Posts

Showing posts from May, 2018

पंढरी वार्ता:- पंढरपूर शहर युवक कॉग्रेसच्या वतीने पंढरीत भारत बचाओ जनआंदोलन !

Image
राज्यातील शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्या,राष्ट्रीयकृत बँकाची बडया उद्योगपतींनी मोठया प्रमाणात  कर्जे थकविल्यामुळे वाढलेला एनपीए,दररोज होत असलेली पेट्रोल डिझेलची दरवाढ,वाढती महागाई,बेरोजगारांची वाढती संख्या,भ्रष्टाचार व संवीधान बदलण्याचा प्रयत्न यामुळे या सरकारच्या विरोधात देशभरात असलेल्या विरोध प्रकट करण्याच्या हेतूने आज पंढरीत युवक कॉगे्रसच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी चौक येथे भारत बचाओ जनआंदोलन करुन शासनाचा निषेध करण्यात आला.       या बाबत बोलताना पंढरपूर शहर युवक कॉग्रेसचे अध्यक्ष अमित डोंबे म्हणाले की,देशभरात या सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष असून सामान्य नागरिकांना अच्छे दिनाचे अमिष दाखवून सत्ता संपादन केल्यानंंतर या सरकारने केवळ काही मोजक्या बडया उद्योगपतींचे हित जोपासण्याचे काम केले आहे.देशात बेरोजगारी वाढत असताना,सामान्य जनता इंधन दरवाढीमुळे वाढलेल्या महागाईत पिचून जात असतानाही गेंडयाच्या कातडीचे हे सरकार नागरिकांच्या समस्या सोडविण्याऐवजी स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात मग्न आहे.देशभरात या सरकारचा निषेध करण्यासाठी कॉग्रेसच्या वतीने भारत बचाओ जनआंदोलन करण्या...

पंढरी वार्ता:- पंढरपूर नगर पालीका व अन्न भेसळ विभागाच्या वतीने कॅन्सरग्रस्त रुग्णांना अर्थिक मदत करा. शहीद टिपू सुलतान युवक संघटनेची निवेदनाद्वारे मागणी

Image
राज्य शासनाने गुटखा व सुगंधी तंबाखू विक्रीवर बंदी घातल्यानंतरही पंढरपूर शहर व तालुक्यात मोठया प्रमाणात गुटखा विक्री केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे.कॅन्सर सारख्या जिवघेण्या व वेदनादायी आजारास कारणीभूत ठरणार्‍या गुटख्यामुळे अनेकजण या आजारास बळी पडत आहे.गुटखा बंदीच्या अंमलबजावणीतील अपयश लक्षात घेवून अन्न विभागाने व नगर पालीकेने कॅन्सर ग्रस्त रुग्णांना अर्थिक मदत करावी अशी मागणी शहीद टिपू सुलतान युवक संघटना व सामाजिक परिर्वन विचार मंचच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.          या बाबत अधिक माहीती देताना शहराध्यक्ष जमीर तांबोळी म्हणाले की,पंढरपूर शहर व तालुक्यात सर्रास चोरून गुटखा विक्री केली जात आहे.गुटखा बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यास येथील अधिकारी अक्षम्य हलगर्जीपणा करीत आहेत.या बाबत अन्न विभागाचे पंढरपूर शहर निरिक्षक विनायक शेटे यांच्याकडे लेखी अथवा तोंडी तक्रार केली असता‘मी लवकरच सेवानिवृत्त होणार आहे,मला टेन्शन देवू नका असे सांगत असताना दिसून येतात.तर तालुका अन्न निरिक्षक केव्हातरी सोलापूरातून येवून तपासणीचा फार्स पुर्ण करतात.त्यामुळे चोरून गुट...

पंढरी वार्ता:- पेट्रोल,डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ पंढरीत राष्ट्रवादीचा बैलगाडी मोर्चा ..तर जनताच सरकारच्या विरोधात हातात आसूड घेईल ! - राजूबापू पाटील

Image
 पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने आज येेथील प्रांतकार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.शासनाने इंधनाच्या किमतीवर तातडीने नियंत्रणात आणाव्यात,इंधनाचे दर वाढल्याने जिवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये मोठया प्रमाणात वाढ होत आहे.ही परिस्थीती तात्काळ नियंत्रणात न आणल्यास जनतेच्या संतपाचा ऊद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही व राष्ट्रवादी कॉग्रेस उग्र आंदोलन छेडेल अशा आशयाचे निवेदन येथील प्रांतअधिकारी कार्यालयात देण्यात आले.     या मोर्चाच्या समारोप प्रसंगी बोलताना राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य राजूबापू पाटील म्हणाले की,रोज सकाळी झोपेतून उठताच सामान्य जनतेला इंधन दरवाढीचा सामना करावा लागत आहे. गेंडयाच्या कातडीचे हे सरकार मात्र अच्छे दिनाचे कौतुक सांगण्यात व्यस्त आहे.या सरकारचा निषेध म्हणून आज बैलगाडी मोर्चा काढत आहोत,मात्र आमच्या सहनशिलतेचा शासनाने अंत पाहू नये कदाचित उद्या  शासनाविरोधात जनताच आसूड घेवून बाहेर पडेल असा इशारा राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य राजूबापू पाटील यांनी दिला.नोटबंदी आणि जीएसटीने सामान्य जनतेचे आधीच कंबरडे मोडलेले ...

पंढरी वार्ता:- मुस्लिम ऑल बॅकवर्ड संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी अश्पाक भालदार यांची निवड. पंढरीत झालेल्या बैठकीत विविध पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहीर

Image
मुस्लिम ऑल बॅकवर्ड संघटनेच्या पंढरपूर तालुकाध्यक्षपदी अश्पाक भालदार यांची निवड करण्यात आली आहे.येथील शासकिय विश्रामगृह येथे जिल्हाध्यक्ष बिलाल शेख,जिल्हा उपाध्यक्ष आदम मुजावर,लाला मुलाणी,माळशिरस तालुकाध्यक्षजुबेर दुरुगकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या निवडी जाहीर करण्यात आल्या. यावेळी अस्लम पठाण(पंढरपूर तालुका उपाध्यक्ष),सद्दाम नाडेवाले(शहर कार्याध्यक्ष),पीरसाहेब जमादार(जिल्हा कार्यकारीणी  सदस्य) यांनाही निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.              यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष बिलाल शेख म्हणाले की,मुस्लिम समाजातील अर्थिक द्रष्टया मागासवर्गिय तसेच ओबीसी जमातींना जातीचे दाखले मिळण्यात वारंवार अडचणी येत आहेत.त्याच बरोबर शिक्षण हक्क कायद्यानुसार मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशाबाबतही अनंत अडचणींचा सामना करावा लागतो.अर्थिक द्रष्टया मुस्लिम समाज हा अतिशय दुर्बल असून रोजच्या व्यवसायावर गुजराण करणारा आहे.विविध योजनांचा आणि सवलतींचा लाभ समाज बांधवांना मिळावा यासाठी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी व कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहीले पाहीजे.   ...

पंढरी वार्ता:- अस्वस्थ भीमाकाठ संतप्त शेतकरी,काळेंचा मोर्चा,आ.भालकेंचा इशारा ! अन् आमदार बबनदादा शिंदेचे मौन ! खा.महाडिकांचा‘दौरा’नसल्याने प्रतिक्रिया नाही !

Image
गतवर्षी उजनी धरण पाणी वाटपाबाबत दोन वर्षाच्या नियोजनाची घाट घातला होता तर यावर्षी सोलापूर शहरासाठी अमृत योजनेतून शासनाने 439 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करीत समांतर जलवाहीनीस मंजुरी दिली आहे.या दोन्ही घटना भीमा नदीकाठाच्या शेतकर्‍यांच्या द्रष्टीने अतिशय महत्वपुर्ण आहेत.सद्या भीमा नदीकाठ अतिशय संतप्त व अस्वस्थ असताना जिल्हयाचे पालकमंत्रंी ना.विजयकुमार देशमुख हे हा  प्रश्‍न गंभीरतेने हाताळताना दिसत नाहीत.त्यामुळेच ते  केवळ सोलापूर शहराचेच पालकमंत्री आहेत की काय ? अशी भावना नदीकाठच्या शेतकरी वर्गामध्ये निर्माण झाली आहे.तर सोलापूर लोकसभा निवडणूक पुन्हा एकदा लढविण्याच्या तयारीत असलेेल सुशिलकुमार शिंदे हेही या बाबत मौन बाळगून असून पंढरपूर-मोहोळ,मंगळवेढा तालुक्यातील काही ठरावीक नेत्यांना हातशी धरले आणि रसद पुरवली की निवडणूकीत स्थानिक नेते पळतात या भ्रमात राहून निवडणूक लढविण्याचे दिवस उरलेलेे नाहीत हे त्यांनी लक्षात घ्यावे अशी भावना कॉग्रेसचे पारंपारीक समर्थक असलेले अनेक ज्येष्ठ नागरिक व्यक्त करीत आहेत.  सत्ताधारी व विरोधी पक्षातील अनेक वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेते या गंभीर प्रश्‍ना...

पंढरी वार्ता:- गोपाळपूरच्या सरपंचपदी परिचारक गटाच्या विजया जगताप यांची निवड नाटयमय घडामोडीत परिचारक गटाची सरशी !

Image
कॅप्शन जोडा पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील सरपंचपदी परिचारक गटाच्या विजया विठ्ठल जगताप यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे.यापुर्वीच्या सरपंच विमल शिवाजी आसबे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्‍वास ठराव 14 विरुध्द शुन्य मतांनी मंजूर झाल्यानंतर बुधवारी सरपंच निवडीसाठी मतदान घेण्यात आले.यामध्ये परिचारक गटाच्या विजया जगताप यांना 9 मते मिळाल्याने त्या विजयी झाल्या तर विरोधी आ.भालके गटाच्या प्रिंयका रघुनाथ पवार यांना केवळ 6 मते मिळाली. गोपाळपूर ग्रामपंचायतीमध्ये एकुण 15 सदस्य असून 9 महिला तर 6 पुरुष सदस्य आहेत.गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत सर्व राजकीय गटांनी एकत्र येत आघाडी करुन निवडणूक लढविण्यात आली होती.व आ.भालके गटाच्या विमल शिवाजी आसबे यांना अडीच वर्षे कालावधीसाठी सरपंच पदाची संधी देण्याचे सर्वानुमते ठरले होते.मात्र हा कालावधी पुर्ण झाल्यानंतर त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याने त्यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव मंजुर करण्यात आला होता.या नंतर सरपंच पदाच्या निवडणूकीत लक्ष घालत आ.भालके गटाकडून काहीही करुन गोपाळपूर ग्रामपंचायतीवर आपल्याच गटाचा सरपंच झाला पाहीजे यासा...

पंढरी वार्ता :- शेतकऱ्यांना वेठीस धरल्यास अधिकाऱ्यांना फिरू देणार नाही जि.प.सदस्या शैला गोडसे यांचा इशारा; बेगमपूर येथे रास्ता रोको

Image
उजनीतून भीमा नदीत तात्काळ पाणी सोडावे, सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून द्यावेत आदी मागण्यांसाठी भीमा नदीकाठ बचाव संघर्ष समितीच्यावतीने गुरूवारी (दि.२४) जि.प. सदस्या शैला गोडसे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर-मंगळवेढा मार्गावरील बेगमपूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल दीड तास चाललेल्या या आंदोलनामुळे दोन्हीकडील वाहतूक ठप्प झाली. पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतरच हे आंदोलन थांबविण्यात आले. दरम्यान, पाण्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरल्यास अधिकाऱ्यांना फिरू देणार नाही, दिसतील तेथे घेराव घालून जाब विचारू, असा इशाराही गोडसे यांनी यावेळी दिला. नदीकाठची शेती आणि शेतकरीही महत्वाचे केवळ सोलापूर शहराचा पाणीपुरवठा डोळ्यासमोर ठेवून नदीत पाणी सोडण्याचे नियोजन केले जाते. तोपर्यंत नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसतो. यापुढील काळात नदीकाठाचे शेतकरी आणि शेतीचा प्राधान्याने विचार करून पाणी सोडण्याचे ठोस नियोजन झाले पाहिजे, असेही शैला गोडसे म्हणाल्या. भीमा नदीत पाणी सोडण्याच्या विषयावर नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. महिनाभरापासून नदीचे पात्र क...

पंढरी वार्ता:- जेथे सत्ता संपादनाचा निर्धार, तेथेच ‘दमदार’ उमेदवार देण्याचे भारिप बहुजन महासंघासमोर आव्हान ! 2019 च्या विधानसभा निवडणूकीत निणार्यक तिसरा उमेदवार कोण ? याच्या चर्चेला सुरुवात.

Image
भारिप बहुजन महासंघाचे नेते ऍड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रविवारी पार पडलेल्या धनगर समाज सत्ता संपादन निर्धार मेळाव्यास सोलापूर जिल्ह्यातील विशेषत: पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील धनगर समाज बांधवांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती.भारत हा देश हा घटनात्मक द्रष्टया धर्मनिरपेक्ष असला तरी व महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी म्हणून ओळखले जात असले तरी या राज्यातील प्रत्येक निवडणुकीत जात हा महत्वाचा फॅॅक्टर म्हणून ओळखला जातो.विधानसभा अथवा लोकसभा निवडणूकाच काय तर अगदी नगर पालीका अथवा ग्रामपंचायतीच्या निवडणुकात देखील त्या संबधीत प्रभागातील,वार्डातील जातींच्या मतदारांची संख्या विचारात घेवून उमेदवार निश्‍चित केले जातात.राज्यात 2014 मध्ये झालेल्या सत्तांतरानंतर मोठया प्रमाणात जातीय धृवीकरण होताना दिसत आले असून एकीकडे मराठा समाजातील अर्थिक द्रष्टया दुर्बल घटक मराठा समाजास आरक्षणाची मागणी करीत आहे तर  धनगर समाज इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही धनगर समाजास अनुसुचीत जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष करीत आहे.15 वर्षाच्या सत्ताकाळात कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉगेे्रसने धनगर समाजाच्या आरक्षणाच्या ...

पंढरी वार्ता:- कर्नाटकातील येदियुरप्पा सरकार दिड दिवसात कोसळले ! पंढरीत कॉग्रेसच्या वतीने जल्लोष

Image
कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाने दडपशाहीचे,दबावाचे व पैशाचे राजकारण करीत कॉग्रेस-जेडीएसचे बहुमत नाकारत सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न केला.सुप्रिम कोर्टाने 48 तासात विधासभेत बहुमत सिध्द करण्याचे आदेश दिल्यानंतर आज कर्नाटक विधानसभेत भाजपा सरकारला बहुमत सिध्द न करता आल्याने या सरकाला दिडदिवसात राजीनामा द्यावा लागला असून हा भारतीय राज्यघटनेचा मोठा विजय आहे.येदिुरप्पा सरकार पायउतार झाल्याचे समताच पंढरीत कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौक येथे फटाके फोडून,गुलालाची उधळण करीत व पेढे वाटत जल्लोष साजरा केला.        यावेळी कॉगेे्रसचे ज्येष्ठ कार्यकर्ते दत्तात्रय बडवे,मा.अध्यक्ष सुहास भाळणवर,अशपाक सय्यद,शंकर सुरवसे,प्रतापसिंह परदेशी,बाळासाहेब मस्के,दत्तात्रय मस्के,रफीक नाडेवाले,देवानंद इरकल,दत्तात्रय झरकर,अमजत खाटे,शेखर मंगेडकर,मुन्ना शेख,ज्ञानेश्‍वर मस्के,मसुरे सर,घोटकर सर,वनिता बनसोडे,सुरज काकडे आदी उपस्थित होते.पंढरीत कॉग्रेेसची वाटचाल मा.केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे,आ.भारत भालके,तालुका कॉग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनखाल...

पंढरी वार्ता:- 3 जून रोजी पंढरीत धनगर समाजाचा वधू-वर मेळावा. धनगर समाजातील वधू-वर व पालकांनी उपस्थित राहण्याचे संयोजकांचे आवाहन

Image
पंढरपूर धनगर समाज वधु वर सुचक मंडळाच्या वतीने रविवार  3 जून  2018 रोजी  संत फरताळे दिंडी क्रमांक  9 भक्ती मार्ग पंढरपूर मध्ये  सकाळी  10 ते  5 वाजेपर्यंत वधु वर मेळावाच्याचे आयोजन करण्यात आले आहे.सदर कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांच्याहस्ते होणार असुन  डी सी सी बँकेचे संचालक चंद्रकांत देशमुख,फॅबटेकचेे चेअरमन भाऊसाहेब रूपनर,बाळासाहेब गडदे पाटील, पंचायत समितीचे मा.सभापती वामनराव माने,विठ्ठल नाना पाटील,निर्मला पाटील, डॉ एम आर टकले, डॉ श्रीकांत देवकते,डॉ सुनिल कारंडे,श्रीधर कारंडे,दिपक येळे,आझाद अल्लापूरकर,ऍड.महेश काळे,विजय माने,महादेव वाघमोडे आदींसह समाजबांधव उपस्थित राहणार आहेत.        या कार्यक्रमास समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पंढरपूर धनगर समाज वधु वर सुचक मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ भिसे यांनी केले आहे .अधिक माहितीसाठी 9766249191 या मोबा.नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

पंढरी वार्ता:- अंबाबाई ‘पटांगण’ नव्हे आता होणार ‘क्रिडांगण’ ! जिल्हाधिकार्‍यांचे नगर पालीका प्रशासनास पत्र. नगर पालीकेच्या लेखी आश्‍वासनानंतर शिवक्रांती संघटनेचे उपोषण मागे. क्रिडा शौकिन व पालकवर्गाकडून व्यक्त होत आहे समाधान.

Image
पंढरपूर शहाराच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारावरच असलेले अंबाबाई पटांगण हे एकेकाळी या शहरातील नगर पालीका शिक्षण मंडळाच्या अखत्यारीतील अनेक शाळांचे अधिकृत क्रिडांगण म्हणून ओळखले जात होते.तर शहराच्या जवळपास निम्म्या लोकवस्तीतील मुले या पटांगणाचा वापर मैदानी खेळासाठी करीत होते.मात्र पुढे यात्राकालावधीत पंढरपूरात येणार्‍या भाविकांच्या वाहनांसाठी पार्कींंग स्थळ म्हणून या पटांगणाचा वापर करण्यात येवू लागला यातच भरीस भर म्हनून या पटांगणाच्या जागेत मोठया प्रमाणात अतिक्रमणे वाढत गेली हे 195 पासून तेे आतापर्यंतच्या सॅटेलाईट सर्व्हेतून निदर्शनास येते.1 लाख लोकवस्तीच्या या शहरात नगर पालीकेच्या मालकीचे सर्वसुविधा युक्त एकही क्रिडांगण नसल्याने क्रिडाप्रेमी  नागरिक व पालकांच्या भावना लक्षात घेवून शिवक्रांती संघटनेने अंबाबाई पटांगण हे क्रिडांगण म्हणून विकसीत केले जावे यासाठी सातत्याने लोकशाही मार्गाने लढा दिला होता.नगर पालीकेसमोर भररस्त्यावर क्रिेकेट मॅचचे आयोजन करुन अनोखे आंदोलनही केले होते.                 या आंदोलनाची दखल न घेतल्यास सोलापूर येथील जिल्हाधिकारी...

पंढरी वार्ता:-‘ रेनी’सिझनला केवळ 20 दिवसांचा अवधी तर आषाढी यात्रेच्या वर्दळीस 40 दिवस बाकी ! कामांची ‘गडबड’ टाळण्यासाठी आतापासूनच नियोजनाची गरज !

Image
पंढरी वार्ता विशेष:-         महाराष्ट्रात पूर्वी कालनिर्णय आणि महालक्ष्मी कॅलेंडर तसेच दाते पंचांग या तीनच दिनदर्शिका प्रकाशित होत होत्या. कुठली तिथी, वार, सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी कुठल्या महिन्यात किती तारखेला आहे याची तपशिलवार माहिती या कॅलेंडरमधून जनतेला मिळत होती. मात्र आता गावागणिक शेकडोनी कॅलेंडर निघत असताना आषाढी एकादशी किती तारखेला आहे? हे आषाढी यात्रेचे नियोजन करणार्‍या व या नियोजनास आपत्ती व्यवस्थापनाचे गोंडस नाव देणार्‍या प्रशासनास फक्त एक महिना आधीच समजते की काय? असा प्रश्‍न पडल्याशिवाय राहत नाही. तीर्थक्षेत्र विकासाच्या नावाखाली गेल्या जवळपास आठ वर्षांपासून पंढरपूर शहरासाठी कोट्यावधी नव्हे तर अब्जावधी रूपयांचा निधी उपलब्ध करण्यात येत आहे. या माध्यमातून पंढरपूर शहरात भाविकांच्या समस्या लक्षात घेवून विकास कामे होणे अपेक्षित असताना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असूनही अनेक कामे रखडलेली दिसून येतात. मात्र आषाढी यात्रा एक-दिड महिन्यावर आल्यावर अगदी मंत्रालयापासून ते ग्रामपंचायतीपर्यंत प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी होत असल्याचे  अनेकवेळा निदर्शनास ...

पंढरी वार्ता:- जुन्या कोर्टाच्या जागेचा सुदुपयोग व्हावा, नागरिकांमधून व्यक्त करीत होत आहे अपेक्षा ! सहकार न्यायालय,कामगार न्यायालय,धर्मदाय सह.आयुक्त कार्यालय,कौटुंबीक न्यायालयासाठी या ठिकाणी भव्य इमारत उभारण्यात यावी-ऍड.राजेश भादुले

Image
पंढरी वार्ता विशेष:-          गेल्या जवळपास 80 वर्षापासून पंढरपूर शहर व तालुक्यातील अनेक फौजदारी व दिवाणी खटल्यांची सुणावनी करत अनेक कठोर निकाल देत पंढरपूरकरांच्या मनात एक भितीयुक्त आदराचे स्थान प्राप्त केलेल्या शहरातील जुन्या कोर्टाची इमारत गेली चार वर्षे धुळखात पडून आहे.शहराच्या मध्यवर्ती भागात,अतिशय मोक्याच्या ठिकाणची ही जागा नक्की कुणाची याचीही उत्सुकता नागरिकांना लागली आहे.अंबाबाई पटांगण ते अर्बन बँक या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सद्या प्रगतीपथावर असून या रुंदीकरणात ही जुन्या कोर्टाची बरीचशी जागा संपादन होणार आहे.त्यामुळे सद्या येथे बाधीत क्षेत्र सोडून कंपाउंड वॉल बांधण्यात येत आहे तर येथील बाररुमही पाडण्यात येत आहे.               ऍड.भाऊसाहेब काणे,ऍड.मा.आ.नारायणराव पटवर्धन,मा.नगराध्यक्ष ऍड.भगवानराव भादुले ऍड.रामभाऊ ताठे,ऍड.मामासाहेब काणे,ऍड.विनायक वेळापुरे, ऍड.यादगीरी,ऍड.कोंडेजकर, ऍड.राजाभाउ पटवर्धन आदी पंढरीतील एकेकाळच्या दिग्गज वकीलांचा वावर या कोर्टात असायचा.पंढरीतील अनेक गाजलेल्या खून खटल्यांची सुानवणी जेव्हा या इम...

पंढरी वार्ता:- आता पंढरीतील 2011 पुर्वीच्या असंरक्षित झोपडपट्टी धारकांनाही मिळणार ‘परवडणारी घरे’? शासनाच्या नव्या आदेशाने अनेकांच्या आशा पल्लवीत !

Image
पंढरी वार्ता विशेष:-          केंद्र शासनाने 2022 पर्यंत सर्वांसाठी परवडणार्‍या किमतीत घरे उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रधानमंत्री शहरी आवास योजने अर्तंगत झोपडपट्टी धारकांना तसेच अर्थिक द्रष्टया दुर्बल घटाकांना गृहबांधणीसाठी अर्थसहाय्य दिले जात आहे.पंढरपूर शहरातही या योजनेचा लाभ मिळावा म्हणून मोठया प्रमाणात अर्ज दाखल करण्यात आले आहेत.झोपडपट्टी वासीयंाना पक्की घरे देताना नागरी क्षेत्रासाठी सन 2000 हा निकष अस्तित्वात आहे.त्यामुळे या नंतर शहरात नव्याने वसलेल्या अनेक झोपडपट्टी धारकांना पुर्नवसन योजनेचा अथवा गृहबांधणी योजनेचा लाभ मिळत नाही.व हीच परिस्थीती संपुर्ण राज्यात आहे.        एकीकडे केंद्र व राज्य शासन अर्थिक द्रष्टया दुर्बल घटकांना व झोपडपट्टी धारकांना  परवडणार्‍या किमतीत घरे देण्यासाठी मोठया प्रमाणात योजना आखत असतानाच संरक्षीत झोपडपट्टी कायद्याचा त्यास मोठा अडसर ठरत होता.यातून मधला मार्ग काढण्याच्या हेतूने राज्य शासनाने आता 2011 व त्यापुर्वीच्या  कालावधीत झोपडपट्टी मध्ये निवास करणार्‍या रहिवाशांचेही पुर्नवसन करता...

पंढरी वार्ता:- शाळा प्रवेशापासून वंचीत राहीलेल्या दुर्बल घटकातील 25 टक्के विद्यार्थ्यांसाठी आता नव्याने प्रवेश प्रक्रिया ! गटशिक्षणाधिकार्‍यांवरील जबाबदारी वाढली. आता पालकांच्या उत्पतन्नाची अट 1 लाख तर एन.टी.आणि ओबीसींनाही विशेष सवलत.

Image
पंढरी वार्ता विशेष:-          केंद्र शासनाच्या शिक्षण ह्कक कायद्यानुसार अर्थिकद्रष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना 25 प्रवेश बंधनकारक करण्यात आल्यानंतरही अंमलबजावणी करताना शिक्षण संस्था चालक व शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्याकडून संगनमत करुनच ही प्रवेश प्रक्रिया पार पाडली जाते असा आरोप सातत्याने होत आला आहे.2018-19 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अर्तंगत राज्यात 1 लाख 26 हजार 877 जागा उपलब्ध असून 1 लाख 88 हजार ऑनालाईन प्रवेश अर्ज प्राप्त झाले आहेत.पहील्या फेरीत 49 हजार 318 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.या प्रवेश प्रक्रियेविरोधात राजेश पांचाळ यांनी हायकोर्टात जनहीत याचीका दाखल केल्यानंतर हायकोर्टाच्या आदेशा नुसार गुरुवारी राज्य शासनाने याप्रवेश प्रक्रियेत मोठे फेरबदल करण्याचे आदेश काढले आहेत.           शासनाच्या नव्या आदेशानुसार या प्रवेश प्रक्रियेबाबत खालील बदल करण्यात आले आहेत. 1) वंचीत गट व दुर्बल गट यांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत प्रचास व प्रसिध्दी द्यावी. 2)आता पर्यंत झालेल्या प्रवेश प्रक्रियेत प्रवेश दिलेल्या जागा सोडून रि...

पंढरी वार्ता :-विस्थापीत नगरातील अर्तंगत रस्ते खडीकरण व डांबरीकरणासाठी 71.92 लाखांचा निधी उपलब्ध ! नगरसेविका रेणुका घोडके यांच्या पाठपुराव्यास यश .

Image
पंढरपूर शहरातील विस्थापीत नगर येथील अर्तंगत रस्त्यांच्या कामासाठी पंढरपूर नगर पालीकेकडून 71.92 लाख रुपयांच्या कामास मंजुरी देण्यात आली असून या कामास लवकरच सुरुवात होणार आहे.विस्थापीत नगरातील रहिवाशांना पावसाळ्याच्या कालवधीत अर्तंगत रस्त्यांवर चिखल होत असल्याने मोठा त्रास सहन करावा लागत होता.या बाबत नगरसेविका रेणुका धर्मराज घोडके यांनी आ.प्रशांत परिचारक व नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांच्याकडे येथील रस्त्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी केली होती.या मागणीची तात्काळ दखल घेत या कामाच्या निविदा प्रक्रियेस सुरवात झाली असून पावसाळयापुर्वी येथील रस्त्यांची कामे पुर्ण होतील अशी अपेक्षा आहे.        या बाबत अधिक माहीती देताना नगरसेविका रेणुका घोडके म्हणाल्या की,विस्थापीत नगर येथील  ओपनस्पेसच्या ठिकाणी पावसाळ्यापुर्वी लोकसहभागातून वृक्षारोपन करण्यात येणार असून त्याच बरोबर या ठिकाणी जमीन समतल करुन लहान मुलांच्या खेळण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.     गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेल्या विस्थापीत नगर येथील अर्तंगत रस्त्यांच्या प्रश्‍न स...

पंढरी वार्ता:- जि.प.सदस्य बाळराजेंच्या पंढरीतील पहील्याच बैठकीनंतर भीमा व लोकशक्ती परिवारही विधानसभेसाठी सक्रिय ? मतदार संघ पुनर्रचनेनंतर 8 वर्षात पहिल्यांदाच बाळराजेंची पंढरीत बैठक ! 17 गावातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांपेक्षा नेहमीच्या समर्थकांचीच बैठकीला गर्दी ?

Image
सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष,जि.प.सदस्य बाळराजे पाटील यांनी शनिवारी मोहोळ मतदार संघात समाविष्ट असलेेल्या पंढरपूर तालुकयातील 17 गावच्या राष्ट्रवादीच्या मतदार संघ पुनर्ररचने नंतर पहिल्यांदाच कार्यकर्त्यांची बैठक घेतली असून बैठक घेत पंढरपूर तालुका राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बुचकाळ्यात पाडले असले तरी या बैठकीस राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी वगळता बाळराजे पाटील यांच्या नेहमीच्या समर्थकांचीच गर्दी होती अशी चर्चा आता पंढरपूर तालुक्यातील ‘त्या’ 17 गावात होत असून गेल्या आठ वर्षात कधी आमची आठवण झाली नाही आताच बैठकीचा फार्स कशासाठी अशीही प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अनेक समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे.              मोहोळ विधानसभा मतदार संघ हा मतदार संघ पुर्नरचनेत अनुसुचीत जातीसाठी राखीव ठेवण्यात आला.2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत या विधानसभा मतदार संघातून लक्ष्मणराव ढोबळे यांना उमेदवारी देण्यात आली.मात्र स्वाभिमानी बाण्याचे लक्ष्मणराव ढोबळे यांनी अनगरकरांचे वर्चस्व अमान्य करीत आपल्या पध्दतीने कारभार केला.त्याम...

पंढरी वार्ता:- तुळशी वृंदावनाच्या कामाची वनआयुक्त खांडेकर यांनी केली पाहणी ! आठ संताची मंदीरे,संगीत कारंजे कामांची 76 लाख रुपये खर्चाची निविदा प्रक्रिया सुरु ! पर्यावरण खात्याच्या नियमानुसार वनआयुक्तांचा बायोटॉयलेटसाठी आग्रह ?

Image
यमाई तलावाच्या ठिकाणी नमामी चंद्रभागे योजनेअर्तंगत सुरु असलेल्या तुळशी वृंदावनाच्या विविध कामांची विभागीय वनआयुक्त वि.म.खांडेकर यांनी आज भेट देवून पाहणी केली असून त्यांच्या समवेत सह.वनअधिकारी हरिश्‍चंद्र खांडेकर,वनसंरक्षक संजय माळी,उपविगागीय वनअधिकारी श्री कुलकर्णी आदी यांच्यासह वनविभागातील अनेक सह.अधिकारी उपस्थित होते.       नमामी चंद्रभागे योजनेचा मोठा गाजावाजा करीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ठिकाणी तुळशीचे रोपटे लावून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला होता.पुढे दोन वर्षे हे काम रखडलेले होते.मात्र त्यानंतर अर्थमंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी येथील तुळशीवनाच्या कामासाठी तातडीने साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजुर केला होता.नोव्हेंबर 2017 पासून रिटेनींग वॉल,कंपाउंड वॉल व डाव्या बाजुची संरक्षक भींत आदी कामांच्य निविदा प्रक्रियेस सुरुवात झाली तर डिसेंबर 2017 पासून प्रत्यक्षात कामास सुरुवातही झाली होती.सुरुवातीच्या काळात या कामास पंढरपूरकरांमधून प्रचंड विरोध झाला होता.     सद्या हे काम वेगाने पुर्ण केले जात असून आज वनआयुक्तांनी पंढरीत येवून या ...

पंढरी वार्ता आपलं पंढरपूर

Image
पंढरी वार्ता :-  N>ÌnVr e§^yamOo {dMmaYmam `wdm _§M `m§À`mdVrZo N>ÌnVr g§^mOramOo O`§Vr gmOar धर्मवीर  छत्रपती  संभाजी महाराज जयंती सोहळा छत्रपती शंभूराजे विचारधारा युवा मंच यांच्यावतीने चप्पल लाईन स्टेशन रोड पंढरपूर येथे संपन्न झाला. यावेळी संकल्प युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रथमेश कट्टे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी युवा मंचचे आयोजक सुहास कदम, गणेश कदम, योगेश कौजलगीकर , निखिल खटावकर ,  सचिन दिवटे , स्वप्निल रोपळकर, गणेश सोमवंशी , ओंकार चव्हाण , नागेश सोमवंशी , संदेश सरवदे आदी उपस्थित होते. धर्मवीर छ. संभाजी महाराज जयंती सोहळा छत्रपती शंभूराजे विचारधारा युवा मंच यांच्यावतीने चप्पल लाईन स्टेशन रोड पंढरपूर येथे संपन्न झाला. यावेळी संकल्प युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रथमेश कट्टे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी युवा मंचचे आयोजक सुहास कदम, गणेश कदम, योगेश कौजलगीकर , निखिल खटावकर ,  सचिन दिवटे , स्वप्निल रोपळकर, गणेश सोमवंशी , ओंकार चव्हाण , नागेश सोमवंशी , संदेश सरवदे आदी उपस्थित होते.

पंढरी वार्ता :- राणे प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजीराजे जयंती साजरी

Image
स्वराज्याचे पहिले युवराज  छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त आज दि.14 मे रोजी पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी चौक येथे राणे प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिमेस पुष्पहार   घालुन अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, डॉ.गायकवाड, राणे प्रतिष्ठान जिल्हाध्यक्ष एस.पी.गायकवाड, सुमित गायकवाड, अनिल आवटे, विशाल राऊत, सुरज कुकडे, ओंकार वाळके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पंढरी वार्ता :-101 रक्तदात्याने केले.रक्तदान

Image
  पंढरी वार्ता :- g§^mOr {~«JoS> C^maUma  N>ÌnVr g§^mOr _hmamO `m§Mm n§MYmVwMm ^ì` {Xì` nwVim ! आज दि.14 मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या 360 व्या जयंतीनिमित्त पंढरपूर मधील संभाजी चौक येथील पुतळ्यास पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. तसेच जिजाऊ पुतळा छत्रपती शिवाजी चौक येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करून त्या शिबीराचे उद्घाटन पंढरपूरचे कायदेशीर विधी तज्ञ श्री.ऍड.सरदार यांच्या शुभहस्ते व नगरसेवक प्रशांत शिंदे, विभागीय अध्यक्ष किरणराज घाडगे, शहराध्यक्ष स्वागत कदम, तालुकाध्यक्ष बाळासाहेब बागल, कार्याध्यक्ष स्वप्निल गायकवाड, ऍड.सागर आटकळे, विक‘मसिंह भोसले, संदिप पाटील, दादा फत्तेपुरकर, ऍड.राजेश भादुले, श्रीकांत शिंदे, धनंजय मोरे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी 101 रक्तदात्याने रक्तदान केले. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांचा पंचधातुचा पुतळा बसविण्याचा संकल्प करण्यात आला. कार्यक‘म यशस्वी क रण्यासाठी दादासाहेब बोडके, पुरूषोत्तम देशमुख, बंटी वाघ, अनिकेत मेटकरी, आकाश मांडवे, आकाश पवार, अमित देवकर, अभिषेक कर्णे आदिंनी परिश्रम घेतले.

पंढरी वार्ता:- नारायण चिंचोली ग्रामस्थांच्या वतीने हनुमंत देशमुख यांचा सत्कार ! जन्मभुमी आणि कर्मभुमीतील सत्काराने देशमुख भारावले.

Image
सांगली जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगार भाऊ पाटील या गेल्या 7 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस जेरबंद दिल्याबद्दल नारायण चिंचोली येथील रहिवाशी पोलीस हवालदार हनुमंत देशमुख यांचा नारायण चिंचोली ग्रामस्थ,राजे ग्रुप बहुद्देशीय संस्था व पोलीस मित्र संघटना यांच्या वतीने मा.सरपंच विठ्ठल माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.              पंढरपूर तालुक्यातील ईश्‍वर वठार येथील मुळचे रहिवाशी असलेले हनुमंत देशमुख हे गेल्या काही वर्षापासून नारायण चिंचोली येथे वास्तव्यास आहेत.एक कर्तव्यकठोर पोलीस कर्मचारी म्हणून ते परिचीत आहेत.हनुमंत देशमुख यांनी कर्तव्य बजावताना यापुर्वीही अनेक सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात प्रशंसनिय भुमिका बजावली आहे.त्यांचा अतिशय उत्साहपुर्ण वातावरण सत्कार करण्यात आला.तसेच यावेळी बाळासाहेब काळे प्राथमिक शिक्षक सोसायटीच्या चेअरमनपदी दिनकर खांडेकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.या सत्कार सोहळयास नारायण चिंचोली,भैरवनाथ वाडी व ईश्‍वर वठार येथील ग्रामस्थ व युवा वर्ग मोठया संख्येने सहभागी झाला होता.       यावेळी ब...

पंढरी वार्ता:- रेल्वे ओव्हरब्रीज खालील खड्डे बुजविण्यास सुरवात ! कोळी युवक महासंघाने दिला होता आंदोलनाचा इशारा.

Image
येथील तालुका पोलीस ठाण्यालगत असलेल्या रेल्वे ब्रीज खालील ऐन वळणावर मोठ मोठे खड्डे पडल्याने दुचाकी चालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत होती.व खड्डा चुकविण्याच्या नादात छोटया अपघाताच्या घटना घडत होत्या.या रस्त्यावर सातत्याने मोठी वर्दळ असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.या ठिकाणचे खड्डे तातडीने बुजवावेत अन्यथा भीक मांगो आंदोलन करुन हे खड्डे बुजवीले जातील असा इशारा कोळी युवक महासंघाने दिल्यानंतर आज पंढरपूर नगर पालीकेच्या वतीने तातडीने येथील खड्डे बजुविण्यास सुरुवात झाली आहे.          या बाबत बोलताना कोळी युवक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बबलू बोराळकर म्हणाले की,येथील खड्डे बुजवावेत अशी मागणी आपण नगर पालीकेकडे निवेदनाद्वारे केली होती व आंदोलनाचा इशाराही दिला होता.मात्र सोमवारी हे खड्डे बुजविण्यात येतील असे आश्‍वासन मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दिले होते.आज येथील खड्डे बुजविण्यास प्रारंभ झाला असून त्याच बरोबर सरगम चौक येथील खड्डे बुजविण्यात येणार असल्याची माहीती देण्यात आली आहे.नगर पालीका प्रशासनाने आमच्या निवेदनाची दखल घेत तातडीने खड्डे बुजविण...

पंढरी वार्ता:- लाडू प्रसाद निविदा प्रश्‍नी राष्ट्रवादी युवक कॉग्रेेस आक्रमक ! शहराध्यक्ष संदीप मांडवे यांचा उग्र आंदोलनाचा इशारा.

Image
आध्यात्माची दक्षिण काशी मानल्या जाणाजया पंढरीच्या श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातून लाखो भाविक येत असतात. या भाविकांना पांडुरंगाचा आवडता प्रसाद असणाजया बुंदीच्या लाडूचा प्रसाद सुविधापूर्वक मिळणेचे नियोजन करण्यात येत असते. याद्वारे दरवर्षी कोट्यावधी रूपयांची उलाढाल होत असते. सध्या ई-टेंडरिंगकडून प्रसादाचा लाडू व त्यासाठी लागणारे पॅकेजिंग याचे नियोजन केले आहे. परंतु  हे करण्यात आलेले नियोजन देण्यात आलेल्या ई-टेंडरिंगच्या पद्धतीप्रमाणे नसल्याने यावरती होत असलेला भाविकांचा देणगीरूपी पैशांचा खर्च अनाठायी होत आहे. त्यामुळे तो प्रसादाचा लाडू आणि त्याचे पॅकेजिंग ई-टेंडरिंगच्या पद्धतीनुसार करण्यात यावे. या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष संदीप मांडवे यांनी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे. राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे शहराध्यक्ष संदिप मांडवे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मंदिर समितीच्या वतीने प्रसादाच्या लाडवासाठी जे  ई-टेंडरिंग केले होते, सध्या त्या पद्धतीने नाही. टेंडर झाल्यानंतर अटी बदलण्यात आल्याचे अधिकार...

पंढरी वार्ता:- अजिंक्य स्पोर्ट ऍकडमीच्या खेळाडूंची भारतीय सैन्य दलात निवड. सलमान मुलाणी, किरण चव्हाण, मिलिंद भोसले ,समाधान थोरात, राहुल गाजरे यांचा युटोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक यांचे हस्ते सत्कार.

Image
श्री शिवछत्रपती स्टेडीअम साताय येथे झालेल्या सैन्य भरती प्रक्रियेत अजिंक्य स्पोर्ट ऍकडमी च्या पाच खेळाडू ची सैन्य दलात निवड झाली आहे. या सर्व नव सौनिकाचा सत्कार युटोपियन चे चेअरमन उमेश परिचारक याच्या हस्ते करण्यात आला देश सेवेचा ध्यास मनी घेतलेल्या सलमान मुलाणी, किरण चव्हाण, मिलिंद भोसले ,समाधान थोरात, राहुल गाजरे, या नवसौनिकाचा सन्मान या वेळी करण्यात आला. यावेळी बोलताना उमेश परिचारक म्हणाले की, यश हे सोपे असते कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते पण समाधान हे महाकठीण कारण त्याला मनाचीच परवानगी लागते. सर्व तरूणांनी न डगमगता  पोलीस व सैन्य दलात भरती होऊन देशासेवा करावी असे आव्हान त्यांनी केले.छोटस रोपट पंतनगर येथे लावलेले आहे त्याच लवकरच वटवृक्ष व्हावी आशी इच्छा त्यांनी व्यक्त केली सैन्यदला मध्ये समाविष्ट होण्यासाठी  खुप मेहनेत घ्यावी लागते. त्याच पद्धतीने आमच्या ऍकडमीचे  प्रशिक्षक सराव करून घेतात. प्रशिक्षक चेतन धनवडे यांनी अत्यंत खडतर  सराव करून घेतल्या मुळे सैन्य दलात प्रशिक्षणाची आता कसलची भिती उरली नसल्याचे मत किरण चव्हाण यांनी व्यक्त केले    . या कार्य...

पंढरी वार्ता:-कॉग्रेेस ओबीसी सेलने तहसिल कार्यालयासमोरील अपघातास कारणीभूत ठरणार्‍या ‘त्या’ रस्ता दुभाजकावर लावला रिफ्लेक्टर ! गुरुवारी रात्री पुन्हा एका कारचालकाची या रस्तादुभाजकास धडक

Image
येथील तहसिल कार्यालयासमोरुन रस्त्याच्या मधोमध सुरु होणारा हा रस्ता दुभाजक अनेकवेळा अपघातास कारणीभूत ठरला आहे.या ठिकाणी रात्रीच्या वेळी असलेले अंधाराचे साम्राज्य येथूनच सुरु होत असलेला या फूटभर उंचीच्या रस्ता दुभाजकामुळे या ठिकाणी कायम अपघात होत असलेले दिसून येतात.या रस्त्यावर प्रबोधनकार ठाकरे चौक ते तहसिल कार्यालय या रस्त्यावर रस्ता दुभाजक करताना प्रबोधनकार ठाकरे चौक ते जुना कराड नाका इथपर्यंत रस्ता दुभाजकाची रचना व उंची सहज द्रष्टीपथात येण्यासारखी आहे.मात्र येथून पुढे तहसिल कार्यालयापर्यंत हा रस्ता दुभाजक केवळ फूटभर उंचीचा असून हा बदल करण्याचे कारण मात्र आजतागायत गुलदस्त्यात आहे.               गुरुवारी रात्री साडे आठच्या सुमारास या रस्ता दुभाजकावर एक कार थेट जावून आदळली आणि पाठीमागून येणार्‍या अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांना आपली वाहने नियंत्रीत करताना फार मोठी कसरत करावी लागली होती.नागरिकांनी प्रयत्नाची शिकस्त करीत रस्ता दुभाजकावर चढलेली कार मागे ढकलून आतील प्रवाशांना बाहेर काढले होते.या घटनेनंतर सोशल मिडीयावर पुन्हा एकदा या अपघातास  कारणीभूत...

पंढरी वार्ता:-नविन वीज जोडणीसाठी ‘बोगस’ टेस्ट रिपोर्टचा आधार ? कमी विद्युत भार दाखविल्याने महावितरणला लाखोंचा फटका .

Image
महावितरणकडून घरगुती अथवा व्यवसायीक वापरासाठी नविन विद्युत कनेक्शन घेताना परवानाधारक विद्युत निरिक्षकाचा टेस्ट रिपोर्ट देणे बंधनकारक असून यानंतर संबधीत ग्राहकाला महावितरण कडून विद्युत जोडणी दिली जाते.या टेस्ट रिपोर्टमध्ये नमुद केलेला विद्युत भार लक्षात घेवूनच  ग्राहकांना विद्युत जोडणी शुल्क आकारले जाते.मात्र टेस्ट रिपोर्ट देताना कमी विद्युत भार दाखविल्याने महावितरणला प्राप्त होणार्‍या सुरक्षा ठेव रक्कमेवर मोठया प्रमाणात पाणी सोडावे लागत आहे. ग्राहकांनी नमूद केलेल्या जागेमध्ये प्रत्यक्षात वायरींग करणारा वायरमन वेगळाच आणि टेस्ट रिपोर्ट देणारा विद्युत अभियंता वेगळाच असा प्रकार सर्रास घडत आहे.ही बाब अतिशय धोकादायक असून अनेकवेळा शॉटसर्किंटने आग लागल्यानंतर केलेल्या पाहणीत चुकीच्या पध्दतीने वायरिंग केल्याने दुर्घटना घडल्याचे दिसून येते.अशावेळी संबधीत टेस्ट रिपोर्ट देणार्‍या विद्युत अभियंत्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.     प्रत्यक्षात वायरिंग करताना अनेक नियमांची काटेकोर अंमलबजावणी बंधनकारक असून यामध्ये, कुठल्याही कामासाठी लागणारे सामान याची निवड व सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्...

पंढरी वार्ता:- भीमा नदीला कालव्याचा दर्जा देण्यासाठी उग्र संघर्ष करू- आ.भारत भालके. सरकोली येथील शेतकरी मेळाव्यात दिला इशारा

Image
उजनी धरणाच्या प्रकटीकरणात भीमा नदीत पाणी सोडण्याचा उल्लेखच नाही.ज्या शेतकर्‍यांनी जमीनी देवून उजनी धरणासाठी त्याग केला त्याच शेतकर्‍यांना उजनीच्या पाण्यापासून वंचीत ठेवणयचे पाप हे सरकार करीत आहे.हे सरकार नाकर्ते सरकार आहे.यातील मंत्र्याची तोंडे सुध्दा पाहू वाटत नाहीत असले लोक राज्याचा कारभार हाकत आहेत.मात्र आम्ही नदीकाठच्या शेतकर्‍यांवर अन्याय होऊ देणार नाही.या प्रकटीकरणात बदल करण्यात नाही आला तर उग्र संघर्ष करू आणि शेतकर्‍यांच्या उद्रेकानंतर होणार्‍या परिणामाची जबाबदारी शासनाची असेल असा इशारा आ.भारत भालके यांनी सरकोली येथे आयोजीत शेतकरी मेळाव्यात दिला आहे.या मेळाव्यास मा.केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे,मा.मुख्यममंत्री अशोक चव्हाण,पृथ्वीराज चव्हाण,विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील,आ.प्रणिती शिंदे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

पंढरी वार्ता:- चला आपणच रुपया-रुपयाने आठ हजार गोळा करु अन् हे खड्डे बुजवू ! रेल्वे ओव्हरब्रीज खालच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी कोळी युवक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बबलू बोराळकर शनिवारी करणार भीक मांगो आंदोलन !

Image
पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यानजिक असलेल्या रेल्वे ओव्हर ब्रीज खालील रस्त्यावर पडलेले खड्डे चुकविताना वाहनचालकांना विशेषत: दुचाकी चालकांना मोठी कसरत करावी लागत असून हे खड्डे चुकवीताना अनेकवेळा छोटमोठे अपघात घडत असल्याचे दिसून येत आहे.तालुका पोलीस ठाण्याकडून खाली येताना ऐन वळणावरच हे खड्डे असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.त्यामुळे या ठिकाणच्या खड्डयाबाबत वाहनचालक प्रचंड नाराजी व्यक्त करीत असल्याचे दिसून येत असून या बाबत वृत्तपत्रातूनही बातम्या प्रसिध्द झाल्या आहेत.या बातम्यांची दखल घेत प्रशासनाने तातडीने या रस्त्यावरील हे तीन-चार मोठ मोठे खड्डे बुजवीणे गरजेचे असताना त्या कडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात आल्यानंतर कोळी युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष बबलू बोराळकर यांनी या बाबत अनोखे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून हे तीन ते चार खड्डे बुजविण्याच्या खर्चाचा अभ्यास करुन केवळ आठ हजार रुपये खर्च अपेक्षीत आहे हे लक्षात घेवुन ते शनिवार दिनांक 12 मे रोजी याच ओव्हर ब्रीजखाली भीक मांगो आंदोपलन करणार असून यातून जमा झालेल्या निधीतून आवश्यकता भासल्यास स्वत: खर्च करुन हे धोकादायक खड्...

पंढरी वार्ता:- ऊस दर,दुध दर,उजनीचे पाणी वाटप प्रकटीकरण,शेतकर्‍यांची रखडलेली कर्जमाफी अन् विजबीलासाठी उतरवलेले डि.पी.! सरकोलीच्या शेतकरी मेळाव्यात सुशिलकुमार शिंदे यांचे भाषण ऐकण्यासाठी शेतकरी उत्सुक !

Image
सोलापूर-मंगळवेढा मतदार संघाचे पाच वर्षे प्रतिनिधीत्व केलेले कॉग्रेसचे मा.खा.सुशिलकुमार शिंदे यांच्यासह राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सरकोली तालुका पंढरपूर येथे आयोजीत शेतकरी मेळाव्याची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली असून 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत खा.ऍड.शरद बनसोडे यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर गेली चार वर्षे पंढरपूर-मंगळवेढा व मोहोळ तालुक्यात केवळ एखाद्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहात असलेले सुशिलकुमार शिंदे हे आता पक्ष कार्यकर्त्यांच्या व शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा सक्रिय झाले असल्याची चर्चा या भागातील मतदारांमधून होत असतानाच सरकोली येथील शेतकरी मेळाव्यात ऊसाच्या एफआरपीचा प्रश्‍न,दुधाची नाकारलेली दरवाढ,कर्जमाफीच्या लाभापासून वंचीत राहीलेले शेतकरी,शेतकर्‍यांच्याजिवन मरणाचा प्रश्‍न असलेल्या उजनी धरणाच्या पाणी वाटप प्रकटीकरणाचा प्रश्‍न,सोलापूर शहरासाठी अमृत योजना मंजूर झाल्यानंतर भीमा नदीकाठच्या शेतकर्‍यांवर कोसळणारे संभाव्य जलसंकट,वीज बील भरले नाही म्हणून उतरवीले जाणारे डि.पी.आदी प्रश्‍नावर आक्रमकपण...

पंढरी वार्ता:- आधी जाहीर केलेली 3 रुपये दुध दरवाढ द्या, मग दुधभुकटीच्या अनुदानाबद्दल पाठ थोपटून घ्या ! -संजय पाटील घाटणेकर राज्यातील सहकारी व खाजगी दुध संघ कुठल्या राजकीय पक्षाची संबधीत आहेत हे आधी तपासून पहा !

Image
राज्य शासनाने दुध उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी नव्हे तर केवळ स्वत:ची पाठ थोपटून घेण्यासाठी दुधभुकटीस तीन रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला असून या निर्णयाचा प्रत्यक्ष फायदा शेतकर्‍यांना होणार नसून तो दुध भुकटीचे उत्पादन करणार्‍या सहकारी व खाजगी दुध संघांना होणार आहे.20 जुन रोजी दुग्धविकास मंत्री महादेव जाणकर यांनी दुध उत्पादकांना 3 रुपये दरवाढ देण्याची घोषणा केली मात्र त्याची अंमलबजावणी आजतागाय राज्यातील कुठल्याही खाजगी अथवा सहकारी दुध उत्पादक संकलन व प्रक्रिया संघाने केली नाही.तरीही गेली दहा महिने शासन याबाबत मौन बाळगून असतानाच आता केवळ दुग्ध उत्पादक शेतकर्‍यांसाठी आपण काहीतरी करीत आहोत या दर्शविण्यासाठीच आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत दुधभुकटीस 3 रुपये प्रतिकीलो अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून या या निर्णयाचा लाभ सामान्य दुध उत्पादक शेतकर्‍यांना काडीमात्र होणार नाही.सरकारमध्ये धमक असेल तर सहकारी व खाजगी दुध संघाना जून मध्ये जाहीर केल्या प्रमाणे दूध दरवाढ लागू करुन पुर्वलक्षी प्रमाणे शेतकर्‍यांना त्याची बीले अदा करण्यात यावीत अशी प्रतिक्रिया बळीराजा शेतकरी संघटनेचे ...

पंढरी वार्ता:-हुतात्मा स्मारकाशेजारील ध्वजस्तंभास टेकूनच केले जाते मद्यपान ! आ.रामहरी रुपनर यांनी विधानपरिषदेत केली होती तक्रार, तरीही परिस्थीती जैसे थे !

Image
पंढरीत भर वर्दळीच्या रस्त्यावर केले जणारे मद्यपान हा कायम टिकेचा विषय ठरला असून यामुळे तिर्थक्षेत्र पंढरीची प्रतिमा मलिन होत आहे.त्यामुळेच वारकारी पाईक संघाच्या निवेदनाची दखल घेत विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीनेही या बाबत ठराव केला होता. पंढरीत उघडयावर मद्यापन करण्याचे प्रकार गेल्या काही दिवसात मोठया प्रमाणात दृष्टीस पडत असतानाच रात्रीच्या वेळी येथील जिजामाता उद्यानातील हुतात्मा स्तंभाशेजारील ध्वजस्तंभास टेकुन मद्यपान केले जात असल्याने नागरिकांकडून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.      पंढरीतील हुतात्मा स्मृतीस्तंभाच्या परिसरात मद्यप्राशन केले जात असल्याची तक्रार आ.रामहरी रुपनर यांनी थेट विधानपरिषदेत केली होती.व या बाबत तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली होती.या बाबत पंढरी वार्ताने सर्वप्रथम वृत्त प्रकाशित केले होते.त्यानंतर काही काळ हा प्रकार थांबलेला असतानाच आता पुन्हा येथे तरुणांचे टोळकी रात्री मद्यपान करीत बसल्याने आढळून येत आहे.आपण ज्या ठिकाणी बसून मद्यपान करीत आहोत ती जागा देशासाठी बलीदान दिलेल्या हुतात्म्यांच्या पवित्र स्मृती जपत आहे.व ज्या ध्वजस्तंभास टेकून मद्यपान क...

पंढरी वार्ता:-मोहोळ मतदार संघात समाविष्ट 17 गावातील कार्यकर्त्यांची 13 मे रोजी पंढरीत बैठक जि.प.सदस्य बाळराजे पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार -संकेत ढवळे

Image
मोहोळ मतदार संघात समाविष्ट असलेल्या पंढरपूर तालुक्यातील 17 गावातील कार्यकर्त्यांच्या व पदाधिकार्‍यांच्या बैठकीचे रविवार दिनांक 13 मे रोजी आयोजन करण्यात आले आहे. जि.प.सदस्य बाळराजे पाटील यांच्यासह राष्ट्रवादी कॉग्रेसचे विविध पदाधिकारी या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेणार आहेत अशी माहीती राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संकेत ढवळे यांनी दिली आहे.    या बाबत अधिक माहीती देताना संकेत ढवळे म्हणाले की,जि.प.सदस्य बाळराजे पाटील यांनी पंढरपूर तालुक्यातील 17 गावांमध्ये संंवाद बैठकांचे आयोजन करणार असल्याचे जाहीर केले आहे.या बाबत विचार विनिमय करण्यासाठी पंढरीत 13 मे रोजी विश्रामगृह येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.या बैठकीस राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रांतिक सदस्य राजूबापू पाटील,जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील,मतदार संघ अध्यक्ष दिपक वाडदेकर,तालुकाध्यक्ष ऍड.दिपक पवार,तालुका कार्याध्यक्ष हनुमंत पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.या बैठकीनंतर जि.प.सदस्य बाळराजे पाटील हे या 17 गावचा झंजावाती दौरा करु...

पंढरी वार्ता:-धान्य पुरवठा ठेकेदाराच्या विरोधात आ.गणपतराव देशमुखांचा नाराजीचा सूर ! आ.बबनदादा शिंदे व आ.भारत भालके यांनीही विधानसभेत उठविला होता आवाज ठेकेदाराच्या मनमानीमुळे हजारो कटुुंबे स्वस्त धान्यापासून वंचीत

Image
जिल्यातील स्वस्त धान्य दुकांनांना वाहतुक ठेकेदाराकडून सुरळीतपणे धान्य पुरवठा होत नसल्याने सर्वसामान्य कुटुंबे स्वस्त धान्यापासून वंचीर रहात असून अनेक वेळा चालू महिन्याचा माल स्वस्त धान्य दुकाना पर्यंत पोहोचण्यास महीना अखेरचा कालावधीत उजाडत असल्याने महिन्याच्या सुरुवातीस हाती आलेली तुटपुंज्या पगाराची रक्कम संपून गेल्याने अनेक कुटुंबाना स्वस्थ धान्य दुकानातील धान्य खरेदीस मुकावे लागत आहे.धान्य पुरवठादार ठेकेदाराच्या मनमानी विरोधात नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ.बबनदादा शिंदे व आ.भारत भालके यांनी आवाज उठवला होता व संबधीत धान्य पुरवठा ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी केली होती.आता आ.गणपतराव देशमुख यांनीही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत अन्न व नागरी पुरवठा मंत्र्याची भेट घेवून आपण हा गंभीर प्रकार त्यांच्या समोर मांडणार आहोत असे स्पष्ट केले आहे.            आ.बबनदादा शिंदे व आ.भारत भालके यांनी विधानसभेत प्रश्‍न उपस्थित केल्यानंतर या बाबत धान्य पुरवठा ठेकेदाराकडून खुलासा मागविण्यात आला आहे व विलंबाबत कारवाई करण्यात येत आहे असे आश्‍वासन ना...

पंढरी वार्ता:-चंद्रभागेकाठच्या लाल पुररेषेच्या आतील बांधकाम परवान्यासाठी आता शासनाचा नवा नियम ! जोत्याची उंची लाल पुररेषेच्या समांतर ठेवण्याचे आदेश ! पंढरीच्या पुरबाधीत क्षेत्रात होणार नियमाची अंमबलबजावणी ? पुररेषेच्या आतील झोपडपट्टयांना बसणार नव्या नियमाचा फटका !

चंद्रभागा नदीच्या काठावर वसलेल्या पंढरीस आता पर्यंत अनेकवेळा पुराचा फटका बसला असून गेल्या शंभर वर्षाच्या इतिहासाचे अवलोकन केले असता 1956 व 2007 मध्ये चंद्रभागा नदीस आलेला पुर हा  सर्वात मोठा महापूर समजला जातो.पंढरपूर शहर हे मुख्यत: चंद्रभागा नदीच्या काठावर वसलेले असून गेल्या वीस वर्षात या शहराचा विस्तार उपनगरांच्या माध्यमातून मोठया प्रमाणात झाला आहे.मात्र या शहराचा मुख्य गावठाण भाग म्हणून ओळखल्या गेेलेल्या चंद्रभागा नदीच्या काठावरच अनेक मोठ मोठे मठ व दाट लोकवस्ती असल्याचे आढळून येते. जेव्हा भीमा नदीस पूर येतो तेव्हा नदीकाठच्या रहिवाशांनाच मोठया प्रमाणात विस्थापीत व्हावे लागते.हा निरंतरचा धोका लक्षात घेवून शासनाच्या जलसंपदा विभागाने 3 मे रोजी याबाबत नव्याने आदेश निर्गमीत केले असून नदीकाठच्या परिसरात बांधकाम परवाने देताना नदीकाठच्या परिसरातील बांधकामांच्या जोत्याची उंची ही लाल पूररेषेच्या आत असली पाहीजे व लाल पुररेषेपेक्षा अधिक धोकादायक असलेल्या निळ्या रंगाच्या पुररेषेेत स्थायी स्वरुपाच्या बांधकामांना परवानगी देण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.   महाराष्ट्रात साधा...

पंढरी वार्ता:- अनिधिकृत बांधकाम केलेल्या मालमत्तांचा खरेदी-विक्री दस्त नोंदविण्यास प्रतिबंध ! बेकायदा बांधकामाची यादी नगर पालीकेने तात्काळ प्रसिध्द करण्याचे नगर विकास विभागाचे आदेश. बेकायदा बांधकामाकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल होणार.

Image
 बेकायदेशीर बांधकामांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थाना नागरी सुविधा पुरविण्यात मोठा अडथळा निर्माण होत असल्याने शहरांची अवस्था बकाल होत आहे.अनधिकृत बांधकामे व अनधिकृतरित्या गुंठेवारी करुन प्लॉटजागांची खरेदी-विक्री केली जात असल्याने या भागातील पाणी पुरवठा,रस्ते,गटारी आदी सुविधा देेताना नगर पालीका प्रशासनास अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे वाढत्या बेकायदेशीर बांधकामांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने आता आणखी कठोर उपायोजना करण्याचा निर्णय घेत 3 मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार नगर पालीकेने अशा बेकायदेशीर बांधकामांची यादी आपल्या संकेतस्थळावर प्रसिध्द करावी त्याच बरोबर वृत्तपत्रातून शहरातील बेकायदा बांधकामांची माहीती द्यावी असे आदेश शासनाच्या नगर विकास विभागाने दिले आहेत.          शासनाच्या या आदेशानुसार आता नगर पालीकेने वार्डनिहाय बेकायदा बांधकामांची यादी दुय्यम निबंधकांंकडे तात्काळ सादर करणे बंधनकारक असून दुय्यम निबंधकांनी बेकायदा बांधकाम असलेल्या स्थावर मालमत्तांची तसेच अनधिकृत प्लॉट जागांचे खरेदी-विक्री दस्त नोेंदवून  घेवू नयेत असे आदेश दे...

पंढरी वार्ता:- सुशिलकुमार शिंदेचे मौन तर खा.विजयसिंह मोहीते-पाटील यांची आक्रमक भुमिका ! भीमा नदी काठच्या शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी पालकमंत्रीही प्रयत्नशील ?

Image
सोलापूर शहरासाठी स्मार्ट सिटी योजनेबरोबरच अमृत योजनेसही आता मंजूरी मिळाली असून या योजनेअर्तंगत सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून सोडण्यात येणारे पाणी बंद करुन त्या ऐवजी आता  उजनीच्या पाण्याचा अपव्यय टाळण्याच्या हेतूने अमृत योजनेद्वारे उजनी धरण ते सोलापूर या समांतर पाईपलाईन साठी जवळपास 439 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे.या घोषणेनंतर सोलापूर शहर भाजपासाठी सरकारच्या उपलब्धीचा भाग म्हणून आणखी एक प्रचाराचा मुद्दा उपलब्ध झाला असला तरी सोलापूर शहरासह संपुर्ण जिल्हयाची तहान भागेल या आशेने उजनी धरणासाठी आपल्या जमीनी दिलेल्या जिल्ह्यातील ग्रामिण जनतेमध्ये विशेषत: नदीकाठच्या रहिवाशांमधून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.समांतर जलवाहीनीमुळे उजनीतून भीमा नदीत सोडली जाणारे आवर्तने रद्द केली जाणार असल्याच्या चर्चेने भीमा नदीकाठ अस्वस्थ असून याविरोधात प्रचंड संतप्त भावना व्यक्त होत आहेत.या बाबत खा.विजयसिंह मोहीते-पाटील यांनीही नुकतीच संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती.लोकभावना लक्षाथ घेवून जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजयसिंह देशमुख यांनी या बाबत मुख्यमंत्र्यांना साकडे ...