Posts

Showing posts from December, 2017

पंढरी वार्ता:- ना.चिंचोली येथे मा.आ.सुधाकरपंत परिचारक व प्रभाकर परिचारक यांच्या हस्ते सुर्यनारायणाची महापूजा संपन्न

Image
पंढरी वार्ता:- ना.चिंचोली येथे  मा.आ.सुधाकरपंत परिचारक व प्रभाकर परिचारक यांच्या हस्ते सुर्यनारायणाची महापूजा संपन्न पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे पौष महिन्यात सुर्यनारायण देवाचा यात्रा महोत्सव मोठया उत्साहाने साजरा होत असतो.आज येथील पुरातन हेमांडपंथी मंदीरात मा.आमदार सुधाकरपंत परिचारक व प्रभाकर परिचारक यांच्या हस्ते सुर्यनारायणाची महापूजा संपन्न झाली.मा.सुधाकरपंत परिचारक यांची येथील सुर्यनारायणावर नितांत श्रध्दा असून प्रतिवर्षी ते आवर्जुन महापूजेसाठी उपस्थित असतात.यावर्षी त्यांच्या समवेत त्यांचे बंधू प्रभाकर परिचारक हेही महापूजेसाठी उपस्थित होते.मोठया भक्तीपुर्ण वातावरणात व उत्साहात सुर्यनारायणास महाअभिषेक करण्यात आला.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.उपसभापती  लक्ष्मण धनवडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.        यावेळी त्यांच्यासमवेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे,पंचायत समीतीचे माजी सभापती ऍड.वामनराव माने,जि.प.सदस्य प्रा.सुभाष माने,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महादेव घाडगे, मा.पंचायत समिती सदस्य औदुंबर मेट...

पंढरी वार्ता:- पंढरीत साकारणार 4 कोटी 4 लाख खर्चाचे तुळशीवन ! अखेर कामास सुरुवात झाल्यानंतर दिली गेली माहीती

Image
येथील यशवंतराव चव्हाण जलायशयाच्या ठिकाणी प्रस्तावीत तुळशीवनाच्या कामास धडाक्यात सुरुवात झाली असून या कामास पंढरपूर शहरातीन अनेक सामाजिक संघटनांनी आक्रोशपत्राद्वारे विरोध दर्शविला होता.शहरातील स्वच्छतेची व नागरिकांच्या आरोग्यावर थेट दुष्परणीणाम करणार्‍या समस्या आधी सोडविल्या जाव्यात अशीच या संघटनांची मागणीॅ होती.तर नमामी चंद्रभागा अभियानाअर्तंगत तुळशी वृंदावनाचे काम केले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 2016 च्या आषाढी यात्रेवेळी या कामाचे भुुमीपूजनही झाले होते.आणि मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी लावलेले तुळशीचे रोपटे पेव्हर ब्लॉक च्या आडोशात कसे बसे निसर्गाच्या कृपने तग धरुन वाढत होते.या तुळशीवनाच्या कामास केव्हा सुरुवात होणार असा प्रश्‍न पंढरपूरकांना पडला असतानाच आता मोठया धडाक्याने हे काम सरु करण्यात आले आहे.मात्र या कामाच्या निविदा प्रसिध्द झाल्यानंतर संकल्पचित्रासह आयटेम वाईज इस्टिमेटची प्रत मिळावी यासाठी सोलापूरचे विभागीय वन अधिकारी श्री माळी यांच्याशी वारंवार संपर्क करण्यात येत होता.मात्र माहीती देण्याबाबत एकवाक्यता दिसून आली नाही.या दरम्यान श्री मा...

पंढरी वार्ता :- कौठाळी-शिरढोण पुलाचे सहकार मंत्री श्री.देशमुख यांच्या हस्ते भूमिपूजन !

Image
ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्यासाठी चांगले रस्ते व दळणवळणाच्या सुविधा असणे गरजेचे असते. या सुविधा उपलब्ध करुन देण्यास शासन कटिबध्द असल्याचे प्रतिपादन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले. पंढरपूर तालुक्यातील मौजे कौठाळी-शिरढोण रस्त्यावर बांधण्यात येणा-या पुलाचे भूमिपूजन सहकार मंत्री श्री.देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार भारत भालके, आमदार दत्तात्रय सावंत, शिरढोणच्या सरपंच उज्ज्वला कांबळे, पंचायत समीतीचे माजी उपसभापती विष्णु बागल, उपकार्यकारी अभियंता एस.टी.राऊत, उप-अभियंता एच.एम.बागल आदी उपस्थित होते. सहकार मंत्री श्री.देशमुख म्हणाले, ग्रामीण भागात चांगले रस्ते असल्यास शेतक-यांचा माल त्वरीत बाजारपेठेत पोहचला जाईल. त्यामुळे त्यांच्या भावाला योग्य भाव मिळेल.कौठाळी-शिरढोण पुलामुळे या परिसराचा विकास होण्यास मदत होईल असेही श्री.देशमुख सांगितले. आमदार श्री.भालके म्हणाले, कौठाळी-शिरढोण पुलाच्या कामामुळे चार गावातील नागरीकांच्या रहदारीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. बांधण्यात येणा-या पुलाचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण तसेच मुदतीत पुर्ण...

पंढरी वार्ता:- फक्त दारु पिण्याचे परमीट वाटपाची उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी ?

Image
नववर्षाचे स्वागत करण्याच्या हेतूने राज्यभरात अक्षरश: दारुचा महापुर येणार आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.सोलापूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच बारपरमीट रुम,धाबे,हॉटेल्स अक्षरश: ओसंडून वाहणार आहेत.तर नवीन वर्षाचे स्वागत ‘झिंगाट’ होऊन करण्याच्या आपल्या परंपरेप्रमाणे अनेकजण उद्याच्या पार्टीच्या तयारीला लागले असतानाच दारु पिण्याचे परमीट उपलब्ध करुन देण्याचे प्रसिध्दी करण देवून राज्य उत्पादन शुल्कच्या सोलापूर विभागानेही आपली जबाबदारी पार पाडली आहे.मात्र जिल्ह्यात प्रत्यक्षात वितरीत झालेले परमीट आणि उद्या 31 डिसेंबरच्या रात्री तर्राट होऊन नवीन वर्षाचे स्वागत करणार्‍यांची संख्या यामध्ये यापुर्वीही मोठी तफावत दिसून आली असून उद्या तेच चित्र पंढरपूर तालुक्यातही पहावयास मिळणार आहे.मात्र परमीट व्यतीरिक्त दारु पिणार्‍यांवर प्रत्यक्षात खरी कारवाई ही पोलीसांनाच करावी लागत असून या बाबत कारवाईचे अधिकार असलेले उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी उद्या प्रत्यक्षात कारवाई करुन शहर व परिसरातील अवैध रित्या दारु विक्री करणार्‍या अथवा पिण्यार्‍यांवर कारवाई करणार का असाच प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.     ...

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

Image
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर महाराष्ट्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमल बजावणी सुरु आहे.या अभियानाअर्तंगत राज्यामध्ये ज्या कुटुंबाकडे शौचालय नाही अशा कुटुंबाना शौचालयाची सुविधा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी शासनाची पार पाडणे याच बरोबर शहर स्वच्छ ठेवणे या दोन्ही जबाबदार्‍या स्थानिक प्रशासनाने पार पाडणे या हा या अभियानाचा राज्य शासनाचा मुख्य हेतू आहे.राज्य शासनाने संपुर्ण महाराष्ट्राचा शहरी भाग हा 1 ऑक्टोंबर 2017 रोजी राष्ट्रपतींच्या उपस्थितीत हागणदारी मुक्त करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. या नंतर आता शासनाचे स्वच्छ महाराष्ट्र धोरणानुसार ‘कचरा लाख मोलाचा’ हे ब्रीद घेवून शहरे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी शासनाने नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी बंधनकारक केली आहे.          ‘कचरा लाख मोलाचा’हे लक्षात घेवून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगर पालीकेने ठोस उपाययोजना करण्याबरोबरच जे नागरिक यास सहकार्य करीत नाहीत त्यांच्यावर थेट दंडात्मक कारवाई करावी असे आदेश शासनाने 30 डिसेंबर रोजी निर्गमीत केले आहेत.त्यानुसार आता पंढर पूर शहरात उघडयावर कचरा टाकणा...

पंढरी वार्ता:- दूर दरवाढ नाकारणार्‍या दुध संघांवर कारवाईच्या मागणीसाठी बळीराजाचा रस्ता रोको

Image
राज्याचे दुग्धविकास मंत्री ना.महादेव जानकर यांनी गेल्या चार महिन्यापासून दूर दरवाढ नाकारणार्‍या दुध संघावर कारवाई करण्याचा इशारा देण्याशिवाय कुठलीही कारवाई केली नाही.शासनाने जून महिन्यात दूर दरवाढ जाहीर करुनही प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या पदरात शासनाने केलेली अत्यल्प दरवाढही पडली नाही.हा शासनाचा नाकर्तेपणा असून शासन दूधदरवाढ नाकारणार्‍या संघावर कारवाई करण्यास कुचराई करत आहे.शासनाच्या या धोरणाच्या निषेधार्थ बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने पिलीव चौक येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी बळीराजा शेतकी संघटनेच्या वतीने दूधदरवाढीबरोबरच महावितरणच्या वतीने सद्या वीज कनेक्शन तोडण्याची हाती घेतलेली मोहीम थांबवावी,ज्या भागातील डि.पी.उतरवले गेले आहेत तेेथील डि.पी.त्वरीत पुर्ववत सुरु करावेत अशी मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली.              या रस्ता रोको आंदोलनात बळीराजा शेतकरी संघटनेचे संजय पाटील घाटणेकर,जयंत बगाडे सर,बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली हळणवर,जिल्हा उपाध्यक्ष शहाजहानभाई शेख,पंढरपूर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्‍वर जवळेकर,माळशिरस तालुकाध्यक्ष...

पंढरी वार्ता:- लाचलुचपत प्रतिबंधक विभागास धार्मिक स्थळांच्या ठिकाणी कारवाईचे अधिकार द्या-द.बडवे

Image
 भाविकांना पैसे घेवून दर्शनास सोडले जात असेल तर ते बेकादेशीर असण्याबरोबरच श्रध्देने रांगेत दर्शनासठी थांबलेल्या भाविकांवर अन्यायकारक आहे.भाविकांकडून पैसे घेवून दर्शनास सोडले जात असेल तर हा लाच घेण्याचाच प्रकार असून त्यामुळे भाविकांच्या तक्रारींवर मंदीरात कारवाई करण्याचे अधिकार लाच लुचपत खात्यास प्रदान करावेत अशी मागणी आपण मुख्यमंत्र्याकडे फॅक्सद्वारे केली असल्याची माहीती कॉग्रेस प्रणित ब्राम्हण सेलचे जिल्हाध्यक्ष द.बडवे यांनी दिली आहे.     शासनाच्या व धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्रातील अनेक देवस्थाने आहेत.नाताळाच्या सलग सुट्टयांच्या काळात राज्यभरातील अनेक धार्मिक स्थळांच्या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी झालेली दिसून येत आहे. या काळात अनेक मंदीरांमध्ये मोठया प्रमाणात वशिलेबाजीने दर्शनास सोडण्याचे प्रकार घडल्याचे निदर्शनास येत असुन हे धार्मिक स्थळे पुवि पुजार्‍यांच्या ताब्यात होती तेव्हाही असे प्रकार घडल्याच्या आरोपाखाली तक्रारीही झाल्या होत्या.मात्र पुढे धार्मिक स्थळे शासनाने अधिग्रहीत केल्यानंतर अधिकारप्राप्त व्यक्तीही मंदीरांच्या ठिकाणी भ्रष्टाचार क...

पंढरी वार्ता:- ‘विठ्ठल’च्या वजनकाट्याची भरारी पथकाकाकडून भररात्री तपासणी ! काटा योग्य असल्याचा दिला निर्वाळा

Image
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि वेणुनगर  पंढरपूर कारखान्यातील ऊस  वजन काटे तपासणी महाराष्ट्र शासन नियुक्त भरारी पथकाच्या सदस्यांकडून करण्यात आली. यावेळी भरारी पथक येण्यापूर्वी वजन केलेली वाहने गव्हाणी वरुन परत आणुन ङ्गेर तपासणी करण्यात आली व ऊस भरलेली बैलगाडी, डंपिंग वाहने तपासण्यात आली. भरारी पथकात पंढरपूरचे वैधमापन निरीक्षक कुंभारसाहेब, तहसील पूरवठा आधिकारी जी के वानखडे , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी श्री समाधान ङ्गाटे,लेखापरीक्षक शिंदे, पोलिस कर्मचारी आदी उपस्थित होते.  कोणत्याही वजन काट्यावर ङ्गरक आढळून आला नाही, सर्व वजने बरोबर असलेचा लेखी अहवाल देणेत आला आहे.    ऊसदर आंदोलनाच्या निमित्ताने साखर कारखान्यांकडून काटामारी केली जात असल्याचा आरिेप मोठया प्रमाणात होत होता.मात्र  हा आरोप सिध्द करावा असे आवाहन साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनाकडून वारंवार केले जात होते.राज्य शासनाच्या वतीने साखर कारखान्यांच्या काटे तपासणीसाठी भरारी पथकाची घोषणा केल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातही हे पथक कार्यरत झाले असून काल रात्री या पथकाने विठ्ठलच्या वजनकाट्यावर येवून ...

पंढरी वार्ता :- स्वस्त धान्य दुकानादारांची साखर देण्यास टाळाटाळ ! शिवबुद्ध युवा प्रतिष्ठानचे धरणे आंदोलन

Image
गेल्या साह ते साथ महिन्यापासून पंढरपूर शहर व तालुक्यातील रेशन दुकानदार कार्ड धारकांना साखर वाटप करीत नाहीत कार्डधारकांनी साखरेची मागणी केली तर साखर बंद झाली आहे अशी माहिती दिली जाते . शहर व तालुक्यातील सर्व रेशन दुकानधारकाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी 16/10/2017रोजी केली होती तरी पुरवठा अधिकारी यांनी या निवेदनाची दखल घेतली नाही म्हणून शिवबुध्द'युवा'प्रतिष्ठान'महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने तहसीलदार कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात  येत आहे .       आज सकाळ पासून सुरु असलेल्या या धरणे आंदोलनास अनेक संघटनांनी पाठिंबा व्यक्त केला असून कॉग्रेसचे शहराद्यक्ष राजेश भादुले यांनी याबाबत आंदोलनाच्या ठिकानीं भेट देऊन कारवाईची मागणी केली असल्याची माहिती संदीप मुटकुळे यांनी दिली आहे     

पंढरी वार्ता :- अंबाबाई पटांगण ते अर्बन बँक रस्ता कॉक्रिटीकरण कामाच्या दर्जाची चौकशी करण्याची महर्षी वाल्मिकी संघ विद्यार्थी आघाडीची मागणी !

Image
अर्बन बँक ते अंबाबाई पटांगण रस्त्याच्या कॉंक्रटीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे व चुकीच्या पध्दतीने होत असून हा रस्ता रुंदीकरण करतानाही मोठा भेदभाव करण्यात आला आहे.या रस्त्याचे काम सुरु होऊन चार महिन्याचा कालावधी लोटला असूनही हे काम आजतागाय रखडलेलेच दिसून येते.या बाबत आम्ही यापुर्वीही पंढरपूर नगर पालीका प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या.तेव्हा हे गतीने व  दर्जेदार पद्दतीने केले जाईल असे आश्‍वासन देण्यात आले होते.मात्र तरीही हे काम मनमानी पध्दतीने केले जात असून अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे.शासन पंढरपूर शहराच्या विकासासाठी कोटयावधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देत असताना केवळ प्रशासनाच्या गलथान काराभारामुळे ठेकेदाराकडून हे निकृष्ट पध्दतीने केले जात आहे.तरी या कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी व कामाच्या दर्जाची बाह्य यंत्रणे द्वारे तपासणी केलीॅ जावी अशा आशयाचे निवेदन महर्षी वाल्मिकी संघ विद्यार्थी आघाडीच्या वतीने पंढरपूर  प्रांताधिकारी कार्यालयात    निवेदन   दिले आहे.                  अंबाबाई पटांगण ते अर्बन बँक या रस्त्य...

पंढरी वार्ता:- पंढरपूर शहर कॉग्रेसच्या वतीने कॉग्रेसचा 132 वा स्थापना दिन पंढरीत उत्साहात साजरा

Image
भारतीय राष्ट्रीय कॉग्रेेसचा 132 वा स्थापन दिन पंढरीत मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.येथील हुतात्मा स्मारक येथे कॉग्रेसचे जेष्ठ नेते तात्यासाहेब देवकर यांच्याहस्ते ध्वजारोहन करण्यात व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉग्रेेस कमेटीचे अध्यक्ष ऍड.राजेश भादुले हे होते.तर महिला कॉग्रेसच्या प्रदेश सचिव डॉ.साधना उगले,ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष समिर कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉग्रेेसचे सरचिटणीस प्रा.मारुती भोसले यांनी केले.      यावेळी बोलताना कॉग्रेसचे शहराध्यक्ष ऍड.राजेश भादुले यांनी कॉग्रेसच्या स्थापनेपासूनचा इतिहास कथन करुन इतक्या प्रदिर्घ वर्षाची परंपरा असलेला हा महान पक्ष म्हणून जगात ओळखला जातो.कॉग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धूरा राहूल गांधीच्या हाती आल्यानंतर आता देशभरातील कॉग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट आलेली आहे.      यावेळी कॉग्रेसचे द.बडवे,देवानंद इरकल,सुहास भाळवणकर,मामा फलटणकर,प्रताप रजपूत,राजेंद्र भोसले,किरण घाडगे,भाऊ तेलंग,संदीप माने,राजेंद्र परदेशी,आशाताई बा...

पंढरी वार्ता :-चळे येथील आभ्यासिकेसाठी आ.रामहरी रुपनर यांना निवेदन

Image
पंढरपूर तालुक्यातील चळे येथील भीमनगर येथील लोकसंख्या 2011 च्या जणगणने नुसार 870 आहे.ठिकाणी अनेक गरीब कुटुंबातील विद्यार्थी वास्तव्यास आहेत.राज्यशासनाने दलीतवस्तीच्या ठिकाणी अभ्यासिकेसाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे धोरण कॉग्रेसच्या सत्ताकाळातपासून अमलात आणले आहे.या योजनेअर्तंगत चळे येथील भीमनगरमध्ये अभ्यासिकेसाठी निधी उपलब्ध करुन अभ्यासिकेची उभारणी केल्यास अनेक गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांची सोय होणार आहे.भीमनगरच्या अतिशय जिव्हाळ्याच्या या प्रश्‍नासाठी युवक कॉग्रेेेसचे तालुका उपाध्यक्ष समाधान रोकडे यांनी आ.रामहरी रुपनर हे सोलापूर येथे आयोजीत जिल्हा कॉग्रेस कमेटीच्या बैठकीवेळी आले असता त्यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.           या बाबत बोलताना आ.रामहरी रुपनर म्हणाले की,चळे येथील अभ्यासिकेबाबतची ही मागणी अतिशय रास्त असून या अभ्यासिकेसाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी आपण शासनस्तरावर पाठपुरावा करु व निधी उपलब्ध करुन देवू असे आश्‍वासन यावेळी    त्यांनी दिले.हे निवेदन देताना कॉग्रेस प्रणित ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष समीर कोळी,जिल्हा सरचिटणीस अमर सुुर...

पंढरी वार्ता:- ईश्‍वर वठार निवडणूक सरपंचपदी सितादेवी सुभाष माने विजयी मायाक्कादेवी ग्रामिविकास पॅनल 4 तर विरोधी बिरोबा परिवर्तन पॅनलचे 3 उमेदवार विजयी

Image
पंढरपूर तालुक्यातील ईश्‍वर वठार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य प्रा.सुभाष माने यांच्या मायाक्कादेवी ग्रामविकास पॅनलच्या सितादेवी सुभाष माने 694 मते घेवून विजयी झाल्या असून एकुण 7 ग्रामपंचायत सदस्यापैकी या पॅनलचे 4 तर विरोधी बिरोबा परिवर्तन पॅनलचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत.प्रा.सुभाष माने समर्थकांचे 40 वर्षापासून या ग्रामपंचायतीवर वर्चस्व अबाधीत आहे.गावाच्या विकासासाठी आपण संघटीतपणे व सर्वाना सोबत घेवून काम करीत आल्यानेच आपणावर पुन्हा एकदा विश्‍वास दाखवून सरपंचपदाची संधी गावाने दिली आहे अशी प्रतिक्रिया या विजानंतर सरपंच सितादेवी सुभाष माने यांनी सा.पंढरी वार्ताशी बोलताना दिली आहे.या विजयानंतर ईश्‍वर वठार येथे फटाकयांच्या आतषबाजीने अक्षरश: दिवाळी साजरी करण्यात आली.         गेल्या 40 वर्षात केवळ एक टर्म वगळता 35 वर्षे सुभाष माने समर्थक पॅनलचे ईश्‍वर वठार ग्रामपंचायतीवर वर्चस्व राहीले आहे.जिल्हा परिषद निवडणुकीत प्रा.सुभाष माने हे विजयी झाल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीच्या माद्यमातून विविध विकास कामांचा धडाका सुरु केल्याने त्यांच्या पॅनलचा विजय निश्‍चित हो...

पंढरी वार्ता:-लिंकरोडवरील शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक लक्षात घेवून स्पिड ब्रेकर करा -सुधीर भोसले

Image
प्रबोधनकार ठाकरे चौक ते क्रांतीवीर नाना पाटील चौक हा रस्ता अतिशय वर्दळीचा असून या रस्त्यावरुन मोठया प्रमाणात अवजड वाहनांसह  इतर वाहनांचीही वर्दळ असते.त्याच बरोबर या रस्त्यावरून ही वाहने सुसाट जात असल्याने या रस्त्यावरुन जात असलेल्या विद्यार्थ्यांना व वृध्द व महीलांना अक्षरश: जिव मुठीत धरुन हा रस्ता पार करावा लागत आहे.या परिसरातील नागरिकांची मागणी लक्षात घेवून येथील देशमुख पेट्रोल पंपाजनिक इंग्लीश मिडीयम स्कूलकडे जाणार्‍या रस्त्यानजिक तातडीने स्पिड ब्रेकर तयार करावेत अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे पंढरपूर शहराध्यक्ष सुधीर भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे के ली आहे.      पंढरपूर शहरातील लिंक रोड वरील अवजड वाहनांची वाहतूक हा नेहमीच वादाचा विषय झाला आहे.वाहतूक शाखेने या ठिकाणाहून जडवाहतूकीस बंदी घातलेली असली तरी अनेक वेळा माहीती अभावी वाहने या रस्त्यावरुन जाताना दिसून येतात.या रस्त्यावर शासकिय विश्रामगृह नजिक व महावितरण कार्यालयासमोरील रस्त्यावर स्पिड ब्रेकर करण्यात आले आहेत.त्याच प्रमाणे देशमुख पंपाशेजारी इग्लीश मिडीयम कडे जाणार्‍या जोडरस्त्य...

पंढरी वार्ता:-रुग्णालयांच्या तपासणीसाठी समिती नियुक्तीचा निर्णय

Image
धर्मादाय कायद्याखाली नोंदणी असणाऱ्या इस्पितळातून गरीब रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार दिले जातात का नाही याची तपासणी करण्यासाठी समिती नियुक्त केली जाणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि सोलापूर महानगर पालिकेच्या आरोग्य अधिकारी यांचा या समितीत समावेश असेल. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज याबाबतच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक    डॉ. सुमेध अणदूरकर, सहायक जिल्हा‍ आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे, सह धर्मादाय आयुक्त गीतांजली कोरे आदी उपस्थित होते. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले की, ‘जिल्ह्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयात गरीब रुग्णांसाठी दहा टक्के राखीव खाटा ठेवण्यात येतात याबाबत माहिती दर्शनी भागात लावली जावी. पण अशा माहितीचे फलक नसल्याचे आढळून येते. सर्व रुग्णालयात जमा होणाऱ्या देयकाच्या दोन टक्के रक्कमही बाजूला काढून ठेवली जाते ...

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव

Image
पंढरी वार्ता :-  विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव                      * न्यायलयाच्या निर्णयाविरोधात शिक्षण उपसंचालकांकडे दाद मागणार असल्याचा गायकवाड यांचा दावा खोटा * गार्डी येथील हनुमान लोकसेवा मंडळ संचलीत विद्यामंदीर हायस्कुल गार्डी या शाळेच्या मुख्याध्यापक पदासाठी संस्थेच्या अधिकाप्राप्त विश्‍वस्तांनी शिक्षणाधिकारी सोलापूर यांच्याकडे रा.म.साठे यांचा प्रस्ताव दाखल केला होता.याबाबत जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांनी सार्वजनिकन्यास नोंदणी कार्यालयाकडे संपर्क करुन अधिकारप्राप्त विश्‍वस्तांची परिशिष्ट 1 ची नक्कल प्राप्त  करुनच रा.म.साठे यांना मुख्याध्यापक पदाचा पदभार घेण्याचे आदेश दिले होते.व याबाबत  शाळा न्यायाधिकरणाचे आदेशही होते.असे असताना संस्थेचे तथाकथीत अध्यक्ष असल्याचा दावा करून दत्तात्रय गायकवाड हे दिशाभूल करीत आहेत.वास्तविक पाहता त्यांचा या संस्थेशी काहीही संबध नाही व शिक्षण सस्थेच्या घटनेनुसार वारसा हक्क प्रस्थापीत करता येत नाही असे असतानाही द...

पंढरी वार्ता :- शिक्षण उपसंचालकांकडे वाद प्रलंबीत असताना रा.म. साठेंची पत्रकबाजी -दत्तात्रय गायकवाड

Image
गार्डी येथील हनुमान लोकसेवा मंडळ संचलीत विद्यामंंदीर हायस्कुल गार्डी या शाळेच्या मुख्याध्यापक पद्ाच्या खुर्चीवर आपणास बसून दिले जात नाही असा आरोप केला असून हा आरोप अनाठायी व संस्थेची बदनामी करणारा आहे.ज्या संस्थेत रा.म.साठे हे 1994 पासून सन्मानाने काम करत आले आहेत त्या संस्थेवर जातीयवादाचे आरोप लावणे कृतघ्नपणाचे लक्षण असून जिल्हा शाळा न्यायधिकरणाचे  प्रत्यक्ष आदेश अजून कुणाच्याही हातात पडले नाहीत.असे असताना शाळेच्या वादग्रस्त माजी उपाध्यक्षाला हाताशी धरुन रा.म.साठे यांनी मुख्याध्यापक पदाच्या सहीचे अधिकार मिळविले आहेत.याबाबत संस्थेने पुणे येथील शिक्षण उपसंचालक यांच्याकडे अपिल दाखल केले असतानाही केवळ संस्थेच्या पदाधिकार्‍यांची बदनामी करण्याच्या हेतूने काही विघ्नसंतोषी लोकांना हाताशी धरून रा.म.साठे हे पत्रकबाजी करीत आहेत असा आरोप या संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय प्रकाश गायकवाड यांनी केले आहेत.                     विद्यामंदीर गार्डी या शाळेत रा.म.साठे हे 1994 पासून कार्यरत आहेत.संस्थेमध्ये सर्वजातीधर्माचे कर्मचारी अतिशय आपुलकीने ज्ञ...

पंढरी वार्ता :- अखिल भारतीय मराठा महासंघाच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर

Image
अखिल भारतीय मराठा महासंघ, पंढरपुर शहर व तालुका अंतर्गत विविध संघटना, आघाडीच्या पदाधिकारी यांच्या निवडी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांच्या आदेशानुसार झाल्या.यामध्ये पुढील निवडी झाल्या  मराठा महासंघाचे शहर संघटक म्हणुन काका यादव,शहर उपाध्यक्ष शामराव साळुंखे, मालवाहतुक संघटना तालुकाध्यक्ष सतिश शिंदे, तालुकाउपाध्यक्ष भाऊराव जाधव,शहर संघटक संदिप शिंदे, शहर सचिव दिलीप मलपे,रिक्षा संघटना शहराध्यक्ष नागेश गायकवाड या निवडी करन्यात आल्या.तसेच मराठा महासंघाचे जिल्हासचिव गुरूदास गुटाळ यांची अजोती ग्रामपंचायत उपसरपंच पदी व मराठा महासंघाचे प्रसध्दी प्रमुख विजय काळे यांची राष्ट्रवादी पंढरपुर शहर सचिव पदी निवड झाल्याबद्दल मराठा महासंघ यांचेवतिने सत्कार केली, यावेळी नविन नियुक्त करनेत आलेल्या पदाधिकारी यांनी संघटना वाढीसाठी प्रयत्न करु,तसेच अन्यायाविरुद्ध लढु,विविध सामाजिक उपक्रम राबवु असे मनोगत व्यक्त केले तसेच विविध पदाधिकारी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण,तालुकाध्यक्ष संतोष जाधव, मार्गदर्षक सतिश धनवे सर,जिल्हासचिव गु...

पंढरी वार्ता :- स्वच्छता ऍपवर शहरातील रोज नव्या तक्रारींंचा ढिगारा ! तातडीने निपटारा करण्याची होत आहे मागणी

Image
 स्वच्छतेचा जागर करणार्‍या स्वच्छता ऍपवर पंढरपूर शहरातील आरोग्य खात्याच्या ढिसाळ कारभाराचे वाभाडे काढणारे फोटो मोठया संख्येने पोष्ट होत असून या ऍपवर शहरातील विविध ‘सिटीझन्स’च्या तक्रारींचा ढिगारा साचला असून या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी   नगर पालीकेच्या वतीने काय उपाययोजना करण्यात आली याची माहीती मात्र या ऍपवर उपलब्ध होत नसल्याचेच दिसून येत आहे.तक्रार करुन अनेक दिवस उलटले तरीही या बाबत कुठलीच कार्यवाही होत नसल्याची टिकाही विविध ठिकाणच्या घाणीचे व अस्वच्छतेचे फोटो पोस्ट केल्यानंतर नागरिक व्यक्त करीत आहेत.पंढरपूर नगर पालीकेने स्वच्छता ऍपच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या तक्रारींचे तातडीने निराकारण करणे गरजचे झाले आहे.             स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 4 जानेवारी 2018 पासून सुरु होणार्या सर्वेक्षणामध्ये पंढरपूर नगरपालिकेचा समावेश करण्यात आला आहे. स्वच्छतेच्या ऍपमुळे अस्वच्छ झालेले पंढरपूर शहर स्वच्छ व सुंदर होण्यास नक्कीच मदत होणार आहे मात्र त्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.         ...

पंढरी वार्ता :- ‘एम्पलॉयमेंट एक्स्चेंज’मधील सुशिक्षीत •बेकारांच्या नोंदणीचे पुढे काय ? आ.भारत भालकेंचा सवाल !

Image
राज्य भरात पुर्वीच्या एम्पलॉयमेंट एक्सचेंज म्हणजेच आताच्या कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन केंद्राकडे राज्यभरातून 25 लाख पेक्षा जास्त बेरोजगार सुशिक्षीत युवकांनी नोंदणी केली आहे.मात्र या केंद्रांकडून याबाबत कुठलीही कार्यवाही केली जात नाही.या सुशिक्षीत व बेकार युवकांनी नोंदणी केल्यानंतर वर्षानुवर्षे या केंदांकडून या बेरोजगारांशी साधा संपर्क करण्याचेही दायीत्व पार पाडले जात नाही.राज्यात बेकारीचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढत असताना शासनाच्या या विभागाचा कारभार हा केवळ कर्मचारी पोसण्यापुरताच सुरु असल्याचा टिका आ.भारत भालकेंनी सा.पंढरी वार्ताशी बोलताना केली आहे.        या गंभीर प्रश्‍नाबाबत आ.भालकें  व इतर चार आमदारांनी एकत्रीत रित्या या हिवाळी अधिवेशनात प्रश्‍न उपस्थित केला असून यास उत्तर देताना ना.संभाजी पाटील निलंगेकर यांनी राज्य रोजगार विनिमय केंद्रांकडे 34 लाख 42 हजार 480 बेरोजगारांची नोंद असल्याचे सांगत या बेरोजगारांना रोजगार व व्यवसाय मार्गदर्शन,समुपदेशन अशा माध्यमातून बेकारी नष्ट करण्याचे प्रयत्न या केंद्राच्या माध्यमातून केले जात असल्याची माहीती दिली आहे. ...

पंढरी वार्ता :- मानवी जीवनात साहित्याचे महत्त्व अनन्यसाधारण - प्राचार्य मिलिंद परिचारक

Image
"मानवी जीवनात साहित्याचे महत्त्व हे अमूल्य आणि अनन्यसाधारण आहे. साहित्यिक हे एखाद्या सामान्य गोष्टीला असामान्य बनवितात. म्हणून अशी साहित्य निर्मिती करणाऱ्या साहित्यिकांच्या साहित्य कृतीस पुरस्कार देऊन सन्मानित करणे म्हणजे एक प्रकारे त्यांच्या पाठीवर प्रोत्साहक थाप टाकणेच आहे. " असे मत येथील उमा महाविद्यालयाचे प्राचार्य मिलिंद परिचारक यांनी व्यक्त केले. ते येथील परिमल सांस्कृतिक व्यासपीठच्या वतीने देण्यात आलेल्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण समारंभात बोलत होते.  या वर्षीपासून परिमल सांस्कृतिक व्यासपीठच्या प्रथमच देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी मंगळवेढा येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. शशिकांत जाधव यांच्या 'दु:खितांचे अश्रू' या कादंबरीस 'शब्द परिमल पुरस्कार', गोमेवाडी तालुका आटपाडी येथील गझलकार सुधीर इनामदार यांच्या 'इजांची मखमल' या गझल संग्रहास 'काव्य परिमल पुरस्कार', पंढरपूर येथील कथाकार सुजितकुमार कांबळे यांच्या 'टोळकं' या कथासंग्रहास 'कथा परिमल पुरस्कार' पंढरपूर येथील युवा साहित्यिक उमेश सासवडकर यांच...

पंढरी वार्ता :- महाराष्ट्राच्या आराध्य दैवताला तुळशी अर्चन करून अटलजींना शुभेच्छा

Image
भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या 95 व्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रूक्मिणीला तुळशी अर्चन करण्यात आले. श्री विठ्ठल-रूक्मिणीला सोमवारी सकाळी पंढरपूर शहर भाजपाच्या वतीने तुळशी अर्चन करून अटलजींना शतायुषी करावे, असे साकडे घालण्यात आले. हा कार्यक्रम अतिशय भावपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष संजय वाईकर, जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जगदाळे, युवा मोर्चा शहराध्यक्ष विदुल अधटराव, ओबीसी आघाडी प्रमुख लखन ननवरे, युवा मोर्चा उपाध्यक्ष किरण खडाखडे, युवा मोर्चा उपाध्यक्ष अक्षय कदम, अनिल शिंदे, आनंद नगरकर, भाजपा वैद्यकीय आघाडी प्रमुख डॉ. शशिकांत धायतडक, सतीश सासवडकर, युवा मोर्चा उपाध्यक्ष निलेश चव्हाण, गिरीष आराध्ये, भाजपा शहर उपाध्यक्ष शाम तापडिया, गणेश गोमासे, लखन माळी, महिला आघाडी शहराध्यक्षा अपर्णा तारके, भाजपा शहर सरचिटणीस रेखा कुलकर्णी, मंदिर समिती सदस्या शकुंतला नडगिरे, हर्षदा नगरकर, भाजपा महिला आघाडी उपाध्यक्षा अंजली भोरकर आदी उपस्थित होते.

पंढरी वार्ता :-जॅकवेलसह अनेक प्रश्‍न प्रलंबीत,जिवन प्राधिकरणाचे अक्षम्य दुर्लक्ष ! सभापती विक्रम शिरसट यांचा आरोप

Image
पंढरपूर शहरासाठी राबविण्यात आलेल्या सुधारीत पाणी पुरवठा योजनतेतील 170 एच.पी.जॅकवेल मध्ये वारंवार चिंध्या,कपडे तसेच इतर  टाकावू वस्ते अडकत असल्याने पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करण्यात अडथळा येत आहे. या ठिकाणी पुरेशा उंचीची शिडीही संबधीत काम  पुर्ण करताना बसविण्यात आली नाही त्यामुळे जीव धोक्यात घालून पाणी पुरवठा विभागाकडे कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांना काम करावे लागत आहे.या बाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संबधीत अधिकार्‍यांना वारंवार माहीती देवूनही ते अक्षम्य दुर्लक्ष करीत आहेत.उद्या या ठिकाणी काही दुर्घटना झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाची राहील असा इशारा पंढरपूर नगर पालीका पाणी पुरवठा समितीचे सभापती विक्रम शिरसट यांनी दिला आहे.                या बाबत अधिक माहीती देताना श्री शिरसट म्हणाले की,पंढरपूर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेवून शहरासाठी 24 कोटी रुपये खर्चाची सूधारीत पाणी पुरवठा योजना शासनाकडून मंजूर करण्यात आली.या योजनेचे का महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात आले.मात्र हे काम प...

पंढरी वार्ता:- काही राजकीय व सामाजिक संघटनांच्या अपप्रचाराला बळी पडू नका ! नगराध्यक्षा साधना भोसले यांचे आवाहन

Image
पंढरपूर शहराच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला आहे.या निधीतून पंढरपूर शहरात 185 कोटी रुपयांची कामे पुर्णत्वास आली आहेत.तर काही कामे सुरु आहेत.सदर  बहुतांशी कामे ही पुणे विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुरु आहेत.असे असताना केवळ राजकीय आकसापोटी पंढरपूर नगर पालीकेतील सत्ताधार्‍यांना टार्गेट करुन काही सामाजिक व राजकीय संघटना 200 कोटींचा धुराळा झाला अशा प्रकारचे आरोप करीत आहेत.वास्तविक पाहता ही कामे पुर्णत्वास आल्यानंतर पंढरपूर शहराचा चेहरा मोहरा बदलणार आहे.आ.प्रशांतराव परिचारक हे विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध झाला पाहीजे व कामे दर्जेदार झाले पाहीजेत यासाठी स्वत: प्रयत्नशील आहेत असे असताना सद्या शहरात जे अपप्रचाराची मोहीम राबविण्यात येत आहे ती केवळ राजकीयब आकसापोटी आहे.सोशल मिडीया व इतर माध्यमातून सुरु असलेला अपप्रचार खेदजनक आहे अशी प्रतिक्रिया नगराध्यक्षा साधना भोसले यांनी दिली आहे.        

पंढरी वार्ता:-चंद्रभागेच्या वाळवंटात दारुडयांच्या पार्ट्या ! आ.भालकेंनी विधानसभेत उपस्थित केला प्रश्‍न

Image
माझे माहेर पंढरी आणि माझी बहीण चंद्रभागा ही तमाम महाराष्ट्रातील वारकरी भाविकांची श्रध्दा आहे.येथे आल्यानंतर चंद्रभागेचे स्नान,पुंडलीकाचे दर्शन आणि नंतर सावळ्या विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवण्याच्या ओढीने मंदीराकडे प्रयाण हा प्रत्येक येथे आल्यानंतरचा दिनक्रम असतो.जाता पंढरीसी सुख वाटे जिवा .. हा अभंग गुणगुणत आलेले हे भाविक मात्र पंढरीत आल्यानंतर येथील चंद्रभागेच्या वाळवंटात दारुडयांच्या पार्ट्यां सुुरु असल्याचे पाहून प्रचंड नाराजी व्यक्त करतात.ज्या चंद्रभागेच्या वाळवंटात हजारो वर्षापासून संतांनी विठ्ू नामाचा गजर केला,येथे झालेल्या किर्तनात प्रत्यक्ष परब्रम्ह किर्तनात हेजरी लावत होते.ज्या वाळवंटात संताचे विविध फडातून प्रवचने,किर्तने या माध्यमातून भक्तीपरंपरेची पताका अधिकाधिक उंच झाली डौलाने फडकावली गेली.त्याच चंद्रभागेच्या वाळवंटात टोळक्याटोळक्याने दारु पीत पार्ट्या करीत बसलेले तरुण हे दृश्य येथील वाळवंटात नित्याचे झाल्याने आ.भारत भालके यांनी हा प्रश्‍न थेट विधानसभेत उपस्थित केला आहे.            चंद्रभागेच्या वाळवंटात काय स्वरुपी पोलीस चौकी व्हावी.याठिकाणी र...

पंढरी वार्ता:- दिड वर्षापुर्वी पंढरीत दारु बंदीची मागणी केलेले खा.अमर साबळे यांचा पंढरपूर दौरा ! तिर्थक्षेत्र पंढरी दारुमुक्त करण्याचा आश्‍वासनाचा पडला विसर ?

Image
सुशासन दिनाच्या निमित्ताने खा.अमर साबळे हे शनिवारी पंढरीत दाखल होत असून त्यांच्या आगमनाच्या पाश्‍वभुमीवर पंढरपूर शहर व आसपासच्या काही अवैध दारु विक्रीच्या ठिकाणावर गुरुवारी छापा मारण्याची कारवाई झाली असल्याचीही चर्चा पंढरपूर शहरात रंगली आहे.मा.पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुशासन दिनानिमित्त ते व्याख्यान देणार आहेत.मात्र त्यांच्या पंढरपूर दौर्‍यानिमित्त त्यांनी जून 2016 मध्ये केलेल्या पंढरपूर दौर्‍यात येथील शासकिय विश्रामगृहात घेतलेली पत्रकार परिषद व या पत्रकार परिषदेत पंढरपूर तिर्थक्षेत्रात दारुबंदी व्हावी यासाठी मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी दिलेले आश्‍वासन आणि पुढे या आश्‍वासनाचाच नाहीतर पंढरपूरचा खा.अमर साबळेंना पडलेला विसर याचीच चर्चा त्यांच्या उद्याच्या पंढरपूर दौर्‍यानिमित्त शहर व तालुक्यात होत आहे.                उद्या खा.अमर साबळे हे येथे सुशासनाचे महत्व सांगणार असले तरी पंढरपूर शहर व तालुक्यातील जनतेच्या प्रशासनाकडून सुशासनाच्या अपेक्षा जवळपास संपुष्टात आलेल्या आहेत.भारतीय जनता पक्षाचे ...