आपलं पंढरपूर:- आ.भालकेंचा पाठपुरावा,ना.निलंगेकरांचे आश्वासन आणि कामगार आयुक्त कार्यालयाचा खोडा ! पंढरीत ‘कामगार कल्याण’कार्यालय केव्हा होणार ?
पंढरपूर शहर व आसपासच्या तालुक्यातील कामगार बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा,कामगार आयुक्त कार्यालय व कामगार कल्याण मंडळाच्या मायमातून राबविण्यात येणार्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी पंढरीत कामगार कल्याण मंडळाचे कार्यालय व्हावे अशी मागणी आ.भारत भालके यांनी राज्याचे कामगार मंत्री ना.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडे केली होती.त्यावेळी आपण लवकरच पंढरपूर येथे विभागीय कामगार कल्याण मंडळाचे कार्यालय स्थापन करुन कामगारांना न्याय देण्याबरोबर त्यांना विविध शासकिय योजना व सवलती चा लाभ मिळावा यासाठी उपायोजना करू असे आश्वासन ना.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आ.भारत भालके यांना दिले होते.मात्र या त्यांच्या लेखी आश्वासनाची आजतागायत पुर्तता झाली नसून त्या मुळे अनेक कामगार विविध योजनांपासुन वंचीत रहात आहेत. सोलापूर येथे कामगार कल्याण मंडळाचे व सह.कामगार अयुक्त कार्यालय आहे.मात्र खाजगी आस्थापना,सहकारी व खाजगी साखर कारखाने,विविध खाजगी उद्योग तसेच व्यापारी संस्था यामध्ये काम करणारे अनेक कामगार सोलापूरातील कार्यालयात गेल्यानंतर त्यांना ...