पंढरी वार्ता :-पंढरीतील गुंडगीरीवर आज कोण कोण बोलणार ? पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील आज कोर्टी येथील‘सिंहगड’वर पंढरपूरकरांशी संवाद साधणार .
गेल्या काही वर्षात पंढरपूर शहरात सुरु असलेले हत्यासत्र,येथील गुंडगीरी,अवैध सावकारीची दहशत,सर्वसामान्य जनतेमध्ये पोलीस आणि कायदा याबद्दल निर्माण झालेले अविश्वासाचे वातावरण,येथील गुंडांना मिळालेला राजकीय वरहस्त,वाळूचोरी,सावकारीच्या माध्यमातून मिळालेल्या अफाट संपत्तीच्या बळावर गल्लीतील कट्टयावर बसणार्या बेरोजगार तरुणांचा स्वत:च्या राजकीय वर्चस्वासाठी केला जाणार वापर आणि सर्वात म्हत्वाचे म्हणजे येथे एवढे सगळे घडत असताना पंढरपूरचे भाग्यविधाते म्हणवून घेणार्या येथील नेतेमंडळींनी बाळगलेले मौन यामुळे पंढरपूर शहरातील सर्वसामान्य जनतेमधील आत्मविश्वास हरवीला होता.कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी गतवर्षी मार्च महिन्यातच येथील जनतेशी संवाद साधत पोलीस ठोस कारवाई करतील,गुंडाना मोका लावतील,स्थानबध्द करतील असे सांगत येथील जनतेध्ये पोलीसांबद्दल ‘विश्वास’ निर्माण केला होता. गेल्या वर्षभरात घडलेल्या अनेक गंभीर गुन्ह्यात ना कुठल्या आरोपीवर मोका लावण्यात आला ना पोलीसांच्या कठोर कारवाईचा धोका ओळखून येथील गुंडगीरी,दहशत संपुष्टात आली.आज पुन्हा विश्वास न...