Posts

Showing posts from April, 2018

पंढरी वार्ता:- ग्रामसेवकांसाठी खुशखबर तर ग्रामस्थांची गळचेपी ! आता राष्ट्रीय सणादिवशी ग्रामसभेस परवानगी नाही. ग्रामपंचायतीने ठराव केल्यास ग्रामसभा याच दिवशी घेतली जावी - संजय पाटील घाटणेकर

Image
 राष्ट्रीय सणा दिवशी शासकिय सुटी असल्याने या दिवशी ग्रामसभा न घेण्याची राज्य ग्रामसेवक युनियनने केलेली मागणी राज्य शासनाने मान्य करीत यापुढे गावत या दिवशी ग्रामसभेचे आयोजन करण्यास प्रतिबंध करणारा निर्णय शासनाने घेतला आहे.राष्ट्रीय सणाच्या दिवशी ग्रामसभेत उपस्थित होत असलेल्या विविध वादांच्या विषयामुळे गावातील वातावण कलुषीत होत असल्याने शासनाने हा निर्णय घेतला आहे.त्यामुळे ग्रामसेवकांसाठी ही एक खुशखबर ठरली असली तरी शासनाचा हा निर्णय ग्रामस्थांच्या न्याय्य हक्कावर गदा आणणारा ठरला आहे.    शासनाच्या या निर्णयाबाबत पंढरी वार्ताशी बोलताना बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील-घाटणेकर म्हणाले की,वास्तवीक पाहता राष्ट्रीय सणाच्या दिवशी अतिशय उत्साहाने ग्रामस्थ एकत्र येत असतात व गावच्या विकासाबाबत चर्चा करण्यासाठी उत्सुक असतात.या दिवशी आयोजीत ग्रामसभांमध्ये काहीवेळा वादाचे प्रसंग उदभवतात पण त्याचे प्रमणा अतिशय नगण्य आहे.आणि जर ए खाद्या गावात राजकीय वाद तिव्र असेल तर कुठल्याही दिवशी ग्रामसभा आयोजीत केली तरी वाद हा होत च असतो.मात्र ग्रामसभांकडे सकारात्क द्रष्टीने पा...

पंढरी वार्ता:- पंढरीतील ‘हिस्ट्रीशिटर’च्या मालमत्ता धोक्यात ! पोलीस खात्याच्या अहवालाची प्रतिक्षा तर आयकर विभागाच्या कारवाईचीही शक्यता ?

Image
समतेचा संदेश देणार्‍या संताचे,भाविकांचे माहेरघर म्हणून ओळखल्या गेलेल्या पंढरी नगरीस 1967 साली अस्तित्वात आलेल्या गोल्डन गँग पासून जो गुन्हेगारीचा कलंक लागला तो आजतागायत पुसता आला नाही.1967 पुर्वीचा पंढरपूरचा इतिहास धुंडाळून पाहीला असता पंढरपूरात गुन्हेगारी जगत अस्तित्वातच नव्हते,त्या काळी दादा,नाना,आण्णा,भाऊ अस्तित्वात होते पण ते कुटुंब प्रमुखाप्रमाणे सार्‍या पंढरपूरची काळजी घेत होते इतिहास आहेे.पुर्वी पंढरीच्या राजकारणाची सुत्रे ही या शहराच्या व्यापारी वर्गाच्या हाती होती.बाबुराव म्हमाणे म्हणजे तर या शहराचे चालते-फिरते न्यायालयच होते.ते जो निर्णय देतील तो या शहरात आदराने मान्य केला जात होता.त्यामुळे या शहराच्या राजकारणात कधीही गुंडगीरीस थारा नव्हता.बाबुराव जोशी,बबनराव बडवे,बाबुराव म्हमाणे,शिवप्पा भिंगे,देवदीस भिंगे आदी ज्येष्ठ नेत्यांच्या विचारांवर श्रध्दा ठेवत या शहराची राजकीय वाटचाल होत होती.      पंढरपूरातील प्रख्यात अरुण टॉकीजच्या मालकाचा 1967 मध्ये खुन झाला आणि या शहरास दहशतीच्या वातावरणाचा पही ला  अनुभव आला.या खुन प्रकरणातून पुढे अस्तित्वात आलेल्या गोल्डन गँ...

पंढरी वार्ता:- अखेर पंढरीत कामगार कल्याण मंडळाचे स्वतंत्र कार्यालय सुरु ! आ.भारत भालके यांच्या पाठपुराव्यास यश ! खाजगी कामगारांना मिळणार विविध शासकिय योजनांचा लाभ

Image
 पंढरपूर शहर व तालुक्यातील दुकाने,कारखाने,लघुउद्योग,विविध खाजगी आस्थापना,हॉटेल्स आदी ठिकाणी काम करीत असलेल्या कामगारांना शासनाच्या कामगार कल्याण मंडळाचा लाभ मिळण्यास मोठा अडथळा निर्माण होत होता.या मंडळाचे कार्यालय सोलापूर येथे असल्याने येथील सर्वसामान्य कामगारांना शासनाच्या विविध योजनांची माहीती घेण्यासाठी व अर्ज सादर करण्यासाठी सोलापूर येथील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते.याची दखल घेत आ.भारत भालके यांनी राज्याचे कामगार मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडे पंढरपूर येथे कामगार कल्याण मंडळाचे स्वतंत्र कार्यालय व्हावे अशी मागणी केली होती.व पत्राची दखल घेत ना.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी लवकरच कार्यालय सुरु केले जाईल असे लेखी आश्‍वासन दिले होते.अखेर 1 एप्रिल पासून पंढरीत कामगार कल्याण विभागाने स्वतंत्र कार्यालय सुरु केले आहे. महाराष्ट्र शासनाचे आधिपत्याखाली महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळची स्थापना महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम 1953 नुसार करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील कामगारांच्या सर्वांगिण विकासासाठी मंडळ काम करते.कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी कल्याणकारी यो...

पंढरी वार्ता:- शासकिय कर्मचार्‍याच्या संशयास्पद ‘सचोटी’अहवालाचा शासनादेश बासनात ? अपसंपदा बाबतच्या अनेक प्रकरणात वरिष्ठ अधिकार्‍यांचा अहवालच नसल्याचे उघड.

Image
शासनाच्या सर्वच विभागात मोठया प्रमाणात भ्रष्ट कर्मचारी व अधिकार्‍यांचे लागेबांधे असल्याचे आरोप होत आले असून यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची स्थापना करण्यात आली मात्र या विभागाकडे फारच कमी तक्रारी दाखल होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास वेळोवेळी निदर्शनास आले आहे. एकीकडे विशिष्ट पोस्ट साठी ‘क्रिम पोस्टींग’ च्या नावाखाली कोटीत बोली लावली जात असल्याची चर्चा असतानाच नेमके याच पदावरील अधिकारी अथवा त्यांच्या अधिनस्त कर्मचार्‍यांवर लाचलूचपत अधिकार्‍यांकडून कारवाई होण्याचे प्रमाण नगण्य आहे.लोकप्रतिनिधींकडून या बाबत वारंवार तक्रारी करण्यात येत असल्याने शासनाने सर्वच विभागांना एक परिपत्रक जारी करुन संशयास्पद सचोटी असलेल्या अधिकार्‍यांचा व कर्मचार्‍यांचा गोपनिय अहवाल नियमितपणे पाठविला जावा असे आदेश दिले होते.मात्र शासनाच्या या आदेशाचे पालन करण्याबाबत अनेक शासकिय कार्यालयाच्या जबाबदार अधिकार्‍यांकडून टाळाटाळ केली जात आहे.ज्या अधिकार्‍यांचे चारित्र्य संशयास्पद आहे अपसंपदा अथवा लाचखोरी प्रकरणात ज्या अधिकार्‍यांचा समावेश आहे त्याचा अहवाल तातडीने लाच लुचपत अधिकार्‍यांना पाठविणे बंधनकारक करण्यात आले...

पंढरी वार्ता:- पंढरीतील विकासकामे निकृष्ट दर्जाची ? शहर भाजपाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन ! मुख्यमंत्री दखल घेणार ?

Image
पंढरपूर शहरात 200 कोटी रुपये खर्चुन करण्यात येत असलेली व पुर्णत्वास आलेली विकास कामे निकृष्ट दर्जाची  असून या कामांच्या दर्जाबाबत स्थानिक प्रशासनाकडे वारंवार तक्रार करुनही दखल घेतली जात नाही. अशा आशयाचे पत्र पंढरपूर शहर भाजपाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज सोलापुर येथे देण्यात आले आहे.मात्र या पंढरपूर शहर भाजपाचे अध्यक्ष संजय वाईकर यांनी यापुर्वीही येथील विकास कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याची निवेदने मंत्रालयीन स्तरावर दिलेली आहेत.तरीही ठोस कारवाई झाली नव्हती तेव्हा आता मुख्यमंत्री शहर भाजपाच्या या पत्राची दखल घेणार का? याकडे पंढरपूरकरांचे लक्ष लागले आहे.       विकास कामे चांगल्या दर्जाची, दीर्घकाळ टिकणारी व्हावीत : वाईकर पंढरपूर शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संजय वाईकर यांनी या विकास कामांबाबत मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे. असे म्हटले आहे. दि. 27 एप्रिल रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना वाईकर यांनी त्यांना शहर भाजपाच्या वतीने अध्यक्ष या नात्याने एक पत्र दिले असून त्यात त्यां...

पंढरी वार्ता:- ‘त्या’ वादग्रस्त ठरावामुळे मंदीर समितीवर सोशल मिडीयातून टिकेची झोड ! अनेक नागरिकांकडून दारुबंदीचे समर्थन तर मांस विक्री बंदीस कडाडून विरोध ! वारकरी पाईक संघाने केला खुलासा. दारुबंदीबाबत ठाम तर उंबर्‍याच्या आतील मांसाहारास आक्षेप नाही !

Image
विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीने वारकरी पाईक संघाच्या निवेदनाची दखल घेत पंढरपूर शहरात दारु विक्री बंदी व सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर मांस विक्रीस बंदी करावी असा ठराव मंगळवारी झालेल्या बैठकीत मंजूर करून हा ठराव शासनाकडे पाठीवणार असल्याची घोषणा केली आहे.मात्र समितीने अशा प्रकारचा ठराव केल्याचे वृत्त प्रकाशित होताच पंढरपूरात खळबळ उडाली आहे. मंदीर समितीने आमच्या ताटात पडलेली गाढवे आधी काढावीत नंतर आमच्या ताटात काय आहे याकडे लक्ष द्यावे अशी टिका नेटिझन्स कडून सोशल मिडीयावर होत आहे. मंदीर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी या ठरावाबाबत स्थानिक जनतेमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करणे अपेक्षीत असताना ते याबाबत मौन बाळगून या महत्वपुर्ण ठरावाचे खापर दुसर्‍या कुणाच्या तरी माथ्यावर फोडू पहात आहेत अशीही चर्चा सद्या शहरात सुरु आहे व त्यामुळेच समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर हे प्रसार माध्यमांसमोर या ठरावाचे समर्थन करीत असताना मंदीर समितीचे अध्यक्ष या ठरावाबाबत चकार शब्द बोलत नाहीत अशा प्रतिक्रिया मांसविक्रीस कडाडून विरोध करणारे स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत.    दरम्यान आज वारकरी पाईक ...

पंढरी वार्ता:- 40 च्या पुढे पारा..अन् तळपत्या उन्हाच्या झळा अन् अनवानी भाविकांची घोटभर पाण्यासाठी तळमळ ! दर्शन रांगेवरील आच्छादन गायब !

Image
शिर्डी संस्थान आणि तिरुपती संस्थानच्या धर्तीवर पंढरीत येणार्‍या भाविकांना सुविधा देण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदीर समिती सज्ज असल्याचा दावा मंदीर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांच्याकडून वारंवार केला जात असतानाच आज मोहीनी एकादशी निमित्त श्री विठ्ठलाच्या दर्शन रांगेत तळपत्या उन्हात थांबलेले अबालवृध्द भाविक उन्हाच्या झळांनी असहाय्य होऊन घोटभर पाणी कुठे मिळते का याचा शोध घेत असल्याचे दृष्य सारडा भवन ते कासार घाट परिसरात असलेल्या दर्शन रांगेत पहावयास मिळाले आहे.येथील दर्शन रांगेवर आच्छादन नसल्याने तळपत्या उन्हात दर्शनासाठी अनवानी पायाने थांबलेले भाविक प्रचंड नाराजी व्यक्त करीत होते.             आज मोहीनी एकादशी निमित्त पंढरीत जवळपास पन्नास हजार भाविक दाखल झाले आहेत.त्याच बरोबर उन्हाळ्याच्या सुट्टया असल्याने भाविकांच्या गर्दीत मोठी वाढ झाली आहे.दर महिन्याच्या प्रत्येक शुध्द एकादशीस भाविकांची दर्शन रांग धोंडोपंतदादा मठापर्यंत जाते याचा मंदीर समिती प्रशासनास अनुभव असतानाही भाविकांना आज त्रास सहन करावा लागला आहे.

पंढरीवार्ता: ग्रामसेवक आनंदा मुंढे याच्यावर राजेंद्र भारुड यांच्याकडून निलंबनाची कारवाई ! ग्रामसेवकांच्या मनामानीबाबत जि.प.सदस्यांनी केली होती तक्रार

Image
एकीकडे आपल्या कर्तव्यकठोर भुमिकेमुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड हे केंद्रकर साहेबांच्या कार्यपध्दतीचे आठवण करुन देत जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करीत असतानाच व कर्तव्यच्युत कर्मचार्‍यांवर राजकीय दबाव झुगारुन कारवाई करीत असतानाच विधान परिषदेचे आमदार ऍड.रामहरी रुपनर यांनी हक्कभंगाचा इशारा दिल्यामुळे सद्या जिल्ह्यात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड यांनी आपल्या कर्तव्यात हलगर्जीपणा करणार्‍या व अपहाराचा व गैरव्यवहाराचा आरोप असणार्‍या तीन ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई केली आहे.राजेंद्र भारुड यांनी अपहार,कामात अनियमीतपणा आदी तक्रारींची दखल घेत तिसंगीचे तात्कालीन ग्रामसेवक आनंदा मुंढे यांच्यावर निलंबणाची कारवाई केली आहे.मात्र यापुर्वी सोलपूर जिल्हयात जेव्हा जेव्हा ग्रामसेवकांवर जि.प.च्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून कारवाई करण्यात आली तेव्हा तेव्हा ग्रामसेवक संघटनांच्या माध्यामातून अधिकार्‍यांवर निलंबन मागे घेण्यासाठी दबाव आणण्यात आल्याचे दिसून  आले आहे.त्यामुळे या निलंबन प्रकरणात पंढरपूर ...

पंढरीवार्ता: व्होळे येथे समता पंधरवढा उत्साहात साजरा डॉ.बाबासाहेबांमुळेच या खुर्चीवर बसू शकले- शिलाताई शिवशरण(सभापती-समाजकल्याण विभाग जि.प.सोलापूर)

Image
व्होळे येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समता पंधरवढा साजरा करण्यात आला.सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून समता पंढरवढा साजरा करण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील व्होळे या गावाची विशेष निवड करण्यात आली होती.या कार्यक्रमास जि.प.समाकल्याण विभागाच्या सभापती शिलाताई शिवशरण,पंढरपूर पंचायत समितीचे सभापती दिनकर नाईकनवरे,जि.प.सदस्य अतूल खरात,तानाजी वाघमोडे,पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील,सत्यवान देवकुळे,गटविकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे,विस्तार अधिकारी श्री साखरे आदीं प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.               यावेळी बोलताना जि.प.समाजकल्याण समितीच्या सभापती शिलाताई शिवशरण म्हणाल्या की डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वसामान्य वर्गास न्याय मिळावा,महिलांना सार्वजनिक जिवनात सन्मान मिळावा म्हणून घेतलेल्या परिश्रमामुळेच माझ्यासा            या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक संतोष गायकवाड यांनी केले तर शेवटी आभार वि...

पंढरीवार्ता: ‘घटनेच्या’ तरतुदीकडे धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे ‘अर्थपुर्ण’ दुर्लक्ष ! विश्‍वस्त मंडळाची मुदत पुर्ण झालेल्या पंढरीतील अनेक संस्थाना धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे अभय ?

Image
धर्मदाय संस्थांमधील वाढत्या भ्रष्टटाराबाबत व संस्थेच्या स्थापनेचा मुळ उद्देश प्रतीत करणार्‍या संस्थेच्या घटनला तिलांजली देत संस्थेच्या मुळ उद्देशालाच हरताळ फासण्याचा प्रकार महाराष्ट्रातील धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणीकृत असलेल्या हजारो संस्थाकडून  घडत आहे.गतवर्षी राज्यातील 1 लाख 30 हजार संस्थांना धर्मादाय आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली असून तब्बल 60 हजार संस्थांची नोंदणीच रद्द करण्यात आली आहे. नोंदणी रद्द केलेल्या संस्था महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त कायद्यांचे उल्लंघन करत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.सार्वजनिक विश्वस्त कायद्यांतर्गत राज्यात सुमारे 8 लाख संस्थांची नोंदणी झालेली आहे. यातील 3 लाख 95 हजार 308 संस्था अस्तित्वात असल्या तरी त्या सक्रीय नाहीत. धर्मादाय आयुक्तांनी गेल्या गतवर्षी  नियमांची पूर्तता न करणार्‍या ट्रस्टचा आढावा घेतला होता. संस्थेची नोंदणी केल्यानंतर विश्वस्तांची यादी तसेच संस्थेचे उद्देश आणि तो पार पुर्ण करण्यासाठी संस्थेची घटना(स्किम)आदी इत्यंभूत माहिती देणे बंधनकारक असते. तसेच प्रतिवर्षी ठरावीक कालमर्यादेत संस्थेचे ऑडीट रिपोर्ट देखील धर्...

पंढरीवार्ता: राष्ट्रवादीकडून मंदीर समितीच्या ‘चेंजिंग रुम’चे स्वागत मात्र दर्जाबाबत नाराजी ! टिकावू स्वरुपाच्या फॅब्रीकेटेड चेंजिंग रुम बसविण्याची मागणी करणार - मंदाताई काळे

Image
चंद्रभागेत स्नानासाठी आलेल्या महिला भाविकांना कपडे बदलण्यासाठी ‘चेंजिंग रुम’ची सोय करण्यात यावी यासाठी पंढरपूर शहर राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना निवेदन देण्यात आले होते.या निवेदनाची दखल घेवून मंदीर समितीने मुंबई येथील एका कंपनीकडून सेवभावी हेतूने मंदीर समितीस चेंजिंग रुम उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.याचे उदघाटन आज मंदीर समितीचे अध्यक्ष अतूल भोसले यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी मंदीर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर,सदस्य,ह.भ.प.माउली महाराज जळगावरकर,प्रांताधिकारी सचिन ढोले व आदींसह राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या जिल्हाध्यक्षा मंदा काळे,निरिक्षक निर्मला बावीकर,साधना राउत,शहराध्यक्षा रंजना हजारे,तालुकाध्यक्षा अनिता पवार,युवती अध्यक्षा चारुशिला कुलकर्णीॅ,हेमलता पांढरमीसे,शहराध्यक्ष सुधीर भोसले,जिल्हा सरचिटणीस दिगंबर सुडके,रा.विद्यार्थी कॉग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संकेत ढवळे,राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गुरुराज अभंगराव,सचिव विजय काळे,अल्पसंख्याक विभाग प्रमुख गुलाब मुलाणी,सुरज पेंडाल,सरचिटणीस पांडुरंग पुणेकर उपस्थित होते. ...

पंढरीवार्ता: तिर्थक्षेत्र पंढरीतील दारुबंदीबाबत आता मंदीर समिती ठराव करणार ? समिती सदस्य आणि सल्लागार मंडळात वारकरी प्रतिनिधींचे वर्चस्व असल्याने अपेक्षा -ह.भ.प.राणा महाराज वासकर मंदीर समितीचे अध्यक्ष अतूल भोसले यांनी पुढाकार घेण्याची गरज.

Image
पंढरीसी जारे आल्याने संसारा । दिनाचा सोयरा पांडुरंग ॥ असे वर्णन आपल्या अभंगातून संतानी केले आहे.या वारकरी संत परंंपरचे पाईक असलेले कोटयावधी भाविक वर्षाकाठी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीत येत असतात.पंढरपूर हे भाविकांचे माहेर असल्याने येथे आल्यानंतर येथील प्रसन्न वातावरणात सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर जेव्हा या शहरात फेरफटका मारावयास लागतो तेव्हा मात्र येथे आलेल्या भाविकांचा पुरता भ्रमनिरास होताना दिसून येतो.रस्त्यावर जागोजागी असलेले मांसाहारी पदार्थ विक्रीच्या गाडयाशेजारीच दारुच्या बाटल्या रिकामे करत बसलेले युवक,शहरात अवैध रित्या होत असलेली दारु विक्री आणि चंद्रभागेच्या वाळवंटासह  65 एकर परिसर व शहरातील विविध मैदाने,मोकळ्या जागा या ठिकाणी दारु पित बसलेले टोळके हे द्रश्य येथे नित्याचे झाले आहे.विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीच्या अध्यक्षपदाची धुरा यापुर्वी वै.ह.भ.प.विवेकानंद महाराज वासकर यांनी सांभालळी होती.त्यावेळी त्यांनी पंढरपूर शहरात दारुबंदी व मांसविक्रीबंदी झाली पाहीजे अशी मागणी करीत आंदोलनही केले होते.मात्र पुढे मंदीर समितीवर राजकीय मंडळींचीच वर्णी लागल्याने हा विषय मागे पडल...

पंढरीवार्ता: मंदीर समितीच्या टेंडरनंतर वारकरी साहित्य परिषदेची पंढरीतील स्वच्छता सेवा थंडावली. साहित्य परिषदेच्या सेवकांचा पंढरीत सत्कार.

Image
वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने गेल्या दोन महिन्यापुर्वी सुरु करण्यात आलेली स्वच्छता सेवा आता थांबविण्यात आली असून मंदीर परिसर,प्रदक्षिणा रस्ता,वाळवंट आदी भागातील स्वच्छतेच्या कामासाठी मंदीर समितीने निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर 15 एप्रिल पासून सदर ठेकेदाराकडून या परिसराची स्वच्छता केली जात आहे.त्यामुळे साहित्य परिषदेच्या वतीने शहरातील इतर प्रमुख मठ,मंदीरे व बस्थानक परिसरात मोफत स्वच्छता केली जाईल अशी माहीती साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिली होती.मात्र या परिसरात नगर पालीकेचे कर्मचारी स्वच्छता करीत आहेत तर बसस्थानक परिसराच्या स्वच्छतेसाठी ठेकेदाराची नियुक्ती यापुर्वीच करण्यात आली आहे.त्यामुळे वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने करण्यात येणारी स्वच्छतासेवा सद्या तरी थंडावली आहे.         वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने करण्यात येत असलेल्या स्वच्छता सेवेत सहभागी झालेल्या सफाई कर्मचार्‍यांचा नगरसेवक महादेव भालेराव यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.यावेळी नगरसेवक महादेव धोत्रे,नगरसेवक डि.राज सर्वगोड,मा.नगरसेवक महेश साठे,सुनिल वाघमारे,श्री हजारे आदी उपस...

पंढरीवार्ता: Rte ऍडमिशनच्या पहील्याच फेरीत 58 पैकी 14 शाळांमध्ये केवळ 41 विद्यार्थ्यांना प्रवेश ! 461 पैकी 420 जागा रिक्त,दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबत अनेक शाळा उदासीन वाखरीच्या त्या बडया शिक्षण संस्थेस नोटीस.

Image
शिक्षण हक्क कायद्यानुसार पंढरपूर शहर व तालुक्यातील 58 शाळांची नोंदणी करण्यात आली होती.मात्र पहील्या फेरीअखेर 461 पैकी केवळ 41 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला असून 420 जागा अजुनही रिक्त आहेत.तर वाखरी येथील एका बडया शिक्षण संस्थेस शिक्षण हक्क कायद्याचा भंग करीत असल्याबाबतची नोटीस काढण्यात आली आहे.अर्थिक द्रष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खाजगी बडया शिक्षण संस्थांमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे.व शासनाच्या नियमाप्रमाणे या जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवीण्यात येत आहे.याचा पहीला टप्पा नुकताच पुर्ण झाला असून यामध्ये केवळ 41 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.एकीकडे याच खाजगी शाळांंमध्ये आपल्या पाल्यास प्रवेश मिळावा म्हणून खुल्या प्रवर्गातील प्रवेशअर्जासाठी पहाटेपासून पालक रांगा लावून थांबत असल्याचे दिसून आले होते.असे असताना याच शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेश देताना मात्र ही प्रवेश प्रक्रिया इतकी रेंगाळण्यामागचे गौडबंगाल काय ? असाच प्रश्‍न आता पालकवर्गाकडून विचारला जात आहे.                 शिक्षण ह्क्क कायद्...

पंढरीवार्ता: अन्न व औषध प्रशासनाचे‘तडजोडीत’ समाधान ? 12 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीचे नमुने तडजोड अधिकार्‍यांच्या स्वाधीन ! दंडाच्या इष्टांकपुर्तीसाठी सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळ ?

Image
भेसळयुक्त अन्न आणि औषधींविषयीच्या तक्रारींची दखल घेत प्रशासनाने गेल्या वर्षभरात लक्षणीय कारवाई केली. यात निकृष्ट अन्नपदार्थ, उघड्यावर होत असलेली अन्नपदार्थांची विक्री व अन्नभेसळीबाबतचे प्राप्त दुषीत नमुने तसेच गुटखा व प्रतिबंधीत अमली पदार्थ विक्रीबाबत कठोर कारवाई करुन सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळाणार्‍या व्यवसायीकांवर कारवाई होणे अपेक्षीत असताना अन्न विभागाच्या अधिकार्‍यांनी अशा कारवाईत प्राप्त झालेल्या दंडाच्या आकडेवारीची टिमकी बजावत आपली पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न केला  आहे. यात सर्वात संतापजनक बाब म्हणजे ज्या कारवाईत 12 लाख रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्यांचे भेसळयुक्त नमुने तडजोड अधिकार्‍यांकडे पाठवण्याचा या विभागाचा निर्णय अनैतीक असल्याचीच भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.             वास्तवीक पाहता भेसळयुक्त पदार्थ विक्रीचे रॅकेट शहरी भागापेक्षा ग्रामिण भागात मोठया प्रमाणात आढळून येते.सोलापूर जिल्हयात तिर्थक्षेत्र म्हणून पंढरपूर शहरात भाविकांची मोठी वर्दळ असते.तर याठिकाणी भरणार्‍या चार प्रमुख यात्रा कालावधीत तसेेच इतर वेळीही ये...

पंढरी वार्ता :- गोपाळपूरच्या उपसरपंचपदी उज्वला अरुण बनसोडे यांची बिनविरोध निवड. मा.आ.सुधाकरपंत परिचारक यांच्याहस्ते सत्कार

Image
गोपाळपूरच्या उपसरपंचपदी गोपाळकृष्ण ग्रामविकास आघाडीच्या ग्रा.प.सदस्या उज्वला अरुण बनसोडे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.उपसरपंच रेश्मा राजू लेंगरे यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने सदर जागा रिक्त झाली होती.या रिक्त जागेसाठी शनिवार दिनांक 21 एप्रिल रोजी निवडणुक प्रक्रिया पार पडली.या वेळी उपसरपंचपदासाठी उज्वला अरुण बनसोडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी  श्री भडंगे यांनी ही निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.या वेळी सहा.निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेविका ज्योती पाटील काम पाहीले.              या निवडीनंतर नुतन उपसरपंच उज्वला अरुण बनसोडे यांचा पांडुरंग सह.साखर कारखान्याचे चेअरमन सुधाकरपंत परिचारक यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी जेष्ठ नेते दिलीप गुरव,आघाडीचे अध्यक्ष प्रा.सुभाष मस्के,माणिक सावंत,राजेंद्र लेंगरे,दत्तात्रय गुरव,नामदेव लांबतुरे,अरुण बनसोडे,विठ्ठल जगताप,उमेश अधटराव,सुहास पाटील,रगुनाथ पवार,सतिश लेंगरे,अमोल सलगर,ज्ञानेश्‍वर मस्के,राजू पिसे,गोपाळ लेंंगरे,पंकज लांबतुरे यांच्यासह गोपाळपूर ग्रामपं...

पंढरी वार्ता :- असिफाला न्याय मिळवून देण्यासाठी हजारोंच्या संख्येने पंढरपूरकर रस्त्यावर . मूक मोर्चाद्वारे दिले विविध मागण्यांचे निवेदन.

Image
जम्मू काश्मीरच्या कथुआ मध्ये आसिफा नामक 8 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून हत्या केली होती. या घृणास्पद घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी पंढरपूर शहरातील सामाजिक संघटनांनी व नागरिकांनी हजारोंच्या संख्येने सहभागी होत आज मुक मोर्चाद्वारे येथील तहसिल कार्यालयावर जावून निवेदन दिले.या मुक मोर्चात आ.भारत भालके,आ.प्रशांत परिचारक यांच्यासह सर्व नगरसेवक,विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी व सर्वच जातीधर्माचे नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.हा मुक मोर्चा तहसिल कार्यालयावर आल्यानंतर नायब तहसिलदार तिटकारे यांनी निवेदन स्विकारले.    जम्मू काश्मीर, उत्तरप्रदेश, गुजरात येथे झालेल्या बलात्काराच्या घटनांचा या बैठकीत निषेध करण्यात आला.या घटनांमधील सर्व आरोपींना फॅस्ट ट्रॅक कोर्टात घडला चालवून तात्काळ ाफाशीची शिक्षा देण्यात यावी भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून बलात्कार व हत्या प्रकरणांच्या सुणावणीसाठी स्वतंत्र न्यायलय असावेत व एक महिन्यात या घटल्याची सुनावणी पुर्ण करुन शिक्षा देण्याचा कयादा करावा आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

पंढरी वार्ता :- खाजगी कोचींग क्लासेसच्या मनमानीमुळे पालकवर्गामध्ये प्रचंड नाराजी! पंढरीतील अनेक मठांसाठी क्लासचालकांकडून वर्षासाठी लाखोंची बोली. नगर पालीकेच्या असेसमेंट रेकॉर्डमध्ये क्लासचालकांच्या भाडेकराराची नोंदच नसल्याने लाखो रुपयांची टॅक्स चोरी ?

Image
एका क्लासमध्ये शोकडो विद्यार्थी कोंबले जातात,पाच ते 25 हजारांपर्यंत फी आकारली जाते,हुशार परंतू अर्थिक द्रष्टया दुर्बल विद्यार्थ्यांना कुठलीही सवलत दिली जात नाही,क्लासचालकांडून पार्कींगची व्यवस्था केली जात नाही,अनेक क्लासचालकांनी नेमलेल्या पगारी शिक्षकांची आवश्यक शैक्षणिक पात्रता नसते.एकावेळी एका वर्गातील विद्यार्थीसंख्या निश्‍चित करुन त्याचे काटोकोर पालन केले जावे.प्रतिविद्यार्थी खाजगी शिकवणीची फी पाच हजार रुपयापेक्षा अधिक असू नये यासह शिक्षण हक्क कायद्याअर्तंगत खाजगी क्लास चालकांची नोंदणी करुन त्यामध्ये अर्थिक द्रष्टया दुर्बल घटकांना संधी दिली जावी अशी मागणी पालकवर्गांकडून होत असून खाजगी क्लासेसच्या मनमानी विरोधात प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.व या साठी शासनाने प्रस्तावित खाजगी क्लास चालकांबाबतच्या नियमवालीची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा पालक वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. खाजगी क्लासेसच्या माध्यमातून राज्यात बर्‍याच ठिकाणी विद्यार्थ्यांची फसवणूक होत असते. तसेच खाजगी क्लासेसमुळे शाळेचे महत्व दिवसेंदिवस कमी होत आहे.राज्याच्या शिक्षण खात्याने खाजगी क्लासेसवर निर्बंध घालण्य...

पंढरी वार्ता :- ‘सिहगड’च्या व्यवस्थापनास शेकडो पालकांच्या सह्यांचे निवेदन ! अन्यायी फी वाढ,शिक्षणाचा ढासळलेला दर्जा यासह अनेक तक्रारींचा पाढा वाचत पालकानी दिला उग्र आंदोलनाचा इशारा ! आदर ऍक्टिीव्हीटीच्या नावाखाली घेतले जाणारे साडेसहा हजार खर्च होतात तरी कशासाठी ?

Image
कोर्टी रस्त्यावरील सिंहगड विद्यालयाच्या मनमानी कारभाविरोधात संघटीत झालेल्या पंढरपूर शहर व तालुक्याती पालकांनी एकत्र येत पालक समितीच्या माध्यमातून आज ‘सिहगड’च्या व्यवस्थापनास निवेदन देवून आपल्या तक्रारींचा पाढा वाचला असून यामध्ये शाळेने पालकांना विश्‍वासात न घेता अचानकपणे व अन्यायीपणे केलेली फी वाढ,येथे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा दर्जा वरचेवर ढासळत चालला आहे,शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांच्या शारीरीक तपासणीसाठी पुर्णवेळ वैद्यकिय अधिकार्‍याची नियुक्ती करावी,सीबीएसई अभ्यासक्रमाची माहीती प्रथम शिक्षकांनाच आहे का याची खात्री करुन आदी या शिक्षकांना प्रशिक्षीत करावे,क्रिडा शिक्षणावर शाळेने लक्ष द्यावे,एनसीईआरटीचीच अभ्यासक्रमाची पुस्तके वापरावीत,शाळेतूनच वह्या/ पुस्तके घ्यावी लागतात मात्र त्याच्या किमती भरमसाठ ठेवल्या आहेत त्याऐवजी छापील किमतीनुसारच पुस्तके/वह्या उपलब्ध कराव्यात.विद्यार्थ्यांना शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आरओ सिस्टीम उपलब्ध करावी,आरटीओ नियमाप्रमाणेच स्कुलबस मध्ये विद्यार्थी ने-आण केली जावी,आदर ऍक्टीवीटीच्या नावाखाली घेण्यात येणारी साडेसहा हजारांची र...

पंढरी वार्ता :- पंढरीत शनिवारी सर्व सामाजिक संघटनांचा भव्य मुक मोर्चा. बलात्कार व हत्याप्रकरणातील आरोपींना तात्काळ फासावर चढविण्याची मागणी

Image
जम्मू काश्मीरच्या कथुआ मध्ये आसिफा नामक 8 वर्षाच्या चिमुकली वर बलात्कार करून हत्या केली होती. या घृणास्पद घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी पंढरपूर शहरातील सामाजिक संघटनांनी शनिवार 21 एप्रिल रोजी मुक मोर्चाचे आयोजन केले आहे. जम्मू काश्मीर, उत्तरप्रदेश, गुजरात येथे झालेल्या बलात्काराच्या घटनांचा या बैठकीत निषेध करण्यात आला.या घटनांमधील सर्व आरोपींना फॅस्ट ट्रॅक कोर्टात घडला चालवून तात्काळ ाफाशीची शिक्षा देण्यात यावी भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून बलात्कार व हत्या प्रकरणांच्या सुणावणीसाठी स्वतंत्र न्यायलय असावेत व एक महिन्यात या घटल्याची सुनावणी पुर्ण करुन शिक्षा देण्याचा कयादा करावा आदी मागण्या या मुक मोर्चाद्वारे करण्यात येणार आहेत. या मुक मोर्चात शहर व तालुक्यातीळ मुस्लिम समाज बांधवांसह विविध सामाजिक व पक्ष संघटना,सर्व जाती धर्माचे नागरिक सहभागी होणार आहेत. छत्रपती शिवाजी चौक येथून सकाळी ठिक 9 वाजता या मुकमोर्चाची सुरुवात होणार असून तहसील कार्यालय येथे निवेदन देवून या मोर्चाची समाप्ती होणार आहे.    या मोर्चाच्या आयोजनाबाबत नुकत्याच झाले...

पंढरी वार्ता :- गजानन महाराज संस्थेविरोधातील एल्गार सभेस शेगावकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद ! श्रध्देच्या नावाखालील दुकानदारी थांबविण्याच्या मागणीसाठी स्थानिक नागरिक संघटीत

Image
शेगाव येथील गजानन महाराज संस्थान हे केवळ अर्थिक हित डोळ्यासमोर ठेवून कार्यरत आहे.या संस्थानाला स्थानिक जनतेच्या हिताशी काहीही देणे घेणे नाही त्यामुळे या संस्थेच्या विरोधात शेगाव येथील जनभावना प्रक्षुब्ध असतानाच या संस्थेच्या कारभाराबाबत जनजागृती व स्थानिक जनतेच्या भावनेस वाट मोकळी करुन देण्यासाठी शेगाव येथे आयोजीत सभेस हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून या संस्थेच्या लोकहितविरोधी व केवळ अर्थकारण डोळ्यासमोर ठेवून करण्यात येत असलेल्या कारभाराबाबत आपली प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.          भक्तांच्या सोयीसाठी शासनाने विकास आराखडा आणून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक शेगांव शहरामध्ये केली, पर्यटन वाढून स्थानिक रोजगार निर्माण व्हावा हा उद्देश त्यामागे होता.मात्र गजानन महाराज संस्थान हे केवळ अर्थिक फायदाच डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करीत आहे.येथे या संस्थानने ज्या काही सुविधा व विकास केला आहे तो केवळ अधिक अर्थिक फायदा डोळ्यासमोर ठेवूनच केला आहे अशी टिका यासभेत करण्यात आली.कोटयावधी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेला मुख्य दरवाजा बंद असल्याने या मंदीर परिसरातील नागरिकांच्या पोटा...

पंढरी वार्ता :- ‘त्या’ बातमीमुळे नदीकाठच्या शेतकर्‍यांच्या उरात धडकी ! सोलापूरसाठी ‘अमृत’ आमच्यावरील ‘विषप्रयोग’ ठरू नये ! नदीकाठच्या शेतकर्‍यांकडून व्यक्त होत आहेत प्रतिक्रिया .

Image
सोलापुर शहरास पाणी पुरवठा करण्यासाठी उजनी धरणातून मोठया प्रमाणात पाणी सोडावे लागत होते. या शहराची वर्षाची पाण्याची गरज केवळ तीन टिएमसी असताना नदीवाटे पाणी पाणी सोडून औज,टाकळी व हिळ्ळी बंधारा भरुन घ्यावा लागत होता.हा पाण्याचा अपव्यय(?) टाळण्यासाठी अनेक स्वयंघोषीत पर्यावरण प्रेेमी व जलतज्ञ सोलापूरसाठी दुहेरी पाईपलाईन झाल्यास शहरास थेट उजनी धरणातून आवश्यक तेव्हा आवश्यक तेवढे पाणी उचला येईल त्यामुळे या योजनेस तातडीने मंजूरी मिळावी व हे काम गतीने पुर्ण व्हावे अशी मागणी करीत होते.अखेर मुख्यमंत्र्यानी या मागणीची दखल घेत उजनी धरण ते सोलापूर शहर या दुसर्‍या अधिक व्यासाच्या पाईपलाईनला मंजूरी दिली असून यासाठी तातडीने पहील्या टप्प्यासाठी 439 कोटींचा निधीही मंजूर केला आहे.           केवळ सोलापूर शहराची नाही तर संपुर्ण जिल्हयाची शेतीची व पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी उजनी धरणाची निर्मिती करण्यात आली.या धरणासाठी सोलापूर शहरातील कुणालाही आपली एक गुंठाही जागाही द्यावी लागली नाही.मात्र त्याच वेळी सोलापूर जिल्ह्यातील हजारो शेतकर्‍यांच्या जमीनी सिलींगच्या नावाखाली संपादी...

पंढरी वार्ता :- वडार समाजाच्या मागणीची आ.भारत भालकेंकडून दखल ! महावीर नगर येथे मेडिटेशन हॉलसाठी आ.भालकेंकडून 10 लाखांचा निधी !

Image
पंढरपूर शहरातील महावीर नगर येथील सि.स.नं.4075/1 अ/1 येथे मेडिटेशन हॉलसाठी आ.भारत भालके यांनी आमदार निधीतून 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावपत्र आज वडार समाजातील आजीमाजी नगरसेवक व जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.या बाबत वडार समाजाकडून सातत्याने पाठपुरावा केला जात होता.आता याबाबत वडार समाजातील वरील सर्व नेतेमंडळी आ.प्रशांत परिचारक यांच्याकडेही पाठपुरावा करणार असून त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.            यावेळी वडार समाजातील आजी-माजी नगरसेवक व ज्येष्ठ नेते व समाजबांधव उपस्थित होते.

तहसिल आणि तलाठी कार्यालयांतील तो गुप्तहेर कोण ? पंढरपूर शहर व तालुक्यात रंगतदार चर्चा ! वाळुमाफीयांच्या हेरागीरीला समांतर यंत्रणा ?

Image
राज्यातील सर्वच महसूल अधिकारी,कर्मचारी व कार्यालये येथे भ्रष्टाचारावर नजर ठेवण्यासाठी खाजगी गुप्तहेरांची नेमणुक करण्यात आल्याची माहीती राज्याचे महसूलमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच नाशिक येथे एका कार्यक्रमात बोलताना दिली आहे.व या गुप्तहेरांचे काम सुरु झाले असून ते थेट स्थानिक पोलीसांनाच भ्रष्टाचार सरु असलेल्या ठिकाणाबाबत ब्रिफींग देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असल्याने राज्यातील महसुल खात्याच्या अनेक भ्रष्ट अधिकार्‍यांचे      धाबे दणाणले असतानाच हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर पंढरपूर शहर व तालुक्यात नागरिकांमधून समाधान व्यक्त होण्याबरोबरच येथील तहसिल कार्यालय व विविध मंडलअधिकारी /तलाठी कार्यलय परिसरात वावरणारा ‘तो’गुप्तहेर कोण याबाबत मोठी उत्सुकता व्यक्त होत आहे.        पंढरपूर तालुक्यात वाळुमाफीयांचे फार मोठे प्रस्थ असून पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले व  उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पिंगळे हे याबाबत ठोस कारवाई करण्यासाठी सज्ज असले तरी अनेकवेळा रात्री अपरात्री वाळू चोरांवर कारवाईसाठी अधिकार्‍यांची गाडी बाहेर पडली की थेट वाळूचोरांना खब...

पंढरी वार्ता :- तहसिल आणि तलाठी कार्यालयांतील तो गुप्तहेर कोण ? पंढरपूर शहर व तालुक्यात रंगतदार चर्चा ! वाळुमाफीयांच्या हेरागीरीला समांतर यंत्रणा ?

Image
राज्यातील सर्वच महसूल अधिकारी,कर्मचारी व कार्यालये येथे भ्रष्टाचारावर नजर ठेवण्यासाठी खाजगी गुप्तहेरांची नेमणुक करण्यात आल्याची माहीती राज्याचे महसूलमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच नाशिक येथे एका कार्यक्रमात बोलताना दिली आहे.व या गुप्तहेरांचे काम सुरु झाले असून ते थेट स्थानिक पोलीसांनाच भ्रष्टाचार सरु असलेल्या ठिकाणाबाबत ब्रिफींग देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असल्याने राज्यातील महसुल खात्याच्या अनेक भ्रष्ट अधिकार्‍यांचे      धाबे दणाणले असतानाच हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर पंढरपूर शहर व तालुक्यात नागरिकांमधून समाधान व्यक्त होण्याबरोबरच येथील तहसिल कार्यालय व विविध मंडलअधिकारी /तलाठी कार्यलय परिसरात वावरणारा ‘तो’गुप्तहेर कोण याबाबत मोठी उत्सुकता व्यक्त होत आहे.        पंढरपूर तालुक्यात वाळुमाफीयांचे फार मोठे प्रस्थ असून पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले व  उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पिंगळे हे याबाबत ठोस कारवाई करण्यासाठी सज्ज असले तरी अनेकवेळा रात्री अपरात्री वाळू चोरांवर कारवाईसाठी अधिकार्‍यांची गाडी बाहेर पडली की थेट वाळूचोरांना खब...

पंढरी वार्ता :- स्वच्छता उपक्रमाबद्दल राष्ट्रवादी ओबीसी सेल कडून मंदीर समितीचे आभार ! समितीच्या चांगल्या कामास जनसामान्यांचा पाठींबा आवश्यक-अनिल सप्ताळ

Image
पंढरपूर शहरातील विठ्ठल मंदीर परिसरासह संपुर्ण प्रदक्षिणामार्गाच्या स्वच्छतेसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीच्या वतीने घेण्यात आलेला निर्णह अतिशय कौतुकास्पद असून मंदीर समितीच्या चांगल्या उपक्रमास आपण जबाबदार नागिरक म्हणून प्रतिसाद दिल्यास आणखी अनेक चांगले निर्णय समन्वयाने घेतले जावू शकतात याचे हे उत्तम उदाहरण आहे.याच बरोबर विभाग प्रमुख,पुजारी,सेवक यांना डे्रसकोड देणे,मंदीर परिसरात शेडनेड उभारणे,सोमेश्‍वर मंदीराभोवती संरक्षण भिंत बांधणे असे अनेक चांगले उपक्रम मंदीर समिती सद्या राबिवित आहे.म्हणून राष्ट्रवादी कॉग्रेस ओबीसी सेलच्या वतीने आज मंदीर समितीच्या अभिनंदनाचे पत्र आज प्रदान करण्यात आले असल्याची माहीती ओबीसी सेलचे अध्यक्ष अनिल सप्ताळ यांनी दिली आहे.       या बाबत सा.पंढरी वार्तास अधिक माहीती देताना अनिल सप्ताळ पुढे म्हणाले की,स्थायी मंदीर समितीच्या अध्यक्ष व इतर पदाधिकार्‍यांची निवड झाल्यानंतर समितीच्या वाटचालीस आता खर्‍या अर्थाने स्वयंपुर्णता आली असून पंढरपूरच्या विकासबाबत चर्चा करताना पुर्वी शिर्डी आणि शेगावचे उदाहरण दिले जायचे मंदीर समितीच्या माध्यमातून सद्या अतिशय...

पंढरी वार्ता :- अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने मोटार वाहन निरीक्षकपदी निवड झालेल्यांचा सत्कार .

Image
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग  (अरण माढा),कु.अमृता सदाशिव देशमुख(करकंब),कु.अधिका हनुमंत खरात(कासेगाव),कु. प्रियंका मारुती माने (पंढरपूर),चि. अनिकेत वाघमारे (श्रीपुर),चि.कुलदिप उत्तम पवार (खेडभोसे),चि.सतिश संभाजी भोसले(कासेगाव) या सर्व स्पर्धापरिेक्षेत यश मिळविलेल्यांचा सत्कार आमदार भारत भालके व नगराध्यक्षा साधनाताई भोसले तसेच मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण,डॉ.मनोज भायगुडे,प्रा.जोतिराम भायगुडे सर, डॉ.बी.आर.पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या प्रसंगी  आमदार भारत नाना भालके ,नगराध्यक्षा साधनाताई भोसले, यांच्यासह विविध मान्यवर व   यशस्वीतांनी आपली मनोगते व्यक्त केली. तर्फे घेतलेल्या मोटार वाहन निरीक्षक परीक्षेत यशस्वी झालेल्यांचा सत्कार  संपन्न झाला.यावेळी कु. सोनाली सुनील घाडगे,कु. सुप्रिया सुनील घाडगे सदर कार्यक्रमास श्री राजू मोरे (पो.हेड.कॉन्स्टेबल),ललिता रोंगे(पोलीस पाटील), महासंघाचे  जिल्हा उपाध्यक्ष  सचिन गंगथडे, जिल्हा सचिव गुरुदास गुटाळ,जिल्हासंघटक सतीश धनवे सर,तालुकाध्यक्ष संतोष जाधव,ता.उपाध्यक...

पंढरी वार्ता:-पंढरपूर रेल्वे प्रशासनाकडून येथील विविध महत्वपुर्ण समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार- महादेव भालेराव. रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यपदी महादेव भालेराव यांची निवड

Image
पंढरपूर येथे नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यपदी पंढरपूर नगर पालीकेचे नगरसेवक महादेव भालेराव यांची निवड करण्यात आली आहे.या निवडीचे पत्र रेल्वेच्या वरिष्ठ वाणिज्य प्रबंधकांकडून महादेव भालेराव यांना नुकतेच प्रदान करण्यात आले आहे.             या बाबत बोलताना नगरसेवक महादेव भालेराव म्हणाले की,पंढरपूरच्या रेल्वे प्रशासनाकडून येथील स्थानिक नागरिकांच्या खुप अपेक्षा आहेत.अनेक समस्या सोडविणे रेल्वेच्या अधिकारात असल्याने रेल्वे प्रशासनाने त्या प्राधान्यक्रमाने सोडवाव्यात अशी नागरिकांची अपेक्षा आहे.सद्या रेल्वे स्थानकाकडून येणारा रेल्वे हद्दीतील रस्ता आहे तो रेल्वे विश्रामगृहापर्यंतच दुहेरी आहे.हा रस्ता पुढे थेट रेल्वे ब्रीज पर्यंत रुंद करण्यात यावा. या ठिकाणी यात्रा कालावधीत,दर महिन्याच्या एकादशीला व रविवारी सुट्टीच्या दिवशी मोठया प्रमाणात भाविक रेल्वेने पंढरीत दाखल होतात.रेल्वे स्थानकावरील शौचालयांनी संख्या अपुरी असल्याने प्रवाशांची मोठी कुचंबणा होते,ती दूर करण्यासाठी येथील मोकळ्या जागेत प्रस्तावीत असलेलेल सुलभ शौचालयाच्या इमारतीचे क...

पंढरी वार्ता :- भीम जयंती निमित्त विद्यार्थ्यांवर लाखोंचा खर्च पंढरपुरातील जय भीम मंडळाचा उपक्रम

Image
डॉल्बीचा व्यर्थ खर्च टाळुन शहरातील शकडो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर लाखो रुपयांचा खर्च करण्याचा उपक्रम चांगला असून, असा संकल्प महापुरुषांची जयंती साजरी करणाºया सर्व मंडळांनी घ्यावा असे अवाहन प्रांत अधिकारी सचिन ढोले यांनी केले. शहरातील जय भीम तरुण मंडळाच्यावतीने डॉ. आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये प्रांत अधिकारी  सचिन ढोले बोलत होते. यावेळी रिक्षाचालवून मुलींचे  वैद्यकीय शिक्षण करणाºया पोपट क्षिरसागर व डॉ. प्राजक्ता क्षिरसागर यांचा सत्कार करुन तिच्या पुढील शिक्षणासाठी अर्थिक मदत केली. साह. पोलीस अधिक्षक निखील पिंगळे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची शिदोरी पुढे नेहण्याचा काम जय भीम तरुण मंडळाकडून होत असल्याचे त्यांनी सांगितले. रिपाइंचे शहराध्यक्ष संतोष पवार म्हणाले, गौतम विद्यालयातील मुलांचा विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य देणार आहे. त्याचबरोबर वयोवृध्दांना अन्नदान केले आहे. असे समाज उपयोगी प्रत्येक वर्षी राबविणार असे, पवार यांनी सांगितले.  यावेळी  मंडळांचे प्रमुख संतोष पवार, सहा. सहा. पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, ड...

पंढरी वार्ता:- स्विकृत नगरसेवक पद स्विकाल्यानंतर पहील्याच महिन्यात डि.राज सर्वगोड ‘तोटयात’ ! तोटया वाटपाच्या देखाव्याचा झाला भांडाफोड.

Image
पंढरपूर नगर पालीकेच्या स्विकृत नगरसेवकपदी निवड होऊन उना पुरा दहा दिवसाचा कालावधी लोटला असतानाच पंढरपूरच्या सामाजिक वर्तुळात आपल्या सफेदोपोष कपडयाने आणि काळ्या गॉगलने वेगळाच ठसा उमटवलेले  डि.राज सर्वगोड यांनी स्विकृत नगरसेवकपदाचा पदभार स्विकारल्यानंतर आपल्या पहील्याच विधायक उपक्रमाचे प्रतिक शहरातील सार्वजनिक नळांचे (यात बहुतांश अनधिकृत आहेत) पाणी वाया जावू नये म्हणून नगर पालीकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना तोटया भेट देवून आपण स्विकृतकाअसेना पण जबाबदार नगरसेवक आहोत हे सिध्द करण्याचा आटापीटा केला होता.त्यांच्या विधायक(?) उपक्रमास येथील प्रसिध्द माध्यमातून प्रसिध्दी मिळाल्यानंतर ते भलतेच खुष झाले असल्याचे दिसून आले होते.मात्र या शह्रातील जनतेने स्व.नगरसेवक नामदेव भुईटे यांच्या ‘हल्लाोबल’ नगरसेवक पदाची कारकिर्द पाहील्याने येथील जनतेला या तोटयामागील प्रसिध्दीचा हव्यास लगेच लक्षात आला होता.डेली सोलापूरचे संपादक अभिराज उबाळे यांनी डि.राज यांच्या दुहेरी भूमिकेचा पर्दाफाश केल्याने स्विकृत नगरसेवक पदाची कारकिर्द संभाळल्यानंतर पहील्याच महिन्यात डि.राज सर्वगोड हे राजकीय द्रष्टया प्रचंड ‘तो...

पंढरी वार्ता:- वारकरी साहित्य परिषद सोमवार पासून मोफत स्वच्छता सेवेचे रस्ते बदलणार ! संत कैकाडी महाराज मठ,संत तनुपरे महाराज मठ,गोपाळपूर मंदीर परिसर,पंढरीतील विविध प्रमुख मठांच्या परिसरात केली जाणार मोफत सेवा.

Image
पंढरीत वारकरी साहित्यपरिषदेच्या वतीने नियुक्त करण्यात आलेले स्वच्छता सेवक मंदीर परिसर,प्रदक्षिणा मार्ग,वाळवंट आदीसह मुख्य रस्त्यावर स्वच्छता करीत असलेले दृश्य गेल्या दोन महिन्यापासून या भागात पहावयास मिळत होते.या भागातील व्यापारी,मठाधिपती,सर्वसामान्य नागरिक वारकरी साहित्य परिषदेचे सेवाधारी करीत असलेले स्वच्छतेचे काम पाहून समाधान व्यक्त करीत होते.मात्र आता मंदीर समितीने हेच काम करण्यासाठी दिड कोटी रुपयांचा भुर्दंड सहन करत ठेकेदाराची नियुक्ती केली असून त्यामुळे वारकरी साहित्य परिषदेला नाईलाजास्तव समितीच्या टेंडरमध्ये नमूद करण्यात आलेल्या परिससरातील काम थांबवावे लागणार आहे.         या बाबत पंढरी वार्ताशी बोलताना वारकरी साहित्य परिषदेचे पंढरपूर येथील समन्वयक अनिल हजारे म्हणाले की,आम्ही सेवाभावी वृत्तीने मंदीर समितीस अथवा नगर परिषदेस कुठलाही अर्थिक भार न टाकता ही सेवा बजावणार होतो.आता मंदीर समितीने मंदीर परिसर,चौफाळा ते महाद्वार,संपुर्ण प्रदक्षिणा मार्ग,वाळवंट परिसराच्या स्वच्छतेचे टेंडर काढून ठेकेदाची नियुक्ती करुन दिड कोटीचा खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.असे असताना आ...

पंढरी वार्ता:- पोलीसांच्या गराडयातील मंत्र्याच्या साक्षीनेच वृत्तांकनासाठी आलेल्या पंढरीतील पत्रकार संघाच्या अध्यक्षांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरटयांनी लांबवीली ! ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंढे यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमात चोरटयाची करामत

Image
पंढरपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार सुनिल उंबरे हे 13 एप्रिल रोजी अरण येथे ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंढे यांच्या प्रमुख उपस्थिीत आयोजीत करण्यात आलेल्या सावता परिषदेच्या वृत्तांकनासाठी गेल्यानंतर या ठिकाणी मोठा पोलीस फौजफाटा बंदोबस्ताठी उपस्थित असताना चोरटयांनी सुनिल उंबरे यांच्या गळ्यातील सोनसाखळी हातोहात लांबवीली असून यामुळे या कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रचंड खळबळ उडाली असल्याचे दिसून आले.    या बाबत ज्येष्ठ पत्रकार सुनिल उंबरे यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद दिली असून अरण येथे सावता परिषदेच्या कार्यक्रमाचे वृत्तांकन करण्यासाठी आले असता अज्ञात चोरटयाने उंबरे यांच्या गळ्यातील 23 ग्राम वजनाची सोनसाखळी बेमालूमपणे लंपास केल्याचे या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.      राज्याचे कॅबीनेट दर्जाचे मंत्री कार्यक्रमासाठी उपस्थित असताना व पोलीसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी हजर असताना सराईत चोरटयांनी थेट पत्रकराच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून पोलीसांच्या बंदोबस्तावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण केले आहे.