Posts

Showing posts from January, 2018

पंढरी वार्ता: स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या नुतन पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहीर.

Image
येथील शासकिय विश्रामगृह येथे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या पार पडलेल्या बैठकीत पक्षाचे जिल्हाअध्यक्ष आंनद लोंढे यांनी विविध नुतन पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहीर केल्या.या मध्ये अमर चंदनशिवे यांची जिल्हाउपाध्यक्ष,प्रताप कांबळे जिल्हासंपर्क  प्रमुख,पंढरपूर तालुका अध्यक्ष म्हणून वैभव वाघमारे,यांची निवड निवड करण्यात आली व मोतीलाल बनसोडे यांची तालुका उपाध्यक्ष रंजित पोकळे ता.सचिव,उमेश झेंडे ता. सरचिटणीस आदीची निवड करण्यात आली.या वेळी पिंटू रणपिसे,लखन डावरे,अजित जगताप,अक्षय वनसाळे,सुखदेव कांबळे,संतोष लोखंडे,तुषार सोनवणे,प्रशांत बाबर,अशाताई क्षिरसागर आदीस स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

पंढरी वार्ता:- वाढती महागाई व इंधनदरवाढीचा पंढरीत कॉगेे्रसकडून निषेध तहसिलदारांना दिले निवदेन

Image
गेल्या काही दिवसात पेट्रोल,डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी दरवाढ झाली आहे.त्यामुळे महागाईचा भडका उडाला असून सर्वसामान्य जनतेला जगणे असह्य झाले आहे.राज्यात इंधनावर विविध कर व सरचार्ज लावले आहेत.त्यामुळे इतर राज्यापेक्षा आपल्याकडे महागाई अधिक आहे.राज्य व केंद्र शासनाच्या विरोधात येथील तहसिदार मधूसुधन बर्गे यांना निवेदन देवून पंढरपूर शहर व तालुक कॉग्रेस कमेटीच्या वतीने शासनाचा निषेध करण्यात आला आहे.        राज्यात दुष्काळ निधी व दारुबंदी सरचार्जच्या नावाखाली शासन अक्षरश: सामान्य जनतेची लूट करीत आहे.इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे जिवनावश्यक वस्तूंच्या किमतीही वाढल्या आहेत.एकीकडे सर्वसामान्य जनतेस जगणे असह्य झाले असताना राज्यातील व केंद्रातील सरकार स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात मग्न आहे.जनतेची होणारी लूट थांबावी यासाठी शासनाचे डोळे उघडण्याच्या हेतून आ.भारत भालके यांच्या मार्गदर्शनानुसार हे निवेदन कॉग्रेसच्या वतीने तहसिलदारांना देण्यात आले आहे.       यावेळी पंढरपूर तालुका कॉग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील,शहराध्यक्ष ऍड.राजेश भादुले,महिला तालुका कॉग्र...

पंढरी वार्ता:- सण उत्सवानिमित्त एकत्र आल्याने विचारांची देवणा घेवाण- सिमाताई परिचारक पंतनगर येथे तिळगुळ वाटप कार्यक्रम संपन्न

Image
पंढरपूर शहरातील पंतनगर येथे परिसरातील सर्व महिलांनी एकत्र येउन अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात सिमाताई परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत तिळगुळ वाटप कार्यक्र माचे आयोजन केले होते.         या वेळी सौ.कुलक र्णी,सौ.बनकर,सौ.केसकर,सौ.गुंड,सौ.जमीला बागवान यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.मकर संक्र ाती हा सौभाग्यवती महिलांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा सन आहे.हा सन साजरा करताना या परीसरातील महिलांना एकमेकास वाण वसा देऊन शुभेच्छा व तिळगुळ दिले.        या वेळी बोलताना सिमाताई परिचारक म्हणाल्या की पूर्वी प्रत्येक सन महिला एकत्र येऊन साजरा करत यातुन विचांराची देवाण घेवान होत असे आता अनेक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत.पण एक मेकींशी संर्पक विरळ झाला आहे.तिळगुळ वाटप कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलात तर असेच प्रत्येक सण उत्सावाच्या वेळी एकत्र येऊ या आणि विचांराची देवाण घेवान करुयात.

पंढरी वार्ता:- भाळवणी येथे अवैध दारु धंद्याविरोधात सुरु असलेल्या उपोषणाकर्त्यांची ह.भ.प.बंडातात्या कराडकर यांनी यांनी घेतली भेट ! वरिष्ठांशी संपर्क करुन केली अवैध धंदे बंद करण्याची मागणी !

Image
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील मारूती मंदिरामध्ये येथील रहिवाशी गोरख गणपत लिंगे हे आमरण उपोषणाला बसले आहेत परंतू गेल्या तीन दिवसापासून या उपोषणाची कुणीही दखल घेतली नव्हती.मात्र आज ह.भ.प.बंडातात्या कराडकर व आ.गणपतराव देशमुख यांनी उपोषण स्थळास भेट देवून उपोषणकर्त्यांच्या भावना समाजवून घेतल्या.यावेळी ह.भ.प.बंडातात्या कराडकर यांनी उपोषणकर्त्यांच्या भावना जाणून घेत थेट राज्याचे महसुलमंत्री चंद्रकांत पाटील,प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांच्यासह जिल्हा पोलीस प्रमुखांशी संपर्क शाधला व या उपोषणाची तातडीने दखल घेत कारवाई झाली पाहीजे अशी मागणी केली.आजही हे उपोषण सुरुच याबाबत ठोस कारवाईचे आश्‍वासन मिळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही अशी भुमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे.   भाळवणी व परिसरात सुरू असलेले अवैध व्यवसाय कायमस्वरूपी बंद करावेत.तसेच गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यांसाठी कायमस्वरूपी औटपोस्ट व्हावे.अवैध धंदे करणारे गावात  दहशत निर्माण करीत असून त्यास आळा घालावा व अशा अवैध धंदेवाल्यांवर कडक कारवाई करावी.अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष करणार्‍या संबधीत पोलीस कर्मचार्‍यावर कारवाई...

पंढरी वार्ता:- सदभावना सेवाभावी संस्थेच्या वतीने इसबावी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त खाऊ वाटप

Image
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने येथील सदभावना सेवाभावी संस्थेच्या वतीने इसबावी विसावा कट्टा  येथे शालेय विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजू शिदे यांच्या हस्ते नाथपंथी डवरी समाजाचे शहराध्यक्ष सतिश सातपुते यांच्याहस्ते खाऊ वाटप करण्यात आले.समता,स्वातंत्र्य आणि बंधुता यांची अनमोल देणगी आजच्याच दिवशी या देशाला मिंळाली आहे.आणि त्याचा हा उत्सव या लहान लहान बालकांसोबत साजरा करताना मोठया आनंदाची अनुभूती येत असल्याचे प्रतिपादन राजू शिंदे यांनी केले.        सदभावना सेवाभावी संस्थेच्या माध्यामतून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.यामध्ये रक्तदान शिबीर,वृध्द नागरिकांची आरोग्य तपासणी,शालेय विद्यार्थ्यांना विविध शालेय साहित्य वाटप केले जाते.प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आजचा हा उपक्रम संस्थेच्या वतीने राबविण्यात आला. यावेळी स्वप्नील शिंदे,सोनू शिंदे,योगेश लोखंडे,विजय जगताप,सागर अपुणे,अदित्य संगीतराव,सचिन ढोले,स्वप्निल जाधव,सचिन ढोले,अजित गायकवाड,पापल्या कथले,नंदू पाटील,आण्णा पोरे,विजय राऊत,ओंकार शिंदे,ओंकार साळुंखे,आकाश रिकीनी,अक्षय संगीतराव,शिवम...

पंढरी वार्ता:- राष्ट्रवादी कॉग्रेेसच्या वतीने पंढरीत संविधान बचाव कॅन्डल मार्च ! विविध पक्ष संघटनांचा सहभाग !

Image
देशात समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता प्रस्थापित व्हावी, सर्वांना समान अधिकार मिळावा, यासाठी आपले संविधान महत्वाची भूमिका बजावते. जगात सर्वश्रेष्ठ असलेल्या या संविधानाची पायमल्ली करण्याचा प्रयत्न काही अनिष्ट प्रवृत्तीचे लोक करत आहेत. या प्रवृत्तीचा विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी कॉगेेेस पक्षाच्या वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रवादी कॉग्रेेसचे जिल्हाध्यक्ष मा.आ.दिपक साळुंखे-पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष बळीराम साठे यांच्या आदेशानुसार पंढरीतही संविधान बचाव कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते अशी माहीती राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर भोसले यांनी दिली आहे.       येथील छत्रपती शिवाजी चौक येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन या संविधान बचाव कॅन्डल मार्चची सुरुवात करण्यात आली तर विश्‍वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन या कॅन्डल मार्चची समाप्ती करण्यात आली. राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रांतिक सदस्य राजूबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत या मार्चमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष ऍड.दिपक पवार,पंढरपूर म...

पंढरी वार्ता :-तीर्थक्षेत्र देहुत दारू-मांस विक्रीस बंदी ! देहू ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय !

Image
तीर्थक्षेत्र देहु परिसरात मांस व दारू विक्रीस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  तीर्थक्षेत्र देहु परिसरात असलेली अवैध दारू व मांस विक्री बंद करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य आणि श्रीसंत तुकाराम महाराज संस्थानची बुधवारी दुपारी ग्रा. पं. कार्यालयात बैठक झाली. मांस विक्रेत्यांकडे असलेला साठा संपवण्यासाठी दहा दिवसांची मुदत दिली आहे.      पंढरपूर तिर्थक्षेत्राच्या ठिकाणीही दारुबंदी व्हावी अशी मागणी सर्वप्रथम विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीचे मा.अध्यक्ष वै.ह.भ.प.विवेकानंद महाराज वासकर यांनी केली होती.त्यावेळी सत्तेत असलेल्या युती शासनाने याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्‍वासनही महाराज मंडळींना दिले होते.मात्र याबाबत आजतागायत अंमलबजावणी झालेली नाही.महसुलमंत्री पदाचा पदभार एकनाथ खडसे यांच्याकडे असताना त्यांनी पंढरपूर नगर पालीकेने ठराव केल्यास आम्ही पंढरीत दारुबंदी करण्याचा निर्णय घेवू असे आश्‍वासन दिले होते.मात्र ते मंत्रीपदावरुन पायउतार झाले आणि त्यांचे आश्‍वासनही हवेत विरले.सुप्रिम कोर्टाने महामार्गवरील दारु विक्रीस प्रतिबंध करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शहरात...

पंढरी वार्ता:- युवा उद्योजक अभिजीत पाटील यांनी साखर कारखानदारांसमोर ठेवला नवा आदर्श ! जि.प.शाळेतील 11 मुलींच्या हस्ते 1,11,111 व्या साखर पोत्यांचे पुजन !

Image
राज्यभरातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम मध्यावर आलेला असून अनेक साखर कारखाने विविध मान्यवरांच्या हस्ते साखर कारखान्यामध्ये उत्पादीत झालेल्या साखरेच्या पोत्याचे पुजन करताना दिसून येतात.पंढरपूरचे युवा उद्योजक अभिजीत पाटील यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात धाराशीव सहकारी साखर कारखान्याच्या माध्यामातून एका नव्या आव्हानात्म क्षेत्रात यशस्वी वाटचाल सुरु केली आहे. या कारखान्यामध्ये उत्पादीत झालेल्या पहील्या साखर पोत्याचे पुजन आई्रसाहेबांच्या हस्ते करुन त्यांनी आपल्या मातृभक्तीचा परिचय करुन दिला होता.तर आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रिय दिनाचे औचित्य साधत या साखर कारखान्यात निर्मिती झालेल्या 1 लाख 11 हजार 111 व्या साखर पोत्याचे पुजन जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेणार्‍या 11 विद्यार्थिनींच्या हस्ते करुन त्यांनी या सुकन्यंाचा गौरव केला आहे.         युवा उद्योजक अभिजीत पाटील यांनी विविध व्यवसायात यशस्वी वाटचाल करीत असतानाच आपल्या सामाजिज बांधीलकीचा प्रत्यय अनेक वेळा दिला आहे.धाराशिव सहकारी साखर कारखान्याच्या माद्यमातून त्यांनी या कारखान्याच्या परिसरातील अनेक शाळा,...

पंढरी वार्ता:-रस्ता रुंदीकरणाच्या कामात कुठल्याही मालमत्ताधारकांवर अन्याय होणार नाही याची मी हमी देतो-आ.प्रशांतराव परिचारक नगरसेवक गुरुराज अभ्यंकर,राजकुमार शहापूरकर, नगरसेवक विक्रम शिरसट यांची मार्गदर्शन समिती स्थापन !

Image
भजनदास चौक ते सोलापूर रस्ता या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम केले जात असताना बाधीत होणार्‍या मालमत्ता धारकांवर कुठलाही अन्याय होणार नाही.त्यांना जास्तीत जास्त प्रमाणात नुकसान भरपाई दिली जाईल यासाठी आपण ठोस प्रयत्न करणार असून रेडीरेकनरचे दर,मालमत्तांचे मुल्यांकन यावर आधारीत नुकसान भरपाईच्या नोटीसा सद्या 127 मिळकतदारांना देण्यात आलेल्या आहेत.नागपूर सुधारणा न्यास तसेच विविध तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी जे विशेष निकष लावून नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे त्याच पध्दतीने या बाधीत होणार्‍या मालमत्ता धारकांना नुकसान भरपाई दिली जाईल यासाठी आपण ठोस प्रयत्न करणार असून याबाबत कुठलाही अन्याय होणार नाही याची मी हमी देतो अशी ग्वाही बाधीत मालमत्ताधारकांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजीत करण्यात आलेल्या बैठकीत आ.प्रशांतराव परिचारक यांनी दिली आहे.       यावेळी बोलताना आ.प्रशांतराव परिचारक यांनी बाधीत होणारे मालमत्ता धारक व त्यांना मिळनारी नुकसान भरपाई याची माहीती देवून पंढरपूर शहरात रेडीरेकनरचे विविध झोन आहेत.त्याप्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम बदलते.भजनदास चौकातील मिळकतीचा रेडीरेकनर आणि लगतच्या कुंभ...

पंढरी वार्ता:- आ.भारत भालकेंचा मोहोळ विधानसभा मतदार संघातील जनतेला दिलासा ! रांझणी -ओझेवाडी-सरकोली रस्त्यासाठी 6 कोटी 43 लाखांचा निधी मंजूर !

Image
पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार या नात्याने आपण या मतदार संघातील रस्त्यासाठी 9 कोटी 43 लाखांचा निधी मंजूर करण्याचा दावा आ.भारत भालके यांनी केला असून यामध्ये पंढरपूर तालुक्यातील रांझणी ते ओझेवाडी,सरकोली या रस्त्यासाठी 6 कोटी 43 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.मोहोळ विधानसभा मतदार संघात बहुतांश समावेश असलेल्या या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर करण्यात आल्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात समाधानाचे वातावरण निर्माण झाल्याचा दावाही आ.भारत भालके यांच्याकडून करण्यात आला आहे.     मंगळवेढा येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात आ.भारत भालके यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्यावर कडाडून टिका केली होती.संजय शिंदे हे विकास कामांसाठी निधी देण्याबाबत दुजाभाव करीत असल्याचा आरोपही आ.भारत भालके यांनी केला होता.पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात आ.भारत भालके -कल्याणराव काळे समर्थक जि.प. व पंचायत समिती सदस्य हे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध होणार्‍या निधीबाबत मौन बाळगून असताना आ.भारत भालके यांनी थेट जि.प.अध्यक्ष संजय शिंदे यांना टार्गेट केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती.रस...

पंढरी वार्ता:- किराणा दुकानातून तंबाखू विक्रीस प्रतिबंध करण्याचे आव्हान पंढरपूरचे अन्न निरिक्षक पेलणार ?

Image
किराणा तसेच अन्य दुकानांतून तंबाखू व तंबाख पदार्थांच्या विक्रीवर राज्य सरकारने बंदी घातली आहे. ज्या दुकानातून ग्राहकोपयोगी वस्तू (एङ्गएमसीजी) विक्री होते अशा दुकानात आता विक्रीसाठी तंबाखू ठेवता येणार नसल्याचे आदेश राज्याच्या अन्न व औषधी  विभागाने   बुधवारी दिले आहेत.लाखाच्यावर लोकसंख्या असलेल्या पंढरपूर शहरात जवळपास  शेकडोंच्या संख्येत   छोटी मोठी  किराणा   व विविध नित्योपयोगी वस्तू विक्रींची दुकाने असून या ठिकाणी तंबाखूची विक्री करण्यास प्रतिबंधक करण्याची व योग्य ती कारवाई करण्याची जबाबदारी नगर पालीकेकडून अन्न विभागाकडे प्रतिनियुक्तीवर गेलेल्या विनायक शेटे यांच्यावर आहे.मात्र त्यांच्या कार्यपध्दतीबाबत पंढरपूरकरांमध्ये प्रचंड नाराजी असून तक्रारी आल्यास कारवाई करण्याऐवजी‘समजूत’काढण्याकडेच त्यांचा जास्त कल असल्याचे दिसून येते.त्यामुळे पंढरपूरात गुटखा विक्री अजूनही पुर्णत: बंद होऊ शकली नाही.आता तंबाखू बंदीची जबाबदारीही संपुर्ण शहरासाठी एकमेव  निरीक्षक असले ले     विनायक शेटे हे पेलणार का ? असाच प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. ...

पंढरी वार्ता:- नगरपालीका,ठेकेदार आणि बांधकाम विभागाच्या वादात लिंगायत स्मशानभुमीची भिंत बेवारस !

Image
पंढरीतील वैकुंठ स्मशानभुमीच्या सुशोभीकरणाचे काम एकीकडे प्रगतीपथावर असतानाच लिंगायत समाजाच्या दफनभुमीची दुरावस्था मात्र कायम असून गोपाळपूर ते भक्त निवास या रस्त्याच्या कामात रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाईपलाईन टाकण्यासाठी खोदाई केली जात असताना एक वर्षापुर्वी लिंगायत स्मशानभुमीची कंपाऊंड भींत पडली होती.त्यामुळे या स्मशानभूमीत भटकया कुत्र्यांचा,मोकाट जनावरांचा मोठया प्रमाणात वावर आहे.त्यामुळे संबधीत ठेकेदारावर कारवाई करुन तातडीने संरक्षक भिंत बांधण्यात यावी अशी मागणी समाजसेवक धर्मराज घोडके यांनी केली आहे.         याबाबत सा.पंढरी वार्ताशी बोलताना धर्मराज घोडके म्हणाले की,लिंगायत स्मशानभुमीस संरक्षक भींत नसल्याने मोठया प्रमाणात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे.त्यामुळे येथे दफन केलेल्या मृतदेह दफन केलेल्या ठिकाणी खड्डे पडत असल्याचे पहावयास मिळते.येथील रस्त्याचे काम करीत असताना ही संरक्षक भीत पडल्यानंतर सदर कामाच्या ठेकेदाराने भींत पुन्हा बांधून देणे अपेक्षीत होते.याबाबत लिंगायत समाजातील विविध संघटनांनीही मागणी केली होती.मात्र सदर ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केल्याने पंढरप...

पंढरी वार्ता:- संविधान बचाव कॅन्डल मार्चमध्ये सहभागी होण्याचे राष्ट्रवादी कॉग्रेेसचे शहराध्यक्ष सुधीर भोसले यांचे आवाहन

Image
अच्छे दिनाचे अमिष दाखवत राज्यात 2014 मध्ये सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारच्या काळात राज्यातील अनुसुचीत जाती-जमाती तसेच नवबौध्द यांच्यावर मोठया प्रमाणात अत्याचार अन्यायाच्या घटना घडल्या आहेत.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संपुर्ण जगात आदर्श ठरेल अशी राज्यघटना या देशास बहाल केली आहे.मात्र भाजपाचे केंद्रातील अनेक मंत्री घटना बदलायची भाषा करीत आहेत.तर अनेक पदाधिकारी घटना दुरुस्ती करुन मागासवर्गीय व शोषीत घटकांचे हक्क नाकारण्याचे षडयंत्र रचले जात आहे.त्यामुळेच राष्ट्रवादी कॉग्रेसच्या माध्यमातून शुक्रवार दिनांक 26 जानेवारी रोजी सायंकाळी ठिक 6 वाजता पंढरीत संवीधान बचाव कॅन्डल मार्चचे आयोजन केले असून यामध्ये सर्व समविचारी पक्ष संघटना व व्यक्तींनी सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर भोसले यांनी केले आहे.                         मुंबई येथेही या संवीधान बचाव कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते सहभागी होणार असून त्याच बरोबर विविध सामाजिक संघटना,स...

पंढरी वार्ता :- पंढरीच्या ‘वैकुंठ’ स्मशानभुमीचे रुपडे पालटणार ! वैशिष्ठयपुर्ण योजनेतून सुशोभीकरणाच्या कामास सुरुवात

Image
 वैकुंठनगरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या पंढरीतील जन्ममृत्युच्या फेर्‍यातून सुटका झाल्यानंतर अखेरचा विसावा असलेल्या वैकुंठ स्मशानभुमीत सुधारणा व्हाव्यात अशी मागणी गेल्या काही वर्षापासून होत होती.यापुर्वी या स्मशानभुमीच्या कंपाऊंडचे काम करण्यात आले होते.मात्र स्मशानभुमी पर्यंत जाणारा रस्ता आतिल भागातील अर्तंगत रस्ते झाले पाहीजेत अशी मागणी केली जात होती.याची दखल घेत वैशिष्ठपुर्ण योजनेतून या स्मशानभुुमीत आता पेव्हींग ब्लॉक सह सुशोभीकरणाच्या कामास सुरुवात झाली असून त्याच बरोबर या स्मशानभुमीस जोडणार्‍या रस्त्याच्या कामासही सुरुवात करण्यात आली आहे.          या कामाची पाहणी नगरसेवक विक्रम शिरसट व नगरसेवक संजय निंबाळकर,अमोल डोके,बसवेश्‍वर देवमारे यांनी नुकतीच केली असून हे काम गतीने व दर्जेदार पध्दतीने झाले पाहीजेत अशा सुचना यावेळी देण्यात आल्या.याबाबत अधिक माहीती देताना नगरसेवक विक्रम शिरसट म्हणाले की,स्मशानभुमीतील सुधारणा बाबत आ.प्रशांतराव परिचारक हे सातत्याने आग्रही होते.या ठिकाणी आवश्यक असलेल्या कामांचा अग्रक्रम निश्‍चित करुन तातडीने कामे हाती घेण्यात यावीत अशा सु...

पंढरी वार्ता:- पंढरीतील ‘रेड झोन’ ठरत आहेत ‘ऐपतदारांसाठी’ डोकेदुखी ! शहरातील ठरावीक भागास फायनान्स कंपन्यांचे ‘आळे ’े

Image
पंढरपूर शहर व तालुक्यात दुचाकी,चारचाकी,व्यवसायीक वाहने यासाठी कर्जपुरवठा करणार्‍या राष्ट्रीयकृत व खाजगी बँकाशी निगडीत व खाजगी फायनान्स कंपन्या याच बरोबर मायक्रो फायनान्स कंपन्याकडून महिला बचत गटांना कर्जपुरवठा करण्याबाबत पंढरपूर शहर व तालुक्याची विविध रेडझोन मध्ये अघोषीत विभागणी केली असल्याचे निदर्शनास येत असून मात्र या रोडझोन मुळे या भागात राहणारे अनेक ऐपतदार मात्र आपले क्रेडीट गमावून बसले आहेत.तर या रेड झोन मधील अनेक महिला बचत गटांना कर्जपुरवठा करण्यास मायक्रो फायनान्स कंपन्या नकार देत असल्याने नियमितपणे कर्ज फेडूनही अनेक बचत गट या मायक्रो फायनान्स कंपन्याच्या कर्जापासून वंचीत रहात आहेत.तुम्ही विशिष्ट भागात रहाता त्यामुळे तुम्हला कर्ज मिळणार नाही असे या मायक्रो फायनान्स कंपन्याकडून सांगीतले जात असल्यामुळे अशा प्रकारे थेट विविष्ट भागालाच रेड झोन मध्ये टाकण्याचा फायनान्स कंपन्यांचा हा फंडा कायदेशीर व नैतिकतेला धरुन आहे का असाच प्रश्‍न अनेकांना पडला आहे.            एकेकाळी दुचाकी अथवा चार चाकी वाहन खरेदी करावयाचे झाले तर बँकाचे उंबरठे झिजवावे लागत होते.मात...

पंढरी वार्ता:- नगर पालीकेने वारंवार पत्र व्यवहार करुनही जीवन प्राधिकरणाचे अधिकारी सुस्तच ! महावीर नगर येथील पाण्याच्या टाकीचे पाणी मुरतेय कुठं ?

Image
तिर्थक्षेत्र विकास आरखडयाअर्तंगत पंढरपूर शहरात सर्वत्र समान दाबाने व सुरळीत पाणी पुरवठा व्हावा या हेतूने विस्तारीत पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली.या योजने अर्तंगत शहरातील अनेक उपनगरात तसेच शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नव्याने पाणी पाण्याच्या वितरण टाक्या उभारण्यास मंजूरी देण्यात आली व तातडीने या कामांसाठी निधीही उपलब्ध करण्यात आला. या अंर्तगत पंढरपूर शहरात अनेक ठिकाणी नव्याने पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या व तेथून पाणी पुरवठाही होऊ लागला मात्र 2009 सालची मंजूरी असलेली व 2012 पासून प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली महावीर नगर येथील पाण्याची टाकी ही कायम वादाच्या भोवर्‍यात अडकलेलीच दिसून आली आहे.या टाकीचे काम ज्या गतीने झाले व रखडले त्याबाबत या परिसरातील नागरिकांकडून प्रचंड नाराजी व्यहक्त होत होती.या परिसरातील नागरिकांना योग्य दाबाने व सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी ही टाकी उभारण्याचे प्रस्तावीत करण्यात आले होते.ही टाकी उभारण्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सोपविण्यात आले आणि इथेच घोळ झाला. या टाकीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे अशा आशयाची तक्रार गेली 2 वर्षे नगर पालीका महाराष्ट...

पंढरी वार्ता:- गणेश नगर,परदेशी नगर रेल्वे स्थानक परिसरात नव्या पाईपलाईनसाठी 73 लाखांचा निधी उपलब्ध ! नगरसेवक विवेक परदेशी यांच्या पाठपुराव्यास यश

Image
पंढरपूर शहरातील आतिशय दाट लोकवस्ती असलेल्या गणेश नगर,परदेशी नगर,येळेवस्ती,रेल्वे स्थानक परिसरातील पिण्याच्या पाईपलाईन बदलण्यात याव्यात यासाठी नगरसेवक व नगर पालीका शिक्षण मंडळाचे सभापती विवेक परदेशी यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.गणेश नगर येथील पाण्याच्या टाकीवरुन या परिसरातील अनेक उपनगरांना पाणी पुरवठा होत होता.मात्र परिसरातील अनेक पाईपलाईन बदलण्याची गरज निर्माण झाली होती.या बाबत नगरसेवक विवेक परदेशी यांनी आ.प्रशांतराव परिचारक व नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करुन येथील नागरिकांच्या या महत्वपुर्ण प्रश्‍नास न्याय मिळवून दिला आहे.           गणेश नगर येथील पाण्याच्या टाकीवरुन परदेशी नगर,येळेवस्ती,माळीवस्ती,बालाजी नगर,अन्नपुर्णा नगर,पुंडलीक नगर,रेल्वे वसाहत,गुरुकृपा हौसींग सोसायटी आदी भागास पाणी पुरवठा केला जातो.येथील वाढती लोकसंख्या लक्षात घेता या भागात अधिक व्यासाच्या व काही ठिकाणी नविन पाईपलाईन टाकणे गरजचे होते.त्यामुळे सर्वच नळकनेक्शन धारकांना समान दाबाने व सुरळीत पाणी पुरवठा करणे सुलभ होणार होते.येथील नागरिकांच्या या जिव्हाळ्याच्य...

पंढरी वार्ता:- सुर्यनारायण देव यात्रेची नारायण चिंचोलीत उत्साहात सांगता ! प्रणव परिचारक यांच्याहस्ते रथसप्तमी निमित्त महापूजा

Image
सुर्यनारायण देव यात्रेनिमित्त गेले महिनाभर नारायण चिचोंली येथे सुुरु असलेला यात्रा महोत्सवाची बुधवारी रथसप्तमीनिमित्त युवा नेते प्रणव परिचारक यांच्याहस्ते महापूजा करुन सांगता करण्यात आली आहे.गेले संपुर्ण महिनाभर प्रत्येक रविवारी नारायण चिंचोली येथील पुरातन हेमाडपंथी सुर्यनारायण मंदीरास हजारोंच्या संख्येने भाविकांनी भेट दिली असून विविध मान्यवरांच्या हस्ते सुर्यनारायणाची महापूजा संपन्न झाली आहे.रथसप्तमीच्या दिवशी प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी सुर्यनारायणाच्या मुर्तीच्या मुखमंडलावर पडणारी सुर्याची पहीली किरणे आपल्या नेत्रात साठविण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.       यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.उपसभापती लक्ष्मण धनवडे,सरपंच विठ्ठल माने,उपसरपंच बळवंत धनवडे,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शिवाजी गुंड,ट्रस्टचे उपाध्यक्ष विजय कोळेकर,चेअरमन धर्मराज नलवडे,व्हा.चेअरमन विष्णू माने,तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष अभिजीत कवडे,वसंत कोले,भास्कर गुंड,शिवजी वसेकर,भाऊसाहेब माने,दत्तात्रय कोळेकर,सुनिल माने,भानुदास गाजरे,नितिन गुंड,संदीप हिंगमीरे,साधू नलवडे,चिटबॉय गोडगे आदी उ...

पंढरीवार्ता:- पंढरपूर शहर युवक कॉग्रेसच्या वतीने सुनेत्राताई पवार यांचा वाढदिवस साजरा

Image
महाराष्ट्र प्रदेश महिला काग्रेसच्या सरचिटणीस व रुक्मिणी परिवाराच्या संस्थापिका सुनेत्राताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहर युवक कॉग्रेेसच्या वतीने येथील नवजिवन अपंग व मुकबधीर विद्यालयात मिठाई व फळे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन शहर युवक कॉग्रेसचे उपाध्यक्ष मधुकर फलटणकर यांच्यावतीने करण्यात आले होते.              यावेळी बोलताना कॉग्रेसचे ज्येष्ठ मार्गदर्शक मामा फलटणकर म्हणाले की,सुुनेत्राताई पवार यांनी गेल्या दोन दशकापासून पंढरपूरच्या राजकारणात एक वेगळे वलय निर्माण केले आहे.विकासाभिमूख राजकारण करताना महिलांना संघटीत केल्यास विविध क्षेत्रात महिला आपला ठसा उमटवू शकतात याचे अतिशय समर्पक उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहीले जाते.सहकार असो अथवा शिक्षण क्षेत्र अतिशय उत्तमरित्या त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलाा आहे.सर्वसाामान्य कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी जाणून घेवून त्यासोडविण्यासाठी तत्परतेने त्या कार्यरत असल्याचे दिसून येते.आज त्यांचा वाढदिवस साजरा करताना त्यांच्या पुढील कारकिर्दीस आम्ही शुभेच्छा देत आहोत.         ...

पंढरी वार्ता :-भुयारी गटार योजना टप्पा क्र. 3 चे काम मजिप्राला द्या ! भाजपाचे अध्यक्ष संजय वाईकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

Image
मुख्यमंत्र्यांनी मोकळ्या मनाने पंढरपूर नगरपरिषदेला आठ रस्त्यांच्या कामासाठी 52 कोटी रूपये दिले. या कामाचा दर्जा व कामाची प्रतवारी विचारात घेता पंढरपूर शहराच्या भुयारी गटार योजना टप्पा क्र. 3 साठी देण्यात येणारा 65 कोटी रूपयांचा निधी हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला देऊन मजिप्रा मार्फत शहरातील टप्पा क्र. 3 चे काम करावे, अशी मागणी पंढरपूर भाजपाचे अध्यक्ष संजय वाईकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पंढरपूर शहरातील इसबावी, दूध डेअरी परिसर, डाक बंगला परिसर, टाकळी रोड, कोर्टी रोड, भगवान नगर, एमएसईबी परिसर व शहरातील ड्रेनेजपासून वंचित असलेला इतर भागामध्ये ड्रेनेज लाईन व्हावी, ही अनेक दिवसांपासूनची पंढरपूरकरांची मागणी होती. या मागणीस अनुसरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 65 कोटी रूपयांचा निधी पंढरपूर शहराच्या भुयारी गटार योजना टप्पा क्र. 3 साठी देण्याची तयारी दर्शविली आहे. ही 65 कोटी रूपयांची रक्कम 31 मार्च 2018 पूर्वी दिली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सदरची रक्कम ही पंढरपूर नगरपालिकेला न देता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे वर्ग करून टप...

पंढरी वार्ता:- बाधीत मिळकतदारांवर अन्याय दूर करा अन्यथा उग्र आंदोलन छेडू ! शिवबुध्द युवा प्रतिष्ठाणचा इशारा

Image
   भजनदास चौक ते अंबाबाई पटांगण रुंदीकरण : -  पंढरपूर शहरातील भजनदास चौक ते अंबाबाई पटांगण या रस्त्याचे रुंदीकरणाबाबत या परिसरातील बाधीत होणार्‍या मिळकतदारंाना नुकसान भरपाईची रक्कम स्विकारण्याबाबतच्या नोटीसा आलेल्या आहेत. मात्र या नोटीसीत नमूद करण्यात आलेली नुकसान भरपाईची रक्कम आम्हास मान्य नसून वास्तविक पाहता शहरातील या प्रमुख रस्त्यावर असलेल्या मालमत्तांचे बाजारमुल्य खुप मोठे आहे.असे असताना जुन्याच दरानुसार मिळकतदारांना नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत.या नोटीसा पंधरा दिवस मुदतीच्या असून 22 डिसेंबर रोजीची तारीख असलेल्या या नोटीसा मुदत उलटून गेल्यानंतर 17 जानेवारी रोजी बजावण्यात आलेल्या आहेत.या रस्ता रुंदीकरणाच्या कामात बाधीत मिळकतदारांवर मोठा अन्याय होत असून हा अन्याय दूर केल्याशिवाय आम्ही विटही पडू देणार नाही असा इशारा शिवबुध्द युवा प्रतिष्ठाणच्या वतीने येथील प्रांत कार्यालयात देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.          तसेच हा रस्ता 9 मिटर रुंदीकरण करण्याचे मुळ विकास आराखडयात प्रस्तावित करण्यात आले होते.मात्र आता हा रस्ता 12 मिटर रुंद...

पंढरी वार्ता:- दिलित मित्र कै.नारायणराव धोत्रे यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त सोमवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन !

Image
पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष दिलितमित्र कै.नारायणराव धोत्रे यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त सोमवार दिनांक 22 रोजी पंढरीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सोमवार दिनांक 22 रोजी सकाळी ठिक 11 वाजता ‘पालवी’ येथे मा.आ.सुधाकरपंत परिचारक यांच्याहस्ते व जि.प.सदस्य वसंत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत कार्यक्रमात येथील बालकांना मिष्टान्न भोजन देण्यात येणार आहे.या कार्यक्रमास डॉ.बजरंग धोत्रे,डॉ.राजेश फडे,नगरसेवक नवनाथ रानगट,संग्राम अभ्यंकर,गुरुनाथ अभ्यंकर, विवेक परदेशी,नगरसेविका रेणुका धर्मराज घोडके,समाजसेवक धर्मराज घोडके,युवक नेते दत्तात्रय धोत्रे,प्राथमिक शिक्षण मंडळाचे सदस्य गणेश पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.      सकाळी ठिक 11.30 वाजता निवासी मुकबधीर विद्यालय पंढरपूर येथे नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांच्या शुभहस्ते व मा.उपनगराध्यक्षा सुजाता बडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात येणार आहे.या कार्यक्रमास जिल्हा नियोजन व विकास समितीच्या सदस्या नगरसेविका भाग्यश्री सचिन शिंदे व मा.उपनगराध्यक्ष नागेश भोसले हे प्रमुख पाहुणे म्ह...

पंढरी वार्ता:- भजनदास चौक ते सोलापूर रस्ता रुंदीकरणात बाधीत मिळकतदारांवर अन्याय कशासाठी ? नुकसान भरपाईत दुजाभाव होत असल्याने बाधीत मिळकतदारांकडून संताप व्यक्त

Image
गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेल्या भजनदास चौक ते सोलापूर रस्ता या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या हालचाली प्रशासनाने सुरु केल्या असून या रस्त्यावरील बाधीत होणार्‍या मालमत्ता धारकांना आपल्या मालकी हक्काचे पुरावे सादर करा व नोटीसीत नमूद केल्याप्रमाणे आपली नुकसान भरपाई प्राप्त करण्यासाठी कागदपत्रे द्या अशा आशयाच्या पंधरा दिवस मुदतीच्या नोटीसा पंढरपूर प्रांत कार्यालयाकडून बजावण्यात आलेल्या आहेत.मात्र या नोटीसांवर 22 डिसेंबर 2017 ही तारीख असून प्रत्यक्षात 15 दिवस हरकतीची मुदत उलटून गेल्यानंतर दिनांक 17 जानेवारी 2018 रोजी या नोटीसी मिळकतदारांच्या हातात पडल्या आहेत.या बाबत तातडीने विचार विनिमय करण्यासाठी येथील नंद यशोदा मंदीर येथे बाधीत मिळकतदारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत राजकुमार शहापूरकर यांनी बाधीत मिळकतदारांना मार्गदर्शन करुन अर्बन बँक ते सोलापूर रस्ता या रस्तारुंदीकरणाच्या कामात नुकसान भरपाई देताना जे निकष लावले गेले व नुकसान भरपाई देण्यात आली त्याच प्रमाणे या रस्ता रुंदीकरणात बाधीत होणार्‍या कुुटंबाना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली.व यासाठी प्रसंगी न्यायालयाचे द...

पंढरी वार्ता:- पंढरपूरकरांवर दिडपट पाणीपट्टी वाढीचा बोजा? नगर पालीकेने पिण्याचे पाणी व्यवसायीकांना पुरविल्यास तीनपट दंड वसूली ! जलसंपदा विभागाच्या नव्या आदेशाने पाणीपट्टीचे दर वाढणार !

Image
 राज्यात पाणीपट्टी दरात वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरणाने घेतला आहे. यामध्ये ज्या नगर पालीका क्षेत्रात मिटर शिवाय नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो अशा नगरपालीकांना दिडपट पाणीपट्टीचा बोजा सहन करावा लागणार आहे. पंढरपूर नगर पालीकेने शहरात प्रायोगीक तत्वावर काही मोजक्या नळकनेक्शनसाठी मिटर बसवून चाचणी सुरु केली असतानाच आता थेट नळाद्वारे मिटरशिवाय पाणी पुरवठा करणार्‍या नगर पालीकांना पाणीपट्टीपोटी दिडपट रक्कमेची बिले जलसंपदा विभागाकडून सादर केली जाणार आहेत जलसंपदा नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष के. पी. बक्षी यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.त्याब बरोबर नगर पालीकेने पिण्यासाठीचे पाणी व्यवसायीकांना पुरविल्यास तीनपट आकारणी केली जाणार आहे.पंढरपूर नगर पालीका घरगुती नळकनेक्शन धारकांवरील हा वाढीव दिडपट पाणीपट्टीचा बोजा स्वत: सहन करणार की पंढरपूर शहरातील नळकनेक्शन धारकांकडून वसूल करणार  हे नगर पालीकेच्या आगामी अर्थसंकल्पातच दिसून येईल .याच बरोबर या नियामक प्राधिकरणाने शेतीसाठी आणि घरगुती वापरासाठी पाणीपट्टी दरातही 17 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आह...

पंढरी वार्ता:- 25 टक्के राखीव कोटयातील विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्यास शाळांची मान्यताच रद्द ! बडया संस्था चालकांना धडा शिकविण्यासाठी शासनाचा आदेश

Image
अर्थिक द्रष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खाजगी शिक्षण संस्थामध्ये  25 टक्के आरक्षित जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र या सवलतीचा लाभ मिळविण्यासाठी पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो तर अनेकवेळा संस्थाचालक शिक्षणाधिकार्‍यांना हाताशी धरून आधीच प्रवेशाची यादी निश्‍चित करतात व आम्ही हा कोटा पुर्ण केला आहे अशी उत्तरे देवून रिकामे होतात. यावर्षी मात्र ही प्रक्रिया सुलभ व्हावी या उद्देशाने शासनाने 16 जानेवारी रोजी निर्णय जाहीर करून प्रक्रिया कशी असेल याबाबत स्पष्ट केले आहे. यामध्ये प्रवेशास पात्र असलेल्या शाळांनी पोर्टलवर नोंदणी न केल्यास,अलॉटमेंट झालेल्या विद्यार्थ्यांला कोणतेही कारण नसताना प्रवेश नाकारल्यास,पालकांनी शाळा प्रवेश देत नाही अशी तक्रार केल्यास शिक्षणाधिकारी तपासणी करून तक्रारीत तथ्य आढल्यास शाळेवर मान्यता रद्द करण्याची कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे.       अर्थिक दुर्बल घटकांसाठी आरक्षीत 25 टक्के जागांसाठीच्या प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, किती ङ्गेर्‍या घेतल्या जातील याबाबतही निर्णयात नमूद करण्यात आले आहे. ...

पंढरी वार्ता:- नगर परिषद संचलीत शाळांमधून गुणात्मक आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी परिश्रम घेणार-सभापती विवेक परदेशी लोकमान्य विद्यालयात तिळगूळ वाटपाच्या माध्यातून साधला विद्यार्थ्यांशी संवाद

Image
पंढरपूर नगरपरिषद संचालित लोकमान्य विद्यालयात तिळगुळ समारंभ संपन्न झाला. समारंभ चे प्रमुख पाहुणे सीमाताई परिचारक व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते तिळगुळ वाटप समारंभ झाला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा साधनाताई भोसले होते.    सदर प्रसंगी संक्रांती भेट कार्ड प्रदर्शन चे उद्घाटन नगराध्यक्ष साधनाताई भोसले यांच्या शुभहस्ते झाले.       सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे सिमाताई परिचारक यांनी सर्वांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्ला व नुतन शिक्षण समिती सभापती विवेक परदेशी यांना जी जबाबदारी दिली ती ते निच्छितच चांगल्या प्रकारे पार पाडतील व लोकमान्य विद्यालयाचे नावलौकिक करतील असे सांगितले .    यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नगराध्यक्षा साधना भोसले म्हणाल्या की,लोकमान्य विद्यालय शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा केलेली पंढरपुरातील जुनी शाळा आहे. या शाळेतील विध्यार्थीना सोय सुवीध पुरविल्या जाततील व विध्यार्थीच्या आवश्यकते नुसार जादा तास घेण्यात यावेत.व या स्पर्ध्देच्या युगात या शाळांमधील मुले आणखी सक्षमपणे आपला भविष्याकाळ उज्वल करण्यसाठी सज्ज झाली पाहीजेत. ...

पंढरी वार्ता:- भजनदास चौक ते अंबाबाई पटांगण रस्ता रुंदीकरणाच्या नोटीसा निघाल्या ! शहराच्या पहील्या विकास आराखडयातील कामास 40 वर्षांनी मुहुर्त ?

Image
सोलापूरसह मराठवाडा,विदर्भ,कर्नाटक,आंध्रपदेश आदी ठिकाणाहून येणार्‍या भाविकांच्या वाहनांसाठी पंढरपूर शहरात प्रवेश करण्याचा मुख्य आणि एकमेव मार्ग असलेल्या अंबाबाई पटांगण ते भजनदास चौक या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबीत होते.1967 साली तयार करण्यात आलेल्या पंढरपूर शहराच्या पहील्याच विकास आराखडयात या कामाचा समावेश होता.या ठिकाणचा रस्ता अतिशय अरुंद असून बाराभाई तालीम चौक ते भाई मुरलीधर थोरात चौक हा रस्ता तर केवळ आठ फूट रुंदीचा आहे.या रस्त्यावर एकजरी चारचाकी वाहन आले तरी दोन्ही बाजूकडे वाहनांच्या रांगा लागत असल्याचे दृश्य नित्याचे होते.तर पंढरपूर शहरात प्रवेश करताच या अतिअरुंद रस्त्याच्या ट्राफीक जाममध्ये फसलेल्या भाविकांकडून देशातील प्रमुख तिर्थक्षेत्र असलेल्या ठिकाणच्या या परिस्थीतीबद्दल नाराजी व्यक्त होत होती.शहरातील प्रदक्षिणामार्गासह इतरही मार्गाचे रूंदीकरण झाले मात्र या रस्त्याचे काम हाती घेण्यात राजकीय अडथळा हेच मोठे कारण ठरले होते.मात्र तात्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे हे 65 एकराचा परिसर विकसीत करण्यासाठी या भागातून वारंवार जाताना त्यांना या प्रमुख रस्त...

पंढरी वार्ता:- पंढरपूरकरांची तहान भागविण्यासाठी राबणारे कंत्राटी कामगार न्यायाच्या प्रतिक्षेत ! सव्वोर्च न्यायालयाच्या निर्णयाची व मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनाची अंमलबजावणी केव्हा ?

Image
पंढरपूर नगर पालीका पाणी पुरवठा विभागाकडे गेल्या 15 वर्षापासून कंत्राटी कामगार म्हणून काम करीत असलेल्या 10 कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी गरज आहे ती माणुसकीची व सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या अंमलबजावणीची. पंढरपुर शहराची लोकसंख्या गेल्या वीस वर्षात जवळपास दुप्पट झाली आहे.त्याच बरोबर शहरात असलेल्या मठांच्या वाढत्या संख्येमुळे तसेच शहरालगतच्या गोपाळपूरसह काही लोकवस्तीना पंढरपूर नगर पालीकेच्या पाणी पुरवठा विभागावर मोठा ताण पडत असतो.या विभागाकडे मोठया प्रमाणात कर्मचार्‍यांची आवश्यकता असतानाही 1996 नंतर या विभागाकडे नव्याने कायमस्वरुपी कर्माचारीच नियुक्त झाले नसल्याचे दिशून येते.सद्य स्थितीत 1996 पेक्षा निम्मेच कायम कर्मचारी  या विभागात कार्यरत आहेत.     गेल्या पंधरा वर्षापासून नगर पालीका पाणी पुरवठा विभागाकडुन ठेकेदाराच्या मार्फत कंत्राटी कामगारांकडुन शहरातील पाणी पुरवठा पाईललाईनची दुरुस्ती तसेच इतर सर्व कामे करुन घेतली जातात.अनेक वेळा कंत्राटी कामगारांचा ठेकेदार बदलतो पण कामगार मात्र तेच असल्याचे दिसून येते.या कामगारांना शहरातील सर्व रस्त्यावरील व उपनगरातील पाईपलाईनची खड...

पंढरी वार्ता:- रामबागेचा ताबा घेण्यासाठी आलेल्या निरिक्षकास सोलापूरचे पुढारी राजन जाधव यांनी रोखले ! मुख्य प्रवेशद्वार दगड आडवे लावून बंद केले ! धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे पथक रिकाम्या हाताने परतले !

Image
पंढरपूरातील एकेकाळी नामवंत व मोठी संस्था म्हणून गणल्या गेलेल्या रामबाग संस्थेची शेकडो एकर जमीन पंढरपूर तालुक्यात आहे.तर शहरात या संस्थेच्या मालकीची अब्जावधीर रुपये किमतीची जागा आहे.त्याच बरोबर देवाचे वस्त्रअलंकार  आहेत.मात्र गेल्या अनेक वर्षापासून या संस्थेची अवस्था अतिशय बकाल झाल्याचे दिसून येत होते.रामबाग म्हणून गणल्या गेलेल्या या जागेचा अक्षरश हागणदारी म्हणून उपयोग होताना दिसून आला.कासेगाव येथे याच संंस्थेची जवळपास दोनशे एकर जमीन आहे तर आढीव आणी वाखरी परिसरातही शेकडो एकर जमीन आहे.मात्र या संस्थेच्या विश्‍वस्तांनी गेल्या कित्येकवर्षात या संस्थेची अर्थिक स्थिती अतिशय भक्कम असतानाही जी दुरावस्था केली होती यामागे या संस्थेच्या विद्यमान विश्‍वस्तांना नक्की काय हेतू होता हे एक गौडबंगालच होते.पंढरी वार्ताच्या माध्यामतून गेल्या काही महिन्यात या संस्थेबाबत सातत्याने बातम्या प्रकाशित करुन धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे तसेच संस्थेशी संबधीत सर्व देणगीदार,हितचिंतकांचे लक्ष वेधून घेण्याचे काम आम्ही केले होते.याची दखल घेत धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून या संस्थेच्या निलंबीत विश्‍वस्तांकडून संस्थेच...

पंढरी वार्ता:- नवे ‘बडवे’ तयार होऊ नयेत याची जबाबदारी शासननियुक्त समितीचीच ! अन्यथा भाविक पुन्हा ‘हटाव’चा नारा देतील !

Image
बडवे आणि उत्पात यांच्या कचाट्यातून पंढरीचा विठ्ठल आणि रखुमाई यांची  मुक्तता झाली.  पंढरपूरच्या मंदिरात बडवे आणि उत्पातांना असलेले सर्व अधिकार सुप्रीम कोर्टाच्या एका आदेशामुळे संपुष्टात आले. पिढ्यानपिढ्याची मक्तेदारी संपल्याने मंदिराचे व्यवस्थापन आता सरकारने नेमलेल्या मंदिर समितीकडे गेले.  पंढरपूरचे विठ्ठल मंदिर गेल्या अनेक पिठ्यांपासून बडवे, उत्पातांच्या ताब्यात होते. त्यांच्याकडून भक्तांना होणाऱ्या त्रासाबाबत १९५२पासून विधानसभेत वारंवार वाद होत होते. यावर सरकारने १९६८ मध्ये 'नाडकर्णी कमिशन'ची स्थापना केली. समितीच्या अहवालानंतर १९७३मध्ये विठ्ठल मंदिर ताब्यात घेण्यासाठी पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर कायदा संमत करण्यात आला. या कायद्याला बडवे मंडळीनी थेट सुप्रीम कोर्टात आव्हान दिल्यानंतर कोर्टाने त्यांना कनिष्ठ कोर्टातून तुमचे हक्क शाबित करून घेण्यास सांगितले गेले आणि त्यानंतर प्रत्येक कोर्टाने बडवे मंडळींच्या विरोधात निकाल दिला. अखेर १९८५ मध्ये मुंबई हायकोर्टाने बडवे मंडळींचे काही हक्क अबाधित ठेवत मंदिर शासनाच्या ताब्यात दिले. यानंतर २६ फेब्रुवारी १९८५ रोजी बाळासाहेब भार...

पंढरी वार्ता:-एकच कामगार कल्याण अधिकारी ! जिल्हाभर तपासणीची जबाबदारी ! पंढरपूर शहर व तालुक्यातील 3 हजार आस्थापनांच्या तपासणीचे शिवधनुष्य पेलणार ?

Image
महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम 1953 अनुसार पंढरपूर शहर व तालुक्यातील दुकाने,व्यवसायीक आस्थापना,संस्था व कारखाने यांच्याकडे कार्यरत असलेल्या कामगारांच्या कल्याणसाठी विविध योजनार राबविण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र कामगार कल्याण विभागाची स्थापना केली.या विभागाकडे नोंदणीकृत असलेल्या आणि नसलेल्या वर नमूद केलेल्या सर्वच आस्थापना मधील नियमीत,हंगामी,कंत्राटी कामगार व त्यांच्या कुटुंबास मदत करता यावी या हेतूने कामगार आणि मालक वर्गंणी आणि शासनाचे अंशदान अशा स्वरुपात निधी उपलब्ध करुन योजना राबविल्या जातात.पंढरपूर शहर व तालुक्यात अनेक खाजगी व्यवसायीक आस्थापनामध्ये मोठया संख्येने अल्पवेतनावर कुठलीही शाश्‍वती अथवा नोकरीची हमी नसताना वेळेचे बंधन झुगारून हजारोंच्या संख्येने कामगार काम करीत असलेले दिसून येतात.मात्र संपुर्ण सोलापूर जिल्ह्यासाठी केवळ एकच कामगार कल्याण अधिकारी आहेत तर या कार्यालयाचे कार्यक्षेत्र संपुर्ण सोलापूर जिल्हा असतानाही हाताच्या बोटावर मोजता येईल इतकाच कामगार वर्ग आहे.त्यामुळे पंढरपूर शहर व तालुक्यातील खाजगी आस्थापनामध्ये काम करणार्‍या कामगारांचे कल्याण होणार ...

पंढरी वार्ता :- स्पर्धा परीक्षा क्लासेस येणार कायद्याच्या कचाट्यात !

Image
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात सर्वाधिक गर्दी सध्या स्पर्धा परीक्षा क्‍लासेसला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची आहे. त्या तुलनेत खासगी क्‍लासेस व गल्लोगल्ली सुरू झालेल्या अभ्यासिका यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. मात्र, आता यावर नियंत्रण येणे गरजेचे असल्याने शासनाकडून आता खासगी क्‍लासेस संदर्भातील कायद्यात स्पर्धा परीक्षांच्या क्‍लासेसचाही समावेश करण्याचा विचार सुरू आहे. राज्यात सध्या एखाद्या सरकारी जागेच्या परीक्षेसाठी लाखोने अर्ज येतात. लाखोंच्या संख्येने विद्यार्थी स्पर्धा परीक्षांना राज्यभरातून बसतात. यामुळेच राज्यात ठिकठिकाणी स्पर्धा परीक्षा केंद्र, क्‍लासेस, अभ्यासिका सुरू झाल्या आहेत. यामध्ये काही क्‍लासेसची राज्यभर केंद्रे आहेत. याही क्‍लासेससाठी कोणतीही नियमावली नाही. याबाबत सध्याच्या खासगी क्‍लासच्या समितीतील क्‍लासचालकांनी प्रश्‍न उपस्थित केला की जर हा कायदा आम्हाला लागू होऊ शकतो तर तो बारावी पुढील शिक्षण घेणाऱ्यांसाठी का नाही? हा प्रश्‍न उपस्थित केल्यानंतर आता शासनाने बारावीनंतरच्या क्‍लासचाही यामध्ये विचार करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच खासगी क्‍लास कोणाला म्हणा...

पंढरी वार्ता :- शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत २६ जानेवारीस संविधान बचाव लाँग मार्च !

Image
26 जानेवारी रोजी मुंबईत  शरद पवार, शरद यादव, महात्मा गांधीचे पणतू तुषार गांधी, सीताराम येचुरी, हार्दिक पटेल, गणेश देवी, बी जी कोळसे पाटील यांच्यासह विविध पक्षातील नेत्यांच्या उपस्थितीत  सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह सामाजिक व संविधानप्रेमी यांच्यातर्फे संविधान बचाव सत्याग्रह आंदोलन करत लाँग मार्च  काढला जाणार आहे.     मुंबईत मंत्रालयाजवळील आंबेडकर पुतळ्यापासून ते गेट वेवरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत हा लाँग मार्च काढण्यात येणार आहे. शेतकरी नेते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या संकल्पनेतून हा संविधान बचाव मार्च काढला जाणार आहे. या लाँग मोर्चाचे कोणीही नेतृत्त्व करणार नाही. संविधानप्रेमी हा संविधान बचाव सत्याग्रह लाँग मार्च काढत आहोत  .