Posts

Showing posts from June, 2018

पंढरी वार्ता:-यमाई तलाव परिसर विकास आराखडयाच्या उवर्रीत कामांना गती देण्याची मागणी तलावाभोवतीचा संपुर्ण ट्रॅक विकसीत करण्याची मागणी नगर पालीका प्रशासनाकडे पाठपुरावा करणार- दौलत उंबरे

Image
यमाई तलाव परिसर विकास आराखडयाच्या उवर्रीत कामांना गती देण्याची मागणी तलावाभोवतीचा संपुर्ण ट्रॅक विकसीत करण्याची मागणी  नगर पालीका प्रशासनाकडे पाठपुरावा करणार- पहा दौलत उंबरे यांचे मनोगत   महाराष्ट्र शासनाच्या विशेष निधीतून यमाई तलाव परिसर सर्वधन व विकास आराखडयास मान्यता देण्यात आली होती.सुरुवातीच्या टप्प्यात जवळपास अडीच कोटी रुपये यासाठी उपलब्ध झाले होते.यातून तलावाचा 1200 मिटरचा बांध विकसीत करणे,वृक्षलागवड करणे,तलावातील गाळ काढणे,पेव्हरब्लॉक टाकणे व प्रकाश व्यवस्था करणे,प्रवेशद्वार बांधणे  आदी कामे करण्यात आली आहेत.मात्र त्याच वेळी येथे आणखी बरीच कामे प्रलंबीत असून या बाबत नगर पालीका प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहीती यमाई ट्रॅक ग्रुपचे संयोजक दौलत उंबरे यांनी दिली आहे.       यमाई ट्रॅक ग्रुप सदस्यांच्या आजच्या झालेल्या बैठकीत यमाई तलाव परिसरातील विविध विकास कामांबाबाबत न.पा.प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.यमाई तलावाच्या सभोवती असलेल्या साडेचार किमी लांबीचा बांध हा व्यायामाच्या ...

पंढरी वार्ता:- खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त विठ्ठल प्रशालेत वृक्षारोपण शरद क्रिडा व सांस्कृतीक प्रतिष्ठाणचा उपक्रम

Image
  खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त विठ्ठल प्रशालेत वृक्षारोपण शरद क्रिडा व सांस्कृतीक प्रतिष्ठाणचा उपक्रम संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त शरद क्रिडा व सांस्कृतीक प्रतिष्ठानच्या वतीने विठ्ठल प्रशाला वेणुनगर येथे प्रशालेतील विद्यार्थीनींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी प्रतिष्ठाणचे जिल्हा कार्याध्यक्ष व कार्यक्रमाचे संयोजक गणेश गोडसे,जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह लाटे,प्रशालेचे प्राचार्य एस.एन.घोगरदर यांच्या प्रमुख उपस्थिीत हा उपक्रम राबविण्यात आला.खा.सुप्रियाताई या आमच्यासाठी आदर्श आहेत.त्यांच्या महिलांच्या प्रबोधनाचे आणि महिलांना संधी देण्याचे कार्य आमच्यासाठी आदर्शवत आहे त्यामुळे आम्ही आज लावलेल्या या रोपट्यांची जिवापाड जोपासना करणारा असल्याचे यावेळी विद्यार्थीनींनी सांगीतले.                     यावेळी नवनाथ चव्हाण,सोमनाथ ढवण,बालाजी खंदारे,प्रकाश मोरे,विनायक पवार,हणुमंत चव्हाण,भरत खरात,परमेश्‍वर शेजाळ,विलास कवडे,पवार सर,कमठाणकर सर,गोडसे सर,पोपट नागटिळक,नाना कवडे तसेच प्रशालेतील शिक...

पंढरी वार्ता :-नारायण चिंचोली येथे लांब पल्ल्याच्या एसटी बसेसना थांबा देण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना निवेदन पुरातन तीर्थक्षेत्र असूनही लांब पल्ल्याची एस.टी.थांबत नसल्याने होती नाराजी

Image
नारायण चिंचोली येथे लांब पल्ल्याच्या एसटी बसेसना थांबा देण्यासाठी   परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना निवेदन    पुरातन तीर्थक्षेत्र असूनही लांब  पल्ल्याची एस.टी.थांबत नसल्याने होती नाराजी      नारायण चिंचोली येथे लांब पल्ल्याच्या एसटी बसेसना थांबा देण्याचे  परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना निवेदन                         नारायण चिंचोली :- पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे सुर्य नारायणचे पुरातन हेमाडपंती मंदिर आहे हे मंदिर भारतातील दुसरे व महाराष्ट्रातील एकमेव मंदिर असून या ठिकाणी दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात त्यामुळे परिवहन विभागाच्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या थांबा देण्याची मागणी नारायण चिंचोली ग्रामस्थांच्या वतीने परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे लेखी निवेदन देऊन करण्यात आली    दिवाकर रावते हे आषाढी याञेनिमित्त सुरू असलेल्या कामानिमित्ताने पंढरीत आले असता नारायण चिंचोली ग्...

पंढरी वार्ता :-गोपाळपूरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध -आ.प्रशांत परिचारक गोपाळपूर येथे १ कोटी ७ लाख रुपये खर्चाच्या विकास कामांचा शुभारंभ

Image
गोपाळपूरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध -आ.प्रशांत परिचारक      गोपाळपूर येथे १ कोटी ७ लाख रुपये खर्चाच्या विकास कामांचा शुभारंभ  गोपाळपूर हे मोठे तिर्थक्षेत्र असुन या ठिकानी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात.त्यांना व स्थानिक नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याचा मानस असुन गोपाळपुरच्या विकासासाठी आम्ही कटीबध्द आहोत असे प्रतिपादन आमदार प्रशांतराव परिचारक यांनी केले.पंढरपुर तालुक्यातील गोपाळपुर येथे विविध विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार सुधाकरपंत परिचारक हे होते. यावेळी जिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या प्रयत्नातून मंजुर झालेले तिर्थक्षेत्र  विकास अराखड्यातील रुपये 80 लाख,चौदावा वित आयोगाचे 17 लाख रुपये, खासदार शरद बनसोडे यांच्या ङ्गंडातून लेंगरे वस्ती रस्ता 10 लाख रुपये आदी कामांचे भुमिपुजन करण्यात आले . यावेळी उपस्थितांचे स्वागत राजेंद्र लेंगरे यांनी केले. प्रस्ताविक दिलीप गुरव यांनी केले व अभार प्रा.सुभाष मस्के यांनी मानले.  यावेळी नुतन सरपंच  सौ. विजया जगताप,उपसरपंच ...

पंढरी वार्ता:-पंढरीतील नवीन व जुन्या बसस्थानकाच्या आवारात मिनी गाळे बांधून बेरोजगारांना द्या ! एस.टी.चालक वाहकांसाठी सुसज्ज एस.टी.भवन बांधा ! आदिम विकास परिषदेची ना.रावतेंकडे निवेदनाद्वारे मागणी

Image
पंढरीतील नवीन व जुन्या बसस्थानकाच्या आवारात मिनी गाळे बांधून बेरोजगारांना द्या ! एस.टी.चालक वाहकांसाठी सुसज्ज एस.टी.भवन बांधा ! आदिम विकास परिषदेची ना.रावतेंकडे निवेदनाद्वारे मागणी पंढरपूर शहरातील नविन बसस्थानकाच्या पश्‍चिमेकडील बाजूस व जुन्या बसस्थाकाच्या पुर्वेस मिनी गाळे काढून सुशिक्षीत बेरोजगारांना व्यवसायासाठी अल्प डिपॉझीट व भाडे घेवून  उपलब्ध करुन द्यावीत.पंढरपूर बसस्थानकात मुक्कामी गाडया घेवून येणार्‍या वाहक व चालकासाठी येथील बसस्थानक परिसरात एस.टी.भवन बांधण्यात यावे अशी मागणी आदिम विकास परिषदेच्या वतीने परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.  या बाबत अधिक माहीती देताना आदीम विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष नागेश अधटराव म्हणाले की,पंढरपूर शहर व तालुक्यात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड आहे. यात्राकालवधी वगळता इतरवेळी उत्पन्नाचे साधन नसल्याने तसेच मोठे उद्योग व्यवसाय नसल्याने येथील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करण्याच्या हेतूने नविन बसस्थानकाच्या पश्‍चिमेकडील रेल्वे रुळाच्या बाजूस मिनी गाळे काढण्यात यावेत.त्यामुळे हा परिसरही स्वच्छ राहण्यास मदत...

पंढरी वार्ता :-आधी बेरोजगारांना बेकारी भत्ता द्या मगच आणीबाणी बंदीना पेन्शन द्या ! कोळी युवा महासंघाची मागणी असंघटीत खाजगी कामगारांना ‘कल्याण’ योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी संघर्ष करणार-बबलू बोराळकर

Image
आधी बेरोजगारांना बेकारी भत्ता द्या मगच आणीबाणी बंदीना पेन्शन द्या !  कोळी युवा महासंघाची मागणी  असंघटीत खाजगी कामगारांना ‘कल्याण’ योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी संघर्ष करणार-बबलू बोराळकर 1975 च्या आणीबाणीत राजकीय बंदी म्हणून 18 महिने कारावास सहन केलेल्यांना शासनाने प्रतिमहा दहा हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र त्याच वेळी देशभरात वाढलेली बेरोजगारी,2014 च्या निवडणूक प्रचारात बेरोजगारांना 5 कोटी नोकर्‍या उलब्ध करुन देण्याचे दिलेले आश्‍वासन याचा शासनाला विसर पडला आहे.शासनाने 43 वर्षापुर्वीच्या राजकीय कैद्यांना पेन्शन देण्याबरोबरच सुशिक्षीत बेकारांना मासीक बेरोजगार भत्ताही द्यावा अशी मागणी कोळी युवक महासंघाच्या वतीने शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.        या बाबत अधिक माहीती देताना कोळी युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष बबलू बोराळकर म्हणाले की,देशात बेरोजगारीने उग्र रुप धारण केले असतानाच गतवर्षी करण्यात आलेल्या नोटबंदीमुळे हजारो व्यवसाय बंद पडले,मंदीच्या खाईत लोटले गेले.आणि बेरोजगारांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे.अशातच आता प्लॅस्टीक ...

पंढरी वार्ता :- विश्‍वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानला महाराष्ट्र शासनाचा समाजभुषण पुरस्कार जाहीर शासनाच्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचा पंढरपूरला प्रथमच बहुमान

Image
  विश्‍वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानला महाराष्ट्र शासनाचा समाजभुषण पुरस्कार जाहीर शासनाच्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचा पंढरपूरला प्रथमच बहुमान विश्‍वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानने गेल्या 14 वर्षापासून सामाजिक क्षेत्रा त केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने देण्यात येणारा व अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा 2017-18 या वर्षाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार जाहीर झाला आहे.या पुरस्कारासाठी 61 व्यक्तिं व सहा संस्थांची निवड करण्यात आली आहे यामध्ये विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचा समावेश आहे.नुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती आदी विविध समाजातील लोकांसाठी कार्य करणार्‍या कार्यकर्ते व संस्थांच्या कामाची दखल घेऊन राज्य शासनामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देण्यात येतात. सन 2017-18 या वर्षाच्या पुरस्कारांसाठी संस्था व व्यक्तिंची निवड समितीने केली आहे.3 जुलै रोजी नागपूर येथे भव्य कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्य...

पंढरी वार्ता :- ..अन्यथा मुख्यमंत्र्यांना रोखणार - माऊली हळणवर

Image
  . .अन्यथा मुख्यमंत्र्यांना रोखणार  - माऊली हळणवर    मोहोळ - पंढरपूर रस्त्यावर  बळीराजा शेतकरी संघटना, शिवसेना, रासप यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन .     जगदंबा मागासवर्गीय सूतगिरणीची ची बेकायदेशीर खरेदी विक्री झाली असून, न्यायालयाच्या आदेशानुसार माढा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. परंतु चौकशी च्या नावाखाली पोलीस प्रशासन वेळ काढू पणा करीतअसून  तात्काळ कारवाई करावी   अन्यथा मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीला महापुजे पासुन रोखणार  असल्याचा इशारा  जिल्हा  अध्यक्ष  माऊली हळणवर यांनी दिलाआहे. मोहोळ - पंढरपूर रस्त्यावर   ईश्वर वठार येथे विविध मागण्यांसाठी बळीराजा शेतकरी संघटना , शिवसेना, रासप यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.  यावेळी शिवसेना  उपजिल्हाप्रमुख महावीर देशमुख म्हणाले कि , शेतकऱ्यांवर अन्याय होत  असेल तर शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करतेच. माढा मतदारसंघाचा या लोकप्रतिनिधी नी बिहार केला असून जनता यांच्या दहशती खाली वावरताना दिसून येते. ...

पंढरी वार्ता :- पिराची कुरोली येथे कृषीदुतांचे स्वागत

Image
 पिराची कुरोली येथे कृषीदुतांचे स्वागत  महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संचलित शिक्षण प्रसारक मंडळ,  अकलुज संचलित रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या कृषीदुतांचे पंढरपूर तालुक्यातील म ौजे पिराची कुरोली येथे आगमन झाले. रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या अंतर्भत ग्रामीण कृषी कार्यानुभव हा सहा महिन्याच्या कालावधीसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये विविध पिकांची प्रात्यक्षिके, माती परिक्षण, जनावरांचे लसीकरण, शेतकरी समुह गट-चर्चा, सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात येते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. बाळासाहेब कौलगे-पाटील यांनी भुषविले होते. सरपंच कुलदिप कौलगे- पाटील, ग्रामसेवक मारुती भोसले, प्रतिष्ठित व्यक्ती आजी- माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. मान्यवरांनी कृषीदुतांना मोलाचे मार्गदर्शन व कृषी सल्ला केंद्राचे उद्घाटन केले. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, रत्नाई कृषी महाविद्यालयाचे मा. डॉ. डी. पी. कोरटकर, मा. प्राचार्य आर. जी. नलावडे, कार्यक्रम समन्वयक व कार्यक्रम अधिक...

पंढरी वार्ता :- उपनगरातील भुयारी गटार योजनेसह पाणीपुरवठा व रस्त्यांची कामे मार्गी लावणार – आमदार प्रशांतराव परिचारक

Image
उपनगरातील भुयारी गटार योजनेसह पाणीपुरवठा व रस्त्यांची कामे  मार्गी लावणार – आमदार प्रशांतराव परिचारक पंढरपूर   नगरपरिषदेच्या हद्दीतील प्रभाग क्र.१४ मध्ये माझ घरकुल लागालँड पाठीमागे तळे परिसर, प्रशांतराव परिचारक नगर येथे भुयारी गटार टप्पा क्र.३ च्या कामाचा शुभारंभ आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते, नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली, उपनगराध्यक्ष विशाल मलपे, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, सतिष मुळे, पांडुरंग घंटी,  खादी भांडारचे अध्यक्ष नागेश शिंगण सर, माजी नगरसेवक तुकाराम (आप्पा) राऊत, ग्राहक मंचाचे अध्यक्ष शंकर (अण्णा) ऐतवाडकर, माजी नगरसेवक  संजय अभ्यंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी बोलताना आमदार प्रशांतराव परिचारक यांनी उपनगरातील नागरिकांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार असुन या भागात भुयारी गटार योजनेचे काम पुर्ण झाल्यानंतर इसबावी येथील पाण्याच्या  टाकीवरुन या भागात नविन पाईपलाईन टाकुन पाणीपुरवठा करणार असल्याचे सांगितले. तसेच या भागातील सर्व रस्ते, खडीकरण व डांबरीकरण करण्यात ये...

पंढरी वार्ता :-भारतीय राज्य घटनेमुळे समता, न्याय, बंधूता या मूल्यांची जोपासना झाली़-भालचंद्र मुणगेकर पंढरपुरात पहिल्या परिवर्तन साहित्य संमेलनाचे उद्घाटन

Image
भारतीय राज्य घटनेमुळे समता, न्याय, बंधूता या मूल्यांची जोपासना झाली़- भालचंद्र मुणगेकर पंढरपुरात पहिल्या परिवर्तन साहित्य संमेलनाचे उद्घाटन भारतीय राज्यघटना ही एक आदर्श असून स्वातंत्र्यानंतर देशाची जी काही प्रगती झाली ती केवळ राज्यघटनेमुळेच़ मात्र भाजपा सरकारमधील नेते भारतीय राज्यघटना बदलण्याची भाषा करतात़ त्यामुळे या आदर्श राज्य घटनेचे संरक्षण करणे एक आव्हान आहे, असे प्रतिपादन नियोजन आयोगाचे माजी सदस्य खा़ डॉ़ भालचंद्र मुणगेकर यांनी केले़  लोकराजा राजर्षी छ़ शाहू महाराज यांच्या १४४ व्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथे आयोजित पहिल्या परिवर्तन साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे होते़ व्यासपीठावर आरपीआय नेते सुनील सर्वगोड, बा़ ना़ धांडोरे, प्रा़ वामन जाधव, अमरजीत पाटील, परिवर्तन साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष अ‍ॅड़ किर्तीपाल सर्वगोड, कवी प्रा़ प्रशांत मोरे, प्रा़ डॉ़ विजय मोरे, ह़ भ़ प़ रामदास ऊर्फ शिवराज महाराज जाधव, डॉ़ टी़ एस़ मोरे, समितीचे उपाध्यक्ष वैभव माने, सचिव संतोष गायकवाड, कोषाध्यक्ष सचिन कांबळे ...

पंढरी वार्ता:-अर्बन बॅँक ते अंबाबाई पटांगण रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचा आंदोलनाचा इशारा

Image
अर्बन बॅँक ते अंबाबाई पटांगण रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे    राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचा आंदोलनाचा इशारा  अंबाबाई पटांगण ते अर्बन बँक या रस्त्याचे काम निकृष्ट पध्दतीने होत असून या ठिकाणी कॉक्रीटीकरणापुर्वीचा बेस म्हणून मुरुमाऐवजी माती वापरली जात आहे.तसेच अनेक ठिकाणी टाकण्यात आलेल्या पाईपलाईन फुटक्या असल्याचे निदर्शनास येते.तर तयार करण्यात येत असलेले चेंबरचे बांधकामही निकृष्ट पध्दतीने होत असल्याचे दिसून येते.त्यामुळे या परिसरातील नागरिकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.त्यामुळेच आज आम्ही लेखी निवेदनाद्वारे नगर पालीका प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे.या निवेदनाची दखल न घेतल्यास परिसरातील नागरिकांना सोबत घेवून राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलच्या वतीने या ठिकाणी धरणे आंदोलन केले जाईल अशी माहीती शहराध्यक्ष रशीद शेख यांनी दिली आहे.                याबाबत पंढरी वार्ताशी बोलताना रशीद शेख म्हणाले की, पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने पंढरपूर शहरातील अंबाबाई पटांगण ते अर्बन बँक या रस्त्याच्या रुंदीकरणाचे व कॉक्रीटीकरणाचे काम सद्या संथ...

पंढरी वार्ता:- सावळ्या विठ्ठलाच्या शेेतीचे उत्पन्न किती ? शेतकरी भाविकांमध्ये उत्सुकता

Image
पंढरी वार्ता:- सावळ्या विठ्ठलाच्या शेेतीचे उत्पन्न किती ? शेतकरी भाविकांमध्ये उत्सुकता  कांदा मुळा भाजी । अवघी विठाई माझी ॥ या अभंगातून संत सावता माळी यांनी श्री विठ्ठलाच्या सगुण साकार रुपाला शेतकर्‍याचा वेष परिधान करुन  आपल्या मळ्यात भक्तीच्या शक्तीने पाचारण केले होते.तमाम महाराष्ट्रातील कष्टकरी शेतकर्‍यांच्या या दैवताला कुणी विष्णूचा आठवा अवतार संबोधले तर कुणी बौध्दावतार समजले मात्र भक्तांना मुखी नाम हाती मोक्ष । अवघी साक्ष बहुतांशी ॥ याचा प्रत्यय देत आपल्या शेतात राबत असतानाही केवळ नामस्मरणातून या निर्गुण निराकार देवाची भक्ती करता येते हे संत तुकोबारायांनी आपल्यहा अभंगातून प्रमाणीत केले आहे.अशा सावळ्या विठ्ठलाला आपल्या जमीनी दान करुन ज्याचे होेते त्याला दिले असा भाव व्यक्त करीत या महाराष्ट्रातील अनेक शेतकर्‍यांनी आपला देह त्यागला आणि या जमीनी परमात्मा पांडुरंगाच्या नावावर नोंदल्या गेल्या.एकीकडे सद्या महाराष्ट्रात शेतकर्‍यांची मोठी अहवेलना होत असताना व शेती तोटयात असताना भाविकांनी श्रध्देने अर्पण केलेल्या जमीनीचा मालक झालेला सावळया  विठ्ठलाची शेती तरी फायद्यात आह...

पंढरी वार्ता:- नामदेव भुईटे खुन प्रकरणाची सीआयडी चौकशी करा - शुभांगी भुईटे मुख्यमंत्र्याना घेराव घालण्याचा विविध संघटनांचा इशारा

Image
पंढरी वार्ता:- नामदेव भुईटे खुन प्रकरणाची सीआयडी चौकशी करा - शुभांगी भुईटे मुख्यमंत्र्याना घेराव घालण्याचा विविध संघटनांचा इशारा  पहा  शुभांगी भुईटे  पत्रकार परिषदेत काय म्हणाल्या (vdo ) नामदेव भुईटे खुन  प्रकरणात सद्या केवळ एकच आरोपी अटकेत आहे.सदर आरोपीची सखोल चौकशी केल्यास यातील खरे आरोपी समोर येतील.या मागणीसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांचीही भेट घेवून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली तर मिरज येथील पोलीस खात्यातील अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटून विनंती केली मात्र मला केवळ तपास सुरु आहे एवढेच जुजबी उत्तर दिले जाते.त्यामुळे या खुन प्रकरणाचा तपास सीआडीकडे सोपविण्यात यावा अशी मागणी मा.नगरसेवक स्व.नामदेव भुईटे यांच्या पत्नी शुभांगी भुईटे यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे.                 आज येथील पत्रकार भवन येथे आयोजीत पत्रकार परिषदच्या माध्यमातून शुभांगी भुईटे यांनी पंढरपूरातील विविध सामाजिक संघटना,पक्ष संघटना यांना आपल्या पाठीशी राहण्याचे आवाहन करीत या खुन प्रकरणाच...

पंढरी वार्ता:- शहरातील अनेक हॉस्पिटलच्या पार्कींंगचा मुद्दा ऐरणीवर ! बांधकाम परवाने आणि वापर परवाने तपासून पाहण्याची गरज

Image
बांधकाम परवाने आणि वापर परवाने तपासून पाहण्याची गरज  निवासी बांधकाम परवाना घेऊन त्या जागेचा व्यवसायिक वापर केला जात असल्याचे अनेक ठिकाणी निदर्शनास येते.तर अनेक ठिकाणी अशा  जागेत हॉस्पिटलही चालविले जात असल्याचे दिसून येते.येथे येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्या वाहनांसाठी पार्कींगची सुविधा तसेच रुग्णालयात ऍडमीट रुग्णांसोबत ग्रामिण भागातून येणार्‍या नातेवाईकांच्या मुक्कामाची व गाडी पार्कींगची सोय हा अतिशय महत्वाचा भाग असून आरोग्य विभागाकडून कुठल्याही हॉस्पिटलचा ना हरकत प्रमाण पत्र देताना सदर इमारतीस स्थानिक स्वराज्य संस्थेने दिलेला बांधकाम परवाना व्यवसायीक जागा (वाणिज्य प्रयोजन) म्हणून आहे काय? याची खात्री केली जाते.तसेच येथे असलेल्या पार्कींग व्यवस्थेचीही पाहणी केली जाते.मात्र तरीही शहरातील अनेक हॉस्पिटल्समध्ये पार्किंगची व्यवस्था नाही.बांधकाम परवाना घेताना निवासी आणि प्रत्यक्षात मात्र े हॉस्पिटल्स सुरू केले आहेत अशा ठिकाणी जिन्यापासूनच सुरक्षा यंत्रणेबाबत कमतरता असल्याचे निदर्शनास येते.          पालिका कार्यक्षेत्रात येणार्‍या हॉस्पिटल्सची मुंबई...

पंढरी वार्ता:-‘पाझर’च्या यशानंतर दिग्दर्शक अनिल केंगार यांच्या ‘विष्टा’या दुसर्‍या चित्रपटाचे चित्रीकरण पुर्ण

Image
  पंढरी वार्ता:-‘पाझर’च्या यशानंतर दिग्दर्शक अनिल केंगार यांच्या ‘विष्टा’या दुसर्‍या चित्रपटाचे चित्रीकरण पुर्ण  पाझर या मराठी चित्रपटाच्या यशानंतर पंढरपूरातील प्रतिथयश दिग्दर्शक अनिल केंगार यांच्या विष्टा या दुसर्‍या चित्रीकरणास प्रारंभ झाला आहे.शिरढोण येथुन या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात झाली तर शेवटचे चित्रीकरण तारापूर येथे करण्यात आले.    या बाबत अधिक माहीती देताना दिग्दर्शक अनिल केंगार म्हणाले की,या चित्रपटामध्ये समाजातील असलेले अज्ञान आणि अंधश्रध्दा दूर करण्याच्या हेतूने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.या चित्रपटाचे कथा व संवाद लेखन मी स्वत: केले असून या चित्रीपटाचे संपुर्ण चित्रीकरण पुर्ण झाले आहे.आता तांत्रीक बाबींची पुर्तता झाल्यानंतर लवकरच हा चित्रपट पे्रक्षकांच्या भेटीला येणार आहे.      या चित्रपटाचे निर्माते आप्पासो वाघमारे आणि नवनाथ गोडसे यांनी चित्रीकरण पुर्ण झाल्यानंतर समाधान व्यक्त करीत प्रतिक्रीया देताना म्हणाले की,या चित्रपटाचा आशय आम्हास खुप भावला होता.आयुष्यात येवून काहीतरी केल्याचे समाधान आम्हास या चित्रपटाच्या ...

पंढरी वार्ता:- अजिंक्य स्पोर्टस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची पोलीस दलात निवड आ.प्रशांत परिचारक यांच्याहस्ते सत्कार

Image
पंढरी वार्ता:- अजिंक्य स्पोर्टस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची पोलीस दलात निवड आ.प्रशांत परिचारक यांच्याहस्ते सत्कार अजिंक्य स्पोर्टस् अकॅडमीच्या पंतनगर येथील प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी नी सारिका गटकुल यांची पोलीस उपनिरिक्षकपदी तर समाधान ज्ञानू नवले व रजत चंद्रकांत चव्हाण यांची पोलीस दलात निवड झाल्याबद्दल आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.      यावेळी बोलताना आ.प्रशांत परिचारक म्हणाले की,पंतनगर पंढरपूर येथे अजिंक्य स्पोर्टस् अकॅडमीच्या वतीने ग्रामिण भागातील सैन्य दलात,पोलीस खात्यात,रेल्वे पोलीस,सीमा सुरक्षा दल,केंद्रीय व राज्य राखीव पोलीस  तसेच इतरही महत्वपुर्ण खात्यात भरती होण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण व पुर्वतयारीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.शारीरीक चाचणीसाठी आवश्यक अशा क्रिडांगणाची व्यवस्था करण्यात आली आहे.व तज्ञ अनुभवी प्रशिक्षक येथे मार्गदर्शन करीत आहेत.त्याचा तरुणांनी लाभ घ्यावा.आज या अकॅडमीचे हे विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत याचा आम्हास अभिमान वाटतो.    पंतनगर येथील या अजिंक्य स्पोर्टस् अकॅडमीत युटोपीयन शुगरच...

पंढरी वार्ता:- हिंदू मंदीरांच्या अधिग्रहणा विरोधात हिंदुत्ववादी संघटनांचे पंढरीत आंदोलन

Image
हिंदू मंदीरांच्या अधिग्रहणा विरोधात हिंदुत्ववादी संघटनांचे पंढरीत आंदोलन ( पहा आंदोलनाचा एक्सक्लुसिव्ह vdo ) देशात व राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर अल्पसंख्यांकाना कॉंग्रेस काळात मिळणार्‍या विशेष सवलती व् संरक्षण हे हिंदुनाही मिळेल अशी अपेक्षा हिंदुत्ववाद्यांकडून व्यक्त केली जात होती.मात्र हे सरकार हिंदू धर्मियांच्या भावना दुखावत असून हिंदू धर्मीयांचीच मंदीरे ताब्यात घेत आहे.या घटनेचा निषेध म्हणून आज हिंदुत्ववादी संघटनांनी शासनाच्या प्रतिकात्म पुतळ्यास फासावर लटकवण्याचा प्रयत्न येथील छत्रपती शिवाजी येथे केला.मात्र पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप करीत हा पुतळा ताब्यात घेतला.            या बाबत पंढरी वार्ताशी बोलताना हिंदू महासभेचे बाळसाहेब डिंगरे म्हणाले की,मंदिरे’ ही हिंदु धर्माची आधारशिला आहेत. सहस्रो वर्षांपासून हिंदु संस्कृतीचे रक्षण, जतन आणि संवर्धन यांत मंदिरांची भूमिका  अनन्यसाधारण आहे. प्रत्येक हिंदू स्वतःच्या सर्व विवंचना देवाला सांगून त्याचे मन मोकळे करतो आणि देवच अडचणीतून सोडवील’, या श्रद्धेमुळे त्याच्या जीवन जगण्याच्या आशा पल्लवित ...

पंढरी वार्ता:- प्लॅस्टिक बंदीतून बहुराष्ट्रीय कंपन्यांना सूट तर किरकोळ व्यापार्‍यांवर अन्याय - संतोष भिंगे प्लॅस्टिक बंदीबाबत पंढरीत प्रचंड असंतोष !

Image
प्लॅस्टिक बंदीतून बहुराष्ट्रीय कंपन्यांना सूट तर किरकोळ व्यापार्‍यांवर अन्याय - संतोष भिंगे प्लॅस्टिक बंदीबाबत पंढरीत प्रचंड असंतोष ! कालपासून महराष्ट्रात लागू झालेल्या प्लॅस्टिक बंदीच्या अंमलबजावणीत बहुराष्ट्रीय  कंपन्यांना सूट देवून सर्वसामान्य व किरकोळ व्यापार्‍यांना टार्गेट केले जात आहे.बहुराष्ट्रीय कंपन्यांनी त्यंाच्या बॅ्रन्डेड उत्पादनासाठी वापरलेल्या प्लॅस्टीक वेष्टणास सूट आणि छोटे विक्रेते,सामान्य व्यापारी,किरणा दुकानदार यांच्यावर कारवाई ही प्लॅस्टीक बंदी कायद्याच्या तरतुदी मधील विसंगतीच  स्पष्ट होत आहे. वास्तविक पाहता प्लॅस्टीक कचर्‍यामध्ये पाण्याच्या बाटल्यांचे प्रमाण सर्वाधीक आहे.मात्र त्यावर बंदी नाही ही बाब खटकणारी आहे.आता किरकोळ किराणा विक्रेेत्यांना कागदातूनच पॅकींग करुन विक्री करावी लागणार असल्याने कागदाची मागणी वाढल्याने वृक्षतोड होऊन पर्यावरणाची मोठी हानी होणार आहे.याचा विचार शासनाने केलेला दिसत नाही अशी प्रतिक्रिया पंढरी वार्ताशी बोलताना पंढरीतील व्यापारी संतोष भिंगे यांनी व्यक्त केली आहे.       पंढरपूर शहरात प्लॅस्टीक बंदीच्या अंमलबज...

पंढरी वार्ता :- वाकडी येथील घटनेचा दलित महासंघाच्या वतीने अर्धनग्न आंदोलन करून निषेध

पंढरी वार्ता :- वाकडी येथील घटनेचा दलित महासंघाच्या वतीने अर्धनग्न आंदोलन करून  निषेध                                                                पहा vdo  वाकडी ता.जामनेर जि.जळगांव येथे दलित समाजातील तरुणांवर विहरीवर पोहण्यासाठी का गेला या शुल्लक कारणावरुन जातीवादी व संरजामशाही मानसिकतेतुन नग्न करुन मारहान केली अमानुष आत्याचार केला ही घटना पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे. देशात व महाराष्ट्रात दलितांवर आशा पध्दतीने वारंवार हल्ले होत आहेत. परंतु  याबाबत शासणाला कोणतेही गांभिर्य नाही. हि बाब खेदजनक आहे. म्हणून शासनाचा निषेध म्हणून आज दलित महासंघाने आर्धनग्न आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात आला.  जळगाव जिल्ह्यातील समतानगर येथील मेहतर समाजातील आठ वर्षांच्या व वाकडी येतील दलित तरुणांवर झालेला आत्याचार हा गंभिर आसुन याची शासणाने तात्काळ दखल घेऊन संबधित आरोंपिवर कठोरात कठोर कारवाई करावी ...

पंढरी वार्ता:- 2 जुलै मंदीर समितीच्या वर्षपुर्ती दिनी सदस्यांच्या विशेष आढावा बैठकीचे आयोजन करावे ! पंढरपूरकांकडून व्यक्त होत आहे अपेक्षा वर्षभरातील मंजूर ठराव आणि अंमलबजावणी याचा लेखाजोखा ऐकण्यासाठी पंढरपूरकर उत्सुक

Image
पंढरी वार्ता:- 2 जुलै मंदीर समितीच्या वर्षपुर्ती दिनी सदस्यांच्या विशेष आढावा बैठकीचे आयोजन करावे ! पंढरपूरकांकडून व्यक्त होत आहे अपेक्षा  वर्षभरातील मंजूर ठराव आणि अंमलबजावणी याचा लेखाजोखा ऐकण्यासाठी पंढरपूरकर उत्सुक   गतवर्षी 2 जुलै 2017 रोजी आषाढ शुध्द नवमी दिवशी आकस्मातपणे मुख्यमंत्री देवेद्र फडण वीस यांनी मंदीर समितीची घोषणा करुन आश्‍चर्याचा धक्का दिला होता.तर कराडच्या राजकारणात बीजेपीचे कमळ हाती धरुन निवडणूक लढवित पराभूत झालेल्या डॉ.अतुल भोसले यांना समितीचे अध्यक्षपद देवून प.महाराष्ट्रात भाजपाच्या अस्तित्वाच्या लढाईला बळ देण्याचा प्रयत्न केला होता.मात्र स्थापनेच्या घोषणेनंतर वारकरी फडकरी दिंडी समाज सघंटनेने थेट माउलीचा रथ कर्मवीर औदुंबराराव पाटील चौकात थांबवत या समितीस आपला विरोध दर्शविला होता.हा विरोध हा पदाच्या लालसेपोटी होता याची चर्चा तेव्हाही झाली होती आणि पुढे सहअध्यक्षपद,वाढीव सदस्य व सल्लगार समिती सदस्यांच्या निवडीवेळी ते प्रतीतही झाले होते.मात्र तरीही पंढपूरकरांनी हे सारे बदल स्विकारत केवळ ही स्थायी मंदीर समिती आता ठोस निर्णय घेईल व पंढरपूरात समितच्या मा...

पंढरी वार्ता:- ‘बडया’ शिक्षण संस्थांमधील शिक्षकांचे पगार,पात्रता आणि अनुभवाची आता पालकांनीच पडताळणी करणे गरजेचे ! पालक संघटन मजबूत होण्याची गरज

Image
पंढरी वार्ता:- ‘बडया’ शिक्षण संस्थांमधील शिक्षकांचे पगार,पात्रता आणि अनुभवाची आता पालकांनीच पडताळणी करणे गरजेचे ! पालक संघटन मजबूत होण्याची गरज  पुणे स्थित सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षकांच्या थकित वेतनाचा प्रश्‍न सावित्रीमाई फुले पुणे विद्यापिठाच्या अधिसभेत  गाजला होता तर अधिसभा सदस्यांनी मार्च महिन्यात झालेल्या बैठकीत विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरत 17 महिन्यापासून प्राध्यापकां ना वेतन मिळाले नसल्याने  संस्थेवर कारवाई करावी अशी मागणी अधिसभा सदस्य डॉ. पंकज मिनियार यांनी केली होती.दिल्लीस्थीत अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने या संस्थेवर कारवाईही केली होती.मात्र हा प्रश्‍न केवळ सिंहगड संस्थेचा नसून, अन्य काही संस्थेत शिक्षकांना वेळेत वेतन दिले जात नाही हेही अधिसभा सदस्यांनी निदर्शनास आणून दिले होते.हीच परिस्थीती सोलापूर जिल्ह्यातही असून या जिल्ह्यातील अनेक खाजगी शिक्षण संस्था आपल्या संस्थेच्या प्रसिध्दीसाठी लाखो रुपये खर्च करुन जाहीरात बाजी करतात मात्र या संस्थांमध्ये काम करीत असलेल्या शिक्षकांची व कर्मचार्‍यांची अतिशय अहवेलना केली जात असून एकीकडे राज्य शासनाने ...

पंढरी वार्ता :- पंढरपुरातील कोकण विदर्भ बँकेत चोरी लॅपटॉपसह ४३ हजारांचा मुद्देमाल लंपास

Image
पंढरी वार्ता :- पंढरपुरातील कोकण विदर्भ बँकेत चोरी लॅपटॉपसह ४३ हजारांचा मुद्देमाल लंपास    पंढरपुर येथील संत तनपुरे महाराज मठासमोर असणाऱ्या विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतून  चोरटयांनी 43500/- रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे  . ही घटना दि 21/06 /18 रोजी रात्री 8 ते दुसऱ्या दिवशी दि 22/06रोजी 9:30 च्या दरम्यान घडली.विदर्भ कोकण ग्रामीण  बँकेतून चोरी झालेची फिर्याद  अरुण लिबाजी कदम वय वर्ष 55 रा मनीषा नगर पंढरपूर यांनी पंढरपुर शहर पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे .    याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बँकेचे लोखंडी शटर चा कोयंडा  तोडून आत मध्ये प्रवेश केला .व येथून  17000/- किमती  टॅब , एक विप्रो कंपनीचा लॅपटॉप 26500/- पिसीआर कंपनीचा लॅपटॉप सोबत जिपीएस कॅमेरा या वस्तू अज्ञात चोरट्याने वस्तू चोरून नेल्याची तक्रार पंढरपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे . पुढील तपास पो. नि यांच्या आदेशानव्ये पो. हे. कॉ . उबाळे हे करत आहेत .

पंढरी वार्ता:- हज यात्रींना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्ह्यातील पहीला कॅम्प पंढरपूरात संपन्न

Image
पंढरी वार्ता:- हज यात्रींना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्ह्यातील पहीला कॅम्प पंढरपूरात संपन्न   यावर्षीच्या हजयात्रेसाठी जाणार्‍या सोलापूर जिल्ह्यातील हजयात्रींसाठी पहीला मार्गदर्शन मेळावा हज तरबीयत कॅम्प पंढरपूर येथील स्टेशन मस्जिद येथे नुकताच संपन्न झाला.या मेळाव्यात हाजी उस्मान यांनी संपुर्ण हज यात्रा कशा पध्दतीने करयाची व कोणत्या प्रकारची दक्षता घ्यावयाची याचे संपुर्ण मार्गदर्शन यावेळी हजयात्रेसाठी रवाना होणार्‍या मुस्लिम बांधवांना करण्यात आले.यावर्षीच्या हज यात्रेस पंढरपूर शहरातून प्रथमच 72 इतक्या मोठया संख्येने यात्री हजला जाणार आहेत.ही पंढरपूरकरांसाठी अतिशय सुखद बाब आहे असेही यावेळी सांगण्यात आले.       यावेळी हाजी युनुस शेख,हाजी सुभेदार साहेब,हाजी मेहबुब बेद्रेकर,हाजी फय्याज बागवान,ऍड.यासीन शेख,अ.माजीद मौलाना,एम.इब्राहीम,मुन्ना आतार,मुश्ताक नाडेवाले,अ.समद बेद्रेकर,युसुफ मुजावर,इक्बाल मोगल,इक्रम बागवान,कमर व पंढरपूर शहर व तालुक्यातील मुस्लिम समाजबांधव मोठया संख्येने उपस्थित होते.        महाराष्ट्रातील हज यात्रेकरुनांना हज येथे आल्यांन...

पंढरी वार्ता:- स्वातंत्र्य सैनिक गृहनिर्माण संस्थेच्या चेअरमनपदी दिपक वसंतराव भोसले यांची निवड * पंढरीत कॉग्रेस(आय) कडून सत्कार *

Image
पंढरी वार्ता:- स्वातंत्र्य सैनिक गृहनिर्माण संस्थेच्या चेअरमनपदी दिपक वसंतराव भोसले यांची निवड * पंढरीत कॉग्रेस(आय) कडून सत्कार * स्वातंत्र्य सैनिक गृहनिर्माण संस्थेच्या चेअरमनपदी दिपक वसंतराव भोसले यांची निवड करण्यात आली आहे.पंढरपूर शहरातील स्वातंत्र्य सैनिक वारसदार व कॉग्रेस कार्यकर्त्यांकडून दिपक भोसले यांचा कॉग्रेसचे मा.शहराध्यक्ष सुहास भाळवणकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.तर कॉग्रेस सेवादलाच्या अध्यक्षपदी प्रकाश मोरे यांची निवड झाल्याबद्दल नागनाथ अधटराव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.    स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसदारांच्या या सत्कार प्रसंगी कॉग्रेस प्रणित ब्राम्हण सेलचे जिल्हाध्यक्ष द.बडवे,कॉग्रेस अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष अशपाक सय्यद,दत्तात्रय हिंगमीरे,शेखर मंगेढकर,दत्तात्रय झरकर,राहुल पवार,देवानंद इरकल,प्रा.अशोक डोळ,मामा फलटणकर,प्रा.सुदर्शन मसुरे,आनंद कारंडे.सुरज कुकडे,अविनाश पुजारी यांच्यासह कॉग्रेस व सेवादलाचे कार्यकर्ते उपस्थित होते .

पंढरी वार्ता:- रमाई घरकुल योजनेच्या अनुदानासाठी समाजकल्याणमंत्री बडोले यांना निवेदन ...अन्यथा उग्र आंदोलनाशिवाय पर्याय नाही-नगरसेवक डि.राज सर्वगोड

Image
पंढरी वार्ता:- रमाई घरकुल योजनेच्या अनुदानासाठी समाजकल्याणमंत्री बडोले यांना निवेदन ...अन्यथा उग्र आंदोलनाशिवाय पर्याय नाही-नगरसेवक डि.राज सर्वगोड   पंढरपूर शहरातील 274  व मंगळवेढा शहरातील 14 नवबौध्द व दलीत कुटुबांना रमाई आवास घरकूल योजनेअंतर्गत शासनाने  सात कोटी एकवीस लाख रूपये अनुदान तात्काळ उपलब्ध करावे या मागणीचे निवेदन नगरसेवक डि .राज सर्वगोड व दुर्योधन यादव यांनी राज्याचे समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना   मुबंई येथे दिले आहे.  या बाबत पंढरी वार्ताशी बोतलाना नगरसेवक डि.राज सर्वगोड म्हणाले की, हे अनुदान उपलब्ध न झाल्याने 288 घरकुल लाभार्थ्यांना हक्काच्या पक्क्या घरापासून वंचीत रहावे लागत आहे. या बाबत प्रशासकिय पातळीवर सातत्याने पाठपुरावा करुनही दखल घेतली जात नाही.यापुर्वी 4 जून रोजी पुणे विभागीय आयुक्त यांना देखील या घरकूलांचे अनुदान उपलब्ध करुन द्यावे अशा आशयाचे निवेदन दिले होते. मात्र याची दखल घेतली गेली नाही.केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनाही याच आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.राज्याचे समाजकल्याणमंत्री रा...

पंढरी वार्ता:- पंतनगर येथे आंतराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा प्राणायाम शिबीराचे नियमित आयोजन करण्याचा मानस-उमेश परिचारक

Image
पंढरी वार्ता:- पंतनगर येथे आंतराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा प्राणायाम शिबीराचे नियमित आयोजन करण्याचा मानस-उमेश परिचारक  आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंढरीत विविध संस्थांच्या वतीने येथील पंतनगर येथे एकदिवसीय योगासन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले. 21 जून जगभरात योग दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्‍वभूमिवर पंढरीतील नागरिकांना शास्त्रशुध्द योगाचे प्रशिक्षण देण्यासाठी तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, अजिंक्य स्पोटर्स अकॅडमी पंतनगर, पंढरपूर योग विद्याधाम, पांडुरंग परिवार व विठ्ठल रूक्मिणी योग प्राणायाम यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर एक दिवसाच्या योग शिबीरामध्ये पंढरपूर मधील विविध भागातून मान्यवर नागरीक सहभागी झालेले होते. एक दिवसीय योग शिबीर याचे उद्घाटन माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा साधना भोसले, युटोपियन शुगर्सचे चेअरमन उमेश परिचारक, योग प्रशिक्षक अशोक ननवरे, तालुका क्रीडा अधिकारी आमसिध्द सोलनकर, सुनिल वाळुजकर, ...

पंढरी वार्ता:- म्हैसाळचे पाणी जुलै महिन्यात मंगळवेढा तालुक्यात -आ.भारत भालके शिरनांदगी तलावातील पाण्याचा होणार तालुक्याला फायदा

Image
पंढरी वार्ता:- पंतनगर येथे आंतराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा प्राणायाम शिबीराचे नियमित आयोजन करण्याचा मानस-उमेश परिचारक  आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंढरीत विविध संस्थांच्या वतीने येथील पंतनगर येथे एकदिवसीय योगासन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले. 21 जून जगभरात योग दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्‍वभूमिवर पंढरीतील नागरिकांना शास्त्रशुध्द योगाचे प्रशिक्षण देण्यासाठी तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, अजिंक्य स्पोटर्स अकॅडमी पंतनगर, पंढरपूर योग विद्याधाम, पांडुरंग परिवार व विठ्ठल रूक्मिणी योग प्राणायाम यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर एक दिवसाच्या योग शिबीरामध्ये पंढरपूर मधील विविध भागातून मान्यवर नागरीक सहभागी झालेले होते. एक दिवसीय योग शिबीर याचे उद्घाटन माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा साधना भोसले, युटोपियन शुगर्सचे चेअरमन उमेश परिचारक, योग प्रशिक्षक अशोक ननवरे, तालुका क्रीडा अधिकारी आमसिध्द सोलनकर, सुनिल वाळुजकर,...

पंढरी वार्ता :- लोकमान्य विद्यालय, पंढरपूर, येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहाने साजरा

Image
पंढरी वार्ता :-  लोकमान्य विद्यालय, पंढरपूर, येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहाने साजरा  लोकमान्य विद्यालया मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला. सर्व विद्यार्थ्यांनी या शिबिरात उस्फुर्त सहभाग घेतला. शिक्षण समिती  सभापती विवेक परदेशी यांनी सांगितले की तरुण वयात योग-प्राणायाम ची आवड लागल्यास ती आयुष्यभर टिकते,माणूस निरोगी राहतो, विद्यार्थ्यांना योग प्राणायाम ची आवड निर्माण व्हावी यासाठीच या शिबिराचे आयोजन केले असल्याचे विवेक परदेशी सांगितले. निश्चितपणाने दररोज योग साधना केल्यास मानवाचे मानसिक व शारिरीक आरोग्य चांगले राहते त्यामुळे नियमीतपणे सर्वांनी योग साधना करावी असे अवाहन नगरपरिषदेचे उपमुख्यधिकारी सुनील वाळुजकर साहेब यांनी केले.           विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायाम बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील वाळूजकर, सचिव प्रशांत अगावणे, खजिनदार चंदुलाल सुपेकर, संचालक जयंत हरिदास, संचालक विवेक परदेशी यांनी विद्यार्थ्यांना योग-प्राणायाम चे महत्व सांगून विद्यार्थ्यांना आदर्श  प्रात्यक्षिके दाखवली व विद्यार्थ्यांकडून य...