणुन आंदोलकांचे लक्ष भरकटवणे असे अनेक प्रयत्न करुन ही आंदोलनातील एकसंधपणा कमी होत नाही हे लक्षात आल्यावर एक चाल सरकारकडुन ख...

पंढरी वार्ता:- पाणी फौंडेशनच्या कार्यास एस.एम.कंन्स्ट्रक्शन कडून अर्थसहाय्य

Image
  पाणी फौंडेशनच्या कार्यास एस.एम.कंन्स्ट्रक्शन कडून अर्थसहाय्य   डोंगरगाव पाणी फौंडेशनच्या वतीने समाधान आवताडे यांचा सत्कार      मंगळवेढा तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या वॉटर कप स्पर्धेत डोंगरगाव सह अनेक गावांनी सहभाग नोंदवला होता.या पुरस्कार प्राप्त डोंगरगाव पाणी फौंडेशनच्या वतीने करण्यात आलेल्या विविध कामांसाठी एस.एम.कंन्स्ट्रक्शनच्या वतीने अर्थसहाय्य दिल्याबद्दल दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांचा डोंगरगावचे सरपंच बाळासाहेब कवाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या प्रसंगी सभापती प्रदिप खांडेकर यांचाही सत्कार करण्यात आला.     यावेळी कारखान्याचे संचालक राजीव बाबर,शिवाजी जाधव,उत्तम भुसे,मधुकर मोरे,पंडीत साखरे,सारंग जाधव आदींसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.    

पंढरी वार्ता :- पंढरी वार्ता:- रस्ते दुरुस्ती व खड्डे बुजविण्याच्या कामाचा अहवाल दर तीन महिन्याला सादर करा !

Image
रस्ते दुरुस्ती व खड्डे बुजविण्याच्या कामाचा अहवाल दर तीन महिन्याला सादर करा ! मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाची दखल घेत शासानाचा आदेश   डस्ट व मुरुम भरुन नव्हे तर शास्त्रीय पध्दतीने खड्डे बुजवावे लागणार                       राज्यातील नगर पालीका व महापालीका क्षेत्रातील रस्त्यावरील खड्डयांच्या बाबत सर्वसामान्य जनतेमध्ये असलेला प्रचंड रोष व अनेक ठिकाणी सुरु असलेली रस्ता दुरुस्तीची कामे वेळेत पुर्ण होत नसल्याने नागरिकांना सहन करावा लागणारा त्रास याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने स्वत दखल घेत सुमोटो याचीकेची सुणावणी करीत नागरिकांची या त्रासातून मुक्तता करण्याच्या हेतून शासनास आदेश दिले असून मुंबई उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे खडबडून जागे होत महाराष्ट्र शासनाने राज्यातीळ सर्व नगर पालीका व स्थानिक स्वराज्य संस्थांना 18 ऑगस्ट रोजी एक परिपत्रक काढून रस्त्यावरील खड्डे व रस्ते दुरुस्तीबाबत दर तीन महिन्याला नगर परिषद संचनालयाकडे प्रगती अहवाल दाखल करावा असे आदेश दिले आहेत.पंढरपूर शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर...

पंढरी वार्ता :- पंढरपूर शहरातील चंद्रभागा काठच्या रेड लाईन आणि ब्ल्यु लाईन पुररेषेचा फेरसर्व्हे होणार

Image
  पंढरपूर शहरातील चंद्रभागा काठच्या रेड लाईन आणि ब्ल्यु लाईन पुररेषेचा फेरसर्व्हे होणार  बांधकाम परवाने देताना करावी लागणार काटेकोर अंमलबजावणी गेल्या 50 वर्षातील महापूर लक्षात घेवून होणार सर्व्हे !   भीमा पाटबंधारे विभागाच्या वतीने भीमा नदीकाठच्या पुररेषेचा फेरसर्व्हे होणार असून गेल्या 50 वर्षात भीमा नदीस आलेले महापूर व या महापूर काळात नागरी वस्तीत घुसलेले महापुराचे पाणी याचा गेल्या 50 वर्षाचा अभ्यास करुन रेडलाईन व ब्ल्यु लाईन पुररेषा नव्याने आखण्यात येणार आहे.यासाठी भीमा पाटबंधधारे विभागाच्या वतीने सर्व्हेसाठी निविदा आमंत्रीत केल्या आहेत.या साठी सुमारे 70 लाख रुपये खर्च अपेक्षीत आहे.पंढरपूर शहरातील चंद्रभागा नदीकाठचा मोठा लोकवस्तीचा परिसर या  पुरेषेच्या आत येत असून या मध्ये अनेक अधिकृत व अनधिकृत झोपट्टयांचाही समावेश आहे.महापूराच्या काळात मोठया प्रमाणात पुनर्वसन करावे लागत असल्याने पुररेषेच्या आत बांधकाम परवाने देताना विशिष्ट अटींची पुर्तता करणे नगरविकास खात्याने बंधनकारक केले आहे.या पुररेषेच्या नव्याने आखणीनंतर या पुररेषेच्या आतील रहिवाशांना शासनाच्या बा...

पंढरी वार्ता :- उमेश परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त उपनगराध्यक्ष विशाल मलपे यांच्याकडून युवकाच्या उपचारासाठी अर्थिक मदत

Image
 उमेश परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त उपनगराध्यक्ष विशाल मलपे यांच्याकडून युवकाच्या उपचारासाठी अर्थिक मदत  युटोपीयन शुगरचे चेअरमन व पंढरपूर-मंगळवेढा विकास आघाडीचे अध्यक्ष उमेश परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत इतर कार्यक्रमास खर्च करण्याऐवजी उपनगराध्यक्ष विशाल मलपे यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून पारुबाई महादेव घनवजर मु.पो.सरकोली सध्या रा.इसबावी यांच्या मुलाच्या ऑपरेशन साठी अकरा हजार रुपयेची मदत इसबावी विकास सेवा सोसायटी चेअरमन सुखदेव आप्पा मलपे यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आली.     या बाबत अधिक माहीती देताना अतुल मलपे म्हणाले की,आमचे आधारस्तंभ मार्गदर्शक युटोपीयन शुगरचे चेअरमन  व  पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीचे अध्यक्ष उमेशराव परिचारक यांचा वाढदिवस प्रतिवर्षी आम्ही विविध विधायक उपक्रमाचे आयोजन करुन साजरा करत असू मात्र यावर्षी हा सर्व खर्च टाळून सदर मुलाच्या ऑपरेशनसाठी मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आणि हा निधी सुपुर्द केला आहे. यावेळी  समाधान मलपे , अतुल मलपे विनायक गाजरे रोहित मलपे  प्रशांत काळे मनोज कांबळे  उपस्थित होते

पंढरी वार्ता :- राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या बुथ सक्षमीकरण संकल्प मेळाव्यास हजारो युवकांची उपस्थिती

Image
राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या बुथ सक्षमीकरण संकल्प मेळाव्यास हजारो युवकांची उपस्थिती   भर पावसात कार्यकर्त्यांच्या उत्साह पाहून प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते यांनी केले कौतुक                             दिवसभर पावसाची रिपरिप असतानाही सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या वतीने पंढरीत आयोजीत करण्यात आलेल्या बुथ सक्षमीकरण संकल्प मेळाव्यास हजारो कार्यकर्त्यांनी उत्साहाने उपस्थित राहून बुथ सक्षमीकरणाचा संकल्प सोडला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले प्रदेश अध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी उत्साही कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक केले.या मेळाव्यात राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.आ.दिपक साळुंखे-पाटील,आ.दिलीप    सोपल,मा.आ.राजन पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष बळीराम साठे,युवकचे जिल्हा निरिक्षक प्रदिप कंद,जि.प.सदस्य उमेश पाटील,अजित जगताप,आर्यन सोपल,आप्पासो कोरे,राजेंद्र हजारे,लतीफ तांबोळी,प्रकाश चवरे,बाळासो केदार,महिला जिल्हाध्यक्ष मंदा काळे,मंगला शेळवणे,नगमा शेख,प्र...

पंढरी वार्ता :- 3 टक्के अपंग विकास निधी तातडीने ग्रामपंचायतींना वर्ग करा अन्यथा 23 ऑगस्ट पासून उपोषण

Image
3 टक्के अपंग विकास  निधी तातडीने ग्रामपंचायतींना वर्ग करा अन्यथा 23 ऑगस्ट पासून उपोषण प्रहार  संघटनेचा पंचायत समिती गट विकास अधिकार्‍यांना निवेदनाद्वारे इशारा  अपंग व्यक्तींना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेतील 3 टक्के निधी देण्याची तरतूद आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नसल्याने अपंगांना न्याय मिळतच नाही. अपंग व्यक्ती कायद्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 3 टक्के निधीतून अपंग कल्याणकारी योजना राबवून अपंगांचे पुनर्वसन करण्यात येते. हा निधी स्थानिक स्वराज्य संस्थांना खर्च करणे बंधनकारक असते. मात्र, सर्वच ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा हा निधी खर्च करण्यास टाळाटाळ करतात तर अनेक वेळा ग्रामपंचायतींना हा निधीच उपलब्ध करुन दिला जात नाही.या निधी पासून वंचीत राहीलेल्या ग्रामपंचायतींना तातडीने हा निधी उपलब्ध करुन द्यावा अन्यथा 23 ऑगस्ट पासून आ.बच्चू कडू यांच्या आदेशानुसार व त्यांच्या मार्गदर्शनाखाली  पंचायत सतिमीसमोर उपोषण केले जाईल असा इशारा प्रहार संघटनेच्या वतीने पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आल...

पंढरी वार्ता:- मराठा समाजास आरक्षण मिळत नाही तो पर्यंत दंडावर काळी फीत बांधून शासनाचा निषेध ! आज 16 ऑगस्ट पासून आंदोलनास गादेगाव येथून सुरुवात

Image
  मराठा समाजास आरक्षण मिळत नाही तो पर्यंत दंडावर काळी फीत बांधून शासनाचा निषेध !  आज 16 ऑगस्ट पासून आंदोलनास गादेगाव येथून सुरुवात      (पहा गादेगाव येथे आंदोनकर्त्यानी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया )   9 ऑगस्ट 2016 ला सूरु झालेला मराठा मोर्चाच्या  दोन वर्षाच्या शांततामय आंदोलनानंतरही या सरकारचे डोळे उघडत नसल्याने  हा मुक मोर्चा ठोक मोर्चात परावर्तीत झाला.या दोन वर्षात फडणवीस सरकारने हा लढा मोडुन काढण्यासाठी बरेच मार्ग वापरुन पाहिले. पहिल्यांदा इतर समाजाला मराठा मोर्चाच्या विषयी गैरसमज पसरवून प्रती मोर्चे काढायला प्रवृत्त केलं. नंतर आंदोलनात फुट पाडण्यासाठी मोर्चांना जातीय रंग देणे, काही कळसुत्री नेत्यांना आंदोलनात घुसविणे, अशा नेत्यांनी सरकारशी चर्चा केल्याचे वृत्त पसरविणे, समान नागरी कायदा, आर्थिक निकष अशा कधीच अस्तित्वात न येणार्या मुद्यावर आणुन आंदोलकांचे लक्ष भरकटवणे असे अनेक प्रयत्न करुन ही आंदोलनातील एकसंधपणा कमी होत नाही हे लक्षात आल्यावर हे सरकार शेवटी पोलीस बळाचा व कायद्याचा धाक दाखविण्याची खेळी खेळत मराठा समाजाचे आंदो...

पंढरी वार्ता :- पंढरपुर फोटोग्राफर विकास मंचने फोटोग्राफर बांधवांना संघटित केले- जेष्ठ फोटोग्राफर शिवाजीराव तरळगट्टी

Image
पंढरपुर फोटोग्राफर विकास मंच ने फोटोग्राफर बांधवांना संघटित केले- जेष्ठ फोटोग्राफर शिवाजीराव तरळगट्टी पंढरपूर फोटो ग्राफर विकास मंचने फोटोग्राफर बांधवांना संघटीत करुन त्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी जो संघटीत प्रयत्न चालविला आहे,व या विकास मंचच्या माध्यमातून नवनव्या संधी उपलब्ध केल्या जात आहेत त्या निश्‍चितच कौतुकास्पद आहेत असे प्रतिपादन जेष्ठ फोटोग्राफर शिवाजीराव तरळगट्टी यांनी केले पंढरपूर मध्ये फोटोग्राफर दिनानिमित्त पंढरपूर विकास मंच च्या वतीने शहर व तालुक्यातील फोटोग्राफर बांधवांच्या विशेष कार्यशाळेचे येथील हॉटेल विठ्ठल इन मध्ये आयोजन केले होते यावेळी ते बोलत होते.यावेळी फोटोग्राफर शिवाजी दादा तरळगट्टी, लालाकाका खिस्ते,सांगली कलर लॅबचे मालक शरद सारडा व श्रीकांत बाहेती यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.              या कार्यशाळेत पंढरपूर शहर व तालुक्यातील फोटोग्राफर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या कार्यशाळेत फोटो इडिटींग सॉफ्टवेअर विषयीे अद्यावत तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली.तसेच नवनवीन अत्यधुनिक कॅमेरे,लेन्सेस,अल्...

पंढरी वार्ता :- महाराष्ट्र राज्य पोलीस पत्नी संघाच्या पंढरपूर तालुकाध्यक्षपदी सुजाता लोखंडे यांची निवड

Image
  महाराष्ट्र राज्य पोलीस पत्नी संघाच्या पंढरपूर तालुकाध्यक्षपदी   सुजाता लोखंडे यांची निवड  महाराष्ट्र राज्य पोलीस पत्नी संघांच्या तालुकाध्यक्षपदी सुजाता सुरेश लोखंडे यांची निवड करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य पोलीस पत्नी संघाच्या प्रदेश संस्थापक अध्यक्षा यशश्री प्रमोद पाटील यांनी त्यांना या निवडीचे पत्र नुकतेच प्रदान केले आहे.महाराष्ट्र राज्य पोलीस पत्नी संघ संपुर्ण राज्यभरात कार्यरत असून या संघाच्या माध्यमातून पोलीस कुटुंबीयांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी संघटीतपणे प्रयत्न केले जातात.तर पोलीस कुुटंबीयांच्या विविध समस्याबाबत जनजागृती केली जाते.                या बाबत अधिक माहीती देताना नुतन तालुकाध्यक्षा सुजाता लोखंडे म्हणाल्या की,मनुष्यबळ कमी असल्यामुळे राज्यातील पोलिसांना रोज 12 ते 14 तास काम करावे लागते. पुरेशी साधने नसतानाही जोखीम पत्करावी लागते. यात कुठे चूक झाली तर वरिष्ठांकडून तंबी मिळते.त्यांची बोलणी खावी लागते. चौकशीचा ससेमिरा मागे लागतो. बदली, निलंबन, बडतर्फीची टांगती तलवार असतेच. अशा या वातावरणात काम करीत असताना...

पंढरी वार्ता:- ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनाझेशनच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

Image
  ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनाझेशनच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटप पोलीस कर्मचार्‍यांनाही जिलेबी भरवून दिल्या शुभेच्छा       ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशनच्या वतीने पंढरपूर तालुका अध्यक्ष शफी मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली आज 72 वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठया उत्सासात साजरा करण्यात आला.या निमित्ताने आज येथील उर्दू  शाळा नं.16 येथील  विद्यार्थ्यांना तसेच अरबी मदरसा टाकळी रोड येथे ध्वजवंदनानंतर खाऊ वाटप करण्यात आले तर पंढरपूर पोली उपअधिक्षक कार्यालय,  शहर व तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांनाही ऑर्गनाझेशनच्या वतीने  जिलेबी भरवून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.    येथील ऊर्द प्रशालेत बोलताना तालुकाध्यक्ष शफी मुलाणी म्हणाले की,ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीतून सुटका करुन घेण्यासाठी आपल्या देशातील अनेक महान सपूत शहीद झाले आहेत.तेव्हा कुठे आपणास हे स्वातंत्र्य अनुभवता आले आहे.स्वातंत्र्याचा पाया हा समता आणि बंधुता आहे.याच विचारावर आपण आपल्या देशाला आणखी प्रगतीपथावर नेवू शक...

सकल धनगर समाज आता निर्णायक आंदोलनाच्या तयारीत

Image
सकल धनगर समाज आता निर्णायक आंदोलनाच्या तयारीत   31 ऑगस्टला औरंगाबाद येथे धनगर समाजाचा एल्गार     पंढरपूर शहर व तालुक्यातून हजारो समाज बांधव सहभागी होणार गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाज आपल्या हक्काच्या अनुसुचीत जमतीच्या आरक्षणासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करीत आला आहे.महाराष्ट्रात धनगड जमात दाखवा असा निर्वाणीचा इशारा देत धनगर समाजाने 7 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन केले तर अनेक ठिकाणी मोर्चही काढण्यात आले.धनगर समाजातील युवकांनी या आरक्षणाच्या लढाईत आत्महत्या करुन हौतात्म्य पत्करले तरीही शासनास पाझर फुटला नाही.13 ऑगस्ट रोजी धनगर समाजाच्या वतीने राज्यव्यापी बंदची हाक दिली होती.मात्र राज्यातील भिषण परिस्थीती लक्षात घेवून धनगर समाजाने मन मोठे करुन हा बंद मागे घेतला.असे असताना शासन धनगर समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे आता धनगर समाज निर्णायक आंदोलनाच्या तयारीत असून 31 ऑगस्ट रोजी औरंगाबाद येतील हमखास मैदानावर धनगर समाज राज्यभरातून एकवटणार असून हा धनगर समाजाचा शासनास निर्वाणीचा इशारा आहे अशी भुमिका सकल धनगर समाज बांधवांनी आज येथील शासकिय विश्रामगृह ...

पंढरी वार्ता :- बडवे प्रतिष्ठानचा आदर्श माता गौरव सोहळा संपन्न

Image
बडवे प्रतिष्ठानचा आदर्श माता गौरव सोहळा संपन्न   एकत्र कुटुंब पध्दती ही काळाची गरज - साध्वी राधिकामाता  सरस्वती    एकत्र कुटुंब पध्दती ही काळाची गरज आहे.विभक्त कुटुंब पध्दतीमुळे आज अनेक कुुटुंबात असुरक्षीततेची भावना निर्माण झाल्याने मानसिक स्वास्थ हरवत चालले आहे.त्यामुळे कुटुंबाच्या उत्कर्षासाठी आणि पुढील पिढीवर सुसंस्कार करण्यासाठी एकत्र कुटुंब पध्दतीचा आणखी प्रसार झाला पाहीजे  व यामुळे देश देखील संघटीत होण्यास मदत होईल असे प्रतिपादन साध्वी राधिकामाता सरस्वती यांनी केले आहे.सौ.पावर्तीबाई बडवे महिला प्रतिष्ठाणच्या वतीने येथील संत तुकाराम भवन येथे कॉग्रेसच्या नेत्या उज्वलाताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.या कार्यक्रमात उषाताई विश्‍वनाथ कराड,पुष्ममाला यशवंतराव पाटील,अरुणा गोपाळकृष्ण शहापूरे,मालती मधूकर कवडे या आदर्श मातांचा गौरव करण्यात आला.तर बडवे समाज भुषण म्हणून सुचीत साईनाथ बडवे,विजय वैभव बडवे,श्रीराम दत्तात्रय बडवे यांचा सत्कार करण्यात आला.या वेळी प्रतिष्ठाणच्या वतीने गौरी सजावट स्पर्धेत...

भांडे समितीच्या अहवालाप्रमाणे परिट समाजाचा अनुसुचीत जाती प्रवर्गात समावेश करा परिट(धोबी)समाजसेवा मंडळाची मागणी

Image
भांडे समितीच्या अहवालाप्रमाणे परिट समाजाचा अनुसुचीत  जाती प्रवर्गात समावेश करा  परिट(धोबी)समाजसेवा मंडळाची मागणी 1 मे 1960 पुर्वी राज्यातील बुलढाणा व भंडारा जिल्ह्यात परीट समाजाला अनुसुचीत जातीच्या सवलतीचा लाभ मिळत होता.मात्र भाषिक प्रांत रचनेनंतर परीट समाजाचा इतर मागासवर्गीयात प्रवर्गात समावेश करण्यात आला.देशातील 15 राज्ये व 5 केंद्रशासीत प्रदेशात परीट (धोबी) समाजाचा समावेश अनुसुचीत जातीमध्ये असून महाराष्ट्रात मात्र या समाजावर अन्याय होत आहे.2001 मध्ये या समाजाने मुंबई येथे मोर्चा काढल्यानंतर धोबी समाज पुनर्विलोकन समितीची स्थापना करण्यात आली होती. भांडे समितीच्या अहवालानुसार परीट समाजास अनुसुचीत जाती प्रवर्गाचे आरक्षण मिळावे अशी मागणी परीट (धोबी)समाजसेवा मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.या आशयाचे निवेदन  तहसिलदार पंढरपूर यांना देण्यात आले.       परीट समाजाचा अनुसुचीत जमातीत समावेश करावा या मागणीसाठी समाजाने 2017 मध्येही मुंबई येथे मोर्चा काढला होता.तेव्हा शासनाच्या वतीने ना.गिरीष बापट धोबी समाजास यापुढे आंदोलन करावे लागणार नाही.लवकरच निर्णय घेवू असे ...