Posts

Showing posts from February, 2018

पंढरी वार्ता:- शरद प्रतिष्ठाणने केली फसव्या सरकारच्या आदेशांची प्रतिकात्मक होळी ! सरकारच्या नावे बोंब ठोकून केला शासनाचा निषेध !

Image
मराठा आरक्षाणचे आश्‍वासन बासणात,धनगर आरक्षणाबाबत चालढकल,शेतकर्‍यांची फसवी कर्जमाफी ,1300 शाळा बंद करुन गोरगरीबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचीत ठेवण्याचे धोरण आणि जी.एस.टी.सारख्या जाचक प्रणालीमुळे थंडावलेला व्यापार व्यवसाय यामुळे राज्यात या सरकारच्या विरोधात सर्वसामान्य जनतेमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे त्यामुळे आज आम्ही या अन्यायी सरकारची प्रतिकात्मक होळी करुन शासनाच्या विरोधात बोंब ठोकून शासनास जागे करण्याचा प्रयत्न करीत आहोत अशी माहीती शरद प्रतिष्ठाणचे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गोडसे यांनी दिली आहे.       गुरसाळे -टेंभुर्णी रस्ता ता.पंढरपूर येथे होळी सण अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला असून शासनाच्या वतीने सातत्याने अन्यायी धोरणे राबविण्यात येत आहेत.या धोरणांच्या निषेधार्थ वेळोवेळी मोर्चे,आंदोलने करुन देखील शासनास जाग येत नसल्याने आज येथील ग्रामस्थ व शरद प्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विविध निर्णयांच्या प्रतींची प्रतिकात्मक पुतळ्याची होळी करण्याबरोबरच शासनाविरोधात बोंब ठोकल्याचे दिसून आले.      यावेळी बालाजी खंदारे,पोपट चव्हाण,सोमा ढवण...

पंढरी वार्ता:- पंढरीच्या सुरक्षेसाठी के.पी.एम.जी.च्या सहाय्याने 56 कोटी खर्चाचा डि.पी.आर.शासनास सादर ! आ.भालकेंच्या लक्षवेधीस मुख्यमंत्र्याचे उत्तर प्रमुख ठिकाणी 175 कॅमेरे तर 108 ठिकाणी उदघोषणा प्रणाली बसविणार !

Image
पंढरपूर शहरास असलेल्या संभाव्य दहशतवादी धोक्याबरोबरच येथे येणार्‍या भाविकांच्या सुरक्षेसाठी राज्य शासनाने पंढरपूर शहरातील सर्व प्रमुख रस्ते,चौक आदी ठिकाणी 178 सी.सी.टि.व्ही.कॅमेरे बसविण्यात येणार असून त्याच बरोबर सुरक्षेच्या व इतर महत्वपुर्ण  सुचना करण्यासाठी 108 ठिकाणी उदघोषणा प्रणाली बसविण्यात येणार आहे.याबाबतचा संपुर्ण प्रकल्प अहवाल के.पी.एम.जी.ने पोलीस महासंचालकांच्या मार्फत शासनाकडे  5 ऑगस्ट 2017 रोजीच सादर केला असून यामध्ये एक आदेश व डेटा संकलन केंद्राचाही समावेश आहे.हा संपुर्ण प्रकल्प अहवाल माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे पाठीविण्यात आला असून लवकरच याबाबत कार्यवाही केली जाईल अशी माहीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ.भारत भालके यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेशी प्रश्‍नास उत्तर देताना दिली आहे.

पंढरी वार्ता:- चंद्रभागा प्रदुषणमुक्त केव्हा करणार? आ.दत्तात्रय सावंत यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला प्रश्‍न

Image
पुणे आणि सोलापूर जिल्ह्याची तहान भागविणारी भीमा नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. वारक-यांचे दैवत असलेली ही भीमा अर्थात, चंद्रभागा नदी कारखान्यांनी सोडलेल्या दूषित पाण्यामुळे प्रदूषित झाली आहे. याच नदीच्या काठावर भीमाशंकर, सिद्धटेक, गंगापूर आणि पंढरपूर ही तीर्थक्षेत्रे आहेत. भाविक हेच पाणी तीर्थ म्हणून पितात. एकीकडे गंगेच्या शुद्धीकरणासाठी विशेष प्रयत्न सुरू असतानाच लाखो वारक-यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरातील चंद्रभागेकडे मात्र अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले आहे.अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी नमामी चंद्रभागे योजनेची घोषणा करून वर्ष होत आले तरी तुळशी वनाचे प्रगतीपथावर असलेले काम सोडले तर हे काम पुढे सरकू शकले नाही.यातच भरीस भर म्हणून चंद्रभागेतून रात्रभर होत असलेला अवैध वाळू उपसा नदीच्या पात्रालाच धोका उत्पन्न करीत असल्याचे दिसून येत आहे.   केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या अतिप्रदूषित 302 नद्यांमध्ये मुळा-मुठेचा समावेश आहे. नागरी वस्त्यांतून निर्माण होणारे सांडपाणी, औद्योगिक सांडपाणी, निचरा होणारे लिचेट, वाळू उपसा, नदीत पाणी नसणे, जलपर्णीची वाढ, गाळाचे ...

पंढरी वार्ता:- ‘श्रीमंताच्या(?)’शाळेत गरीब विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची मुदत बुधवारी संपणार ! ‘घुसखोरी’ टाळण्यासाठी अर्जाच्या काटेकोर पडताळणीची गरज

Image
 शिक्षण हक्क कायद्यांतर्गत देण्यात येणार्‍या 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत आता वाढणार असल्याचे संकेत शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी दिले आहेत. राज्यभरातून याला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत राज्यभरातून 1 लाख 30 हजार 390 पालकांनी यासाठी अर्ज केला आहे.पंढरपूर शहर व तालुक्यातील 43 शाळांनी आरटीई अर्तंगत प्रवेशासाठी अर्ज मागविले असून यामध्ये पंढरपूर तालुक्यात आरटीई अर्तंगत 1) ज्ञानदिप प्रायमरी स्कुल चळे 2) श्री विठ्ठल न्यु इंग्लिश स्कुल पांढरेवाडी 3)अभिजीत इंग्लिश मिडियम स्कूल पंढरपूर 4)शांतीनिकेतन गुरुकूल कोर्टी.5)प्राथमिक विद्यालय पेहे 6)किशोर निर्मल इंग्लिश मिडियम स्कुल तारापूर 7)शरदचंद्रजी पवार इंग्लिश मिडीयम स्कूल नांदोरे,8)ज्ञानदिप प्रोगे्रसीव्ह स्कुल नांदोरे9)विठ्ठल प्रायमरी स्कुल 10)पालवी ज्ञानमंदीर टाकळी 11)श्री गणेश इंग्लिश मिडीयम स्कुल भंडीशेगाव 12)वसंतराव काळे विद्यामंदीर चंद्रभागानगर भाळवणी 13)शिवराज इंग्लिश मिडीयम स्कुल पोहोरगाव 14)सनराईज पब्लीक स्कुल शेळवे15) आदर्श इंग्लिश मिडीयम स्कुल वाडेकुरोली 16) कर्मयोगी इंग्लिश मिडीयम स्कुल शेळवे 1%)...

पंढरी वार्ता:- अल्प व अत्यल्प भुधारक शेतकर्‍यांच्या कृषीपंपाना तातडीने विद्युत कनेकक्शन जोडणीसाठी आ.भारत भालके आक्रमक ! विधानसभेत पटलावर ठेवले अशासकिय विधेयक !

Image
पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील अल्प भुधारक व अत्यल्प भुधारक शेतकरी हे महावितरणकडून विद्युत पंपासाठी वीज जोडणी मिळावी यासाठी वर्षानुवर्षे प्रतिक्षा करीत असून या बाबत विविध कारणे पुढे करुन विद्युत जोडणी देण्याबाबत महावितरणच्या संबधीत अधिकार्‍यांकडून चालढकल होत असल्याने या गरीब शेतकर्‍यांचे वर्षा काठी मोठे नुकसान होत आहे.विहरीत पाणी आहे,नदीला पाणी आहे,बंधार्‍यात पाणी आहे मात्र शेतीला देता येत नाही अशी दुर्दैवी वेळ या दोन्ही तालुक्यातील अनेक अल्पभुधारक व अत्यल्प भुधारक शेतकर्‍यांवर आली आहे.या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नावर आ.भारत भालके यांनी अनेकवेळा महावितरणच्या अधिकार्‍यांना विविध शासकिय बैठकींच्या वेळी धारेवरही धरले होते.मात्र     महावितरणचे अधिकारी प्रतिसादच देत नसल्यामुळे आ.भारत भालके हये आक्रमक झाले असून थेट विधानसभेत अशासकिय विधेयक मांडून त्यांनी पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील शेतकर्‍यांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नास वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे.   अटल सौर कृषी पंप योजनेच्या साथीने.. शेती पिकवू समृद्धीने चा गाजावाजा करीत सुरु करण्यात आलेली   योजनाही केवळ कागदोपत्री...

पंढरी वार्ता:- यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रम निम्म्यावर ! केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शिक्षकांवर व्यक्त केलेला अविश्‍वासामुळे व्रतस्थ शिक्षक नाराज !

Image
पुढील वर्षीपासून शालेय अभ्यासक्रम निम्म्यावर आणण्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. शालेय विद्यार्थ्यांवरील अभ्यासक्रमाचा बोजा कमी करण्याच्या हेतूने हा निर्णय घेतला आहे.सध्याचे शालेय अभ्यासक्रम हे कला आणि वाणिज्य शाखेच्या पदवी अभ्यासक्रमापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास होण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचं मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. यावेळी प्रकाश जावडेकर यांनी शिक्षकांच्या गुणवत्तेवरही शंका उपस्थित केली. ते म्हणाले, विद्यार्थ्यांच्या जमेच्या बाजू आणि कमकुवत गोष्टी शिक्षकांनी समजून घ्यायला हव्या. त्यानुसार विद्यार्थ्यांना पुढील तयारीस मदत करायला हवी. दप्तराचे ओझे कमी होण्यासंदर्भात नागपूरच्या खंडपीठात जनहित याचिका दाखल झाली होतीे. या याचिकेच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना व उपाययोजना करताना येणा-या अडचणी यांबाबत नेमके उपाय सुचविण्यासाठी शासनाने समिती स्थापन करण्याचे आदेश शिक्षण विभागास दिले होते. सरकारने दप्तराचे ओझे...

पंढरी वार्ता:- पंढरपूरातील रखडलेल्या सी.सी.टिव्ही प्रकल्पाचा प्रश्‍न विधानसभेत ! आ.भारत भालके यांनी व्यक्त केली नाराजी !

Image
पंढरी वार्ता:- पंढरपूरातील रखडलेल्या सी.सी.टिव्ही प्रकल्पाचा प्रश्‍न विधानसभेत !  आ.भारत भालके यांनी व्यक्त केली नाराजी ! संत तुकाराम महाराज चर्तुंजन्मशताब्दी तिर्थक्षेत्र विकास आराखडयाअर्तंगत पंढरपूर शहरातील प्राधान्याने करण्यात येणार्‍या कामांमध्ये भाविकांच्या सुरक्षेसाठी व मंदीरास असलेल्या संभाव्य धोक्याचा लक्षात घेत व यात्रा काळात शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी येथील प्रमुख रस्ते,प्रदक्षिणा मार्ग,विविध महत्वपुर्ण चौकाच्या ठिकाणी सी.सी.टिव्ही कॅमेरे बसवून त्यांचे नियंत्रण एकाच ठिकाणी ठेवण्याचे प्रस्तावित होते.यासाठी साडे सहा कोटी रुपयांच्या आसपास निधीही उपलब्ध करण्यात आला होता.मात्र गेल्या आठ वर्षापासून शहराच्या सुरक्षेच्या द्रष्टीकोनातून महत्वपुर्ण असलेला हा प्रकल्प रखडलेला आहे.याबाबत त्रीव्र नाराजी व्यक्त करीत आमदार भारत भालके यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा प्रश्‍न उपस्थित केला असून मंगळवारी या प्रश्‍नावर राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे खुलासा करतील अशी अपेक्षा आहे.     शासनाच्या विकास आराखडयातील हा महत्वपुर्ण व सुरक्षेच्या द्...

पंढरी वार्ता:- होमगार्डच्या सेवेत कार्यरत असलेले सदस्य हे नोकरी व्यवसाय करणारे ! होमगार्डना शासकिय सेवेत सामावून घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांची नकारघंटा !

Image
विविध यात्रा,उत्सव व विशेष पोलीस बंदोबस्ताच्या काळात तसेच विविध नेत्यांच्या दौर्‍याच्या व आपत्तीच्या काळात चोखपणे बंदोबस्त ठेवण्यासाठीचा एक महत्वाचा पर्याय असलेल्या गृहरक्षक दलाच्या जवानांना त्यांची शारीरीक क्षमता व शैक्षणिक पात्रता लक्षात घेवून शासकिय सेवेत दाखल करुन घेण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साफ नकार दिला असून या बाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ.प्रा.वर्षा गायकवाड यांच्यासह विविध सदस्यांनी उपस्थित केलेल्या अतारांकीत प्रश्‍नास लेखी उत्तर देताना मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी गृहरक्षक दलाचे जवान हे राष्ट्रसेवा करण्याच्या हेतूने संघटनेचे सदस्य होतात त्यामुळे त्यांना शासकिय सेवेत दाखल करण्याचा प्रश्‍नच उदभवत नसल्याचे स्पष्ट केले आहे.       होमगार्ड्सना विनाअट शासकीय सेवेत सामावून घ्यावे, होमगार्ड अधिनियमातील आजपर्यंतच्या जाचक अटी रद्द कराव्यात, होमगार्डस यांच्या पाल्यांचे शिक्षण मोङ्गत व्हावे, परिवाराला मोङ्गत आरोग्य सेवा मिळावी, होमगार्ड्सना मिळणारा भत्ता वाढावा, होमगार्डना पिवळ्या शिधापत्रिका देण्यात याव्यात, होमगार्डची सेवा शासकीय कर्मचार्‍याप्रमाणे गृही...

पंढरी वार्ता :- नागपूर - कोल्हापूर एक्स्प्रेसला कवठे महाकाळ येथे अपघात ! नेक प्रवाशांचे हात कापले !

Image
पंढरपूर-मिरज रेल्वेमार्गावर कवठे महांकाळ-सलगरे रेल्वे स्थानकाच्या दरम्यान नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेसमध्ये खिडकीत बसलेल्या सुमारे डझनभर प्रवाशांचे हात धावत्या ट्रेनमध्ये कापले गेल्याची घटना घडली आहे. सर्व जखमी प्रवाशांना मिरजमधील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कवठे महांकाळ-सलगरे रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रेल्वेमार्गाला खेटून असणारा एखादा मार्गदर्शक फलक किंवा खांबाचा पत्रा तुटून लटकत होता. यामुळे प्रवाशाचे हात कापले गेले. भरधाव निघालेल्या नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेसला हा तुटलेला पत्रा घासत गेला, त्यामुळे रेल्वेच्या डब्यात खिडकीला टेकून बसलेल्या प्रवाशांचे हात क्षणात कापत गेले. अवघ्या मिनिटभरात डझनभर प्रवासी रक्तबंबाळ झाले. स्लिपर आणि जनरल डब्यातील प्रवासी प्रामुख्याने जखमी झाले. यामुळे गाडीत एकच गोंधळ सुरु झाला. तोपर्यंत गाडी मिरजेपर्यंत आली होती. घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी, रेल्वे पोलिस व सुरक्षा दल, रेल्वेचे वैद्यकीय पथक मदतीला धावले.

पंढरी वार्ता :- बादलकोट येथील अवैध वाळू उपसा व वाहतूकीवर महसूल प्रशासनाची कारवाई ! महसूल व पोलिसांची संयुक्त करवाई !

Image
तालुक्यातील  बादलकोट हद्दीतील  भीमा नदीपात्रातून  बेकायदेशीर अवैध वाळू  उपसा करुन वाहतूक सुरु असताना महसूल व पोलींसाच्या पथकाने संयुक्तपणे छापा  टाकून सात टिपर व एक  जे.सी.बी  पकडला असून, 1 कोटी 27 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती प्रांताधिकारी  सचिन ढोले यांनी  दिली.             भीमा नदीपात्रात बेकायदेशीर अवैद्य वाळू उपसाकरुन वाहतूक सुरु असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या निर्देशानुसार प्रांतधिकारी सचिन ढोले  व सहायक पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनानुसार तहसिलदार मधुसूदन बर्गे यांनी पथके तयार केली. मौजे बादलकोट येथे बेकायदेशीर यांत्रिक यारीच्या सहाय्याने अवैद्य वाळू उपसा सुरु असताना, पथकाने छापा टाकून सात टिपर व एक जेसीबी जप्त केला आहे. तसेच संबंधितांवर करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती प्रांतधिकारी  सचिन ढोले यांनी...

पंढरी वार्ता:- छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पंढरीत महादेव धोत्रे मित्र मंडळाच्या वतीने ‘‘बॉस 2018’’स्पर्धा संपन्न !

Image
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त  बॉस श्री 2018 स्पर्धेचे आयोजन  समाजसेवक श्री .महादेव धोत्रे यांच्या वतीने करण्यात आले होते.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे ,विठ्ठल सहकारी कारखान्याचे संचालक भगिरथ  भालके, पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष विठ्ठल शेट्टी धोत्रे पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष .नागेश भोसले.डॉ.अमित गुंडेवार डॉ.आरिफभाई बोहरी डॉ.सोनवणे प्रा.गणेश धांडोरे( सर.)ऍड.यासिन शेख, नगरसेवक सुरेश नेहतराव.नागरसेवक सुधीर धोत्रे.भास्कर कासगावडे सुनीलजी सर्वगोड,नगरसेगवक महादेव भालेराव.दत्तात्रय धोत्रे सुधीर धुमाळ,ऍड.राजेश भादुले (अध्यक्ष :कॉंग्रेस आय ),पै.भिमाप्पा माळी,संतोष पवार, नगरसेवक लखन चौगुले, नगरसेवक आशिष डोंबे, निलेश आंबरे,मा.नगरसेवक नागेश यादव,राहुल साबळे,डी.राज सर्वगोड ,मा.मोहन पवार,मा. नागरसेवक बालाजी मलपे ,बापू घंटे ,नानासाहेब जगताप,नगरसेवक गुरुदास अभ्यंकर,श्री रानगट ,दादासाहेब फत्तेपुरकर,शाम गोगाव ,कोळी महासंघाचे प.महाराष्ट्र अध्यक्ष अरुण भाऊ कोळी,ज्येष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे,मोहन शिंदे,संजय बंदपट्टे (समाजस...

पंढरी वार्ता:- विधानसभेवर भगवा फडविण्यासाठी जोमाने कामाला लागा-शिवसेना निरीक्षक राजाभाऊ वैद्य

Image
आगामी काळात शिवसेना पक्ष प्रमुख उध्दवसाहेबांच्मा आदेशाप्रमाणे शिवसैनिकांनो जोमाने कामाला लागा व विधानसभेवर भगवा ङ्गडकविण्याचे स्वप्न साकार करा. आत्ता युती सरकारच्या काळामध्ये भाजपाच्या कामकाजावर शिवसेना नाराज असून शेतकर्‍यांना कर्जमाङ्गीचे आश्‍वासन देवून ही पूर्ण केले नाही. निवडणूकीपुरताच केवळ छत्रपतींचा नावाचा वापर केला असून भ्रष्टाचार, महागाई, दरवाढ यामुळे जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. मा गोष्टींमुळे शिवसेना पक्ष जनतेच्या समस्या लक्षात घेवून स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढविणार आहे. शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांचे वाक्य रडायचं नाही, आता लढायचं असे सांगून विधानसभेवर भगवा झेंडा ङ्गडकविण्याचे आवाहन निरीक्षक राजाभाऊ वैद्य (संभाजीनगर) यांनी केले. शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेबांनी स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय प्रक्रियेवर पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहामध्मे शिवसेना पदाधिकारी व कार्मकर्त्यांची बैठक बुधवार दि.21 ङ्गेब्रुवारी रोजी पंढरपूर शिवसेना शहर व तालुका बैठक आयोजित करण्मात आली होती. यावेळी विरभद्र गादगे (नगरसेवक संभाजीनगर), प्रशांत डिघुळे (विभाग प्रमुख...

पंढरी वार्ता:- पंढरपूर युवक कॉग्रेसकडुन मुख्याधिकारी बापट यांच्या बदलीची मागणी ! प्रांताधिकार्‍यांना दिले निवेदन !

Image
पंढरपूर नगर पालीकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट हे राजकारण करीत असून नगर पालीेकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली जात असताना मुळ निमंत्रण पत्रीकेत त्यांनी आ.भारत भालके यांचे नाव केवळ राजकीय दबावापोटी वगळले आहे.या बाबत विविध राजकीय पक्ष,संघटना यांच्याकडुन विरोध होताच व प्रचंड संताप व्यक्त होत असल्याचे पाहून नंतर त्यांनी प्रोटोकॉल प्रमाणे दुसरी निमंत्रण पत्रीका छापून घेतली.जनतेचे आमदार असलेल्या आमदार भारत भालके यांचे नाव वगळून विधानपरिषदेतून निलंबीत करण्यात आलेले आमदार प्रशांत परिचारक यांचे नाव टाकून मुख्याधिकारी बापट यांनी लोकशाहीचा अवमान केला आहे.     या बाबत तीव्र निषेध होत असल्याचे पाहून मुख्याधिकारी बापट यांनी आपल्यावरील जबाबदारी झटकून नगर पालीकेच्या इतर कर्मचार्‍यांना बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न केला आहे.त्यामुळे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची तातडीने बदली करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन पंढरपूर शहर युवक कॉग्रेसच्या वतीने प्रांताधिकारी सचिन ढोले यांना देण्यात आले आहे.हे निवेदन देताना युवक कॉग्रेसचे अध्यक्ष अमित डोंबे,समाजसेवक महादेव धोत्रे,आकाश कौलवार,बाबा ल...

पंढरी वार्ता :- बारा बलुतेदार महासंघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी !

Image
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३८८ व्या जयंती निमित्त पंढरपूर शहरात बारा बलुतेदार महासंघाच्या वतीने शिवरायांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी  ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश फडे यांचे शुभहस्ते छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे संयोजक बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष भाई किशोर भोसले, संभाजी ब्रिगेड चे शहर सचिव विशाल आर्वे, पंढरपूर शहर मध्यवर्ती शिव जन्मोत्सव सोहळा समितीचे सचिव सारंग दिघे,शालिवाहन कोळेकर,संजय सावंत,बापुसाहेब गायकवाड,महादेव खंडागळे,युवराज  फरकांडे  ,एकनाथ माने, नागनाथ माने,डांगे,हरवळकर,तेजस भोसले, आकाश भोसले आदी मान्यवर, शिवप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.

पंढरी वार्ता :- सेवानिवृत्त सैनिकाच्या निधनानंतर आमदार भारत भालके यांच्याकडून देशभक्त कुटूंबाचे सांत्वन !

Image
पंढरपूर येथील कालिकादेवी चौकातील माजी सैनिक स्व.लक्ष्मण शत्रुघ्न आगावणे यांचे दि.14.02.2018 रोजी आकस्मित निधन झाले. स्व.लक्ष्मण आगावणे यांनी स्वतः लष्करात देशसेवा केली असून त्यांची दोन्हीही मुलेसुध्दा लष्करामध्ये देशसेवा करीत आहेत. पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार  भारत भालके यांनी त्यांचे घरी जाऊन आगावणे कुटूंबाचे सांत्वन केले. सदर प्रसंगी नामदेव लामतुरे, सुभाष हुंगे-पाटील, सुधीर हुंगे-पाटील, पंकज लामतूरे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

पंढरी वार्ता :- नवजात अर्भक सोडून जाणा-या महिलेवर गुन्हा दाखल

Image
उ पजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे  एका अनोळखी महिलेने पाच ते सहा दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक ताब्यात देवून पसार झाली  आहे. याबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात अनोळखी महिले विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उ पजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे  दिनांक 11 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 9.00 वाजता एका अनोळखी महिलेने ( अंदाजे वय-22 वर्षे) तिचे पाच ते सहा दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक श्रीमती प्रतिभा वायकसकर (वय-40वर्षे) रा.करकंब ता.पंढरपूर यांच्या ताब्यात देवून पसार झाली आहे. याबाबत श्रीमती प्रतिभा वायकसकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अनोळखी महिले विरोधात भादंवि कलम 317 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तरी नवजात बालक हरविल्याची तक्रार अथवा माहिती असल्यास संबधितांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्याशी ( दुरध्वनी क्र. 02186-223443 ) संपर्क साधावा असे आवाहन पंढरपूर शहर पोलीस ठाणाच्या वतीने करण्यात आहे.

पंढरी वार्ता :-शिवबुध्द युवा प्रतिष्ठान च्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा ! पत्रकारी सुरक्षा समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजकुमार शहापूरकर व जेष्ठ समाजसेवक संजय ननवरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन.

Image
येथील भजनदास चौक येथे शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन पत्रकारी सुरक्षा समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष  राजकुमार शहापूरकर व जेष्ठ समाजसेवक संजय ननवरे यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य महिला आघाडी पंढरपूर तालुका अध्यक्षपदी सौ. शोभाताई विद्याधर धांडोरे , व शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ओबीसी सेलच्या पंढरपूर तालुका अध्यक्षपदी जावेद सत्तार शेख आदींच्या निवडी करण्यात आल्या. कार्यक्रमाचे आयोजन शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक कार्याध्यक्ष किरण शहा व युवक जिल्हाध्यक्ष योगेश कांबळे यांनी केले होते. यावेळी पंढरपूर शहरामध्ये भव्य दिव्य रॅली कडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आल. याचबरोबर गोपाळपूर येथेही छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करुन जयंती साजरी करण्यात आली.  यावेळी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान ...

पंढरी वार्ता :- सरस्वती विद्यालय व कै.भिमराव महाडिक कनिष्ठ महाविद्यालयात दहावी,बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

Image
मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील सरस्वती विद्यालय व कै.भिमराव महाडिक कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता 10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठया उत्साहात व भावपुर्ण वातावरणात पार पडला.या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष सुधीर भोसले व सचिव श्रीधर बिरजे,ग्रिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेले साहित्त्यीक कवी रवी सोनार यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.              या कार्यक्रमाच्या निमित्ताने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी या शाळेतील आपले अनुभव कथन करीत अतिशय भावुक होऊन आपले मनोगत व्यक्त केले.सरस्वतीच्या प्रांगणात आमच्यावर पुत्रवत मायाकरणारे शिक्षकवृंद आम्हास भेटले.त्यांनी केलेले मार्गदर्शन आणि संस्कार आम्हास आयुष्यभर प्रगतीच्या आणि ध्येयाच्या वाटेवर नेणार असल्याचे सांगीतले.या कार्यक्रामाच्या निमित्ताने साहित्यीक कवी रवी सोनार यांचा सत्कार करण्यात आला.      या प्रसंगी प्र.मुख्याध्यापक तानाजी अनुसे,पर्यवेक्षक तानाजी चव्हाण व श्री देशपांडे सर,श्री कोळेकर सर,श्री जाधव सर आदींसह सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर...

पंढरी वार्ता:-बहुजन क्रांती मोर्चाची पंढरपूरात प्रबोधन सभा संपन्न

Image
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 388 व्या जयंती निमित्त बहुजन क्रांती मोर्चा यांच्या माध्यमातून प्रबोधन सभेचे आयोजन दि 19फेब्रुवारी रोजी येथील  "शिवतिर्थ" शिवाजी चौक पंढरपूर येथे करण्यात आले होते.   सभेचे उदघाटन श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाध्यक्ष मोहन अनपट यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष बबन फडतरे , संभाजी बिग्रेडचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब बागल,बामसेफचे जेष्ठ कार्यकर्ते सुनिल वाघमारे आदी मान्यवरांनी आपले विचार वक्त केले. या प्रबोधन सभाचे अध्यक्ष बामसेफचे प्रचारक सचिन अब्दुले यांनी प्रबोधन सभेला संबोधित करताना अब्दुले म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार बहुजन हिताय बहुजन सुखाय या तत्वावर चालत होता.शिवकाळात शेतकरी सुखी होता.छत्रपती शिवरायांच्या मृत्यू नंतर त्यांचा वारसा त्यांचे पराक्रमी पुत्र संभाजी महाराजांनी चालविला.संभाजी राजे प्रचंड बुद्धीमान संस्कृत चे गाढे अभ्यासक तसेच धर्मचिकित्सक होते.त्यांना अनेक भाषा अवगत होत्या.अनेक विदेशी इतिहासकारांनी संभाजी महाराजांचा उल्लेख बुद्धीमान आणि पराक्रमी राजा असा केलेला आहे मात्र महार...

पंढरी वार्ता:- वृक्षारोपणाचा आढावा केव्हा घेणार ? पंचायत राज सदस्यांनाही पडला शासन आदेशाचा विसर !

Image
राज्यात मोठया प्रमाणात वृक्षसवंर्धन करण्याच्या हेतूने शासनाने गतवर्षी प्रत्येक शासकिय कार्यालये,स्थानिक स्वराज्य संस्था,जिल्हा परिषद,पंचायत समिती,ग्रामपमचायत यांच्या माध्यमातून महत्वाकांक्षी वृक्षलागवड योजना राबविण्याचा निर्णय घेतला होता.व प्रत्येक जिल्हानिहाय वृक्षारोपणाचे लक्ष निर्धारीत करून कोटयावधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला. मात्र भ्रष्टाचारी प्रवृत्तींना व वृक्षलागवडीचे काम करणार्या संबधीत एजन्सींजना बनावटगीरी करता येवू नये या उद्देशाने शासनाने आता या योजनेवर जिल्हा निहाय झालेला खर्च लक्षात घेवून दिलेल्या लक्षांकाप्रमाणे वृक्ष लागवड झाली आहे की नाही,ही रोपे जिवंत आहेत का ? शासनाच्या नियमाप्रमाणे या रोपांचे संगोपन करण्याची काळजी घेतली जाते का ? याचा आढावा जिल्हापातळीवरीळ तसेच तालुका पातळीवरील प्रत्येक बैठकीत संबधीत अधिकार्यांनी घ्यावा तसेच दिलेल्या टार्गेटनुसार वृक्षारोपण आणि त्यांचे जतन केले जाते का याचाही प्रत्येक बैठकीत आढावा घेतला जावा असे आदेश दिले होते.पंचायत राज समिती सदस्यांच्या पंढरपूर दौर्‍यात विविध विकासकामे आणि शासकिय योजना यांचा आढावा घेण्यात आला.मात्र या ...

पंढरी वार्ता:- एस.टी.कामगारांची ग्रुप भिशी ठरणार सावकारी ! कर्मचार्‍यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे ना.रावतेंचे आदेश

Image
अतिशय तुटपुंज्या व वेळेवर होत नसलेल्या पगारात काम करणार्‍या एस.टी.कर्मचार्‍यांनी आपले अर्थिक प्रश्‍न सोडविण्यासाठी एकत्र येवून सहकारी बँक आणि विविध ठिकाणी पतसंस्थाही स्थापन केल्या आहेत.मात्र अनेकवेळा संघटनेच्या सभासदत्वाचा अडसर तर बँकेत असललेल्या ठेवीपेक्षा कर्जमागणीच जास्त असल्याने गरजेच्या वेळी कर्ज मिळण्याची खात्री नसल्याने तसेच काही ठरावीक ठिकाणीच एस.टी.कामगाराच्या स्वतंत्र के्रडीट सोसायटीचे अस्तित्व असल्याने पंढरपूर सह राज्यभरातील अनेक एस.टी.डेपो मध्ये कार्यरत असलेल्या काही कर्मचार्‍यांनी पुढाकार घेत भिशी पध्दत सुरु केल्याचे दिसून येते.गरजेच्या वेळी यातील सभासदांना अत्यल्प व्याज आकारुन कुठल्याही कागदपत्राशिवाय ऊचल स्वरुपात रक्कम दिली जाते व त्याची परतफेड मासिक हप्त्याने कर्मचारी करतात.मात्र एस.टी.कामगार संघटनामध्ये असणारे राजकारण आता छोटीमोठी गरज भागविण्याच्या या  भिशी पध्दतीच्या मुळावर उठले असून  अशा प्रकारे भिशी चालवीणार्‍या काही कर्मचार्‍यांविरोधात थेट परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यापर्यंत तक्रारी गेल्याने ही भिशी चालविणार्‍या व बेकदायदा सावकारी करणार्‍या कर्मचार्‍...

पंढरी वार्ता:- वर्गणी कुणाची अन् कल्याण कुणाचे ? ‘कामगार कल्याण’च्या योजनांपासून असंघटीत कामगार वंचीत !

Image
महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम 1953 अनुसार पंढरपूर शहर व तालुक्यातील दुकाने,व्यवसायीक आस्थापना,संस्था व कारखाने यांच्याकडे कार्यरत असलेल्या कामगारांच्या कल्याणसाठी विविध योजनार राबविण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र कामगार कल्याण विभागाची स्थापना केली.या विभागाकडे नोंदणीकृत असलेल्या आणि नसलेल्या वर नमूद केलेल्या सर्वच आस्थापना मधील नियमीत,हंगामी,कंत्राटी कामगार व त्यांच्या कुटुंबास मदत करता यावी या हेतूने कामगार आणि मालक वर्गंणी आणि शासनाचे अंशदान अशा स्वरुपात निधी उपलब्ध करुन योजना राबविल्या जातात.मात्र पंढरपूर शहर तालुक्यातील खाजगी व्यवसायीक कामगार कल्याणची वर्गणी भरत असतानाही अनेक खाजगी असंघटीत कामगार कामगार कल्याण मंडळाच्या वतीने राबविण्यात येणार्‍या विविध योजनांंपासून वंचीत रहात असल्याचे दिसून येते.विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजयकुमार देशमुख यांच्याकडे कामगार मंत्रीपदाचा जबाबदारी असतानाही खाजगी असंघटीत कामगारांना लाभ मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.       कमागार कल्याण अधिनियम 6 ब नुसार मालक,कामगार आणि शासन हे समान हिश्श्यात ...

पंढरी वार्ता:- दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना 25 टक्के कोटयातून प्रवेश देण्यासाठी 43 शाळांची नोंदणी ! लोटस,सिहगड,शांतीनिकेतन गुरुकुल सह विविध शाळांंमधून लवकरच प्रवेश प्रक्रियेस सुरुवात

Image
विनाअनुदानीत व नामांकित प्राथमिक व माध्यमिक शाळांमधून अर्थिक द्रष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी शासनाच्या आरटीई ऍक्ट अनुसार सोलापूर जिल्ह्यातील 351 शाळांमधून 3697 विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणार्‍या प्रवेश प्रक्रियेच्या पहील्या टप्प्यात शाळांची नोदंणी करण्याची मुदत काल संपली असून राज्यातील इतर जिल्ह्यात या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे वेळापत्रक जाहीर झाले असले तरी शिक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर सोलापूर जिल्ह्यातील प्रवेशासाठीचे वेळापत्रक अजुनही उपलब्ध नसल्याचेच दिसून येत आहे.या प्रवेश प्रक्रियेअर्तंगत पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील लोटस स्कुल,कोर्टी येथील सिहगड स्कुल व शांतीनिकेतन गुरुकूल या सारख्या नामांकीत शाळांबरोबरच 43 शाळांनी आरटीई अर्तंगत दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत प्रवेश देण्याची तयारी दर्शविली आहे.    पंढरपूर तालुक्यात आरटीई अर्तंगत 1) ज्ञानदिप प्रायमरी स्कुल चळे 2) श्री विठ्ठल न्यु इंग्लिश स्कुल पांढरेवाडी 3)अभिजीत इंग्लिश मिडियम स्कूल पंढरपूर 4)शांतीनिकेतन गुरुकूल कोर्टी.5)प्राथमिक विद्यालय पेहे 6)...

सा.पंढरी वार्ता :- लोकमान्य विद्यालयात १३१ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Image
पंढरपुर नगरपरिषद संचलित लोकमान्य विद्यालय पंढरपुर येथे  उमेश परिचारक   ( चेअरमन युटोपियन शूगर लि) यांचे शुभहस्ते संपन्न झाला या कार्यक्रमाच्चा अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ साधनाताई भोसले होते.लोकमान्य विद्दालय एन.सी.सी. विद्यार्थ्यांनी देशभक्ती पर गित सादर केले व नगरपरिषद प्रथमिक शाळा नं ८ व १५ च्चा विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा व गाणी, डांस साधर केले. या प्रसंगी युटोपियन शुगर लि. चे चेअरमन  ऊमेश परिचारक यांनी सांगितले सन १८८७ साली पंढरपूर नगरपरिषदेने मोठ्ठे धाडस करून नगरपरिषद संचलीत माध्यमिक शाळेची सुरवात केली. लोकमान्य विद्यालयाच्चा १३१ व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांनी साधर केलेल्या देशभक्ती पर गित व साधर केलेल्या कलेचे कौतुक त्यांनी केले, युटोपियन शुगर लि. ने स्थापन केलेल्या "कर्मयोगी निकेतन" (पाठखळ) प्रथमिक शाळेचे वैशिष्ट्य त्यांनी सांगितले या शाळेमध्ये आम्ही डिजिटलाईजेशन चा वापर करुन पेपरलेस शाळा आहे. विद्यार्थ्यी कोणतेही वही पुस्तके, जेवनाचा डबा न घेता शाळेत येतात त्यांना व्यगचित्र, पेंटिंग, छोटा भिम, ग्राफिक्स ,झोके , खेळाची ...

सा.पंढरी वार्ता :- रस्ता रुंदीकरणात बाधीत होणार्‍या रस्त्यावरील व्यवसायांचे मुल्यांकन करुन भरपाई द्या ! शिवबुध्द युवाप्रतिष्ठाणचा उपोषणाचा इशारा

Image
भजनदास चौक ते सोलापूर रस्ता रुंदीकरणाच्या कामात बाधीत होणार्‍या जागा मालकांचे व्यवसाय व दुकाने अस्तित्वात असतानाही दुकाने,व्यवसाय उपलब्ध नसल्याचा उल्लेख आवार्डमध्ये करण्यात आला आहे.त्यामुळे नुकसानभरपाई पासून हे दुकानचालक मालक  वंचीत राहणार आहेत.त्यामुळे या रस्त्याचा फेरसर्व्हे करुन येथे सद्यस्थितीत सुरु असलेल्या दुकानांचे मुल्यांकन करण्यात यावे व नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शिवबुध्द प्रतिष्ठाणच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.     या बाबत माहीती देताना प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संदीप मुटकुळे म्हणाले की,भजनदास चौक ते सोलापूर रस्ता या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम लवरकच हाती घेण्यात येणार असून बाधीत होणार्‍या मालमत्ता धारकांना नोटीसाही बजावण्यात आलेल्या आहेत.व नुकसान भरपाईपोटीचे आवार्डही देण्यात आलेले आहेत.यामध्ये या रस्त्यावर बाधीत होणार्‍या मालमत्ता धारकांची दुकाने व विविध व्यवसाय अस्तित्वात असतानाही व त्यांच्याकडे याबाबत शॉप ऍक्ट लायसेन्ससह विविध पुरावे आहेत.व अनेक बँकानी अशा दुकानदारांना व्यवसायासाठी कर्जपुरवठाही केलेला आहे.तरीही   व्यवसायच अस्तित्वात नसल्याचे...

पंढरी वार्ता:- क्रांतीसिंह नाना पाटील चौक ते सरगम चौक रस्त्यावर तातडीने दुभाजक करा ! राष्ट्रवादी कॉग्रेसची निवेदनाद्वारे मागणी

Image
पंढरपूर शहरातील क्रांतीसिंह नाना पाटील चौक ते सरगम चौक हा रस्ता सातत्याने अपघातास कारणीभूत ठरत असून येथील रस्ते अपघातात आतापर्यंत अनेक बळी गेले आहेत.या अतिशय वर्दळीच्या रस्त्यावर तातडीने रस्ता दुभाजक करावेत व वाखरी ते पंढरपूर रस्त्यावरील दोन्ही समांतर रस्त्यावर एकेरी वाहतुक करावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने आज येथील प्रांताधिकारी व तहसिलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.या बाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास राष्टवादी कॉग्रेेसच्या वतीने याच रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मा.आ.दिपकआबा साळुंखे पाटील व जिल्हा कार्याध्यक्ष बळीरामकाका साठे यांच्या आदेशानुसार हे निवेदन देण्यात आले आहे.      या बाबत अधिक माहीती देताना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर भोसले म्हणाले की,या रस्त्यावर सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत.याच रस्त्यावर केबीपी महाविद्यालय,यशवंत विद्यालय आहे.तर विठ्ठल हॉस्पिटल,कृषी उत्पन्न बाजार समिती,तसेच डि.व्ही.पी.स्क्वेअर हे सिनेमागृह असल्याने या रस्त्यावर मोठया प्रमाणात वाहतुकीची...

पंढरी वार्ता:- पंढरपूर शहर युवक कॉग्रेसच्या अध्यक्षपदी अमित डोंबे यांची निवड. मा.केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्याहस्ते निवडीचे पत्र प्रदान

Image
पंढरपूर शहर युवक कॉग्रेसच्या अध्यक्षपदी अमित डोंबे यंाची निवड करण्यात आली असुन मा.केंद्रीय गृहमंत्री व कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांच्याहस्ते त्यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.यावेळी मा.गृहराज्यमंत्री सिध्दराम म्हेत्रे,आ.प्रणितीताई शिंदे,मा.आ.प्रकाश यलगुलवार,सोलापूर शहर कॉगे्रस कमेटीचे अध्यक्ष प्रकाश वाले,चेतन नरोटे,पंढरपूर तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील,शहराध्यक्ष ऍड.राजेश भादुले आदी उपस्थित होते.       सोलापूर जिल्ह्यात कॉग्रेसच्या पुढील वाटचालीबाबत ज्येष्ठ नेते मा.खा.सुशिलकुमार शिंदे यांनी स्वत: लक्ष घातले आहे.यावेळी बोलताना ते म्हणाले की, राज्यात व देशात सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारचा नाकर्तेपणा जनतेसमोर आल्यामुळे भविष्यात सर्वसामान्य जनतेला खर्‍या अर्थाने न्याय मिळवून देणार्‍या कॉग्रेसच्याच हाती जनता सत्ता सोपविणार आहे.मात्र सामान्य जनतेच्या अपेक्षांची पुर्तता करण्यासाठी,त्यांच्या समस्या मांडण्यासाठी आणि वेळप्रसंगी या समस्या सोडविण्यासाठी उग्र आंदोलने करण्याची जबाबदारी युवक कॉग्रेसची आहे.      या निवडीनंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करता...

पंढरी वार्ता:- भाडेकरार नोंदविण्याच्या सक्तीने अनेक जागा मालकांची भाडेकरु लपविण्याची युक्ती निरुपयोगी ठरणार ? नगर पालीकेचा 33 टक्के अतिरिक्त कर भरणार कोण ?

Image
भाडेकराराने राहत असलेल्या व्यक्तींनी महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम 1999 नुसार भाडेकराची नोंदणी करावी, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी केले आहे.नोकरी, व्यवसाय, शिक्षणानिमित्त परराज्यातून, इतर शहरातून, इतर जिल्ह्यातून आलेले लाखो नागरिक भाड्याने वास्तव्यास आहेत. त्यांना महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम 1999 नुसार भाडेकराराची नोंदणी करणे सक्तीचे केले आहे. तसेच नागरिकांनी त्यांच्या दुकान, घर अथवा इमारतीमध्ये ठेवलेल्या भाडेकरुंची संपर्ण माहिती पोलीसांना देणे बंधनकारक केले आहे.पंढरपूर शहरातील मालमत्ताधारकांनी आपल्या जागेत असलेल्या भाडेकरुकडुन भाडयापोटी येणार्‍या उत्पन्नाची माहीती नगर पालीकेच्या मालमत्ता विभागास कळविणे बंधनकारक असून या जागा भाड्यापोटी मिळणार्‍या उत्पन्नावर नगर पालीकेडून अतिरिक्त कर आकारणी केली जाते.काही वेळेस ही करण आकारणी एकुण वार्षिक भाडयाच्या 33 टक्के इतकी आहे.पंढरपूर शहरात अनेक स्थावर मालमत्ता धारकांनी आपल्या अतिरिक्त जागा निवसी किवा व्यवसायीक प्रयोजनसाठी भाडयाने दिलेल्या असून भाडेकरुकडून येणारे उत्पन नगर पालीकेस कळवणीने बंधनकारक आहे.     पंढरप...

पंढरी वार्ता:- स्व.नारायणराव धोत्रे समाजसेवा मंडळाच्या वतीने गजानन महाराज प्रकट दिन साजरा

Image
येथील स्व.नारायराव धोत्रे बहुद्देशीय सभागृहात समाजसेवा मंडळाच्या वतीने संत गजानन महाराज प्रकट दिन उत्सव मोठया भक्तीपुर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.यावेळी पांडुरंग सह.साखर कारखान्याचे चेअरमन मा.आ.सुधाकरपंत परिचारक यांच्याहस्ते संत गजानन महाराजांच्या मुर्तीवर गुलालफुले अर्पण करुन महाआरती करण्यात आली.यावेेळी मा.नगराध्यक्ष दगडू धोत्रे,मा.नगराध्यक्ष वामनतात्या बंदपट्टे,मा.नगराध्यक्ष सतिश मुळे, मा.उपनगराध्यक्ष नागेश भोसले,नगरसेवक संजय निंबाळकर,शंकर देवमारे,विवेक परदेशी,विक्रम शिरसट,धर्मराज घोडके,संजय पाठक,दत्तात्रय धोत्रे ,,सत्यविजय मोहोळकर,पप्पू शिंदे,महेश खिस्ते,प्रविण नागणे यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.        यावेळी मा.आ.सुधाकरपंत परिचारक यांनी संत गजानन महाराज यांच्यावर स्व.नारायणराव धोत्रे यांची अपार श्रध्दा होती.व त्यांनी या उत्सावाला पंढरपूरात सार्वजनिक स्वरुप देण्याचे फार मोठे कार्य केले असल्याचे सांगीतले.या उत्सवाच्या निमित्ताने येथील सभागृहात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.यामहाप्रसादाचा लाभ हजारोच्या संख्येने भाविकांनी घेतला.प्रतीव...

पंढरी वार्ता:-शिवजन्मोत्सव सोहळा 2018 विनावर्गणी विना देणगी साजरा करणार सार्वजनिक मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळा समितीचा निर्णय

Image
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा करताना कुणालाही वर्गणी अथवा देणगी न मागता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याने साजरा करण्याचा निर्णय आज या समितीच्या पंढरीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.   या बैठकीसाठी पंढरपूर शहरात कार्यरत असलेल्या अ.भा.छावा संघटना, अ.भा.मराठा महासंघ,अ.भा.मराठा युवक महासंघ,शिवक्रांती संघटना,संभाजी ब्रिगेड,राष्ट्रवादी कॉग्रेेस पक्ष,कॉग्रेस(आय),छावा क्रांतीवीर सेना,राणे प्रतिष्ठाण,भारतीय जनता पार्टी,मनसे,राजे प्रतिष्ठाण,आधार प्रतिष्ठाण,स्वराज्य प्रतिष्ठाण,अ.भा.नाभिक सेना,बारा बलुतेदार महासंघ,शिवभक्त प्रतिष्ठाण,शिवबा बहुद्देशीय संघटना,वीर शिवा काशिद संघटना,धनगर समाज उन्नती मंडळ,विश्‍वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाण,सह्याद्री प्रतिष्ठाण,शिवबुध्द प्रतिष्ठाण आदी संस्था व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी या बैठकीत सर्वसंमत्तीने हा निर्णय घेण्यात आला.     या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे वैशिष्ठय म्हणजे शिवजन्मोत्सव सोहळा 19 फेब्रुवारी 2018 हा पुर्णपणे विनावर्गणी व विना देणगी अशा स्वरुपाचा साजरा करण्यात येणार असल्याचे य...

पंढरी वार्ता:- नोटरीद्वारे केलेले भाडेकरार अडचणीत ! कायदेशीर कारवाईचे मुंद्रांक जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

Image
जिल्ह्यात अनोंदणीकृत नोटरी करुन केलेल्या भाडेकराची पडताळणी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात भाडेकराराने राहत असलेल्या व्यक्तींनी महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम 1999 नुसार भाडेकराची नोंदणी करावी, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी केले आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये नोकरी, व्यवसाय, शिक्षणानिमित्त परराज्यातून, इतर शहरातून, इतर जिल्ह्यातून आलेले लाखो नागरिक भाड्याने वास्तव्यास आहेत. त्यांना महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम 1999 नुसार भाडेकराराची नोंदणी करणे सक्तीचे केले आहे. तसेच नागरिकांनी त्यांच्या दुकान, घर अथवा इमारतीमध्ये ठेवलेल्या भाडेकरुंची संपर्ण माहिती पोलीसांना देणे बंधनकारक केले आहे. हा भाडेकरार वाहन परवाना, वाहन खरेदीसह अन्य आवश्यक कामांसाठी रहिवासी पुरावा म्हणूनही ग्राह्य धरला जातो. पोलीस  ठाण्यामध्ये पडताळणीसाठी दाखल केलेल्या करारांपैकी केवळ नोंदणीकृत दस्तांवर योग्य मुद्रांक शुल्क लावलेले असते मात्र काही दस्त अनोंदणीकृत, केवळ नोटरी केलेले असतात. त्यामुळे पडताळणी दरम्यान नागरिकांकडे नोंदणीकृत भाडेकरार आणण्याबाबत आग्रह धरण्यात यावा जेणेकरुन शासकीय म...

पंढरी वार्ता:- छावा क्रांतीवीर सेनेच्या युवक जिल्हा उपाध्यक्षपदी प्रदीप जाधव यांची निवड !

Image
छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या युवक जिल्हा उपाध्यक्षपदी मंगळवेढा तालुक्यातील जुनोनी येथील प्रदीप जाधव यांची निवड करण्यात आली आहे.त्यांना या निवडीचे पत्र छावा क्रांतीवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष धनराज लटके यांच्या हस्ते तर छावा क्रांतीवीर सेनेच्या विद्यार्थी विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष महेश कारंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पत्र प्रदान करण्यात आले.     छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून संपुर्ण सोलापूर जिल्ह्यात विविध समााजिक समस्या तसेच समाजाच्या महत्वपुर्ण प्रश्‍नाबाबत आवाज उठविण्याबरोबरच संघर्षही केला जात आहे.या युवक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करीत असताना प्रदीप जाधव हे निश्‍चितच कर्तव्यदक्ष राहून व तत्परतेने कार्य करतील असा विश्‍वास यावेळी जिल्हाध्यक्ष धनराज लटके यांनी व्यक्त केला.        यावेळी रामा कांबळे,औदुंबर अवघडे,औदुंबर निकम,महेश सुडके,निलेश देशमुख,विकास जाधव,सोयद भगवान,रोहीत गायकवाड,प्रसाद पवार यांच्यासह मंगळवेढा तालुक्यातील छावा क्रांतीवीर सेनेच्या युवक विभागाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

पंढरी वार्ता:- रस्ता कॉक्रीटीकरणाचे काम निकृष्ट आणि चुकीच्या पध्दतीने होत असल्याची नगरसेवक घोडके यांची तक्रार ! उपनगरातील नागरिक धुळीला व वारंवार होणार्‍या अपघातांना वैतागले ! तर निकृष्ट काम होत असल्याने संताप

Image
पंढरपूर शहरातील भाई राऊळ पुतळा पदमाती उद्यान ते टाकळी रस्ता या रस्त्याच्या कॉक्रीटीकरणाचे काम हाती घेवून दिड वर्षाचा कालावधी पुर्ण होत आला तरी हे काम ठेकेदाराकडून अतिशय धिम्यागतीने तसेच निकृष्ट पध्दतीने केले जात असून जागोजागी उघडे चेंबर,अपघातास कारणीभूत ठरणारे रस्त्यावर आलेले ड्रेनेज पाईप आणि अनेक दिवस पसरून ठेवलेली घडी यामुळे परिसरातील रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.या रस्ता कॉक्रीटकरणाच्या कामाची सखोल चौकशी होऊन ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागनी नगरसेविका रेणुका धर्मराज घोडके यांनी नगर पालीकेच्या मुख्याधिकार्‍यांकडे केली आहे.              या बाबत अधिक माहीती देताना नगरसेविका रेणूका घोडके म्हणाल्या की,या रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाचे काम सुरुवातीपासूनच चुकीच्या पध्दधतीने केले जात आहे.रस्त्याचे कॉ्रंकीटीकरण केले जात असताना दोन्ही बाजूला अनेक ठिकाणी फुटके पाईप टाकण्यात आले आहेत.तर लेव्हल न काढताच केवळ पाईप पुरण्यात आल्याचाही प्रकार घडला आहे.त्यामुळे भविष्यात या रस्त्यावरील ड्रेनेजलाईन तुंबल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.ह...

पंढरी वार्ता:- पंढरीत आज आणखी एका जुगार अड्डयावर धाड! जिल्हा पोलीस प्रमुखांच्या पथकाची शहरातील दुसरी मोठी कारवाई. 2 लाख 58 हजाराचा मुद्देमाल जप्त

Image
आमच्या हद्दीत कुणीही कारवाई करु शकत नाही या मस्तीत पंढरपूर रेल्वे स्थानकातील पोलीस चौकतीतच चालविला जात असलेल्या जुगार अड्डयावर कालच जिल्हा पोलीस प्रमुखांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने मोठी कारवाई करुन 20 जणांना ताब्यात घेण्याबरोबरच गेल्या कित्येक वर्षापासून उघडपणे चालविला जात असलेला येथील जुगार अड्डा उध्दवस केलेले होता.कालच्या या कारवाई नंतर या विशेष पथकाचे सर्वत्र अभिनंदन केले जात असतानाच आज पुन्हा एका विशेष पथकाने जिल्हा पोलीस अधीक्षक विरेश प्रभू सर यांचेकडे आलेल्या तक्रारीवरून व त्यांच्या आदेशान्वये शनिवार दिनांक 3 फेब्रुवारी 2018 रोजी दुपारी साडेचारच्या येथील आणखी एका जुगार अड्डयावर धाड टाकून या जुगार अड्डयाच्या तीन चालकांसह 13 जणांना ताब्यात घेवून 2 लाख 58 हजारांचा मुद्देमालही जप्त केला आहे.     या बाबत अधिक माहिती अशी की,येथील  गोविंदपुरा भागात एका खोलीत (1) विशाल अशोक करकंबकर, रा. कोळी गल्ली, पंढरपूर (2) विठ्ठल करकंबकर (3) समाधान चंद्रकांत शिंदे, दोघे रा. गोविंदपुरा, पंढरपूर हे चालवत असलेल्या मन्ना नावाच्या जुगार आड्यावर छापा टाकून (1)विशाल अशोक करकंबकर ...

पंढरी वार्ता:- ‘डबल रोल’ मधील फार्मासिस्टवर कारवाईची गरज ! माहीती देण्यास औषध प्रशासनाची टाळाटाळ !

Image
रोगांचे निदान,प्रतिबंध व चिकित्सा यांसाठी औषधिद्रव्यांच्या मात्रा निश्चित करणे, प्रमाणीकरण, विश्लेषण व परीक्षण करणे तसेच योग्य तर्‍हेने साठवण औषधांची ने-आण व औषधांची विक्री यासाठी प्रत्येक औषध विक्री दुकानात फार्मासिस्टच्या उपस्थितीत औषध विक्री करणे बंधनकारक आहे.आणि याबाबतच्या सर्व नियम व अटींची पुर्तता होते की नाही याची तपासणी करण्याचे व कारवाई करण्याचे सर्वस्वी अधिकार औषध प्रशासनाचे आहेत.औषध व सौंदर्यप्रसाधन अधिनियम 1940 नुसार औषध  दुकानाचा परवाना असलेल्या केमिस्ट दुकानात रजिस्टर्ड ङ्गार्मासिस्टची पूर्ण वेळ उपस्थिती बंधनकारक आहे. 8 तासाहून जास्त वेळ सुरु असलेल्या, एका पेक्षा जास्त कौंटर असणार्‍या औषध दुकानांत जादाचे ङ्गार्मासिस्ट नेमणे बंधनकारक आहे. रजिस्टर ङ्गार्मासिस्ट बनायचे असल्यास कमीत कमी डी ङ्गार्म अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे.मात्र अनेक हॉस्पिटल्स व आयसीयु सेंटर तसेच इतरही ठिकानी असलेल्या औषध दुकानांमध्ये फार्मासिस्ट अभावानेच उपस्थित असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले आहे.रुग्णास चुकीचे अथवा डॉक्टरनी दिलेल्या प्रिस्किप्शन मधील औषध बदलून चुकीचे औषध दिले गेल्यास र...